HOME

THE BOMBAY PROHIBITION ACT, 1949

View all order & notifications Forms / Schedules

, dated 20th May, 1949

Glossary

The Maharashtra Prohibition Act, 1949.

After adopting the Government of India Act, 1935, the responsibility for regulating intoxicants and alcohol was transferred to the state governments. The states were given the power to regulate the production, distribution, and sale of alcohol. The provincial Government formed in the state of Bombay adopted a stricter policy of regulation and enacted the Bombay Prohibition Act in 1949, (repelling the British era   The Bombay Abkari Act,1876 ) which prohibited the manufacture, sale, and consumption of alcohol in the state. The act also established the Director of Prohibition and Excise as head of the Prohibition and Excise Department with the responsibility of administration and carrying out the provisions of the Act, including the regulation of the production, distribution, consumption and sale of alcohol in the state. This act provides for licensing, regulating & controlling the alcoholic liquors and raw materials used for manufacturing of the liquor.  

Government have power under section 139 & 143 to makes the orders & rules respectively. Commissioner State excise has power to make regulation under section 144. Using these powers there are around 49 rules and 5 regulations and around 139 orders issued by government until end of 2011. Many numbers of new notifications, new rules & new orders are issued after last printed copy of Excise Manual.  All notifications, rule, regulation and orders  are digitally & logically linked in this system. you can click on a link   provided at each section number to go to all new amendments, notifications, orders etc relevant to that perticuler section number, again from the link button  provided on table of notification & orders you can go to all concern section number or rule number  provided in link. Hope you will find it useful & interesting.


  1. 16, dated 17th July, 2017

WHEREAS it is expedient to amend and consolidate the law relating to the promotion and enforcement of and carrying into effect the policy of Prohibition and whereas it is also necessary to amend and consolidate the Abkari law in the State of Bombay for the said purpose and to provide for certain other purposes hereinafter appearing; It is hereby enacted as follows:


Section 1 SHORT TITLE, EXTENT AND COMMENCEMENT. संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ.

1 Short Title, Extent and Commencement. संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ..[View all order & notifications]

(1)

This Act may be cited as the Bombay Prohibition Act, 1949.

या अधिनियमास, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, असे म्हणावे.

(2)

It extends to the whole of the State of Maharashtra

तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे.

(3)

It shall come into force in the area comprising the pre-Reorganisation State of Bombay on such date as the State Government may by notification in the Official Gazette specify.

 In those areas of the State to which it is extended by the Bombay Prohibition (Extension and Amendment) Act, 1959, it shall come into force on such other date that Government may, by like notification, appoint:

Provided that having regard to the nature of the outstill area of the Chanda District, the general backwardness of the people residing therein, and the necessity of preparing an adequate background before the introduction of prohibition therein, the State Government may, if it thinks fit, fix a different date for bringing the Act into force in that area.

Explanation.— In this sub- section the expression “outstill area of the Chanda District” means the areas of the Chanda District specified in Schedule I-A.

तो राज्य शासन, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे जो दिनांक विनिर्दिष्ट करील त्या दिनांकास पुनर्रचनेपूर्वीच्या मुंबई राज्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातट अमलात येईल. तसेच, उक्त अधिनियम, मुंबई दारूबंदी (व्याप्ती व सुधारणा) अधिनियम, 1959 अन्वये राज्याच्या ज्या क्षेत्रास लागू करण्यात आला असेल त्या क्षेत्रात ते शासन तत्सम अधिसूचनेद्वारे नेमील अशा इतर दिनांकास तो अंमलात येईल :
 

परंतु, चांदा जिल्ह्रातील हातभट्टी असलेल्या क्षेत्राची परिस्थिती, त्या क्षेत्रात राहणा-या व्यक्तींची सर्वसाधारण मागासलेली स्थिती आणि तेथे दारूबंदीस सुरुवात करण्यापूर्वी योग्य पाश्र्वभूमी तयार करण्याची गरज लक्षात घेऊन, राज्य शासनास जर योग्य वाटेल तर, त्या क्षेत्रात हा अधिनियम अंमलात आणण्यासाठु वेगळा दिनांक ठरविता येईल.

स्पष्टीकरण.----या पोट-कलमातील “चांदा जिल्ह्रातील हातभट्टी असलेले क्षेत्र” याचा अर्थ अनुसूची एक-अ मध्ये विनिर्दिष्ट केलेले चांदा जिल्ह्राचे क्षेत्र असा होतो.

(4)

On the commencement of this Act in the manner provided in sub-section (3) in any area to which this Act is extended by the Bombay Prohibition (Extension and Amendment) Act, 1959, all rules, regulations, orders and notifications made or issued or deemed to be made or issued under this Act and in force in the pre-reorganisation State of Bombay excluding the transferred territories immediately before such commencement, shall also extend to, and be in force in that area.

पोट-कलम (3) मध्ये तरतूद केलेल्या रीतीने हा अधिनियम अंमलात आल्यावर मुंबई दारूबंदी (व्याप्ती व सुधारणा) अधिनियम, 1959 अन्वये हा अधिनियम ज्या कोणत्याही क्षेत्रास लागू करण्यात आला असेल अशा क्षेत्रात, दुस-या राज्यात घातलेले प्रदेश वगळून पुनर्रचनेपूर्वीच्या मुंबई राज्यात अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी अंमलात असलेले व या अधिनियमान्वये करण्यात आले असतील किंवा काढण्यात आले असतील किंवा केल्याचे किंवा काढण्यात आले आहेत असे समजण्यात येत असतील असे सर्व नियम, विनियम, आदेश व अधिसूचना उक्त क्षेत्राससुद्धा लागू करण्यात येतील आणि त्या क्षेत्रात अमलात येतील.
 

 

Section 2 DEFINITIOS. व्याख्या

2 Definitios. व्याख्या.[View all order & notifications]

In this Act, unless there is anything repugnant in the subject or context,-

विषयात किंवा संदर्भात एतंद्विरुद्ध काही नसल्यास या अधिनियमात,

(1)

“authorization” means an authorization granted under section 45 for the use of liquor for sacramental purposes;

“प्राधिकारपत्र” याचा अर्थ, कलम 45 अन्वये धार्मिक विधीसाठी दारूचा उपयोग करण्याकरिता दिलेले प्राधिकारपत्र असा आहे.
(2)

“to bottle” with its various grammatical variations, means to transfer any article from a cask or other vessel to a bottle, jar, flask, pot or similar receptacle for the purpose of sale, whether any process of manufacture be employed or not; bottling includes re- bottling.

“बाटलीत भरणे” याचा अर्थ, त्याचे व्याकरणदृष्ट्या होणारे फेरफार धरून विकण्यासाठी कोणताही पदार्थ पिंपातून किंवा इतर भांड्यातुन काढून तो बाटली, बरणी, कुपी, घट किंवा तत्सम पात्रे यात भरणे, असा समजावा मग त्यासाठी माल तयार करण्याचा कोणत्याही प्रक्रियेचा उपयोग केला असो व नसो ; “बाटलीत भरणे” या शब्दप्रयोगात “पुन्हा बाटलीत भरणे” याचा समावेश होतो ;

(4)

“Collector” includes an officer appointed by the State Government to exercise all or any of the powers and to perform all or any of the duties or functions of a Collector under this Act;

“जिल्हाधिकारी” यामध्ये, या अधिनियमान्वये जिल्हाधिका-याचे सर्व किंवा कोणतेही अधिकार चालविण्यासाठी किंवा जिल्हाधिका-याची सर्व किंवा कोणतेही कर्तव्ये किंवा कामे पार पाडण्यासाठी राज्य शासनाने नेमलेला अधिकारी याचा समावेश होतो;

(5)

“Commissioner” means an officer appointed as the Commissioner of Prohibition and Excise under section 3 of the Act and includes any officer on whom the State Govern- ment may confer all or any of the powers of the Commissioner under this Act;

“आयुक्त” याचा अर्थ, या अधिनियमाच्या कलम 3 अन्वये, आयुक्त, दारूबंदी व उत्पादन शुल्क म्हणून नेमण्यात आलेला अधिकारी असा आहे आणि त्यामध्ये राज्य शासन या अधिनियमाखालील आयुक्ताचे सर्व किंवा कोणतेही अधिकार ज्याला देईल अशा कोणत्याही अधिका-याचा समावेश होईल;

(6)

“committee or board” means a committee or board appointed by the State Government under section 7;

“समिती” किंवा मंडळ याचा अर्थ, कलम 7 अन्वये राज्य शासनाने नेमलेली समिती किंवा मंडळ असा आहे;

(7)

“Common drinking house” means a place where the drinking of liquor or consumption of any intoxicating drug is allowed for the profit or gain of the person owing, occupying, using, keeping or having the care of management or control of such place whether by way of charge for the use of the place or for drinking facilities provided, or otherwise howsoever and includes the premises of a club or any other place which is habitually used for the purpose of drinking liquor or consuming any intoxicating drug by more than one person without a licence granted under this Act;

“दारूचा गुत्ता” याचा अर्थ, जी कोणतीही जागा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असेल किंवा तिचा तो भोगवटा करीत असेल, वापर करीत असेल, ती ताब्यात ठेवीत असेल किंवा तिच्यावर देखरेख ठेवीत असेल किंवा तिची व्यवस्था पाहत असेल किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवीत असेल आणि जीत तिचा वापर केल्याबद्दल किंवा तिच्यात दारू पिण्याची सोय केल्याबद्दल आकार घेऊन किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अशा व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा कमाईसाठी दारू पिण्याची किंवा कोणतेही मादक औषधिद्रव्य सेवन करण्यासाठी परवानगी दिली असेल अशी जागा, असा आहे ; व त्यात या अधिनियमांन्वये दिलेल्या लायसनवाचून एकापेक्षा अधिक व्यक्तीकडून दारू पिण्याकरिता किंवा कोणतेही मादक औषधिद्रव्य सेवन करण्याकरिता जिचा वारंवार उपयोग करण्यात येतो त्या क्लबच्या जागेचा किंवा कोणत्याही इतर जागेचा समावेश होतो ;

(8)

“country liquor” includes all liquor produced or manufactured in India;

“देशी दारू” यात भारतात उत्पादन केलेल्या, किंवा तयार केलेल्या सर्व प्रकारच्या दारूचा समावेश होतो;

(9)

“cultivation” means raising a plant from seed and includes the tending or protecting of a plant during its growth;

“लागवड करणे” याचा अर्थ, बी लावून रोपटे वाढविणे, असा आहे; आणि यात, रोपट्याची वाढ होत असताना त्याची जोपासना करणे किंवा रक्षण करणे यांचा समावेश होतो;

(10)

“denatured” means subjected to a process prescribed for the purpose of rendering unfit for human consumption;

“विप्रकृत” याचा अर्थ मनुष्याच्या सेवनास अयोग्य करण्याकरिता ज्यावर विहित केलेली क्रिया केली आहे असा आहे;

(10a)

“denatured spirituous preparation” means any preparation made with denatured spirit 3[or denatured alcohol] and includes lacquers, French Polish and varnish prepared out of such spirit or alcohol;

“विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ” याचा अर्थ, विप्रकृत मद्यसार किंवा विप्रकृत मद्यार्कट वापरुन केलेला कोणताही सिद्धपदार्थ असा आहे; व तीत असे मद्यसार किंवा मद्यार्क यापासून तयार केलेले लाखरोगण, फ्रेंच पॉलिश व वॉर्निश यांचा समावेश होतो;

(12)

“ to drink” with its grammatical variations means to drink liquor or to consume any intoxicating drug;

“पिणे” याचा अर्थ, त्याचे व्याकरणदृष्ट्या होणारे फेरफार धरून, दारू पिणे किंवा कोणतेही मादक औषधिद्रव्ये सेवन करणे असा आहे ;

(13)

“excisable article” means—

(a)  any alcoholic liquor for human consumption,

(b) an intoxicating drug or hemp,

(c) opium,

(d) other narcotic drugs and narcotics which the State Government may, by noti- fication in the Official Gazette, declare to be an excisable article;

 “उत्पादनशुल्कयोग्य पदार्थ” याचा अर्थ 
(अ) मनुष्याने सेवन करण्यासाठी असलेले कोणतेही मद्यार्कयुक्त पेय.
(ब) मादक औषधी किंवा भांग.
(क) अफू,
(ड) राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे उप्तादन शुल्क योग्य पदार्थ म्हणून जाहीर करील अशी इतर अंमली औषधिद्रव्ये आणि अंमली द्रव्ये असा आहे;

(14)

“excise duty” and “countervailing duty” means such excise duty or countervailing duty, as the case may be, as is mentioned in entry 51 in list II in the Seventh Schedule to the Constitution;

“उत्पादनशुल्क” व “प्रतिशुल्क” याचा अर्थ संविधानाच्या सातव्या अनुसूचीतील सूची 2 मधील नोंद 51 यातट नमूद केल्याप्रमाणे असलेले यथास्थिति, उत्पादनशुल्क किंला प्रतिशुल्क असा आहे;

(15)

“excise revenue” means revenue derived or derivable from any duty, fee, tax, fine (other than a fine imposed by a court of law) or confiscation or forfeiture imposed or ordered under the provisions of this Act, or of any other law for the time being in force relating to intoxicants;

“उत्पादनशुल्क महसूल” याचा अर्थ या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये किंवा मादक द्रव्यासंबंधी त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही इतर कायद्याच्या तरतुदींअन्वये बसविलेले कोणतेही शुल्क फी, कर किंवा (न्यायालयाने बसविलेल्या दंडाव्यतिरिक्त इतर) दंड अथवा आदेशाअन्वये जप्त केलेला किंवा सरकारजमा केलेला माल यापासून मिळालेला किंवा मिळण्याजोगा महसूल असा आहे;

(16)

“export” (except in section 147) means to take out of the State otherwise than across a customs frontier     

“निर्यात करणे” याचा अर्थ (कलम 147 व्यतिरिक्त) सीमा शुल्क सरहद्द न ओलांडता इतर रीतीने राज्याबाहेरट नेणे, असा आहे;

(17)

“foreign liquor” means all liquor produced or manufactured outside India;

Provided that the State Government may by notification in the Official Gazette declare, that any specified description of country liquor shall, for the purposes of this Act, be deemed to be foreign liquor;

“परदेशी दारु” याचा अर्थ, भारताबाहेर उत्पादन केलेली किंवा तयार केलेली सर्व प्रकारची देशी दारु, असा आहे.

परंतु, राज्य शासनास राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, कोणत्याही विशिष्ट प्रकारची देशी दारु ही या अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता परदेशी दारू आहे असे जाहीर करण्याचा
अधिकार आहे;

(18)

“hemp” means any variety of the Indian hemp plant from which intoxicating drugs can be produced ;

“भांग” याचा अर्थ, भांगेच्या ज्या झाडापासून मादक औषधिद्रव्ये तयार करता येतात ते भारतातील कोणत्याही प्रकारचे भांगेचे झाड, असा आहे;

(19)

“hotel licence” means a licence granted under section 35 ;

“हॉटेल लायसन” याचा अर्थ, कलम 35 अन्वये दिलेले लायसन असा आहे;

(19a)

“household” means a group of persons residing and messing jointly as members of one domestic unit, but does not include their servants ;

“कुटुंब” याचा अर्थ, एकाच घरातील व्यक्ती म्हणून एकत्र राहणा-या आणि जेवण घेणा-या व्यक्तींचा गट असा आहे. परंतु तीत त्यांच्या नोकरांचा समावेश होत नाही;

(20)

“import” (except in section 147) means to bring into the State otherwise than across a customs frontier. 

“आयात करणे” याचा अर्थ, सीमा शुल्क सरहद्द न ओलांडता इतर रीतीने राज्यात आणणे, असा आहे (कलम 147 मध्ये याचा अर्थ या व्याख्येप्रमाणे होत नाही);

(21)

"interim permit” means a permit granted under section 47 ;

“अंतरिम परवाना” याचा अर्थ, कलम 47 अन्वये दिलेला परवाना असा आहे;

(22)

“intoxicant” means any liquor, intoxicating drug, opium or any other substance, which the State Government may, by notification in the Official Gazette, declare to be an intoxicant ;

“मादक द्रव्य” याचा अर्थ, कोणतीही दारु, मादक औषधिद्रव्य, अफु किंवा राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे मादक द्रव्य म्हणून जाहीर करील असा कोणताही इतर पदार्थ, असा आहे ;

(23)

“intoxicating drugs” means—

(a)    the leaves, small stalks and flowering or fruiting tops of the Indian hemp plant (Cannabis Sativa L) including all forms known as bhang, sidhi, or ganja

 (b)    charas, that is, the resin obtained from the Indian hemp plant, which has not been submitted to any manipulations other than those necessary for packing and transport ;

(c)    any mixture with or without neutral materials of any of the above forms of intoxicating drug or any drink prepared therefrom ; 

 (d) any other intoxicating or narcotic drug or substance together with every preparation or admixture of the same which the State Government may be notification in the Official Gazette, declare to be an intoxicating drug for the purposes of the Act, such drug, substance, preparations or admixture, not being opium coca leaf or a manufactured drug as defined in section 2, of the Dangerous Drugs Act, 1930 ;

“मादक औषधीद्रव्य” याचा अर्थ-----

(अ) भारतातील भांगेच्या झाडाची (कॅनॅबिस सॅटिव्हा एल) पाने, बारीक देठ व फुले किंवा फळे, येणारी बोंडे, यात भांग सिद्धी किंवा गांजा या सर्व प्रकारांचा समावेश होतो;

(ब) चरस याचा अर्थ संवेष्टन व परिवहन यांसाठी आवश्यक असलेल्या, क्रियेव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रिया ज्यावर करण्यात आलेल्या नाहीत अशी भारतातील भांगेच्या झाडापासून मिळणारी राळ;

(क) वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या मादक औषधिद्रव्याचे उदासीन पदार्थ घालून किंवा त्याशिवाय तयार केलेले कोणतेही मिश्रण किंवा त्यापासून तयार केलेले कोणतेही पेय;

(ड) राज्य शासन राजपत्रात प्रसिद्द केलेल्या अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता मादक औषधिद्रव्य म्हणून जाहीर करील असे कोणतेही इतर मादक किंवा अमली औषधिद्रव्य किंवा पदार्थ व त्यापासून तयार केलेला प्रत्येक पदार्थ किंवा मिश्रण, असे औषधिद्रव्य, पदार्थ, तयार केलेला पदार्थ किंवा मिश्रण हे अपायकारक औषधिद्रव्य अधिनियम, 1930, कलम 2 मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे अफू, कोका पान किंवा तयार केलेले औषधिद्रव्य असता कामा नये; असा आहे;

(24)

“liquor” includes—

(a)    spirits’ denatured spirits, wine, beer, toddy and all liquids consisting of or containing alcohol; and

(b)    any other intoxicating substance which the State Government may, by notification in the Official Gazette, declare to be liquor for the purposes of this Act;

“दारु ” यात--
(अ) मद्यसार, विप्रकृत मद्यसार, वाईन, बीअर, ताडी आणि मद्यार्काचे बनलेले किंवा मद्यार्क असलेले सर्व प्रवाही पदार्थ; आणि
(ब) राज्य, शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता दारु म्हणून जाहीर करील असा कोणताही इतर मादक पदार्थ, यांचा समावेश होतो;

(25)

“manufacture” includes—

(a)    every process whether natural or artificial by which any liquor or intoxicating drug is produced, prepared or blended and also redistillation and every process for the rectification, flavouring, or colouring of liquor or intoxicating drug but does not include flavouring, blending or colouring of liquor or intoxicating drug lawfully pos- sessed for private consumption; and

(b)    every process of producing and drawing of toddy from trees;

“तयार करणे” यात

(अ) ज्या क्रियेने---मग ती स्वाभाविक असो वा कृत्रिम असो-कोणतीही दारू किंवा मादक औषधिद्रव्य यांचे उत्पादन केले जाते किंवा ती तयार केली जाते किंवा तिचे मिश्रण केले जाते ती प्रत्येक क्रिया व तसेच पुन्हा गाळणे आणि दारू किंवा मादक औषधिद्रव्य शुद्ध करण्यासाठी, स्वादयुक्त करण्यासाठी किंवा तिला रंग देण्यासाठीटउपयोगात आणलेली प्रत्येक क्रिया, यांचा समावेश होतो; परंतु तीत खाजगी सेवनासाठी कायदेशीररीत्या जवळ बाळगलेली दारू किंवा मादक औषधिद्रव्य यांस स्वादयुक्त करण्याच्या किंवा त्यांचे मिश्रण करण्याच्या किंवा त्यांना रंग आणण्याच्या क्रियेचा समावेश होत नाही; आणि

(ब) झाडापासून ताडी तयार करण्याचा व काढण्याच्या प्रत्येक क्रियेचा समावेश होतो;

(26)

“Medical Board” means a board constituted under section 8;

“वैद्यकीय मंडळ” याचा अर्थ, कलम 8 अन्वये रचना केलेले मंडळ असा आहे;

(27)

“mhowra flowra” does not include the berry or seed of the mhowra tree;

“मोहाचे फूल” यात मोहाच्या झाडाच्या फळाचा किंवा बीचा समावेश होत नाही;

(28)

“molasses” means the heavy, dark coloured viscous liquid produced during the

manufacture of gur or sugar containing, in solution or suspension, sugars which can be fermented, and includes the solid form of such liquid and also any product formed by the addition to such liquid or solid of any ingredient which does not substantially alter the character of such liquid or solid; and shall also include substances containing sugars obtained from sugarcane known as black coloured gur and residual substances obtained from khandsari known as third sugar or raskat or sayar and irrespective of its colour rotten gur or rotten rab which conform to the following analytical standards on dry weight basis,—

(i)   total sugars (expressed as invert sugar) less than 85 per cent. and sucrose less than 57 per cent.; or

(ii)    extraneous matter insoluble in water more than 2 per cent.; or

(iii)    total ash more than 6 per cent.; or

(iv)   ash insoluble in Hydrochloric acid (HCL) more than 0.5 per cent.; or

(v)   more than 10 per cent. of moisture;

but does not include any article which the State Government may, by notification in the Official Gazette, declare not to be molasses, for the purposes of this Act.

“मळी” याचा अर्थ, गूळ किंवा साखर तयार करताना उत्पन्न झालेला व ज्यामध्ये आंबवता येण्याजोगी द्रवरुप किंवा तरंगणारी साखर आहे असा जड व काळसर रंगाचा चिकट द्रवपदार्थ असा आहे; आणि त्या संज्ञेमध्ये, अशा द्रवपदार्थाच्या घन स्वरुपातील पदार्थाचा तसेच ज्या घटकद्रव्यामुळे अशा द्रवपदार्थाचे किंवा त्याच्या घन स्वरुपातील पदार्थाचे स्वरुप मूलत: बदलणारा नाही असे कोणतेही घटकद्रव्य त्या द्रवपदार्थात किंवा त्या घन स्वरुपातील पदार्थात घालून तयार केलेल्या पदार्थाचा समावेश होतो; तसेच तीमध्ये, काळा रंगाचा गूळ म्हणून ओळखली जाणारी ऊसापासून मिळवलेली साखर आणि खांडसरी बनवल्यानंतर शिल्लक राहिलेले व तिसरी साखर किंवा रस्कट किंवा सायर म्हणून ओळखले जाणारे पदार्थ अंतर्भूत असलेल्या पदार्थाचा आणि कोणत्याही रंगाचा असलेल्या कुजक्या गुळाचा किंवा कुजक्या राबाचादेखील समावेश असेल आणि त्यामधील पुढील घटकद्रव्ये त्यांच्या निद्र्रव वजनाच्या आधारे काढलेल्या पुढील विश्लेषणात्मक प्रमाणांशी मिळत्याजुळत्या प्रमाणात असतील,---
(एक) एकूण साखर (इन्वर्ट साखर म्हणून संबोधली जाणारी साखर) 85 टक्क्यांपेक्षा कमी आणि सुक्रोज 57 टक्क्यांपेक्षा कमी; किंवा
(दोन) पाण्यामध्ये न विरघळणारी अनावश्यक बाह्र वस्तू, 2 टक्क्यांपेक्षा जास्त; किंवा
(तीन) एकूण राख, 6 टक्क्यांपेक्षा जास्त; किंवा
(चार) हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये न विरघळणारी राख, 0.5 टक्क्यांपेक्षा जास्त; किंवा
(पाच) आद्र्रता, 10 टक्क्यांपेक्षा जास्त,
परंतु राज्य शासन, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, जो कोणताही पदार्थ, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, मळी नसल्याचे जाहीर करील त्याचा तीमध्ये समावेश असणार नाही;

(29)

“ Officer in charge of a Police Station” includes—

(a)   in, the Greater Bombay the officer in charge of police station as provided under the provisions of the Bombay Police Act, 1951; and

(b)  elsewhere the officer in charge of a police station as defined in the *Code of Criminal Procedure, 1898;

 “पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी” या शब्दप्रयोगांत----

(अ) बृहन्मुंबईत, मुंबई पोलीस अधिनियम, 1951, याच्या तरतुदीन्वये ज्याची तरतूद केली आहे असा पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी;---आणि

(ब) इतरत्र फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 यात व्याख्या केल्याप्रमाणे पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी यांचा समावेश होतो;

(30)

“opium” means—

(a)    the capsules of the poppy (Papaver Somaniforum L) whether in their original form or cut or crushed or powdered and whether or not the juice has been extracted therefrom;

(b)    the spontaneously coagulated juice of such capsules which has not been submitted to any manipulation other than those necessary for packing and transport; and

(c) any mixture with or without neutral materials of any of the above forms of opium; but does not include any preparations containing not more than 0.2 per cent of mor- phine, or a manufactured drug as defined in section 2 of the Dangerous Drugs Act,1930.

“अफू” या संज्ञेचा अर्थ----

(अ) खसखशीच्या (पॅपॅव्हर सॉम्निफेरम एल.) झाडाची बोंडे मग ती आपल्या मूळ स्वरूपात असोत किंवा कापलेली किंवा चुरा केलेली असोत किंवा त्यांची भुकटी केलेली असो आणि त्यांपासून रस काढून घेण्यात आला असो वा नसो;

(ब) संवेष्टन व परिवहन यांसाठी आवश्यक असलेल्या क्रियेव्यतिरिक्त इतर कोणतीही क्रिया ज्यावर करण्यात आलेली नाही असा स्वाभाविकपणे जमलेला अशा बोंडांचा रस; आणि

(क) वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या अफूचे गुणविरहित पदार्थ घालून किंवा त्याशिवाय तयार केलेले कोणतेही मिश्रण असा आहे; परंतु यात शेकडा 0.2 पेक्षा अधिक प्रमाणात मॉपींन नसलेल्या अशा कोणत्याही पदार्थाचा किंवा घातक औषधिद्रव्य अधिनियम, 1930, कलम 2 यात व्याख्या केल्याप्रमाणे तयार केलेल्या औषधिद्रव्याचा समावेश होत नाही.

(32)

“permit” means a permit granted under the provisions of this Act and the expression “permit holder” shall be construed accordingly ;

 “परवाना” याचा अर्थ, बृहन्मुंबई या अधिनियमाच्या तरतुदींन्वयेट दिलेला परवाना, असा समजावा व “परवानाधारक” या शब्दप्रयोगाचा अर्थ त्याप्रमाणे लावण्यात यावा;

(33)

“ police station” means in the Greater Bombay a police staion as provided under the provisions of the Bombay Police Act,1951 and elsewhere any place declared to be a police station for the purposes of the Code of Criminal Procedure, 1898;

“पोलीस ठाणे” याचा अर्थ, मुंबई पोलीस अधिनियम, 1951 याच्या तरतुदींन्वये ज्याची तरतूद केली आहे असा पोलीस विभाग व इतरत्र फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 याच्या प्रयोजनांकरिता पोलीस ठाणे म्हणून जाहीर केलेले कोणतेही ठिकाण असा आहे;

(34)

“prescribed” means prescribed by the rules, orders or regulations under this Act;

“विहित” याचा अर्थ, याचा अर्थ या अधिनियमान्वये केलेले नियम किंवा विनियम किंवा तद्न्वये दिलेले आदेश यांनी विहित केलेले असा आहे;

(35)

“Prohibition officer” includes the Commissioners, Collector or any officer or person appointed to exercise any of the powers or to perform any of the duties and functions under the provisions of this Act and also includes any officer or person invested with any such powers and on whom any such functions or duties are imposed, and any member of a committee, board or medical board;

 “दारुबंदी अधिकारी” यात, आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा या अधिनियमाच्या तरतुदींन्वये कोणतेही अधिकार चालविण्यासाठी किंवा कोणतीही कर्तव्ये व कामे पार पाडण्यासाठी नेमण्यात आलेला कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती यांचा समावेश होतो; तसेच, तीत ज्याच्याकडे कोणतेही असे अधिकार निहित करण्यात आले आणि कोणतीही अशी कामे किंवा कर्तव्ये सोपवून देण्यात आली असतील असा कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती यांचा आणि समितीच्या, मंडळाच्या किंवा वैद्यक मंडळाच्या कोणत्याही सदस्याचा समावेश होतो;

(36)

“State” means the State of Maharashtra including the space within the limits of the territorial waters appertaining to it;

“राज्य” याचा अर्थ, महाराष्ट्र राज्य असा आहे व तीत महाराष्ट्र राज्याशी संबद्ध असलेल्या क्षेत्रीय जलधीच्या हद्दीतील जागेचा समावेश होतो;

(37)

“rectification” includes every process whereby liquor is purified or refined;

“शुद्ध करणे” यासंज्ञेत, ज्या क्रियेने दारू शुद्ध करण्यात येते किंवा साफ करण्यात येते अशा प्रत्येक क्रियेचा समावेश होतो ;

(38)

“registered medical practitioner” means a person who is entitled to practice any system of medicine in the State under any law for the time being in force relating to medical practitioners, and includes registered dentists as defined in the Dentists Act, 1948 and a veterinary practitioner registered under the Bombay Veterinary Practitioners Act, 1953 or under of any law corresponding thereto in any part of the State;

“नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी” याचा अर्थ वैद्यकीय व्यवसाय करण्यासंबंधी त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ज्यास राज्यात, कोणत्याही वैद्यकीय पद्धतीनुसार व्यवसाय करण्याचा हक्क आहे अशी व्यक्ती असा आहे व तीत दंत वैद्य अधिनियम, 1948, यात व्याख्या केल्याप्रमाणे नोंदलेले दंतवैद्य आणि मुंबई पशु वैद्यक व्यवसायी अधिनियम, 1953 अन्वये किंवा राज्याच्या कोणत्याही भागातील कोणत्याही तत्सम कायद्यान्वये नोंदलेली पशुवैद्यक व्यवसायी यांचा समावेश होतो ;

(39)

“regulations” means regulations made under this Act;

“विनियम” याचा अर्थ या अधिनियमान्वये केलेले विनियम असा आहे;

(40)

“rules” means rules made under this Act;

“नियम” याचा अर्थ या अधिनियमान्वये केलेले नियम असा आहे;

(41)

“ sell” with its grammatical variations includes—

(a) any transfer whether such transfer is for any consideration or not,

(b) any supply or distribution for mutual accommodation, and

(c) any supply by a club to its members on payment of price or of any fees or subscription, but does not include selling of opium for export across the customs frontier;  The word “buy” with its grammatical variations shall be construed accordingly ;

“विकणे” या शब्दप्रयोगाचे व्याकरणदृष्ट्या होणार फेरफार धरुन त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो :--

(अ) कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करणे-----मग असे हस्तांतरण कोणताही मोबदला घेऊन किंवा न घेता केलेले असो;

(ब) एकमेकांच्या सोईसाठी कोणत्याही प्रकारे पुरविणे किंवा वाटप करणे; आणि

(क) एखाद्या क्लबने आपल्या सदस्यांस किंमत किंवा कोणतीही फी किंवा वर्गणी घेऊन कोणत्याही प्रकारे पुरविणे ; परंतु, त्या शब्दप्रयोगात सीमाशुल्क सरहद्दीपलीकडे निर्यात करण्यासाठी अफू विकण्याचा समावेश होत नाही ; “विकत घेणे” याचा अर्थ, त्याचे व्याकरणदृष्ट्या होणारे फेरफार धरून, त्याप्रमाणे लावण्यात येईल.

(43)

“ spirit” means any liquor containing alcohol and obtained by distillation (whether it is denatured or not) ;

“मद्यसार” याचा अर्थ, मद्यार्क असलेली व गाळून तयार केलेली कोणतीही दारू (मग ती विप्रकृत केलेली असो वा नसो) असा आहे ;

(44)

“sweet toddy or nira or neera” means unfermented juice drawn from a coconut, brab, date or any kind of palm tree into receptacles treated in the prescribed manner so as to prevent fermentation ;

 “गोड ताडी किंवा नीरा” याचा अर्थ, नारळीच्या, शिंदीच्या, खजुरीच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या ताडाच्या झाडापासून आंबू नये म्हणून विहित केलेल्या रीतीने क्रिया केलेल्या पात्रात काढलेला न आंबवलेला रस, असा आहे ;

(45)

“territorial waters” with reference to the State, means any part of the open sea within a distance of six nautical miles measured from the appropriate base line according to the President’s Proclamation published in this behalf in the Government of India, Ministry of External Affairs, Notification No. SRO-669, dated the 22nd March 1956, or such other distance as may be fixed from time to time by the President hereafter ;

राज्याच्या संबंधात “क्षेत्रीय जलधी” याचा अर्थ, दिनांक 22 मार्च 1956 रोजीची भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक एस. आर. ओ. 669 यामध्ये या बाबतीत प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रपतींच्या उद्घोषणेनुसार, समुचित मूळ रेषेपासून मोजलेल्या सहा सागरी मैलांच्या अंतरातील किंवा राष्ट्रपतींकडून यानंतर वेळोवेळी ठरविण्यात येईल अशा इतर अंतरांच्या आत असलेल्या समुद्राचा कोणताही खुला भाग, असा आहे;

(46)

“toddy” means fermented or unfermented juice drawn from a coconut, brab, date or any kind of palm tree and includes sweet toddy or nira a neera;

“ताडी” याचा अर्थ, नारळीच्या, शिंदीच्या, खजुरीच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या ताडाच्या झाडापासून काढलेला, आंबवलेला किंवा न आंबवलेला रस, असा आहे आणि तीत गोड ताडी किंवा नीरा यांचा समावेश होतो ;

(47)

“to tap” means to prepare any part of a tree, or to use any means, for the purpose of causing juice to exude from the tree;

“छेदणे” याचा अर्थ, झाडातून रस बाहेर गळावा म्हणून त्याचा कोणताही भाग कापणे किंवा कोणतेही साधन वापरणे, असा आहे ;

(47-A)

“tourist” means a person who is not a citizen of India and who is either born or brought up or domiciled in any country outside India, but who visits India on a tour for a temporary period;

“प्रवासी” याचा अर्थ, जी भारताचा नागरिक नसेल व भारताबाहेरील कोणत्याही देशात जी जन्मली असेल किंवा वाढली असेल किंवा जिचा तेथे अधिवास असेल परंतु जी भारतात प्रवास करण्यासाठी थोड्या दिवसांकरिता आली असेल अशी व्यक्ती, असा आहे.

(47B)

“tourists permit” means a permit granted under sectin 46-A;

“प्रवाशाचा परवाना” याचा अर्थ, कलम 46-अ अन्वये दिलेला परवाना असा आहे ;

(48)

“trade and import licence” means a licence granted under section 33;

“व्यापार व आयात लायसन” याचा अर्थ, कलम 33 अन्वये दिलेले लायसन, असा आहे ;

(49)

“transport” means to move from one place to another within the State;

“परिवहन करणे” याचा अर्थ, राज्यात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेणे, असा आहे ;

(50)

“vendor’s licence” means a licence granted under section 34;

“विक्रेत्याचे लायसन” याचा अर्थ, कलम 34 अन्वये दिलेले लायसन, असा आहे ;

(51)

"visitor’s permit” means a permit granted under section 46;

“अभ्यागताचा परवाना” याचा अर्थ, कलम 46 अन्वये दिलेला परवाना, असा आहे ;

(52)

any reference to the Code of Criminal Procedure, 1898, the Bombay Village Panchayats Act, 1933, or the Bombay Police Act, 1951 includes a reference to any law corresponding to those Acts, respectively, in force in any part of the State.

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1933 किंवा मुंबई पोलीस अधिनियम, 1951 यासंबंधी केलेल्या कोणत्याही उल्लेखात, राज्याच्या कोणत्याही भागात अंमलात असलेल्या अनुक्रमे तत्सम अशा कोणत्याही कायद्यासंबंधी केलेल्या उल्लेखाचा समावेश होतो.

(17A)

“Gram Rakshak Dal” means Gram Rakshak Dal established under section 134A;

“ग्राम रक्षक दल” याचा अर्थ, कलम 134अ अन्वये स्थापन केलेले ग्राम रक्षक दल असा आहे: 

Section 3 COMMISSIONER OF PROHIBITION AND EXCISE. आयुक्त दारूबंदी व उत्पादनशुल्क.

3 Commissioner of Prohibition and Excise. आयुक्त दारूबंदी व उत्पादनशुल्क..[View all order & notifications]

The State Government may, by notification in the Official Gazette, appoint an officer to be called the Commissioner of Prohibition and Excise, (Click to see list of CSE)  (List & Address of Excise offices) (List Of Additional Commissioner) who subject to the control of the State Government and subject to such general or special orders as the State Government may from time to time make, shall exercise such powers and shall perform such duties and such functions as are conferred upon, by or under the provisions of this Act and shall superintend the administration and carry out generally the provisions of this Act:

Provided that, the person holding the office of Director of Prohibition and Excise immediately before the commencement of the Maharashtra Director of Prohibition and Excise (Change in Designation) Act, 1973 shall be the Commissioner of Prohibition and Excise for the State and shall hold that Officer until the State Government otherwise directs.

राज्य शासनास, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे आयुक्त, दारूबंदी व उत्पादन शुल्क या नावाचा एक अधिकारी नेमता येईल. असा अधिकारी राज्य शासनाच्या नियंत्रणास अधीन राहून व राज्य शासन वेळोवेळी जे सर्वसाधारण किंवा विशेष आदेश देईल त्यास अधीन राहून, या अधिनियमाच्या तरतुदींन्वये किंवा तद्नुसार सोपविलेल्या अधिकारांचा वापर करील आणि तद्न्वये किंवा तद्नुसार सोपविलेली कर्तव्ये व कामे पार पाडील. तसेच तो या अधिनियमाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत देखरेख ठेवील व त्याच्या तरतुदी सामान्यत: पार पाडील :

परंतु, महाराष्ट्र संचालक, दारूबंदी व उत्पादनशुल्क (पदनामातील बदल) अधिनियम, 1973 याच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी, संचालक, दारूबंदी व उत्पादनशुल्क याचे पद धारण करणारी व्यक्ती ही राज्याचा, आयुक्त, दारूबंदी व उत्पादनशुल्क असेल आणि राज्य शासन अन्यथा निदेश देईपर्यंत ती ते पद धारण करील.

Section 4 COLLECTORS. जिल्हाधिकारी

4 Collectors. जिल्हाधिकारी.[View all order & notifications]

(1)

The Collectors shall, within the limits of their jurisdiction exercise such powers and perform such duties and functions as are provided by or under the provisions of this Act.

जिल्हाधिकारी आपल्या अधिकारक्षेत्राच्याट हद्दीत या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये किंवा त्यानुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करील व कर्तव्ये व कामे पार पाडील.

(2)

For the purpose of this Act all Collectors including the Collector of Bombay shall be subordinate to the Commissioner

या अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता मुंबईचा जिल्हाधिकारी यासहित सर्व जिल्हाधिकारी आयुक्तास दुय्यम असतील.

(3)

The State Government may, by notification in the Official Gazette, appoint any person other than the Collector  to exercise in any district or place all or any of the powers and perform all or any of the duties] as are assigned by or under this Act to a Collector subject to such control, if any, in addition to that of the Commissioner and of the State Government as the State Government may from time to time direct. 

राज्य शासनास, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाद्वारे किंवा अधिनियमान्वये जिल्हाधिका-यास नेमून देण्यात आलेल्या अधिकारांपैकी सर्व किंवा कोणतेही अधिकार आणि नेमून दिलेल्या कर्तव्यांपैकी व कामांपैकी सर्व किंवा कोणतीही कर्तव्ये व कामेट कोणत्याही जिल्ह्रात किंवा कोणत्याही ठिकाणी चालविण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी जिल्हाधिका-याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस नेमता येईल. अशा व्यक्तीवर आयुक्ताच्या व राज्य शासनाच्या नियंत्रणाखेरीज राज्य शासन वेळोवेळी आणखी जे कोणतेही नियंत्रण निर्दिष्ट करील ते नियंत्रण राहील.

Section 5 SUBORDINATE OFFICERS . दुय्यम अधिकारी

5 Subordinate Officers . दुय्यम अधिकारी.[View all order & notifications]

To aid the Commissioner and the Collectors in carrying out the provisions of this Act, the State Government may appoint such subordinate officers with such designations, and assign to them such powers, duties and functions under this Act, rules or regulation or orders made thereunder, as may be deemed necessary.

आयुक्तास व जिल्हाधिका-यांस या अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यास सहाय्य करण्याकरिता राज्य शासनास आवश्यक वाटतील असे दुय्यम अधिकारी त्यांच्या पदनामासह नेमता येतील हा अधिनियम किंवा तद्नुसार केलेले नियम किंवा विनियम किंवा तद्नुसार दिलेले आदेश या अन्वये जे अधिकार व जी कर्तव्ये व कामे असतील त्यापैकी आवश्यक वाटतील असे अधिकार, कर्तव्ये व कामे राज्य शासन अशा अधिका-यांस नेमून देईल.
 

Section 6 INVESTING OFFICERS OF POLICE AND OTHER DEPARTMENTS WITH POWERS AND DUTIES UNDER THIS ACT. या अधिनियमान्वये असलेले अधिकार व कर्तव्ये पोलीस विभागाच्या आणि इतर विभागांच्या अधिका-यांकडे सोपविणे.

6 Investing officers of Police and other departments with powers and duties under this Act. या अधिनियमान्वये असलेले अधिकार व कर्तव्ये पोलीस विभागाच्या आणि इतर विभागांच्या अधिका-यांकडे सोपविणे..[View all order & notifications]

(1)

The State Government may invest any officer of the Police Department or any officer of any other department either personally or in right of his officeremove with such powers, impose upon him such duties and direct him to perform such functions under this Act, rules or regulations or orders made thereunder, as may be deemed necessary and any such officers shall, thereupon, exercise the said powers, discharge the said duties and perform the said functions in addition to the powers, duties and functions incidental to his principal office.

राज्य शासनास, पोलीस विभागाच्या कोणत्याही अधिका-याकडे किंवा कोणत्याही इतर विभागाच्या कोणत्याही अधिका-याकडे, व्यक्तिश: किंवा त्याच्या पदाच्या नात्याने, हा अधिनियम किंवा तद्नुसार केलेले नियम किंवा विनियम किंवा तद्नुसार दिलेले आदेश या अन्वये जे अधिकार, कर्तव्ये व कामे असतील त्यापैकी आवश्यक वाटतील असे अधिकार व कर्तव्ये सोपविता येतील व आवश्यक वाटतील अशी कामे करण्याविषयी त्यास निदेश देता येईल, आणि कोणतेही असे अधिकारी त्यानंतर आपल्या मुख्य पदास आनुषंगिक असे जे अधिकार, कर्तव्ये व कामे असतील त्याखेरीज आणखी उक्त अधिकार वापरतील व उक्त कर्तव्ये व कामे पार पाडतील.

(2)

The State Government may also invest any person  with such powers, impose on him such duties and direct him to perform such functions under this Act, rules or regulations or orders made thereunder, as may be deemed necessary. Such persons may be given such designation as the State Government may deem fit.

तसेच राज्य शासनास, कोणत्याही व्यक्तीकडे हा अधिनियम किंवा तद्नुसार केलेले नियम किंवा विनियम किंवा तद्नुसार दिलेले आदेश या अन्वये जे अधिकार, कर्तव्ये व कामे असतील त्यापैकी आवश्यक वाटतील असे अधिकार व कर्तव्ये सोपविता येतील व आवश्यक वाटतील अशी कामे पार पाडण्याविषयी निदेश देता येईल. अशा व्यक्तींना राज्य शासनास योग्य वाटतील ती पदनामे देता येतील. 

 

Section 6A BOARD OF EXPERTS. तज्ञ मंडळ

6A Board of Experts. तज्ञ मंडळ.[View all order & notifications]

(1)

For the purpose of enabling the State Government to determine whether—

(a) any medicinal or toilet preparation containing alcohol; or

(b) any antiseptic preparation or solution containing alcohol, or (c) any flavouring extract, essence or syrup containing alcohol, is an article fit for use as intoxicating liquor, the State Government shall constitute a Board of Experts.

(अ) मद्यार्क असलेला कोणताही औषधीय किंवा प्रसाधनीय सिद्धपदार्थ, किंवा

(ब) मद्यार्क असलेला कोणताही पूर्तीप्रतिबंधक सिद्धपदार्थ किंवा द्रावण, किंवा

(क) मद्यार्क असलेला कोणताही स्वाद आणणारा अर्क, सत्त्व किंवा सरबत मादक दारू म्हणून वापरण्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरविणेराज्य शासनास शक्य व्हावे म्हणून राज्य शासन एक तज्ञ मंडळ स्थापन करील.

(2)

The Board of Experts constituted under sub-section (1) shall consist of such members, not less than five in number, with such qualification as may be prescribed. The members so appointed shall hold office during the pleasure of the State Government.

पोट-कलम (1) अन्वये स्थापन केलेल्या तज्ञ मंडळात विहित करण्यात येतील अशा पात्रता असलेले कमीत कमी पाच सदस्य असतील. अशा रीतीने नेमलेले सदस्य राज्य शासनाची मर्जी असेल तोपर्यंत पद धारण करतील.

(3)

Three members shall form a quorum for the disposal of the business of the Board.

मंडळाचे कामकाज पार पाडण्यासाठी तीन सदस्यट हजर असले म्हणजे गणपूर्ती होईल ;

(4)

Any vacancy of the member of the Board shall be filed in as early as practicable:

Provided that, during any such vacancy the continuing members may act, as if no vacancy had occurred.

मंडळाच्या सदस्याची कोणतीही रिकामी झालेली जागा शक्य तितक्या लवकर भरण्यात येईल :

परंतु, अशी कोणतीही जागा रिकामी झाली असेल त्या मुदतीत, विद्यमान सदस्यांना जणू कोणतीही जागा रिकामी झाली नव्हती असे समजून काम करता येईल.

(5)

The procedure regarding the work of the Board shall be such as may be prescribed.

मंडळाच्या कामासंबंधीची कार्यपद्धती विहित करण्यात येईल अशी असेल.

(6)

It shall be the duty of the Board to advise the State Government on the question whether any article mentioned in sub-section (1) is fit for use as intoxicating liquor and also on any matters incidental to the question, referred to it by the State Government. On obtaining such advise, the State Government shall determine whether any such ar- ticle is fit for use as intoxicating liquor, and upon determination of the State Govern- ment that it is so fit, such article shall, until the contrary is proved, be presumed to be fit for use as intoxicating liquor.

 पोट-कलम (1) मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ हा मादक दारू म्हणून वापरण्यास योग्य आहे किंवा नाही या प्रश्नावर व तसेच राज्य शासनाने त्याच्याकडे पाठविलेल्या प्रश्नाशी आनुषंगिक असणा-या कोणत्याही बाबीविषयी राज्य शासनाला सल्ला देणे हे मंडळाचे कर्तव्य असेल. असा सल्ला मिळाल्यावर, राज्य शासन असा कोणताही पदार्थ मादक दारू म्हणून वापरण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरविल आणि राज्य शासनाने, तो पदार्थ अशा रीतीने वापरण्यास योग्य आहे असे ठरविल्यावर, जोपर्यंत त्याविरुद्ध सिद्ध करण्यात आले नसेल तोपर्यंत असा पदार्थ मादक दारू म्हणून वापरण्यास योग्य आहे असे गृहीत धरण्यात येईल.

(7)

Until the State Government has determined as aforesaid any article mentioned in sub-section (1) to be fit for use as intoxicating liquor, every such article shall be deemed to be unfit for such use.

पोट-कलम (1) मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ हा कैफ आणणारी दारू म्हणून वापरण्यास योग्य आहे असे उपरोक्तप्रमाणे राज्य शासनाकडून ठरविण्यात येईपर्यंत असा प्रत्येक पदार्थ अशा रीतीने वापरण्यास अयोग्य आहे असे मानण्यात येईल.

Section 7 OTHER BOARDS AND COMMITTEE. इतर मंडळे आणि समित्या

7 Other Boards and Committee. इतर मंडळे आणि समित्या.[View all order & notifications]

(1)

The State Government may appoint other boards and committees to advise and assist officers in carrying out the provisions of this Act

या अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्याच्या कामी अधिका-यांना सल्ला देण्याकरिता आणि सहाय्य करण्याकरिता राज्य शासनास इतर मंडळे आणि समित्या नेमता येतील.

(2)

Such other boards and committees shall perform such functions as may be prescribed

अशी इतर मंडळे आणि समित्या विहित करण्यात येतील अशी कामे पार पाडतील.

(3)

The constitution of such other boards and committees and the procedure regarding their work shall be as may be prescribed.

अशा इतर मंडळांची आणि समित्यांची रचना व त्यांच्या कामकाजाची कार्यपद्धती विहित करण्यात येईल अशी असेल.
 

(4)

The State Government may direct that the members of such other boards and committees shall be paid such fees and allowances as may be prescribed.

अशा इतर मंडळांच्या आणि समित्यांच्या सदस्यांना विहित करण्यात येईल अशी फी व भत्ते देण्यात येतील असा निदेश देण्याचा राज्य शासनास निदेश देता येईल.

Section 8 MEDICAL BOARDS. वैद्यक मंडळ

8 Medical Boards. वैद्यक मंडळ.[View all order & notifications]

(1)

The State Government may constitute one or more medical boards or panels thereof for such areas and consisting of such members as it may deem fit

राज्य शासनास, त्यास योग्य वाटतील अशा क्षेत्रांकरिता व त्यास योग्य वाटतील, असे सदस्य असलेल्या एका किंवा अनेक वैद्यक मंडळांची किंवा त्यांच्या तालिकांची स्थापना करण्याचा अधिकार असेल.

(2)

A medical board or a panel thereof so constituted shall perform such functions as are prescribed.

अशा रीतीने स्थापन केलेले वैद्यक मंडळ किंवा त्यांच्या तालिका विहित करण्यात आलेली कामे पार पाडतील.

(3)

The procedure regarding the work of the medical board or a panel thereof shall be as may be prescribed.

वैद्यक मंडळाच्या किंवा त्यांच्या तालिकेच्या कामकाजाची कार्यपद्धती विहित करण्यात येईल अशी असेल.

(4)

The members of the medical board or a panel thereof shall be entitled to such fees and allowances as may be prescribed.

वैद्यक मंडळाच्या किंवा त्यांच्या तालिकेच्या सदस्यांना विहित करण्यात येईल अशी फी व भत्ते मिळण्याचा हक्क असेल.

Section 9 CONTROL OF COMMISSIONER OVER PROHIBITION OFFICERS AND OTHER OFFICERS. दारूबंदी अधिका-यांवर व इतर अधिका-यावर आयुक्तांचे नियंत्रण.

9 Control of Commissioner over Prohibition Officers and other officers. दारूबंदी अधिका-यांवर व इतर अधिका-यावर आयुक्तांचे नियंत्रण..[View all order & notifications]

In exercise of their powers and in discharge of their duties and functions under the provisions of this Act or rules, regulations or orders made thereunder all Prohibition Officers and all officers including the officers of the Police and other department shall, subject to the general or special orders of the State Government be subordinate to and under the control of the Commissioner and shall be bound to follow such orders as the Commissioner may, from time to time make.

सर्व दारूबंदी अधिकारी आणि पोलीस व इतर विभागाचे अधिकारी यासह सर्व अधिकारी हे, या अधिनियमाच्या तरतुदी किंवा, तद्नुसार केलेले नियम किंवा विनियम किंवा तद्नुसार दिलेले आदेश या अन्वये असलेले आपले अधिकार चालविताना व आपली कर्तव्ये व कामे पार पाडताना राज्य शासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांस अधीन राहून, आयुक्ताच्या हाताखाली व नियंत्रणाखाली असतील : व त्यांस आयुक्त वेळोवेळी जे आदेश ते पाळणे बंधनकारक असेल.

Section 10 DELEGATION प्रत्यायोजन

10 Delegation प्रत्यायोजन.[View all order & notifications]

(1)

The State Government may delegate any of the powers exercisable by itunder this Act to the Commissioner or such other officers as it deems fit.

राज्य शासनास, या अधिनियमाअन्वये त्यास त्याचे चालविता येतील असे कोणतेही अधिकार आयुक्त किंवा त्यास योग्य वाटेल अशा इतर अधिका-यांकडे प्रत्यायोजित करता येतील.

(2)

Subject to the control and direction of the1[State] Government the powersconferred on the Commissioner or any other officer appointed or invested withpowers under this Act may be delegated by him to any of his subordinates.

आयुक्तास किंवा या अधिनियमाअन्वये नेमलेल्या किंवा अधिकार असलेल्या कोणत्याही इतर अधिका-यास दिलेले अधिकार. हे त्यास, राज्य शासनाच्या नियंत्रणास व निदेशांस अधीन राहून, आपल्या हाताखालील कोणत्याही अधिका-याकडे प्रत्यायोजित करता येतील.

Section 11 MANUFACTURE, ETC., OF INTOXICANT TO BE PERMITTED IN ACCORDANCE WITH PROVISIONS OF ACT, RULES, ETC .मादक द्रव्य तयार करणे, वगैरे यांस या अधिनियमाच्या तरतुदी, नियम, वगैरे यांस अनुसरून परवानगी देणे.

11 Manufacture, etc., of intoxicant to be permitted in accordance with provisions of Act, rules, etc .मादक द्रव्य तयार करणे, वगैरे यांस या अधिनियमाच्या तरतुदी, नियम, वगैरे यांस अनुसरून परवानगी देणे..[View all order & notifications]

Notwithstanding anything contained in the following provisions of this Chapter, it shall be lawful to import, export, transport, manufacture bottle, sell, buy, possess, use or consume any intoxicant or hemp or to cultivate, or to cultivate or collect hemp or to tap any toddy producing tree or permit such tree to be tapped or to draw toddy from such tree or permit toddy to be drawn therefrom in the manner and to the extent provided by the provisions of this Act or any rules, regulations or orders made or in accordance with the terms and conditions of a licence, permit, pass or authorization granted thereunder.

या प्रकरणाच्या पुढील तरतुदींमध्ये काहीही असले तरी, या अधिनियमाच्या तरतुदीन्वये किंवाट तद्नुसार केलेले नियम, विनियम किंवा तद्नुसार दिलेल्या आदेश या अन्वये तरतूद केलेल्या रीतीने त्या मर्यादेपर्यंत अथवा तद्नुसार दिलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या अटीस व शर्तीस अनुसरून, कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग यांची आयात करणे, निर्यात करणे, किंवा तिचे परिवहन करणे, किंवा ती तयार करणे, ती बाटल्यात भरणेट, विकणे, खरेदी करणे, जवळ बाळगणे, वापरणे किंवा सेवन करणे, अथवा भांगेची लागवड करणे किंवा ती गोळा करणे अथवा कोणतेही ताडी देणारे झाड छेदणे किंवा छेदणीस परवानगी देणे किंवा अशा झाडापासून ताडी काढणे किंवा काढण्यास परवानगी देणे हे कायदेशीर
असेल. 

Section 11 A POWER OF GRAM SABHA TO ENFORCE PROHIBITION OR TO REGULATE OR RESTRICT THE SALE AND CONSUMPTION OF ANY INTOXICANT. दारूबंदी अंमलात आणण्याचा किंवा कोणत्याही मादक द्रव्यांची विक्री आणि वापर यांचे विनियमन करण्याचा किंवा त्यावर निर्बंध घालण्याचा ग्रामसभेचा अधिकार.

11 A Power of Gram Sabha to enforce prohibition or to regulate or restrict the sale and consumption of any intoxicant. दारूबंदी अंमलात आणण्याचा किंवा कोणत्याही मादक द्रव्यांची विक्री आणि वापर यांचे विनियमन करण्याचा किंवा त्यावर निर्बंध घालण्याचा ग्रामसभेचा अधिकार..[View all order & notifications]

Notwithstanding anything contained in section 11 or any other provisions of this Act, in respect of any Scheduled Area falling within the jurisdiction of a Gram Sabha and a Panchayat or a Panchayat Samiti or a Zilla Parishad, as the case may be, it shall be competent for such Gram Sabha or a Panchayat and the or the Panchayat Samiti or the Zilla Parishad to enforce prohibition or to regulate or restrict the sale and consumption of intoxicant in Scheduled areas within its jurisdiction ;

Provided that, the decision taken by majority of the Gram Sabhas concerned by passing a resolution in the above matter shall be binding on the concerned Panchayat Samiti or the Zilla Parishad as the case may be.

Explanation.—For the purpose of this section,—

(i) the expression “Gram Sabha”, “Panchayat” and “Scheduled Areas” shall have the meanings, respectively assigned to them in the Bombay Village Panchayats Act, 1958 ;

(ii) the expression “Panchayat Samiti” and Zilla Parishads” shall have the meanings respectively assigned to them in the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961.

ग्रामसभा आणि पंचायत, किवा पंचायत समिती किंवा यथास्थिति, जिल्हा परिषद यांच्या अधिकारितेत येत असलेल्या कोणत्याही अनुसूचित क्षेत्रांच्या बाबतीत कलम 11 मध्ये किंवा या अधिनियमातील अन्य तरतुदींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, अशी ग्रामसभा आणि पंचायत किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ही तिच्या अधिकारितेत येणा-या अनुसूचित क्षेत्रात दारूबंदी अंमलात आणण्यास किंवा मादक द्रव्यांची विक्री आणि वापर यांचे विनियमन करण्यास किंवा त्यावर निर्बंध घालण्यास सक्षम असेल :

परंतु, संबंधित ग्रामसभांपैकी बहुतांश ग्रामसभांनी वरीलपैकी कोणत्याही बाबतीत ठराव संमत करून घेतलेला निर्णय, हा संबंधित पंचायत समिती किंवा यथास्थिति, जिल्हा परिषद यांवर बंधनकारक राहील.

स्पष्टीकरण.---या कलमाच्या प्रयोजनांकरिता,-----

(एक) “ग्रामसभा”, “पंचायत” आणि “अनुसूचित क्षेत्रे” या शब्दप्रयोगांना, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 यात त्यांना अनुक्रमे नेमून देण्यात आलेले अर्थ असतील ;

(दोन) “पंचायत समित्या” आणि “जिल्हा परिषदा” या शब्दप्रयोगांना, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 यात त्यांना अनुक्रमे नेमून देण्यात आलेले अर्थ असतील.

Section 12 PROHIBITION TO MANUFACTURE LIQUOR, CONSTRUCT OR WORK ANY DISTILLERY OR BREWERY. दारू तयार करण्यास व दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधण्यास किंवा चालविण्यास मनाई.

12 Prohibition to manufacture liquor, construct or work any distillery or brewery. दारू तयार करण्यास व दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधण्यास किंवा चालविण्यास मनाई..[View all order & notifications]

No person shall—

(a) manufacture liquor;

(b) construct or work any distillery or brewery;

(c) import, export, tran

(d) sell or buy liquor.

कोणतीही व्यक्ती-

(अ) दारू तयार करणार नाही ;

(ब) कोणतीही दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधणार किंवा चालविणार नाही ;

(क) दारू आयात करणार नाही, निर्यात करणार नाही, तिचे परिवहन करणार नाही किंवा ती जवळ बाळगणार नाही ; अथवा

(ड) दारू विकणार नाही किंवा विकत घेणार नाही.

Section 13 PROHIBITION OF SALE ETC.. दारूची विक्री, वगैरे करण्यास मनाई.

13 Prohibition of Sale etc.. दारूची विक्री, वगैरे करण्यास मनाई..[View all order & notifications]

No person shall—

(a) bottle any liquor for sale;

(b) consume or use liquor, or

(c) use, keep or have in his possession any materials, still, utensils, implements or apparatus whatsoever for the manufacture of any liquor.

कोणतीही व्यक्ती-----

(अ) कोणत्याही प्रकारची दारू विकण्यासाठी बाटलीत भरणार नाही ;

(ब) दारूचे सेवन करणार नाही किंवा ती वापरणार नाही ; अथवा

(क) कोणत्याही प्रकारची दारू तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य, दारू गाळण्याची भट्टी, भांडी, साधने किंवा उपकरणे वापरणार नाही, ठेवणार नाही किंवा आपल्याजवळ बाळगणार नाही.
 

Section 14 PROHIBITION OF EXPORT, IMPORT, TRANSPORT, SALE, MANUFACTURE, ETC. OF INTOXICATING DRUGS. मादक औषधिद्रव्ये निर्यात करणे, आयात करणे, त्याचे परिवहन करणे ते विकणे, तयार करणे, वगैरे यास मनाई.

14 Prohibition of export, import, transport, sale, manufacture, etc. of intoxicating drugs. मादक औषधिद्रव्ये निर्यात करणे, आयात करणे, त्याचे परिवहन करणे ते विकणे, तयार करणे, वगैरे यास मनाई..[View all order & notifications]

No person shall—

(a) export, import, transport or possess any intoxicating drug;

(b) cultivate or collect the hemp 

(c) use, keep or have in his possession any materials, still, utensils, implements or apparatus whatsoever for the manufacture of any intoxicating drug;

(d) sell or buy any intoxicating drug;

e) consume or use any intoxicating drug; or

(f) manufacture any intoxicating drug.

कोणतीही व्यक्ती-

(अ) कोणतेही मादक औषधिद्रव्य निर्यात करणार नाही, आयात करणार नाही, त्याचे परिवहन करणार नाही किंवा ते जवळ बाळगणार नाही ;

(ब) भांगेची लागवड करणार नाही, किंवा ती गोळा करणार नाही ;

(क) कोणतेही मादक औषधिद्रव्य तयार करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे साहित्य, दारू गाळण्याची भट्टी, भांडी, साधने किंवा उपकरणे वापरणार नाही, ठेवणार नाही किंवा आपल्याजवळ बाळगणार नाही ;

(ड) कोणतेही मादक औषधिद्रव्य विकणार नाही किंवा विकत घेणार नाही ;

(ई) कोणत्याही मादक औषधिद्रव्याचे सेवन करणार नाही किंवा ते वापरणार नाही ; अथवा

(फ) कोणतेही मादक औषधिद्रव्य तयार करणार नाही.

Section 15 PROHIBITION OF IMPORT, EXPORT, TRANSPORT, SALE ETC. OF SWEET TODDY. गोड ताडीची आयात, निर्यात, परिवहन, विक्री वगैरेस मनाई.

15 Prohibition of import, export, transport, sale etc. of sweet toddy. गोड ताडीची आयात, निर्यात, परिवहन, विक्री वगैरेस मनाई..[View all order & notifications]

No person shall—

(a) import, export, transport or possess sweet toddy or nira;

(b) bottle sweet toddy or nira for sale’ or

(c) sell or buy sweet toddy or nira.

कोणतीही व्यक्ती-

(अ) गोड ताडी किंवा नीरा आयात करणार नाही, निर्यात करणार नाही, तिचे परिवहन करणार नाही किंवा ती जवळ बाळगणार नाही ;

(ब) गोड ताडी किंवा नीरा विकण्यासाठी बाटलीत भरणार नाही ; अथवा

(क) गोड ताडी किंवा नीरा विकणार नाही किंवा विकत घेणार नाही.

Section 16 PROHIBITION OF TAPPING OF TODDY PRODUCING TREES AND DRAWING OF TODDY. ताडी देणारी झाडे छेदण्यास व त्यापासून ताडी काढण्यास मनाई.

16 Prohibition of tapping of toddy producing trees and drawing of toddy. ताडी देणारी झाडे छेदण्यास व त्यापासून ताडी काढण्यास मनाई..[View all order & notifications]

No person shall—

(a) tap any toddy producing tree or permit to be tapped any toddy producing tree belonging to him or in his possession; or

(b) draw toddy from any tree or permit toddy to be drawn from any tree belonging to him or in his possession.

कोणतीही व्यक्ती

(अ) आपल्या मालकीचे किंवा आपल्या कब्जात असलेले कोणतेही ताडी देणार झाड छेदणार नाही किंवा ते छेदण्याची परवानगी देणार नाही; अथवा

(ब) आपल्या मालकीच्या किंवा आपल्या कब्जात असलेल्या कोणत्याही झाडापासून ताडी काढणार नाही किंवा त्यापासून ताडी काढण्याची परवानगी
देणार नाही.

Section 17 PROHIBITION OF POSSESSION ETC., OF OPIUM. अफू जवळ बाळगणे, वगैरे यास मनाई.

17 Prohibition of possession etc., of opium. अफू जवळ बाळगणे, वगैरे यास मनाई..[View all order & notifications]

No person shall—

(a) possess opium

(b) transport opium

(c) import or export opium

(d) sell or buy opium; or

(e) consume or use opium

कोणतीही व्यक्ती-

(अ) अफू जवळ बाळगणार नाही ;

(ब) अफूचे परिवहन करणार नाही ;

(क) अफूची आयात करणार नाही किंवा निर्यात करणार नाही ;

(ड) अफू विकणार नाही किंवा विकत घेणार नाही ; अथवा

(ई) अफूचे सेवन करणार नाही किंवा ती वापरणार नाही.

Section 18 PROHIBITION OF SALE TO MINORS. अज्ञान व्यक्तींना मादक द्रव्य विकण्यास मनाई.

18 Prohibition of sale to minors. अज्ञान व्यक्तींना मादक द्रव्य विकण्यास मनाई..[View all order & notifications]

No licensed vendor and no person in the employ of such licensed vendor or acting with the express or implied permission of such licensed vendor on his behalf shall sell or deliver any intoxicant to any person who is a minor whether for consumption by such person or by other person and whether for consumption on or off the premises of such licensed vendor.

लायसन दिलेल्या कोणत्याही विक्रेत्याने तसेच अशा लायसन दिलेल्या विक्रेत्याच्या नोकरीत असलेली किंवा अशा लायसन दिलेल्या विक्रेत्याच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने त्याच्या वतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती कोणत्याही अज्ञान व्यक्तींना कोणतेही मादक द्रव्य विकणार नाही किंवा देणार नाही. मग असे मादक द्रव्य अशा व्यक्तीने किंवा इतर व्यक्तीने सेवन करण्यासाठी, तसेच ते अशा लायसन दिलेल्या विक्रेत्याच्या जागेत किंवा जागेच्या बाहेर सेवन करण्यासाठी विकण्यात किंवा देण्यात येवो.

Section 19 DELETED. वगळण्यात आले.

19 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Prohibition of sale of toddy] Deleted by Bom. 22 of 1960,s.10.

(ताडी विकण्यास मनाई) हे कलम सन 1960 चा मुंबई अधिनियम क्रमांक 22, कलम 10 अन्वये वगळण्यात आले.
 

Section 20 PROHIBITION OR PRODUCTION ETC, OF CHARAS. चरसाचे उत्पादन करणे, वगैरे यास मनाइ

20 Prohibition or production etc, of charas. चरसाचे उत्पादन करणे, वगैरे यास मनाइ.[View all order & notifications]

No person shall—

(a) produce, 

(f) transport

(b) manufacture (g) buy,
(c) possess (h) sell,
(d) export, (l) consume, or
(e) import (j) use,

Charas.

कोणतीही व्यक्ती खालील गोष्टी करणार नाही-

(अ) चरसाचे उत्पादन करणे ; (फ) त्याचे पहिवहन करणे ;
(ब) तो तयार करणे ; (ग) तो विकत घेणे ;
(क) तो जवळ बाळगणे ; (ह) तो विकणे ;
(ड) त्याची निर्यात करणे ; (आय) त्याचे सेवन करणे ; किंवा
(ई) त्याची आयात करणे ; (ज) तो वापरणे. 

Section 21 ALTERATION OF DENATURED SPIRIT. विप्रकृत केलेल्या मद्यसारात बदल करणे.

21 Alteration of Denatured Spirit. विप्रकृत केलेल्या मद्यसारात बदल करणे..[View all order & notifications]

No person shall—

(a) alter or attempt to alter any denatured spirit by dilution with water or by any method whatsoever, with the intention that such spirit may be used for human consumption, whether as a beverage or internally as a medicine or in any other way whatsoever; or

(b) have in his possession any denatured spirit in respect of which he knows or has reason to believe that such alteration or attempt has been made.

कोणतीही व्यक्ती-

(अ) कोणतेही विप्रकृत केलेले मद्यसार मादक पेय म्हणून किंवापोटात घ्यावयाचे औषध म्हणून किंवा कोणत्याही इतर प्रकारचे मनुष्याने सेवन करण्यसाठी वापरता यावे या हेतूने त्यात पाणी मिसळून किंवा कोणत्याही पद्धतीने, बदल करणार नाही किंवा बदल करण्याचा प्रयत्न करणार नाही ; किंवा

(ब) विप्रकृत केलेल्या ज्या मद्यसाराच्या बाबतीत असा बदल करण्यात आला आहे किंवा बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे त्यास माहीत असेल किंवा असे त्यास सकारण वाटत असेल असे कोणतेही विप्रकृत मद्यसार जवळ बाळगणार नाही.
 

Section 21-A ALTERATION OF DENATURED SPIRITUOUS PREPARATION. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात बदल करणे.

21-A Alteration of Denatured Spirituous Preparation. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात बदल करणे..[View all order & notifications]

No person shall—

(a) alter or attempt to alter any denatured spirituous preparation by dilution with water or by any method whatsoever, with the intention that such preparation may be used for human consumption as an intoxicating liquor; or

(b) have in his possession any denatured spirituous preparation in respect of which he knows or his reason to believe that such alteration or attempt has been made.

कोणतीही व्यक्ती-
(अ) कोणताही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ मादक दारू म्हणून मनुष्याने सेवन करण्यासाठी वापरता यावी या हेतूने त्यात पाणी मिसळून किंवा कोणत्याही पद्धतीने, बदल करणार नाही किंवा बदल करण्याचा प्रयत्न करणार नाही ; किंवा

(ब) ज्या विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थांच्याबाबतीत असा बदल करण्यात आला आहे किंवा बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे त्यास माहीत असेल किंवा असे त्यास सकारण वाटत असेल असा कोणताही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ जवळ बाळगणार नाही.
 

Section 22 PROHIBITION OF ALLOWING ANY PREMISES TO BE USED AS COMMON DRINKING HOUSE. कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून वापरण्यासाठी परवानगी देण्यास मनाई

22 Prohibition of allowing any premises to be used as common drinking house. कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून वापरण्यासाठी परवानगी देण्यास मनाई.[View all order & notifications]

No person shall—

(a) open or keep or use any place as a common drinking house; or

(b) have the care, management or control of, or in any manner assist in conducting the business of, any place opened, or kept, or used as a common drinking house.

कोणतीही व्यक्ती-
(अ) कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून उघडणार नाही किंवा ठेवणार नाही किंवा वापरणार नाही ; अथवा

(ब) दारूचा गुत्ता म्हणून उघडण्यात किंवा ठेवण्यात किंवा वापरण्यात आलेल्या कोणत्याही जागेवर देखरेख ठेवणार नाही, तिची व्यवस्था पाहणार नाही किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवणार नाही किंवा तिच्यातील धंदा चालविण्यास कोणत्याही रीतीने सहाय्य करणार नाही.

Section 22-A PROHIBITION OF ISSUING PRESCRIPTIONS FOR INTOXICATING LIQUOR EXCEPT BY REGISTERED MEDICAL PRACTITIONERS.. नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीने मादक दारूसाठी औषधोपचाराचे औषधपत्र देण्यास मनाई.

22-A Prohibition of issuing prescriptions for intoxicating liquor except by registered medical practitioners.. नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीने मादक दारूसाठी औषधोपचाराचे औषधपत्र देण्यास मनाई..[View all order & notifications]

(1)

No person other than a registered medical practitioner, shall issue any prescription for any intoxicating liquor.

नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीव्यतिरिक्त कोणतीही इतर व्यक्ती कोणत्याही मादक दारूसाठी कोणतेही औषधोपचाराचे औषधपत्र देणार नाही.
 

(2)

No registered medical practitioner shall prescribe such intoxicating liquor, unless he believes in good faith after careful medical examination of the person for whose use such prescription is sought, that the use of such intoxicating liquor by such person is necessary; and will afford relief to him from some known ailment.

एखाद्या व्यक्तीला औषधपत्र द्यायचे असेल तर त्या व्यक्तीची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर, त्या व्यक्तीने असा मादक दारूचा वापर करणे आवश्यक असल्याचे व त्यापासून त्या व्यक्तीला एखाद्या परिचित दुखण्यापासून आराम मिळेल असे नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीला सद्भावनापूर्वक वाटत असल्याखेरीज असा कोणताही वैद्यक व्यवसायी अशी मादक दारू औषधपत्रात उपचार म्हणून सुचविणार नाही.
 

(3)

A registered medical practitioner shall state, in every prescription for intoxicating liquor issued by him, the name and address of the person to whom issued, the date of issue, directions for use, and the amount and frequency of the does, and shall preserve a copy of the prescription for one year from the date of issue. On the copy so preserved he shall state the purpose or ailment for which the intoxicating liquor is prescribed.

नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी, मादक दारूसाठी त्याने दिलेल्या प्रत्येक औषधपत्रात, ज्यास ते देण्यात आले असेल त्या व्यक्तीचे नाव व पत्ता, औषधपत्र देण्याचा दिनांक, तिचा उपयोग करण्याबाबत सूचना, कोणत्या प्रमाणात व किती वेळा घ्यावयाचे ते नमूद करील आणि तो अशा औषधपत्राची एक प्रत, ती देण्याच्या दिनांकापासून एक वर्षापर्यंत जपून ठेवील. अशा रीतीने जपून ठेवलेल्या प्रतीवर, त्याने ज्या कारणांकरिता किंवा आजाराकरिता मादक दारू औषधपत्रात लिहून दिली असेल ते कारण किंवा तो आजार नमूद करील.
 

Section 23 PROHIBITION OF SOLICITING USE OF INTOXICANT OR HEMP OR DOING ANY ACT CALCULATED TO INCITE OR ENCOURAGE MEMBER TO COMMIT OFFENCE. मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यास अथवा जनतेतील एखाद्या व्यक्तीस अपराध करण्यास चिथावणी किंवा उत्तेजन देण्याच्या हेतूने कोणतेही कृत्य करण्यास मनाई.

23 Prohibition of soliciting use of intoxicant or hemp or doing any act calculated to incite or encourage member to commit offence. मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यास अथवा जनतेतील एखाद्या व्यक्तीस अपराध करण्यास चिथावणी किंवा उत्तेजन देण्याच्या हेतूने कोणतेही कृत्य करण्यास मनाई..[View all order & notifications]

No person shall—

(a) solicit the use of or offer any intoxicant or hemp ; or

(b) 3 * * * * * * * *

(c) do any act which is calculated to incite or encourage any member of the public or a class of individuals or the public generally to commit any offence under this Act or to commit a breach of any rule, regulation or order made thereunder or the conditions of any licence, permit, pass or authorization granted thereunder.

कोणतीही व्यक्ती-
(अ) कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करणार नाही किंवा असे द्रव्य किंवा भांग देऊ करणार नाही ; अथवा

(ब) । । । । । ।

(क) जनतेतील कोणत्याही व्यक्तीस किंवा एखाद्या वर्गातील व्यक्तीस किंवा सर्वसामान्य लोकांस या अधिनियमाखालील कोणताही अपराध करण्यास किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचा किंवा विनियमाचा किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचा भंग करण्यास किंवा तद्न्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या कोणत्याही शर्तीचा भंग करण्यास चिथावणी किंवा उत्तेजन देण्याच्या हेतूने कोणतेही कृत्य करणार नाही.

Section 24 PROHIBITION OF PUBLICATION OF ADVERTISEMENT RELATING TO INTOXICANT, ETC. मादक द्रव्य, वगैरे यासंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई.

24 Prohibition of publication of advertisement relating to intoxicant, etc. मादक द्रव्य, वगैरे यासंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई..[View all order & notifications]

(1)

No person shall print or publish in any newspaper, news-sheet book, leaflet, booklet or any other single or periodical publication or otherwise display, ordistribute any advertisement or other matter.—

(a) which solicits the use of offers any intoxicant or hemp;

(b) which is calculated to encourage or incite any individual, class or individuals or the public generally to commit an offence under this Act, or to commit a breach of or to evade the provisions of any rule, regulation or order made thereunder or the    conditions of any licence, permit, pass or authorization granted, thereunder.

कोणतीही व्यक्ती-
(अ) ज्याद्वारे कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यात येत आहे किंवा असे द्रव्य किंवा भांग देऊ करण्यात येत आहे, अथवा;

(ब) ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीस किंवा सर्वसामान्य लोकांस या अधिनियमाखालील अपराध करण्यास किंवा तद्न्वये केलेला कोणताही नियम किंवा विनियम किंवा तद्न्वये दिलेला कोणताही आदेश यांच्या तरतुदींचा भंग करण्यास किंवा ते टाळण्यास किंवा तद्न्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या कोणत्याही शर्तीचा भंग करण्यास किंवा त्या टाळण्यास हेतुपूर्वक उत्तेजन किंवा चिथावणी देण्यात येत आहे ;

अशी कोणतीही जाहिरात किंवा इतर मजकूर कोणत्याही वर्तमानपत्रात, वृत्तपत्रात, पुस्तकांत, पत्रकात, पुस्तिकेत किंवा कोणत्याही इतर स्वतंत्र, किंवा नियतकालिक प्रकाशनात छापणार नाही किंवा प्रसिद्ध करणार नाही अथवा अशी जाहिरात अन्यथा प्रदर्शित करणार नाही किंवा वाटणार नाही अथवा असा मजकूर प्रदर्शित करणार नाही किंवा प्रसृत करणार नाही.

(2)

Save as otherwise provided in sub-section (3), nothing in this section shall apply to—

(a) catalogue or price lists which may be generally or specially approved by the Commissioner in this behalf;

(b) any advertisement or other matter contained in any newspaper, news sheet,book, leaflet, booklet or other publication printed and published outside the State;

(c) any advertisement or other matter contained in any newspaper printed, and published in the State before such date as the State Government may, by notification in the Official Gazette, specify; and

(d) any other advertisement or matter which the State Government may, by notification in the Official Gazette, generally or specially exempt from the operation of this section.

पोट-कलम (3) मध्ये जी तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त, या कलमातील कोणतीही तरतूद पुढील गोष्टीस लागू होणार नाही :-
(अ) आयुक्ताने याबाबत सर्वसाधारणत: किंवा विशेषत: मान्यता दिलेल्या सूची किंवा किंमतीच्या याद्या ;

(ब) राज्याबाहेर छापलेले व प्रसिद्ध केलेले कोणतेही वर्तमानपत्र, वार्तापत्र, पुस्तक, पत्रक, पुस्तिका किंवा इतर प्रकाशन यात असलेली कोणतीही जाहिरात किंवा इतर मजकूर ;

(क) राज्य शासन, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा दिनांकापूर्वी राज्यात छापलेल्या किंवा प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही वर्तमानपत्रात असलेली कोणतीही जाहिरात किंवा इतर मजकूर ; आणि

(ड) राज्य शासन, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे या कलमाच्या कक्षेतून सर्वसाधारणत: किंवा विशेषत: वगळील अशी कोणतीही इतर
जाहिरात किंवा मजकूर.
 

(3)

Notwithstanding anything contained in sub-section (2), the State Government may by notification in the Official Gazette, prohibit within the State the circulation, distribution or sale of any newspaper, news sheet, book, leaflet, booklet or other publication printed and published outside the State which contains any advertisement or matter;—

(a) which  solicits the use of or offers any intoxicant or hemp; or

(b) which is calculated to encourage or incite any individual or class of individuals or the public generally to commit any offence under this Act or to commit a breach of or to evade the provisions of any rule, regulation or order made thereunder, or the conditions of any licence, permit, pass or authorisation granted thereunder.

पोट-कलम (2) मध्ये काहीही असले तरी,-
(अ) ज्याद्वारे कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यात येत आहे किंवा असे द्रव्य किंवा भांग देऊ करण्यात येत आहे ; अथवा

(ब) ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीस किंवा सर्वसामान्य लोकांस या अधिनियमाखालील कोणताही अपराध करण्यास किंवा तद्न्वये केलेला कोणताही नियम किंवा विनियम किंवा तद्न्वये दिलेला कोणताही आदेश यांच्या तरतुदींचा भंग करण्यास किंवा ते टाळण्यास किंवा तद्न्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या कोणत्याही शर्तीचा भंग करण्यास किंवा त्या टाळण्यास हेतुपूर्वक उत्तेजन किंवा चिथावणी देण्यात येत आहे ;

अशी कोणतीही जाहिरात किंवा मजकूर ज्यात आहे असे राज्याबाहेर छापलेले व प्रसिद्ध केलेले कोणतेही वर्तमानपत्र, वार्तापत्र, पुस्तक, पत्रक, पुस्तिका किंवा इतर प्रकाशन, यांचा राज्यात प्रसार, वाटप करण्यास किंवा त्याची विक्री करण्यास, राज्य शासनास, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे मनाई करता येईल. 

Section 24-A THIS CHAPTER NOT TO APPLY TO CERTAIN ARTICLES. हे प्रकरण काही पदार्थास लागू नसणे.

24-A This Chapter not to apply to certain articles. हे प्रकरण काही पदार्थास लागू नसणे..[View all order & notifications]

Nothing in this Chapter shall be deemed to apply to ;—

(1) any toilet preparation containing alcohol which is unfit for use as intoxicating liquor;

(2) any medicinal preparation containing alcohol which is unfit for use as intoxicating liquor;

(3) any antiseptic preparation or solution containing alcohol which is unfit for use as intoxicating liquor;

(4) any flavouring extract, essence or syrup containing alcohol which is unfit for use as intoxicating liquor:

Provided that such article corresponds with the description and limitations mentioned in section 59A:

Provided further that the purchase, possession or use of any liquor or alcohol for the manufacture of any such article shall not be made or had except under a licence granted under section 31A.

Explanation.—Nothing in this section shall be construed to mean that any person may drink any toilet preparation, or antiseptic preparation or solution, containing alcohol; and it is hereby provided that no person shall drink any such preparation.

या प्रकरणातील कोणतीही तरतूद पुढील पदार्थास लागू होते असे मानण्यात येणार नाही.
(1) मादक दारू म्हणून वापरण्यास अयोग्य असा मद्यार्क असलेला कोणताही प्रसाधनीय सिद्धपदार्थ ;

(2) मादक दारू म्हणून वापरण्यास अयोग्य असा मद्यार्क असलेला कोणताही औषधीय सिद्धपदार्थ ;

(3) मादक दारू म्हणून वापरण्यास अयोग्य असा मद्यार्क असलेला कोणताही प्रतिपूर्तिक सिद्धपदार्थ किंवा द्रावण ;

(4) मादक दारू म्हणून वापरण्यास अयोग्य असा मद्यार्क असलेला कोणताही स्वाद आणणारा अर्क, सत्व किंवा सरबत :

परंतु, असा पदार्थ कलम 59-अ मध्ये दिलेल्या वर्णनाशी जुळता असेल व त्यात दिलेल्या पदार्थाबरहुकूम तयार केलेला असेल:

परंतु आणखी असे की, कोणताही असा पदार्थ तयार करण्यासाठी कोणतीही दारू किंवा मद्यार्क कलम 31-अ अन्वये दिलेल्या लायसन वाचून खरेदी कऱणार नाही, जवळ बाळगणार नाही किंवा वापरणार नाही.

स्पष्टीकरण.-----या कलमातील कोणत्याही तरतुदीवरून, कोणत्याही व्यक्तीस मद्यार्क असलेला कोणत्याही प्रसाधनीय किंवा प्रतिपूर्तिक सिद्धपदार्थ किंवा द्रावण पिण्यास अधिकार मिळतो असा त्या तरतुदींचा अर्थ लावता येणार नाही ; आणि याद्वारे अशी तरतूद करण्यात येत आहे की, कोणत्याही व्यक्तीस कोणताही असा सिद्धपदार्थ पिता येणार नाही.

Section 25 EXEMPTION OF PREPARATION. सिद्धपदार्थास सूट देणे.

25 Exemption of preparation. सिद्धपदार्थास सूट देणे..[View all order & notifications]

The State Government may, by notification in the Official Gazette; direct that any preparation containing alcohol not exceeding a specified percentage by volume shall be exempt from any of the provisions of this Act or rules, regulations or orders made thereunder.

परिमाणानुसार विनिर्दिष्ट केलेल्या शेकडा प्रमाणापेक्षा अधिक नसेल इतका मद्यार्क असलेला कोणत्याही सिद्धपदार्थास या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीपासून किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमांच्या किंवा विनियमांच्या किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या तरतुदींपासून सूट देण्यात येईल असा राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनाद्वारे राज्य शासनास निदेश देता येईल.

Section 26 DISTILLERIES AND WAREHOUSE FOR INTOXICANTS. मादक द्रव्यांसाठी भट्टया व वखारी.

26 Distilleries and warehouse for intoxicants. मादक द्रव्यांसाठी भट्टया व वखारी..[View all order & notifications]

The State Government] may—

(a) establish a distillery in which spirit may be manufactured in accordance with a licence issued under this Act on such conditions as the State Government deems fit to impose:

(b) discontinue any distillery established :

(c) licence, on such conditions as the State Government deems fit to impose, the construction and working of a distillery or brewery;

(d) establish or licence a warehouse wherein any intoxicant hemp, mhowra flowers or molasses may be deposited and kept without payment of duty; and

(e) discontinue any warehouse so established.

राज्य शासनास-
(अ) राज्य शासनास ज्या शर्ती घालणे योग्य वाटेल त्या शर्तीवर या अधिनियमांअन्वये दिलेल्या लायसनास अनुसरून ज्या भट्टीत मद्यसार तयार करता येईल अशी भट्टी स्थापन करता येईल 

(ब) स्थापन केलेली कोणतीही भट्टी बंद करता येईल ;

(क) दारूची भट्टी व आसवनी बांधण्यासाठी व चालविण्यासाठी राज्य शासनास ज्या शर्ती घालणे योग्य वाटेल अशा त्या शर्तीवर लायसन देता येईल ;

(ड) जी मध्ये शुल्क न देता कोणतीही दारू मादक द्रव्यट भांग, मोहाची फुले किंवा काकवी ठेवता येईल अशी वखार स्थापन करता येईल किंवा तिच्यासाठी लायसन देता येईल ; आणि

(ई) अशा रीतीने स्थापन केलेली कोणतीही वखार बंद करता येईल.

Section 27 INTOXICANT OR HEMP NOT TO BE REMOVED FROM WAREHOUSE, ETC. वखार, वगैरे यातून मादक द्रव्य, किंवा भांग काढून न नेणे.

27 intoxicant or hemp not to be removed from warehouse, etc. वखार, वगैरे यातून मादक द्रव्य, किंवा भांग काढून न नेणे..[View all order & notifications]

No intoxicant, hemp, mhowra flowers or molasses shall be removed from any distillery, warehouse or other place or storage established or licensed under this Act, except under a pass and unless the duty, if any, imposed under the provisions of this Act, has been paid or a bond has been executed for the payment thereof.

पास असल्यावाचून आणि या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये जे कोणतेही शुल्क बसवण्यात आले असेल ते दिल्यावाचून किंवा ते देण्याबद्दल बंधपत्र लिहून दिल्यावाचून कोणतेही मादक द्रव्य भांग, मोहाची फुले किंवा काकवी या अधिनियमाअन्वये स्थापन केलेल्या किंवा लायसन दिलेल्या कोणत्याही दारूच्या भट्टीतून, वखारीतून किंवा साठवण्याच्या इतर जागेतून काढून नेता येणार नाही.
 

Section 28 PASSES FOR IMPORT ETC. आयात वगैरेसाठी पास.

28 Passes for Import etc. आयात वगैरेसाठी पास..[View all order & notifications]

(1)

The State Government may, by general or special order, authorise a Collector or any other officer to grant passes for the import, export or transport or any intoxicant or hemp.

राज्य शासनास, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे कोणत्याही प्रकारचे मादक द्रव्य किंवा भांग याची आयात, निर्यात किंवा परिवहन करण्यास पास देण्यासाठी जिल्हाधिका-यास किंवा कोणत्याही इतर अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

(2)

Such passes may be either general for definite periods of time and definite kind of intoxicant or hemp or special for specified occasions and particulars consignments only.

असे पास सर्वसाधारणत: ठराविक मुदतीसाठी व ठराविक प्रकारचे मादक द्रव्य किंवा भांग यासाठी अथवा विशेष किंवा विनिर्दिष्ट केलेल्या प्रसंगासाठी व पाठविलेल्या विशिष्ट मालासाठी फक्त देता येतील.

(3)

Every such pass shall specify—

(a) the name of the person authorized to import, export or transport intoxicant or hemp;

(b) the period for which the pass is to be in force;

(c) the quantity and description of intoxicant or hemp for which it is granted; and

(d) the places from and to which intoxicant or hemp are to be imported, exported or transported and in the case of places more than ten miles apart, the route by which they are to be conveyed.

अशा प्रत्येक पासात पुढील गोष्टी विनिर्दिष्ट करण्यात येतील-
(अ) मादक द्रव्य किंवा भांग यांची आयात, निर्यात किंवा परिवहन करण्यास प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे नाव ;

(ब) ज्या मुदतीपर्यंत पास अंमलात राहील ती मुदत ;

(क) ज्यासाठी पास देण्यात आला आहे त्या मादक द्रव्याचे किंवा भांगेचे परिमाण व वर्णन ; आणि

(ड) मादक द्रव्य किंवा भांग याची आयात-निर्यात किंवा परिवहन ज्या ठिकाणाहून व ज्या ठिकाणी करावयाचे असेल ती ठिकाणे आणि दहा मैलांपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या ठिकाणांच्या बाबतीत ती ज्या मार्गाने न्यावयाची असतील तो मार्ग. 

Section 29 THROUGH TRANSPORT. थेट वाहतूक

29 Through Transport. थेट वाहतूक.[View all order & notifications]

The through transport—

(a) of any consignment of any intoxicant, hemp, denatured spirituous preparation, mhowra flowers or molasses by a railway administration or by any steamer, ferry, road transport or air service, or

(b) of any intoxicant, hemp, denature spirituous preparation, mhowra flowers or molasses, otherwise than by way of consignment, shall be subject to such conditions as may be prescribed

(अ) रेल्वे प्रशासनाद्वारे किंवा कोणत्याही जहाजाद्वारे किंवा बोटीद्वारे खुष्कीच्या मार्गाने किंवा हवाई मार्गाने पाठविण्यात येणारा माल म्हणून कोणताही मादक पदार्थ, भांग विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, मोहाची फुले किंवा थेट वाहतूक, किंवा

(ब) पाठविण्याचा माल म्हणून नसताना अन्य प्रकारे केलेली कोणतीही मादक पदार्थ, भांग विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, मोहाची फुले किंवा काकवी यांची थेट वाहतूक, विहित करण्यात येतील अशा शर्तींना अधीन असेल. 

Section 30 DELETED. वगळण्यात आले.

30 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

Licence for possession of denatured or rectified spirit and alcohol for industrial or medical purposes. Deleted by Bom. 22 of 1960 s.15.

औद्योगिक किंवा वैद्यकीय प्रयोजनांकरिता विप्रकृत किंवा शुद्ध केलेले मद्यसार व मद्यार्क जवळ बाळगण्यासाठी लायसन सन 1960 चा मुंबई अधिनियम क्रमांक 22, कलम 15 अन्वये हे कलम वगळण्यात आले.

Section 31 LICENCE FOR BONA FIDE MEDICINAL PURPOSE खरोखरीच्या वैद्यकीय किंवा इतर प्रयोजनांकरिता लायसन.

31 Licence for bona fide medicinal Purpose खरोखरीच्या वैद्यकीय किंवा इतर प्रयोजनांकरिता लायसन..[View all order & notifications]

The State Government may, by rules or by an order in writing, authorise an officer to grant licences to any person, or institution, whether under the management of Government or not, for the manufacture, sale, purchase, possession, consumption, or use of any intoxicant or hemp or any article containing an intoxicant or hemp for a bona fide medicinal, scientific, industrial or educational purposes: Provided that, where any intoxicant or hemp, or article containing such intoxicant or hemp, has been obtained by any person for a bona fide medicinal purpose, from any person or institution licensed to sell the same under this section, it shall not be necessary for such person to obtain a licence for the possession, purchase, consumption or use thereof :

Provided further that, no licence shall be necessary for the possession of denatured spirit to the extent of such quantity as may be prescribed.

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, कोणत्याही व्यक्तीस किंवा संस्थेस मग ती शासनाच्या व्यवस्थेखाली असो वा नसो-
खरोखरीच वैद्यकीय, शास्त्रीय, औद्योगिक किंवा शैक्षणिक प्रयोजनांकरिता कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग किंवा ज्यात मादक द्रव्य किंवा भांग असेल असा कोणताही पदार्थ, तयार करण्यासाठी, विकण्यासाठी विकत घेण्यासाठी, जवळ बाळगण्यासाठी, सेवन करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी लायसन देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल :
परंतु, जेव्हा कोणत्याही व्यक्तीने कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग किंवा ज्यात असे अधिक मादक द्रव्य किंवा भांग असेल असा कोणताही पदार्थ ख-याखु-या वैद्यकीय प्रयोजनासाठी, या कलमान्वये तो विकण्यास, लायसन देण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून मिळवला असेल तेव्हा, अशा व्यक्तीस तो जवळ बाळगण्यासाठी, खरेदी करण्यासाठी, सेवन करण्यासाठी, किंवा वापरण्यासाठी लायसन मिळण्याची आवश्यकता असणार नाही :
परंतु, आणखी असे की, विहित करण्यात येईल त्या प्रमाणाच्या मर्यादेपर्यंत विप्रकृत मद्यसार जवळ बाळगण्यासाठी लायसनची आवश्यकता असणार नाही.

Section 31 A LICENCES FOR PURCHASE, ETC., OF LIQUOR FOR MANUFACTURE OF ARTICLES MENTIONED-IN SECTION 24A. कलम 24-अ मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करण्याकरिता, दारू खरेदी करणे वगैरेसाठी लायसन.

31 A Licences for purchase, etc., of liquor for manufacture of articles mentioned-in section 24A. कलम 24-अ मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करण्याकरिता, दारू खरेदी करणे वगैरेसाठी लायसन..[View all order & notifications]

The State Government may, by rules or an order in writing, authorise an officer to grant licences for the purchase, possession or use of any liquor or alcohol for the manufacture of any article mentioned in section 24A on such conditions as may be prescribed. 

राज्य शासनास नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, कलम 24-अ मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ तयार करण्याकरिता कोणत्याही प्रकारची दारू किंवा मद्यार्क खरेदी करण्यासाठी, जवळ बाळगण्यासाठी किंवा वापरण्यासाठी विहित करण्यात येतील अशा शर्तीवर लायसन देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

Section 32 LICENCE FOR TAPPING NEERA . नीरेसाठी झाड छेदण्याचे लायसन.

32 Licence for Tapping Neera . नीरेसाठी झाड छेदण्याचे लायसन..[View all order & notifications]

The State Government may authorise an officer by rules or an order in writing to grant licences for the tapping of, and drawing juice from, any palm trees for the purpose of sale or consumption as neera or manufacture of gur or any other article which is not an intoxicant and on a licence being granted the person to whom the trees belong, or who is in possession of such trees, may permit them to be tapped or permit toddy to be drawn therefrom.

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, नीरा म्हणून विकण्याकरिता किंवा, सेवन करण्याकरिता अथवा गूळ किंवा मादक नसलेला कोणताही इतर पदार्थ तयार करण्याकरिता कोणतीही ताडाची झाडे छेदण्यासाठी आणि त्यापासून रस काढण्यासाठी लायसन देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल ; आणि असे लायसन देण्यात आल्यावर, ज्या व्यक्तीच्या मालकीची ती झाडे आहेत किंवा ती जिच्या ताब्यात आहेत अशा व्यक्तीस, ती झाडे छेदण्यासाठी किंवा त्यापासून ताडी काढून घेण्यासाठी परवानगी देता येईल.

Section 33 TRADE AND IMPORT LICENCES. व्यापार व आयात लायसन.

33 Trade and import licences. व्यापार व आयात लायसन..[View all order & notifications]

The State  Government may by rules or an order in writing, authorise an officer to grant and import licences to persons intending to import and to sell by wholesale any foreign liquor.

राज्य शासनास नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, कोणत्याही प्रकारची परदेशी दारू आयात करण्याचा व ती घाऊक विकण्याचा ज्यांचा इरादा आहे अशा व्यक्तींस व्यापार व आयात लायसन देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

Section 34 VENDOR'S LICENCES

34 Vendor's licences.[View all order & notifications]

(1)

The State Government may, by rules or an order in writing, authorise an officer to grant a vendor’s licence for the sale of foreign liquor.

राज्य शासनास नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, परदेशी दारू विकण्यासाठी विक्रेत्याचे लायसन देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

(2)

A vendor’s licence shall be granted on the following conditions :—

(i) The stock of foreign liquor with the licensee (except what is permitted for thedisposal in the shop) shall be kept by him at godown approved by Government.

(iii) The licensee shall pay all rent, costs, charges and expenses incidental to warehousing and supervision;

(iv) the licensee may sell any part of the stock of foreign liquor to foreign liquor licensees or to chemists, canteens, messes and clubs, holding licences in the State, or to any persons outside the State, Subject to such condition as the Commissioner may impose;

(v) The licensee shall be permitted to sell foreign liquor only to holders of permits or authorization;

(vi) the licensee shall be entitled to keep in his shop such quantity of liquor as may be required by him from time to time for retail sale;

(vii) the licensee shall keep accounts and shall dispose of foreign liquor according to such instructions as may be given by the Commissioner, or any officer authorized in this behalf by the Commissioner.

विक्रेत्याचे लायसन पुढील शर्तींवर देण्यात येईल :-
(एक) लायसनदाराजवळ असलेला परदेशी दारूचा साठी (दुकानात विकण्यासाठी परवानगी दिलेल्या साठ्याव्यतिरिक्त) त्याच्यांकडून शासनाने मान्य केलेल्या गोदामात ठेवण्यात येईल ;

(तीन) माल गोदामात ठेवणे व त्यावर पर्यवेक्षण ठेवणे या गोष्टीस आनुषंगिक असलेले सर्व भाडे, खर्च व आकार लायसनदार देईल ;

(चार) या आयुक्त लादील अशा शर्तींना अधीन राहून लायसनदारास आपल्या परदेशी दारूच्या साठ्यातील कोणताही भाग, राज्यात परदेशी दारूचे लायसन धारण करणा-या व्यक्तींना किंवा रसायनी औषधे विकणा-यांना, अल्पोपहारगृहांना, भोजनालयांना आणि क्लबांना किंवा राज्याबाहेरील कोणत्याही व्यक्तींना विकता येईल ;

(पाच) परवाने व प्राधिकारपत्रे धारण करणा-या व्यक्ती यांनाच फक्त परदेशी दारू विकण्याची लायसनदारास परवानगी देण्यात येईल;

(सहा) किरकोळ विक्रिसाठी वेळोवेळी आवश्यक असेल तेवढीच दारू आपल्या दुकानात ठेवण्याचा लायसनदारास हक्क असेल;

(सात) आयुक्त किंवा त्याने याबाबत प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी जे अनुदेश देईल त्यास अनुसरुन लायसनदार आपले हिशेब ठेवील व परदेशी दारुचा विनियोग करील.

Section 35 HOTEL LICENCES. हॉटेल लायसन.

35 Hotel licences. हॉटेल लायसन..[View all order & notifications]

(1)

The State Government may, by rules or an order in writing, authorize an officer to grant licences to the managers of hotels to sell foreign liquor to the holders of permits granted under this Act: Provided that the State Government is satisfied that such hotel has ordinarily a sufficient number of boarders eligible to hold permits. (RTS Link for making Application)

राज्यशासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, या अधिनियमांन्वये दिलेले परवाने धारण करणा-या व्यक्तींना परदेशी दारू विकण्यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापकांना लायसन देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल:
परंतु, परवाने धारण करण्यास लायक अशा पुरेशा संख्येइतक्या व्यक्ती सामान्यत: अशा हॉटेलमध्ये जेवण घेतात अशी राज्य शासनाची खात्री झाली पाहिजे.
 

(2)

Such licences shall be issued on the following conditions :—

(i) liquor shall be sold  to the permit holders residing or boarding at the hotel,

(ii) Consumption of liquor sold shall not be allowed in any of the rooms of the hotel to which any member of the public has access,

(iii) The holders of hotel licences shall pay the expenses of any officer of the excise establishment, if any, required for grant and control of permits on the premises or for the supervision over the issue and consumption of foreign liquor in the hotel.

अशी लायसने पुढील शर्तीवर देण्यात येतील :-
(एक) जे परवाना-धारक त्या हॉटेलमध्ये राहत असतील किंवा जेवण घेत असतीलट त्यांनाच दारू विकण्यात येईल;

(दोन) जनतेतील कोणत्याही व्यक्तीस हॉटेलच्या ज्या कोणत्याही खोलीत प्रवेश मिळू शकतो तीत, विकण्यात आलेल्या दारुचे सेवन करण्याची परवानगी देण्यात येणार नाही;

(तीन) हॉटेलच्या जागेत परवाने देण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा हॉटेलात परदेशी दारू देणे किंवा ती सेवन करणे यावर देखरेख ठेवण्यासाठी उत्पादनशुल्क आस्थापनेतील कोणत्याही अधिका-याचा जो कोणताही खर्च झाला असेल तो हॉटेल लायसन धारक देतील.

Section 36 DELETED. वगळण्यात आले.

36 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Special import licenses to hotels.] Deleted by Bom.22 of 1960, s. 21.

(हॉटेलांना विशेष आयात लायसन देणे) हे कलम 1960 चा मुंबई अधिनियम क्रमांक 22, कलम 21 अन्वये वगळण्यात आले.

Section 37 DELETED. वगळण्यात आले.

37 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Driving car licences.] Deleted by Bom.22 of 1960, s.21.

(आगगाडीतील जेवणाच्या डब्याचे लायसन्स) हे कलम 1960 चा मुंबई अधिनियम क्रमांक 22, कलम 21 अन्वये वगळण्यात आले.

Section 38 LICENCES TO SHIPPING COMPANIES AND TO MASTERS OF SHIPS. नौवहन कंपनीस व जहाजाच्या प्रमुखास लायसन देणे.

38 Licences to shipping companies and to Masters of ships. नौवहन कंपनीस व जहाजाच्या प्रमुखास लायसन देणे..[View all order & notifications]

The State Government may, by rules or an order in writing, authorized an officer to grant licences to any shipping company for each ship or to the Master of any ship to sell foreign liquor and to permit the use or consumption of foreign liquor on such ship on such conditions as may be prescribed.

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन कोणत्याही नौवहन कंपनीस प्रत्येक जहाजाकरीता किंवा कोणत्याही नौकाधिपतीस अशा जहाजावर परदेशी दारू विकण्यासाठी आणि परदेशी दारू वापरण्यास किंवा सेवन करण्यास परवानगी देण्यासाठी विहित करण्यात येतील अशा शर्तीवर लायसन देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

Section 39 PERMISSION TO USE OR CONSUME FOREIGN LIQUOR ON WARSHIPS, TROOP, SHIP AND IN MESSES AND CANTEENS OF ARMED FORCES. युद्धनौका, सेनानौका, सेनादलाची भोजनालये व आहारगृहे यांत परदेशी दारू वापरण्याची किंवा सेवन करण्याची परवानगी.

39 Permission to use or consume foreign liquor on warships, troop, ship and in messes and canteens of armed forces. युद्धनौका, सेनानौका, सेनादलाची भोजनालये व आहारगृहे यांत परदेशी दारू वापरण्याची किंवा सेवन करण्याची परवानगी..[View all order & notifications]

The State Government may, on such conditions as may be specified by a general or special order, permit—

(i) The sale of foreign liquor to,

(ii) the purchase, use or consumption of such liquor by—

(a) The members of the armed forces in messes and canteens of the armed forces, and

(b) the crew of warship or troop ship and the members of the armed force: thereon.

राज्य शासनास, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीवर-
(अ) सेनादलाची भोजनालये व आहारगृहे यातील सेनादलातील व्यक्तींस आणि,

(ब) युद्धनौका व सेनानौका यांच्या नाविकगणास व त्यांवरील सेनादलातील व्यक्तींस-
(एक) परदेशी दारू विकण्याची,

(दोन) अशी दारू खरेदी करण्याची, वापरण्याची किंवा तिचे सेवन करण्याची परवानगी देता येईल.

Section 40 PERMITS. परवाने.

40 Permits. परवाने..[View all order & notifications]

(1)

 The State Government may, by rules or an order in writing, authorized an officer to grant permits for the use or consumption of foreign liquor to person the following conditions :—

(a) that such person is not a minor;

(c)  (i) That such person was either born and brought up or domiciled in any country outside India where such liquor is being generally used or consumed ; or

(ii) That such person is on the Register of Foreigners under the Registration of Foreigners Act, 1939, and is not domiciled in India :

Provided that, in the case of any person falling under sub-clause (i) or (ii)—

(al) Such person has been residing and intends to reside in India temporarily and that such person has a fixed and settled purpose of making his sole and permanent home in any country outside India; and

(bl) that such person has been ordinarily using or consuming such liquor.

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, परदेशी दारू वापरण्यासाठी किंवा तिचे सेवन करण्यासाठी पुढील शर्तीवर व्यक्तीस परवाने देण्यात एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल :--
(अ) अशी व्यक्ती अज्ञान नसावी ;

(क) (एक) जेथे सर्वसधारणत: अशी दारू वापरण्यात येते किंवा तिचे सेवन करण्यात येते अशा भारताबाहेरील कोणत्याही देशात अशी व्यक्ती जन्मलेली व वाढलेली होती किंवा तिचा अशा देशात अधिवास होता; अथवा

(दोन) परदेशी व्यक्तींच्या नोंदणीबाबत अधिनियम, 1939 अन्वये परदेशी व्यक्तींच्या नोंदवहीत अशा व्यक्तीचे नाव दाखल झालेले आहे व तिचा भारतात अधिवास नाही : परंतु, उप-खंड (एक) किंवा (दोन) यात वर्णन केलेली व्यक्ती ही पुढे सांगितलेल्या प्रकारची असली पाहिजे, म्हणजे :---

(अ-1) अशी व्यक्ती भारतात तात्पुरती राहत असली पाहिजे व तसे राहण्याचा तिचा इरादा असला पाहिजे व भारताबाहेरील कोणत्याही देशात एकमेव व कायमचे घर करण्याचा तिचा ठाम व निश्चित हेतू असला पाहिजे; आणि

(ब-1) अशी व्यक्ती सामान्यत: दारू वापरीत असली पाहिजे किंवा तिचे सेवन करीत असली पाहिजे.
 

(3)

Such permits shall be granted for such quantities as may be prescribed.

असे परवाने विहित करण्यात येतील अशा परिमाणापुरते देण्यात येतील.
 

(4)

If any question arises whether the conditions imposed by clause (a) or (c) of sub-section (1) are satisfied or not in any case, the State Government shall decide question and its decision shall be final.

कोणत्याही बाबतीत पोट-कलम (1), खंड (अ) किंवा खंड (क) याअन्वये घालून दिलेल्या शर्ती पु-या झाल्या आहेत किंवा नाहीत याविषयी कोणताही प्रश्न उद्भवल्यास, राज्य शासन त्याचा निर्णय देईल व राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल.
 

Section 40A HEALTH PERMITS. आरोग्य परवाने.

40A Health Permits. आरोग्य परवाने..[View all order & notifications]

(1)

The State Government may by rules or orders in writing, authorize an officer to grant a health permit for the use or consumption of foreign liquor to any person who requires such liquor for the preservation or maintenance of his health :           

Provided that no such permit shall be granted to a minor. (RTS Link for application for permit)

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, जिला आपली प्रकृती चांगली ठेवण्यासाठी परदेशी दारूची आवश्यकता असेल अशा कोणत्याही व्यक्तीस अशी दारू वापरण्यासाठी तिचे सेवन करण्यासाठी आरोग्य परवाना देण्यास एखाद्या  अधिका-यास प्राधिकृत करता येईल:

परंतु कोणताही असा परवाना एखाद्या अज्ञान व्यक्तीस देण्यात येणार नाही.

(2)

Such permit shall be granted for such quantity and shall be subject to such further conditions as may be prescribed.

असा परवाना विहित करण्यात येईल इतक्या परिणामापुरता व विहित करण्यात येतील अशा आणखी शर्तीवर देण्यात येईल.

Section 40B EMERGENCY PERMITS. निकडीचे परवाने.

40B Emergency permits. निकडीचे परवाने..[View all order & notifications]

(1)

The State Government may by rules or orders in writing, authorize an officer to grant emergency permits for the use or consumption of brandy, rum or champagne or any other kind or liquor to any person for his own use or consumption or to any head of a household for the use of his household for medicinal use on emergent occasions :

Provided that the person to whom a permit is granted under this section may

subject to such conditions as may be prescribed] allow the use or consumption of liquor in respect of which the permit has been granted to any other person who requires the use thereof for medicinal purpose on emergent occasions :

Provided further that on permit shall be granted to more than one member of a household at any one time.

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, कोणत्याही व्यक्तीस, तिच्या स्वत:च्या उपयोगासाठी किंवा सेवनासाठी कोणत्याही कुटुंबप्रमुखास, निकडीच्या प्रसंगी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने औषध म्हणून वापरण्यासाठी ब्राँडी, रम किंवा शँपेन किंवा इतर कोणत्याही प्रकारची दारू वापरण्यासाठी किंवा तिचे सेवन करण्यासाठी निकडीचे परवाने देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल:

परंतु, या कलमान्वये परवाना देण्यात आलेल्या व्यक्तीस विहित करण्यात येईल त्या अटींना अधीन राहूनट ज्या दारूसंबंधी परवाना देण्यात आला असेल अशी दारू निकडीच्या प्रसंगी औषधे म्हणून वापरणे ज्यांस आवश्यक असेल अशा कोणत्याही इतर व्यक्तीस ती वापरण्यास किंवा तिचे सेवन करण्यास परवानगी देता येईल:

परंतु, आणखी असे की, कोणत्याही एका वेळी एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तींस असा परवाना देण्यात येणार नाही.

(3)

Such permits shall be granted for such quantities and shall be subject to such further conditions as may be prescribed. 

असे परवाने, विहित करण्यात येईल अशा परिणामापुरते व विहित करण्यात येतील अशा आणखी शर्तीवर देण्यात येईल. 

Section 41 SPECIAL PERMITS TO FOREIGN SOVEREIGNS, ETC. परकीय राज्यातील राजे वगैरे यांना खास परवाने.

41 Special permits to foreign sovereigns, etc. परकीय राज्यातील राजे वगैरे यांना खास परवाने..[View all order & notifications]

The State Government may grant special for the use or consumption of foreign liquor to any person who is—

(a) A Sovereign or Head of a foreign State ;

(b) an Ambassador, Diplomatic Envoy or Consul, Honorary Consul or Trade, Commerce or other representative of a foreign State;

(c) a member of the staff appointed by or serving under any person, specified in clause (a) or

(b) : Provided that such member is a national or a foreign State; 

(c1) a member of a foreign Government ;

(c2) a representative or officer of any international organization to which privileges and immunities are given for time to time by or under the United of Nationals (Privileges and Immunities) Act, 1947; and 

(d) the Consort of any person specified in clauses (a) , (b), (c), (cl) or (c2) or any relation of such person dependent upon him.

राज्य शासनास, पुढील कोणत्याही व्यक्तीसट परदेशी दारू वापरण्यासाठी किंवा तिचे सेवन करण्यासाठी खास परवाने देता येतील :---
(अ) परकीय राज्याचा राजा किंवा प्रमुख;

(ब) परकीय राज्याचा राजदूत, राजनैतिक दूत अथवा वाणिज्यदूत, परकीय वाणिज्यदूत किंवा व्यापार, वाणिज्य किंवा इतर प्रतिनिधी;

(क) खंड (अ) किंवा (ब) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीने नेमलेल्या कर्मचारी वर्गातील व्यक्ती किंवा त्याच्या नोकरीत असलेली व्यक्ती: परंतु अशी व्यक्ती परकीय राज्याची नागरिक असली पाहिजे;

(क-1) परकीय राज्याचा सदस्य;

(क-2) ज्या आंतरराष्ट्रीय संघटनांना संयुक्त राष्ट्र (विशेषाधिकार आणि उन्मुक्ती) अधिनियम, 1947 अन्वये किंवा त्यानुसार वेळोवेळी विशेषाधिकार आणि उन्मुक्ती देण्यात येतात त्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेचा प्रतिनिधी किंवा अधिकारी ; आणि (ड) खंड (अ) (ब) (क) (क-1) किंवा (क2) यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीची पत्नी किंवा तिच्यावर अवलंबून असलेला तिचा कोणताही नातेवाईक.

Section 42 DELETED. वगळण्यात आले.

42 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Permits to be non-transferable.] Deleted by Bom. 22 of 1960, s.26.

(परवान्यांचे हस्तांतरण करता येणार नाही.) सन 1960 चा मुंबई अधिनियम क्रमांक 22, कलम 26 अन्वये वगळण्यात आले. 

Section 43 REGULATION OF USE OR CONSUMPTION OF FOREIGN LIQUOR BY CERTAIN PERMIT HOLDERS. विवक्षित परवाने धारण करणा-या व्यक्तींनी परदेशी दारू वापरणे किंवा तिचे सेवन करणे याचे विनियमन.

43 Regulation of use or consumption of foreign liquor by certain permit holders. विवक्षित परवाने धारण करणा-या व्यक्तींनी परदेशी दारू वापरणे किंवा तिचे सेवन करणे याचे विनियमन..[View all order & notifications]

(1)

 No holder of a permit granted under any of the provisions of this Act other than section 40B shall drink in a public place   

कलम 40-ब व्यतिरिक्त या अधिनियमाच्या कोणत्याही इतर, तरतुदींअन्वये दिलेला परवाना धारण करणारी कोणतीही व्यक्ती सार्वजनिक जागेत दारू पिणार नाही.
 

(3)

A person holding a permit under sections 40,41,46,46A or 47 may allow the use or consumption of any part of the quantity of foreign liquor possessed by him under the permit, to any other person who holds a permit under any of those sections. 

कलम 40, 41, 46, 46-अ किंवा 47 अन्वये दिलेला परवाना धारण करीत असलेल्या व्यक्तीस तिला परवान्यान्वये जी परदेशी दारू बाळगता येते अशा दारूपैकी कोणत्याही दारूचा उपयोग करण्यासाठी किंवा तिचे सेवन करण्यासाठी, त्या कलमांपैकी कोणत्याही कलमान्वये परवाना धारण करणा-या इतर कोणत्याही व्यक्तीस परवानगी देता येईल.
 

(4)

 No holder of a permit under sections 40,41,46,46A or 47 shall serve any liquor at any ceremonial or other function or any assembly or persons where persons (not being members of his family or his employees) who do not hold any of the permits aforesaid, are present.

कलम 40, 41, 46, 46-अ किंवा 47 अन्वये दिलेला परवाना धारण करीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही समारंभाच्या किंवा इतर प्रसंगी किंवा ज्या ठिकाणी (तिच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा तिचे नोकर नसणारे) उपरोक्त परवान्यांपैकी कोणताही परवाना धारण न करणा-या व्यक्ती उपस्थित असतील अशा सभेत सेवन करण्यास कोणतीही दारू देणार नाही.

Section 44 LICENCE TO CLUBS. क्लब यांना लायसन.

44 Licence to Clubs. क्लब यांना लायसन..[View all order & notifications]

(1)

The State Government may, by rules or an order in writing  grant or authorise an officer to grant licence to a club approved by the State Government in this behalf to sell foreign liquor to its members holding permits. 

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन परवाने धारण करणा-या आपल्या सदस्यांना परदेशी दारू विकण्यासाठी राज्य शासनाने याबाबत मान्य केलेल्या क्लबांस लायसन देता येईल किंवा ते देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

(2)

Such licences shall be granted on the following conditions :— 

(b) that no liquor shall be served to the holder of any permit in any room of the club to which the public have access at the time when any person who does not hold such permit is present;

(c) that the club when authorised in writing by any member who is the holder of a permit may stock the permitted quantity of liquor on account of such member; 

अशी लायसने पुढील शर्तीवर देण्यात येतील :-
(ब) क्लबाच्या ज्या कोणत्याही खोलीत लोकांस प्रवेश मिळू शकतो त्या खोलीत ज्याच्या जवळ परवाना नाही अशी कोणतीही व्यक्ती हजर असेल त्यावेळी कोणताही परवाना धारण करणा-या व्यक्तीस तेथे कोणत्याही प्रकारची दारू देणार नाही ;

(क) परवाना धारण करणा-या कोणत्याही सदस्याने लेखी प्राधिकृत केल्यास क्लबास अशा सदस्याच्या वतीने अनुज्ञात परिमाणाइतकी दारू साठविता येईल ; 

Section 45 AUTHORIZATION FOR SACRAMENTAL PURPOSES. धार्मिक विधीसाठी प्राधिकारपत्र देणे.

45 Authorization for sacramental purposes. धार्मिक विधीसाठी प्राधिकारपत्र देणे..[View all order & notifications]

(1)

The State Government may, by rules or an order in writing, authorise an officer to grant any authorization to any person for the use of liquor for sacramental purposes :

Provided that the officer so authorized is satisfied that the use of such liquor is required in accordance with the religious tenets of the community to which such person belongs. 

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन धार्मिक विधीसाठी दारूचा उपयोग करण्याकरिता कोणत्याही व्यक्तीस प्राधिकारपत्र देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल :

परंतु, अशी व्यक्ती ज्या समाजातील आहे त्या समाजाच्या धार्मिक तत्त्वांनुसार अशा दारूचा उपयोग करणे आवश्यक आहे अशी प्राधिकृत अधिका-याची खात्री झाली पाहिजे.

(2)

An authorization under this section shall be granted on the recommendation of such members of the community to which the person applying for the authorization belongs as may be approved by the State Government in that behalf.

प्राधिकारपत्रांसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही ज्या समाजातील असेल त्या समाजातील ज्या व्यक्तींना राज्य शासनाने याबाबत मान्यता दिली असेल अशा व्यक्तीच्या शिफारशींवरून या कलमाअन्वये प्राधिकारपत्र देण्यात येईल.

(4)

 If any dispute arises whether the use of liquor is required by any person for sacramental purpose, the person requiring such use may apply to the Commissioner. The Commissioner after holding a summary enquiry shall decide whether or not the liquor is required by the person for sacramental purposes.

धार्मिक विधीसाठी कोणत्याही व्यक्तीस दारूचा उपयोग करणे आवश्यक आहे किंवा कसे याविषयी कोणताही विवाद उद्भवल्यास अशा व्यक्तीस आयुक्ताकडे अर्ज करता येईल. आयुक्त संक्षिप्तरीत्या चौकशी करून धार्मिक विधीसाठी अशा व्यक्तीस दारूचा उपयोग करणे आवश्यक आहे किंवा कसे याविषयी निर्णय देईल.

(5)

The decision of the Commissioner under sub-section (4) shall be final

पोट-कलम (4) अन्वये आयुक्ताने दिलेला निर्णय अंतिम असेल. 

Section 46 VISITOR'S PERMIT

46 Visitor's Permit.[View all order & notifications]

(1)

 The State Government may, by rules or an order in writing, authorise an officer to grant a visitor’s permit for the purchase, possession, use or consumption of foreign liquor to a person who—

(a) (i) is a citizen of a foreign country, or a citizen of India and resides in any part of India, where consumption of alcoholic liquor is not generally prohibited by law; or

(ii) is a citizen of a foreign country or is a citizen of India and resides in any part of India, where consumption of liquor is prohibited by law, but has been consuming such liquor under a permit or other authorization; and

(b) Visits the State for a period of not more than a week.

राज्य शासनास नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, जी व्यक्ती.
(अ) (एक) परदेशी नागरिक असेल किंवा भारताचा नागरिक असून भारताच्या ज्या भागात मद्यार्कयुक्त दारू सेवन करण्यात कायद्याने साधारणत: बंदी करण्यात आली नसेल अशा भागात रहात असेल ; किंवा

(दोन) परेदशी नागरिक असेल किंवा भारताचा नागरिक असेल आणि भारताच्या ज्या भागात मद्यार्कयुक्त दारू सेवन करण्यास कायद्याने बंदी करण्यात आली असेल त्या भागात रहात असेल परंतु असे मद्य, परवाना किंवा इतर प्राधिकारपत्र मिळवून सेवन करीत असेल ; आणि

(ब) एक आठवड्याहून अधिक नसलेल्या मुदतीसाठी राज्यास भेट देत असेल,- अशा व्यक्तीस परदेशी दारू विकत घेण्यासाठी, ती ताब्यात ठेवण्यासाठी, ती वापरण्यासाठी आणि तिचे सेवन करण्यासाठी अभ्यागताचे परवाने देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

(2)

Such permit shall be granted ordinarily for a period not exceeding one week at any one time; but may be extended from time to time for further periods not exceeding one week at a time, so however that the total period shall not exceed in the aggregate one month.

असे परवाने कोणत्याही एका वेळी सामान्यत: एका आठवड्याहून अधिक मुदतीकरिता देण्यात येणार नाहीत ; परंतु असा परवाना कोणत्याही एका वेळी जास्तीत जास्त एक आठवड्याच्या आणखी मुदतीसाठी वेळोवेळी वाढविता येईल ; मात्र अशी एकूण मुदत एक महिन्यापेक्षा अधिक असणार नाही.

Section 46A TOURIST'S PERMIT

46A Tourist's permit.[View all order & notifications]

(1)

The State Government may, by rules or an order in writing, authorise an officer to grant a tourist’s permit to consume, use and buy foreign liquor to a person who is a tourist.

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, प्रवासी व्यक्तीस परदेशी दारू सेवन करण्याकरिता, वापरण्याकरिता व विकत घेण्याकरिता एखादा प्रवाशाचा परवाना देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल.
 

(2)

 A tourist’s permit may be granted for the period of the tourist’s intended stay in the State but shall in no case be granted for a period exceeding one month.

प्रवाशाचा परवाना हा, ज्या मुदतीसाठी प्रवाशाचा राज्यात राहण्याचा इरादा असेल त्या मुदतीसाठी देण्यात येईल ; परंतु असा परवाना कोणत्याही बाबतीत एक महिन्याहून अधिक मुदतीसाठी देण्यात येणार नाही.
 

(3)

 Such permits shall be available at such places as may be fixed by the Commissioner in this behalf.

असे परवाने आयुक्त याबाबत ठरवील अशा ठिकाणी मिळतील.
 

Section 47 INTERIM PERMITS. अंतरिम परवाने.

47 Interim permits. अंतरिम परवाने..[View all order & notifications]

(1)

Notwithstanding anything contained in sections 40, 40A and 41 the State Government may, by rules or an order in writing, authorize an officer to gtant interim permits to persons applying for permits under any of the said provisions.

कलम 40, 40-अ व 41ट यांत काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, उक्त तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींअन्वये परवान्यासाठी अर्ज करणा-या व्यक्तींना अंतरिम परवाने देण्यास एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

(2)

Such interim permits shall not be granted for any period exceeding two months.

असे अंतरिम परवाने दोन महिन्यांपेक्षा अधिक मुदतीसाठी देण्यात येणार नाहीत.

Section 48 PERMITS FOR CONSUMPTION OR USE OF INTOXICATING DRUGS OR OPIUM. मादक औषधीद्रव्ये किंवा अफू सेवन करण्यास किंवा वापरण्यास परवाने

48 Permits for consumption or use of intoxicating drugs or opium. मादक औषधीद्रव्ये किंवा अफू सेवन करण्यास किंवा वापरण्यास परवाने.[View all order & notifications]

(1)

The State Government may, by rules or an order in writing, authorise an officer to grant permits for the consumption or use of intoxicating drugs  or opium in such quantities as may be prescribed.

राज्य शासनास, नियम करून किंवा लेखी आदेश देऊन, विहित करण्यात येईल इतक्या परिमाणात मादक औषधिद्रव्य किंवा अफू सेवन करण्याकरिता किंवा वापरण्याकरिता परवाने देण्यासाठी एखाद्या अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

(2)

 Such permits shall be granted on the certificate of the Medical Board.

असे परवाने वैद्यक मंडळाने प्रमाणपत्र दिल्यावर दिले जातील.

Section 48A PERMITS TO BE NON TRANSFERABLE. परवाने अहस्तांतरणीय असणे.

48A Permits to be non transferable. परवाने अहस्तांतरणीय असणे..[View all order & notifications]

Permits granted under sections 40, 40A, 40B, 41, 46, 46A, 47 or 48 shall be non-transferable.

कलम 40, 40-अ, 40-ब, 41, 46, 46-अ, 47 किंवा 48 अन्वये मंजूर केलेले परवाने अहस्तांतरणीय असतील.

Section 49 EXCLUSIVE PRIVILEGE OF THE GOVERNMENT. शासनाचा अनन्य विशेषाधिकार.

49 Exclusive privilege of the Government. शासनाचा अनन्य विशेषाधिकार..[View all order & notifications]

Nowithstanding anything contained in this Act, the State Government shall have the exclusive right or privilege of importing, exporting, transporting, manufacturing, bottling, selling, buying, possessing or using any intoxicant, hemp or toddy, and whenever, under this Act or any licence, permit, pass thereunder any fees are levied and collected for any licene, permit, pass, authorisation or other permission given to any person for any such purpose such fees, shall be deemed to include the rent or consideration for the grant of such right or privilege to that person by or on behalf of the State Government.

शासनाचा मादक द्रव्ये, इत्यादी आयात करण्याचा अनन्य विशेषाधिकार आणि आकारल्या जाणा-या फीमध्ये संबंधित व्यक्तीला असा विशेषाधिकार देण्याबद्दलच्या भाड्याचा किंवा मोबदल्याचा समावेश असणे. या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य शासनाला, कोणतेही मादक द्रव्य, भांग किंवा ताडी यांची आयात करण्याचा, निर्यात करण्याचा, वाहतूक करण्याचा, निर्मिती करण्याचा, ती बाटलीत भरण्याचा, त्यांची विक्री करण्याचा, खरेदी करण्याचा, ती जवळ बाळगण्याचा किंवा त्यांचा वापर करण्याचा अनन्य अधिकार किंवा विशेषाधिकार असेल आणि या अधिनियमान्वये किंवा त्याखाली तयार केलेल्या कोणत्याही नियमान्वये किंवा आदेशान्वये, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही अशा, प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या कोणत्याही लायसनसाठी, परवान्यासाठी, पासासाठी, प्राधिकारपत्रासाठी किंवा अन्य परवानगीसाठी कोणतीही फी आकारण्यात आणि वसूल करण्यात आली असेल त्या बाबतीत, अशा फी मध्ये राज्य शासनाकडून किंवा त्याच्या वतीने त्या व्यक्तीला असा अधिकार किंवा विशेषाधिकार दिल्याबद्दलच्या भाड्याचा किंवा मोबदल्याचा समावेश होत असल्याचे मानण्यात येईल.

Section 50 DELETED. वगळण्यात आले.

50 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Warehousing of opium.] Deleted by Bom. 22 of 1960, s.34.

(अफू वखारीत ठेवणे.) हे कलम सन 1960 चा मुंबई अधिनियम क्रमांक 22, कलम 34 अन्वये वगळण्यात आले.

Section 51 DELETED. वगळण्यात आले.

51 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Rules for sale, etc., of warehoused intoxicant or hemp.] Deleted by Bom. 22of 1960, s.34.

(वखारीत ठेवलेले मादक द्रव्य किंवा भांग यांची विक्री वगैरे यांसाठी नियम.) हे कलम सन 1960 चा मुंबई अधिनियम क्रमांक 22, कलम
34 अन्वये वगळण्यात आले.

Section 52 AUTHORISED OFFICERS TO GRANT LICENCES, PERMITS ETC. काही बाबतीत लायसने, परवाने व पास देण्याचा प्राधिकृत अधिका-याचा अधिकार.

52 Authorised officers to grant licences, permits etc. काही बाबतीत लायसने, परवाने व पास देण्याचा प्राधिकृत अधिका-याचा अधिकार..[View all order & notifications]

Notwithstanding anything in this Act, it shall be lawful for any officer authorized by the State Government in this behalf to grant any licences, passes or permits for import, export, transport, possession, sale, buying, cultivation, collection, manufacture, 2[bottling], consumption and use of any intoxicant, hemp, or mhowra flowers or molasses or for the tapping of any toddy producing tree or the drawing of toddy from such tree in case other than those specifically provided under any of the provisions of this Act.

या अधिनियमात काहीही असले तरी राज्य शासनाने याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिका-यास कोणतेही मादक द्रव्य, भांग किंवा मोहाची फुले किंवा काकवी आयात करणे, निर्यात करणे, त्यांचे परिवहन करणे, ती जवळ बाळगणे, विकणे, विकत घेणे, त्यांची लागवड करणे, ती गोळा करणे, तयार करणे, बाटलीत भरणे, त्यांचे सेवन करणे व ती वापरणे यांसाठी अथवा ताडी देणारे कोणतेही झाड छेदण्यासाठी किंवा अशा झाडापासून ताडी काढण्यासाठी या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदी अन्वये ज्या बाबतीत खास तरतूद करण्यात आली असेल त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत कोणतीही लायसने, परवाने किंवा पास देता येतील आणि त्याने तसे करणे हे कायदेशीर असेल.

Section 53 GENERAL CONDITIONS REGARDING LICENCES. लायसने, वगैरे यासंबंधी सर्वसाधारण शर्ती.

53 General Conditions regarding Licences. लायसने, वगैरे यासंबंधी सर्वसाधारण शर्ती..[View all order & notifications]

All licences, permits, passes, or authorizations granted under this Act shall be in such from and shall, in addition to or in variation or substitution of any of the conditions provided by this Act, be subject to such conditions as may be prescribe and shall be granted on payment of the prescribed fee :

Provided that every licence, permit, pass or authorization shall be granted only on the condition that the  person applying undertakes, and in the opinion of the officer authorized to grant the licence, permit, pass or authorization is likely to abide by all the conditions of the licence, permit, pass or authorization and the provisions of this Act.

या अधिनियमाअन्वये दिलेली सर्व लायसने, परवाने, पास किंवा प्राधिकारपत्रे ही विहित करण्यात येईल अशा नमुन्याप्रमाणे असतील. तसेच तीत या अधिनयमान्वये ज्या कोणत्याही शर्तींची तरतूद करण्यात आली असेल त्याशिवाय आणखी किंवा त्यात फेरफार करून किंवा त्यांच्याऐवजी विहित करण्यात येतील अशा शर्तींना अधीन असतील आणि ती विहित करण्यात येईल अशी फी दिल्यानंतर देण्यात येतील ;
परंतु, असे प्रत्येक लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यांसाठी जो अर्ज करील त्याने आपण अशा लायसनच्या, परवान्याच्या, पासाच्या किंवा प्राधिकारपत्राच्या सर्व शर्तींचे व या अधिनियमाच्या तरतुदींचे पालन करू याबद्दल हमी दिली असेल, आणि अशा शर्तींचे व तरतुदींचे तो पालन करील याबद्दल  असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र देण्यास प्राधिकृत केलेल्या अधिका-याचे मत झाले तरच त्यास असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र देण्यात येईल.      

Section 53A TO KEEP MEASURES ETC.विवक्षित लायसनदारांनी मापे, वगैरे ठेवणे.

53A To keep measures etc.विवक्षित लायसनदारांनी मापे, वगैरे ठेवणे..[View all order & notifications]

Every person who manufactures or sells any intoxicant or hemp under a licence granted under this Act, shall be bound—

या अधिनियमान्वये मंजूर केलेल्या लायसनअन्वये जी कोणी व्यक्ती, कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग तयार करील किंवा विकील अशी प्रत्येक व्यक्ती,-

(a)

to equip himself with and keep such measures and weights and such instruments for testing the strength or quality of the intoxicant or hemp as the Collector may prescribe, and to keep the same in good conditions, and

मादक द्रव्याची किंवा भांगेची तीव्रता किंवा प्रत यांची पारख करण्यासाठी, जिल्हाधिकारी विहित करील अशी वजने व मापे आणि उपकरणे स्वत:जवळ ठेवण्यास आणि ती सुस्थितीत राखण्यास, आणि

(b)

on a requisition of any Prohibition Officer, duly empowered in this behalf, at any time to measure, weigh or test any intoxicant or hemp in his possession or to have it measured, weighed or tested in such manner as the Prohibition Officer may require.

या बाबतीत योग्य रीतीने अधिकार दिलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिका-याने मागणी केली असता, त्याच्या ताब्यात असलेले कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग यांची दारूबंदी अधिका-यास आवश्यक वाटेल त्या रीतीने मोजणी करण्यास, तोलण्यास किंवा पारख करण्यास किंवा ती मोजण्याची, तोलण्याची किंवा त्याची पारख करण्याची व्यवस्था करण्यास, बांधलेली असेल.
 

Section 54 POWERS TO CANCEL OR SUSPEND LICENCES. लायसने व परवाने रद्द करण्याचा किंवा तहकूब करण्याचा अधिकार.

54 Powers to cancel or suspend licences. लायसने व परवाने रद्द करण्याचा किंवा तहकूब करण्याचा अधिकार..[View all order & notifications]

(1)

The authority granting any licence, permit, pass or authorization under this Act may for reasons to be recorded in writing cancel or suspend it,];

(a) if any fee or duty payable by the holder thereof is not duly paid ;

(b) if the purpose for which the licence, permit, pass or authorization was granted ceases to exist;

(c) in the event of any breach by the holder of such licence, permit, pass or authorization or by his servant or by any one acting with his express or implied permission on his behalf of any of the terms or conditions of such licence, permit, pass or authorization or of any licence, permit, pass or authorization previously held by the holder;

(d) if the holder thereof or any person in the employ of such holder or any person acting with his express or implied permission on his behalf is convicted of any offence under this Act or if the holder of the licence, permit, pass or authorization is convicted of any cognizable and non-bailable offence or of any offence under the Dangerous Drugs Act, 1930 or under the Drugs Act, 1940 or under the Bombay Drugs (Control) Act, 1952]or under the Indian Merchandise Marks Act, 1889, or of any offence punishable under sections 482 to 489 (both inclusive) of the Indian Penal Code, or of any offence punishable under Article 8 of the Schedule to section 167 of the Sea Customs Act, 1878;

(e) if the licence, permit, pass or authorization has been obtained through wilful nmisrepresentation or fraud.

(अ) या अधिनियमाअन्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणा-या व्यक्तीने द्यावयाची कोणतीही फी किंवा शुल्क योग्य रीतीने दिले नाहीतर ;(ब) ज्या कारणासाठी असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र देण्यात आले ते कारण नाहीसे झाले तर ;

(क) असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणा-या व्यक्तीने किंवा त्याच्या नोकराने किंवा त्याच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने त्याच्या वतीने काम करणा-या कोणत्याही व्यक्तीने असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या कोणत्याही अटीचा किंवा शर्तीचा किंवा ते धारण करणा-या व्यक्तीने पूर्वी जे कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण केले होते त्याच्या कोणत्याही अटीचा किंवा शर्तीचा भंग केला तर ;

(ड) असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणा-या व्यक्तीस किंवा तिच्या नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीस किंवा त्याच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने त्याच्या वतीने काम करणा-या कोणत्याही व्यक्तीस या अधिनियमाखालील कोणताही अपराध केल्याबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आले असेल किंवा ते धारण करणा-या व्यक्तीस कोणत्याही दखलपात्र व जामीन घेण्यास अयोग्य असा, कोणताही अपराध केल्याबद्दल किंवा घातक औषधिद्रव्य अधिनियम, 1930 किंवा औषधिद्रव्य अधिनियम, 1940 किंवा मुंबई औषधिद्रव्य (नियंत्रण) अधिनियम, 1952 किंवा भारतीय पण्यचिन्ह अधिनियम, 1889 याखालील अपराध केल्याबद्दल अथवा भारतीय दंड संहिता, कलमे 482 ते 489 (दोन्ही धरून) याअन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणताही अपराध केल्याबद्दल अथवा समुद्र सीमाशुल्क अधिनियम, 1878, कलम 167 च्या अनुसूचीतील अनुच्छेद 8 अन्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध केल्याबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आले तर ;

(ई) असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र जाणूनबुजून खोटी कारणे देऊन किंवा लबाडीने प्राप्त केले असेल तर,-

असे कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र मंजूर करणा-या प्राधिका-यास कारणे लेखी नमूद करून असे कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र रद्द करता येईल किंवा तहकूब करता येईल.

(2)

Where a licence, permit, pass or authorization held by any person is cancelled, under sub-section (7), the authority aforesaid may cancel any other licence, permit, or pass or authorization granted or deemed to have been granted to such person under this Act.

कोणत्याही व्यक्तीने धारण केलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र पोट-कलम (1) अन्वये रद्द करण्यात येईल तेव्हा, उपरोक्त प्राधिका-यास या अधिनियमाअन्वये अशा व्यक्तीस दिलेले किंवा दिले आहे असे समजण्यात येणारे कोणतेही इतर लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र रद्द करता येईल. 

(3)

Notwithstanding anything contained in this section, the State Government may, for reasons to be recorded in writing, suspend or cancel any licence, permit, pass or authorization.

या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य शासनास, कारणे लेखी नमूद करून कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र रद्द करता येईल किंवा तहकूब करता येईल.
 

Section 55 NO COMPENSATION OR REFUND OF FEE FOR CANCELLATION OR SUSPENSION. लायसने, वगैरे धारण करणा-या व्यक्तीस ते रद्द केल्याबद्दल किंवा तहकूब केल्याबद्दल भरपाई मिळण्याचा किंवा फी परत मिळण्याचा हक्क असणार नाही.

55 No compensation or refund of fee for cancellation or suspension. लायसने, वगैरे धारण करणा-या व्यक्तीस ते रद्द केल्याबद्दल किंवा तहकूब केल्याबद्दल भरपाई मिळण्याचा किंवा फी परत मिळण्याचा हक्क असणार नाही..[View all order & notifications]

No holder of a licence, permit, pass or authorization shall be entitled to any compensation for the cancellation or suspension of the licence, permit, pass or authorization under section 54 nor to a refund of any fee or deposit made in respect thereof.

लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणा-या कोणत्याही व्यक्तीस कलम 54 अन्वये ते रद्द केल्याबद्दल किंवा तहकूब केल्याबद्दल कोणतीही भरपाई मिळण्याचा किंवा त्याबाबत दिलेली कोणतीही फी किंवा अनामत रक्कम परत मिळण्याचा हक्क असणार नाही.
 

Section 56 CANCELLATIONS FOR OTHER REASONS. इतर कारणांसाठी रद्द करणे.

56 Cancellations for other reasons. इतर कारणांसाठी रद्द करणे..[View all order & notifications]

(1)

(1) Whenever the authority granting a licence, permit, pass or authorization considers that it should be cancelled for any cause other than those specified in section 54, he may cancel it either—

(a) on the expiration of not less than fifteen days’ notice in writing of his intention to do so; or

(b) Forthwith without notice, recording his reasons in writing for doing so.

कलम 54 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी एखादे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्रट रद्द करण्यात यावे असे ते देणा-या प्राधिका-यास वाटेल तेव्हा, त्यास,-

(अ) तसे करण्याचा आपला इरादा आहे याविषयी कमीत कमी पंधरा दिवसांची जी लेखी नोटीस देण्यात येईल तिची मुदत संपल्यानंतर ; अथवा

(ब) तसे करण्याबद्दल आपली कारणे नोटीस न देता नमूद करून ताबडतोब, असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र रद्द करता येईल. 

(2)

Where a licence, permit, pass or authorization is cancelled under sub-section (1), a part of the fee for the licence, permit, pass or authorization proportionate to the unexpired portion of the term thereof and the deposit made by the holder thereof in respect of such licence, permit, pass or authorization shall be refunded to him after deducting any amount due from him to the State Government.

पोट-कलम (1) अन्वये लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र रद्द करण्यात आल्यास, अशा लायसनच्या, परवान्याच्या, पासाच्या किंवा प्राधिकारपत्राच्या मुदतीपैकी न संपलेल्या मुदतीच्या प्रमाणातील त्याच्या फीचा भाग आणि अशा लायसनच्या, परवानाच्या, पासाच्या किंवा प्राधिकारपत्राच्या संबंधातील ते धारण करणारांने ठेवलेली अनामत रक्कम ही, त्याजकडून राज्य शासनास येणे असलेली रक्कम वजा केल्यानंतर त्यास परत करण्यात येईल.
 

Section 57 ATTACHMENT OF LICENCE. लायसन जप्त करणे.

57 Attachment of licence. लायसन जप्त करणे..[View all order & notifications]

Notwithstanding anything contained in any other section, when a licence is liable under that section to cancellation owing to default in the payment of any duty or fee payable by the holder thereof, the authority granting the licence may attach and take such licence under management, and if the profit received from such management after meeting all the expenses of such attachment and management are less than the amount of the arrears for which the licence was attached and the amount falling due on such licence during the remaining period of such licence the difference shall be recovered from the licensee as if it were a duty or fee leviable under any one of the provision of this Act, and in the event of the said profits exceeding the amount so due under the licence, the licensee shall not be entitled to receive any of the said profits.

कोणत्याही इतर कलमात काहीही अंतर्भूत असले तरी, लायसन धारण करणा-या व्यक्तीने द्यावयाचे कोणतेही शुल्क किंवा फी देण्यात कसूर केल्यामुळे ते लायसन त्या कलमाअन्वये रद्द होण्यास पात्र होईल तेव्हा, असे लायसन देणा-या प्राधिका-यास ते जप्त करण्याचा व त्याअन्वये चालणारा धंदा आपल्या व्यवस्थेखाली घेण्याचा अधिकार आहे आणि अशा व्यवस्थेपासून झालेल्या नफ्याची रक्कम ही, अशा जप्तीबद्दल व व्यवस्थेबद्दल झालेला सर्व खर्च भागविण्यात आल्यानंतर, थकबाकीच्या ज्या रकमेसाठी असे लायसन जप्त करण्यात आले ती रक्कम आणि अशा लायसनच्या बाकीच्या मुदतीत त्याबद्दल द्यावयाची रक्कम त्यांच्यापेक्षा कमी असेल तर, अशी कमी पडणारी रक्कम, जणू ती या अधिनियमाच्या कोणत्याही एका तरतुदीअन्वये द्यावयाचे शुल्क किंवा फी आहे अस समजून, लायसनदाराकडून वसूल करण्यात येईल ; परंतु अशी नफ्याची रक्कम लायसनअन्वये द्यावयाच्या रकमेपेक्षा अधिक झाल्यास, अशा कोणत्याही फायद्याची रक्कम मिळण्याचा लायसनदारास हक्क असणार नाही.
 

Section 58 LICENCE NOT TO BE SOLD OR ATTACHED. लायसनअन्वये असलेला हक्क, स्वामित्त्वहक्क किंवा हितसंबंध आदेशिकेची बजावणी करताना विकला जाण्यास किंवा जप्त केला जाण्यास पात्र नसणे.

58 Licence not to be sold or attached. लायसनअन्वये असलेला हक्क, स्वामित्त्वहक्क किंवा हितसंबंध आदेशिकेची बजावणी करताना विकला जाण्यास किंवा जप्त केला जाण्यास पात्र नसणे..[View all order & notifications]

Notwithstanding anything contained in any law for the time being in force no right, title or interest in any licence, permit, pass or authorization granted under this Act shall be liable to be sold, transferred or attached in execution of any process of any civil or any other court.

त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, अधिनियमाअन्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यातील कोणताही हक्क, स्वामित्वहक्क किंवा हितसंबंध कोणत्याही दिवाणी न्यायालयाने किंवा कोणत्याही इतर न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही आदेशिकेची बजावणी करताना विकता येणार नाही, हस्तांतरित करता येणार नाही किंवा जप्त करता येणार नाही.

Section 58A SUPERVISION OVER MANUFACTURE ETC. उत्पादन, वगैरेवर देखरेख ठेवणे.

58A Supervision over manufacture etc. उत्पादन, वगैरेवर देखरेख ठेवणे..[View all order & notifications]

The State Government may be general or special order direct that the manufacture, import, export, transport, storage, sale, purchase, use, collection or cultivation of any intoxicant, denatured spirituous preparation, hemp, mhowra flowers, or molasses shall be under the supervision of such Prohibition and Excise or Police staff as it may deem proper to appoint, and that the cost of such staff shall be paid to the State Government by the person manufacturing, importing, exporting, transporting, storing, selling, purchasing, using, collecting or cultivating the intoxicant, denatured spirituous preparation, hemp, mhowra flowers or molasses

: Provided that, the State Government may exempt any class of persons or institutions from paying the whole or any part of the cost of such staff.

राज्य शासनास सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे असा निदेश देता येईल की, कोणतेही मादक द्रव्य विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग, मोहाची फुले किंवा काकवी यांचे उत्पादन, आयात, निर्यात, परिवहन, साठा, विक्री, खरेदी, वापर, ती गोळा करणे किंवा त्यांची लागवड करणे हे राज्य शासनास ज्यांची नेमणूक करणे योग्य वाटेल अशा दारूबंदी व उत्पादनशुल्क कर्मचारीवर्गाच्या किंवा पोलीस कर्मचारीवर्गाच्या देखरेखीखाली करण्यात येईल ; आणि असे मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग, मोहाची फुले किंवा काकवी यांचे उत्पादन, आयात, निर्यात, परिवहन, साठा, विक्री, खरेदी, वापर किंवा ती गोळा करणा-या किंवा त्यांची लागवड करणा-या व्यक्तीकडून अशा कर्मचारीवर्गाचा खर्च देण्यात
येईल :
परंतु, राज्य शासनास व्यक्तींच्या किंवा संस्थेच्या कोणत्याही वर्गास अशा कर्मचारीवर्गाच्या खर्चाची संपूर्ण रक्कम किंवा त्याचा भाग देण्यापासून सूट देता येईल.

Section 59 COMMISSIONER TO REQUIRE LICENCEE TO DISPOSE OF STOCKS. लायसन धारण करणा-या व्यक्तीस किंवा मालकास साठ्याची विल्हेवाट लावण्याविषयी फर्माविण्याचा आयुक्ताचा अधिकार.

59 Commissioner to require licencee to dispose of stocks. लायसन धारण करणा-या व्यक्तीस किंवा मालकास साठ्याची विल्हेवाट लावण्याविषयी फर्माविण्याचा आयुक्ताचा अधिकार..[View all order & notifications]

(1)

Notwithstanding the fact that the period during which any licence, permit, pass or authorization is to be in force has not expired, the Commissioner may direct the holder thereof to dispose of his stock of intoxicant, denatured spirituous preparation, or hemp or mhowra flowers before such date as may be specified in the order.

 कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र ज्या मुदतीपर्यंत अंमलात असेल ती मुदत संपली नाही तरीही आयुक्तास ते धारण करणा-या व्यक्तीला आदेश देऊन, अशा आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा दिनांकापूर्वी मादक द्रव्य विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ किंवा भांग किंवा मोहाची फुले यांचा त्याच्यापाशी जो साठा असेल त्याची विल्हेवाट लावण्याविषयी निदेश देण्याचा अधिकार आहे.
 

(1A)

the Commissioner may also direct the owner of the stock of any intoxicant, denatured spirituous preparation, hemp or mhowra flowers who does not hold any licence, permit, pass or authorization for such stock to dispose of the said stock before such date as may be specified in the order, and the owner shall comply with such direction.

तसेच, आयुक्तास, कोणतेही मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग किंवा मोहाची फुले याच्या साठ्याचा जो मालक असेल व जो त्यासाठी कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करीत असेल त्याला आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा दिनांकापूर्वी अशा साठ्याची विल्हेवाट लावण्याविषयी निदेश देता येईल ; आणि मालक अशा निदेशाचे पालन करील.

(2)

Any stock intoxicant denatured spirituous preparation, hemp or mhowra flowers left undisposed of after the date so specified shall, together with receptacles or packages in which it is contained, be liable to forfeiture to the State Government] by the order of the Commissioner. On the cancellation or the expiry of the period of any licence, permit, pass or authorization, the Commissioner may also direct that any stock of any intoxicant, denatured spirituous preparation, hemp or mhowra flowers remaining with the holder of the licence, permit, pass or authorization together with receptacles or packages thereof be forfeited to the State Government.

अशा रीतीने विनिर्दिष्ट केलेल्या दिनांकानंतर, मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग किंवा मोहाची फुले यांचा विल्हेवाट न लावता शिल्लक राहिलेला कोणताही साठा, तो ज्यात असेल त्या पात्रांसह किंवा संवेष्टनासह, आयुक्ताच्या, आदेशावरून राज्य शासनाकडे, जमा करता येईल. कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र रद्द केल्यानंतर किंवा त्याची मुदत, संपल्यानंतर आयुक्तास, असाही निदेश देता येईल की, लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणा-या व्यक्तीपाशी कोणतेही मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग किंवा मोहाची फुले यांचा शिल्लक राहिलेला कोणताही साठा, तो ज्यात असेल त्या पात्रासह किंवा संवेष्टनासह राज्य शासनाकडे, जमा करण्यात यावा.

(3)

If the articles which are forfeited under sub-section (2) are sold, the Commissioner may, if he thinks fit, order the whole or any portion of the sale proceeds of such articles to be paid to the owner thereof.

पोट-कलम (2) अन्वये सरकारजमा केलेल्या वस्तू विकण्यात आल्या तर, आयुक्तास योग्य वाटल्यास, अशा वस्तू विकून आलेली सबंध रक्कम किंवा तिचा कोणताही भाग त्याच्या मालकास देण्यात यावा असा आदेश देता येईल.

(4)

No direction or order under sub-sections (1), (1-A), (2) or (3) shall be made unless the person likely to be adversely affected by such direction or order is given reasonable opportunity of being heard, and the reasons for the direction given or order made are recorded in writing by the Commissioner.

पोट-कलमे (1), (1-अ), (2) किंवा (3) अन्वयेचा कोणताही निदेश किंवा आदेश हा, अशा निदेशामुळे किंवा आदेशामुळे ज्या व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम होण्याचा संभव असेल अशाव्यक्तीस आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली असल्याशिवाय आणि आयुक्ताने, दिलेल्या निदेशाबद्दलच्या किंवा केलेल्या आदेशाबद्दलच्या कारणांची लेखी नोंद केलेली असल्याशिवाय, देता येणार नाही. 

Section 59 AA CONTROL OF ARTICLE MENTIONED IN SECTION 24A. कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थांच्या उत्पादनावर नियंत्रण.

59 AA Control of Article mentioned in section 24A. कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थांच्या उत्पादनावर नियंत्रण..[View all order & notifications]

No article mentioned in section 24 A shall be manufactured, imported or exported, except under a licence which shall, subject to the provisions of any rules made in that behalf, be granted by an officer authorized in that behalf by an order in writing by the State Government :

Provided that no such licence shall be necessary for the import or export of such article to the extent of such quantity as my be prescribed.

कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही पदार्थाचे लायसन असल्याशिवाय उत्पादन, निर्यात किंवा आयात करता येणार नाही ; असे लायसन, या बाबतीत केलेल्या कोणत्याही नियमाच्या तरतुदींना अधीन राहून राज्य शासन लेखी आदेशाद्वारे याबाबतीत प्राधिकृत करील त्या अधिका-याकडून मंजूर करण्यात येईल :

परंतु, विहित करण्यात येईल अशा प्रमाणाच्या मर्यादेपर्यंत पदार्थाची आयात किंवा निर्यात करण्यासाठी अशा कोणत्याही लायसनची आवश्यकता असणार नाही.
 

Section 59 A. MANUFACTURE OF ARTICLES MENTIONED IN SECTION 24A. कलम 24-अ मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करणे.

59 A. Manufacture of articles mentioned in section 24A. कलम 24-अ मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करणे..[View all order & notifications]

(1)

No Manufacturer of any of the articles mentioned in section 24 A shall sell, use or dispose of any liquor purchased or possessed for the purposes of such manufacture under the provisions of this Act otherwise than as an ingredient of the articles authorised to be manufactured therefrom. No more alcohol shall be used in the manufacture of any of the articles mentioned in section 24A than the quantity necessary for extraction or solution of the elements contained therein and for the preservation of the articles :

Provided that in the case of manufacture of any of the articles mentioned is section 24A in which the alcohol is generated by a process of fermentation the amount of such alcohol shall exceed 12 per cent. by Volume

कलम 24-अ मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ तयार करणा-या कोणत्याही व्यक्तीने, तो तयार करण्यासाठी या अधिनियमाच्या तरतुदीन्वये खरेदी केलेली किंवा जवळ बाळगलेली कोणत्याही प्रकारची दारू विकता येणार नाही, वापरता येणार नाही किंवा तिची विल्हेवाट लावता येणार नाही ; परंतु अशा व्यक्तीस, अशी दारू तिच्यापासून जे पदार्थ तयार करण्याचा तिला अधिकार मिळाला असेल त्या पदार्थाचे घटकद्रव्य म्हणून विकता येईल, वापरता येईल किंवा तिची विल्हेवाट लावता येईल. कलम 24-अ मध्ये नमूद केलेले कोणतेही पदार्थ तयार करण्याच्या कामी, त्यात असलेली मूलद्रव्ये काढण्याकरिता किंवा ती विरघळविण्याकरिता व तो पदार्थ टिकविण्याकरिता आवश्यक असेल त्या परिमाणापेक्षा अधिक परिमाणात मद्यार्क वापरता येणार नाही :

परंतु कलम 24-अ मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ तयार करताना आंबवण्याच्या क्रियेने मद्यार्क निर्माण होत असेल त्या बाबतीत, अशा मद्यार्काचे प्रमाण त्याच्या आकारमानाच्या शेकडा 12 टक्क्यांहून अधिक असणार नाही.

(2)

No person shall—

(a) Knowingly sell any article mentioned is section 24A for being used as an intoxicating drink, or

(b) Sell any such article under circumstances from which he might reasonablyreduce the intention of the purchaser to use them for such purpose.

 कोणतीही व्यक्ती,---

(अ) कलम 24-अ मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ मादक पेय म्हणून वापरण्यासाठी जाणूनबुजून विकणार नाही, अथवा

(ब) असा कोणताही पदार्थ अशा कारणासाठी वापरण्याचा, खरेदी करणा-याचा इरादा आहे असे ज्या परिस्थितीवरून त्यास वाजवी रीतीने अनुमान करता येईल त्या परिस्थितीत तो त्यास विकणार नाही.
 

Section 59 B ANALYSIS OF ARTICLES MENTIONED IN SECTION 24A. कलम 24- अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थाचे पृथक्करण.

59 B Analysis of articles mentioned in section 24A. कलम 24- अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थाचे पृथक्करण..[View all order & notifications]

(1)

Whenever the Commissioner has reason to believe that any of the articles mentioned in section 24A does not correspond with the description and limitations provided in section 59A, be shall cause an analysis of the said articles to be made and if upon such analysis the  Commissioner shall find the said article does not so correspond, he shall give not less than 15 days notice in writing to the person who is the manufacturer thereof or is known or believed to have imported or obtained such article to show cause why the said article should not be dealt with is the intoxicating liquor, such notice to be served personally or by registered post at the Commissioner] may determine, and shall specify the time when, place where, and the name of the officer before whom such person is required to appear.

कलम 24-अ मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ कलम 59-अ मध्ये दिलेल्या वर्णनाशी जुळता नाही व त्यात दिलेल्या मर्यादांबरहुकूम तयार केलेला नाही असे आयुक्तास सकारण वाटेल तेव्हा, तो अशा पदार्थाचे पृथक्करण करून घेईल ; आणि असे पृथक्करण केल्यानंतर, असा पदार्थ अशा रीतीने वर सांगितल्याप्रमाणे दिलेल्या वर्णनाशी जुळता नाही व त्यात दिलेल्या मर्यादांबरहुकूम तयार केलेला नाही असे आयुक्तास आढळून आले तर, त्याने असा पदार्थ तयार करणा-या व्यक्तीस किंवा ज्याने तो आयात केल्याचे किंवा प्राप्त केल्याचे त्यास माहीत असेल किंवा तसे केल्याचे त्यास वाटत असेल अशा व्यक्तीस उक्त पदार्थाच्या बाबतीत ती मादक दारू आहे असे समजून उपाययोजना का करण्यात येऊ नये याविषयी कारण
दाखविण्यासाठी कमीतकमी 15 दिवसांची नोटीस देईल. अशी नोटीस आयुक्त ठरवील त्याप्रमाणे जातीने देऊन किंवा नोंदणीकृत डाकेने पाठवून बजावण्यात येईल. तसेच, अशा नोटीशीत, अशा व्यक्तीस ज्यावेळी, ज्या ठिकाणी व ज्या अधिका-यासमोर हजर राहण्याविषयी फर्माविण्यात येईल ती वेळ, ते ठिकाण व त्या अधिका-याचे नाव विनिर्दिष्ट करण्यात येईल. 

(1A)

If such person fails to show to the satisfaction of the Commissioner that the said article corresponds with the description and limitations provided in the section 59A,the Commissioner] may by notification in the Official Gazette direct that the said article be dealt with as an intoxicating liquor and thereupon the provisions of this Act relating to liquor shall apply to that article.

जर अशा व्यक्तीने, उक्तपदार्थ कलम 59-अ मध्ये दिलेल्या वर्णनाशी जुळता आहे व त्यात दिलेल्या मर्यादांबरहुकूम तयार केलेला आहे असे आयुक्ताची खात्री होईल अशा रीतीने दाखविण्यात कसूर केली तर आयुक्तास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निदेश देता येईल की, अशा पदार्थाच्या बाबतीत ती मादक दारू आहे ते समजून विल्हेवाट लावण्यात यावी आणि त्यानंतर दारूसंबंधी या अधिनियमाच्या तरतुदी उक्त पदार्थास लागू होतील.

(2)

Whenever the Commissioner causes an analysis of an article mentioned in section 24-A to be made under sub-section (1) or gives notice thereunder, he may require the person who is the manufacture thereof or who is known or believed to have imported or obtained such articles not to sell ,distribute or otherwise deal with such article, or to remove it from any place without the previous permission of the Commissioner, for any period not exceeding three months from the date of such requisition or till the result of the analysis is known and communicated to him in writing by the Commissioner whichever is earlier, or as the case may be, till such manufacturer, or other person satisfies the Commissioner that the article corresponds to the description and limitations provided in section 59A ; and thereupon such manufacturer or person shall comply with such requisition during the said period.

पोट-कलम (1) अन्वये आयुक्त कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थाचे पृथक्करण करवील किंवा उक्त पोट-कलमान्वये नोटीस देईल तेव्हा, त्याने, असा पदार्थ तयार करणा-या व्यक्तीस किंवा जिने तो आयात केल्याचे किंवा प्राप्त केल्याचे त्यास माहीत असेल किंवा तसे केल्याचे त्यास वाटत असेल अशा व्यक्तीस, आदेश देऊन, अशा आदेशाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत किंवा अशा पृथक्करणाचा निकाल माहीत होईपर्यंत व त्यास तो आयुक्ताकडून लेखी कळविण्यात येईपर्यंत, यापैकी जी मुदत कमी असेल त्या मुदतीत, किंवा, यथास्थिति, अशी तयार करणारी किंवा इतर व्यक्ती, उक्त पदार्थ, कलम 59-अ मध्ये दिलेल्या वर्णनाशी जुळता आहे किंवा त्यात दिलेल्या मर्यादांबरहुकूम तयार केला आहे अशी आयुक्ताची खात्री करून देईपर्यंत असा पदार्थ त्याने विकू नये, वाटू नये किंवा अन्य प्रकारे त्याची व्यवस्था लावू नये म्हणून किंवा  आयुक्ताच्या आगाऊ परवानगीवाचून कोणत्याही ठिकाणाहून तो काढून नेऊ नये म्हणून फर्माविता येईल ; आणि त्यानंतर असा पदार्थ तयार करणारा किंवा अशा व्यक्ती उक्त मुदतीत अशा आदेशाचे पालन करील. 

Section 59 C PROHIBITION AGAINST POSSESSION OF DENATURED SPIRITUOUS PREPARATION IN EXCESS OF PRESCRIBED LIMIT AND THE REGULATION OF ITS POSSESSION IN EXCESS OF PRESCRIBED LIMIT. विहित केलेल्या मर्यादेहून अधिक प्रमाणात विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ जवळ ठेवण्यास प्रतिबंध आणि विहित केलेल्या मर्यादेहून अधिक प्रमाणात ते ठेवल्यास त्याचे विनियमन.

59 C Prohibition against possession of denatured spirituous preparation in excess of prescribed limit and the regulation of its possession in excess of prescribed limit. विहित केलेल्या मर्यादेहून अधिक प्रमाणात विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ जवळ ठेवण्यास प्रतिबंध आणि विहित केलेल्या मर्यादेहून अधिक प्रमाणात ते ठेवल्यास त्याचे विनियमन..[View all order & notifications]

(1)

No person shall have in his possession except under a permit granted by any officer empowered by the State Government in that behalf, any quantity of denatured spirituous preparation in excess of such a quantity as the State Government may, by notification in the Official Gazette, specify.

कोणतीही व्यक्ती, त्या बाबतीत राज्य शासनाने अधिकार दिलेल्या कोणत्याही अधिका-याने मंजूर केलेल्या परवान्यान्वये असेल त्याव्यतिरिक्त, राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील, त्यापेक्षा अधिक प्रमाणात, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ आपल्या ताब्यात ठेवणार नाही.

(2)

In specifying quantity of possession of denatured spirituous preparation under sub-section (1) regard shall be had to the necessity for the free possession of such preparation for legitimate, domestic and other purposes, and different limits may be fixed for—

(i) different local areas,

(ii) different classes of persons, and

(iii) different occasions.

पोट-कलम (1) अन्वये विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ जवळ बाळगण्याचे प्रमाण विनिर्दिष्ट करताना ख-याखु-या, घरगुती आणि इतर प्रयोजनांकरिता असा सिद्धपदार्थ निर्वेधपणे जवळ बाळगण्याची गरज लक्षात घेण्यात येईल, आणि-----

(एक) निरनिराळ्या स्थानिक क्षेत्रासाठी,

(दोन) व्यक्तींच्या निरनिराळ्या वर्गांसाठी, आणि

(दोन) निरनिराळ्या प्रसंगांसाठी, निरनिराळ्या मर्यादा ठरविण्यात येतील.

Section 59 D REGULATION OF MANUFACTURE ETC. OF DENATURED SPIRITUOUS PREPARATIONS. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ तयार करणे वगैरेवर विनियमन.

59 D Regulation of manufacture etc. of denatured spirituous preparations. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ तयार करणे वगैरेवर विनियमन..[View all order & notifications]

(1)

No person shall—

(a) manufacture, sell or bottle for sale any denatured spirituous preparation,except under the authority and in accordance with the terms and conditions of a licence,

(b) import, export or transport any denatured spirituous preparation in excess of the limit of possession specified under sub-section (1) of section 59C, except under the authority and in accordance with the terms and conditions of a pass,

(c) drink any denatured spirituous preparation.

कोणतीही व्यक्ती,-

(अ) लायसन अन्वयेच्या अधिकारान्वये आणि लायसनातील अटी आणि शर्ती यानुसार असेल त्याव्यतिरिक्त, कोणताही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ तयार करणार नाही, त्याची विक्री करणार नाही किंवा विक्रीसाठी तो बाटलीत भरणार नाही,

(ब) एखाद्या पासावरून दिलेल्या अधिकारान्वये आणि पासाच्या अटी आणि शर्तीनुसार असेल त्या व्यतिरिक्त कलम 59-क, पोट-कलम (1) अन्वये जवळ बाळगण्यासाठी जी मर्यादा विनिर्दिष्ट करण्यात आली असेल त्याहून अधिक प्रमाणात कोणत्याही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थाची आयात, निर्यात किंवा त्याचे परिवहन करणार नाही,

(क) कोणताही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ पिणार नाही.

(2)

A licence or pass required under sub-section (1) shall be granted by any officer empowered in writing in that behalf by the State Government.

पोट-कलम (1) अन्वये आवश्यक असलेले लायसन किंवा पास हा, राज्य शासनाने त्याबाबतीत लेखी अधिकार दिलेल्या कोणत्याही अधिका-याकडून मंजूर करण्यात येईल.

Section 60 PROHIBITION OF EXPORT OR IMPORT OF MHOWRA FLOWERS. मोहाच्या फुलांच्या निर्यातीस किंवा आयातीस मनाई. मोहाच्या फुलांचे परिवहन, विक्री वगैरे यांवर नियंत्रण व त्याचे विनियमन.

60 Prohibition of export or import of mhowra flowers. मोहाच्या फुलांच्या निर्यातीस किंवा आयातीस मनाई. मोहाच्या फुलांचे परिवहन, विक्री वगैरे यांवर नियंत्रण व त्याचे विनियमन..[View all order & notifications]

(1)

No person shall export or import mhowra flowers except under a pass granted by the Collector or an officer authorised in this behalf.

जिल्हाधिका-याने किंवा याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिका-याने दिलेल्या पासावाचून कोणतीही व्यक्ती मोहाच्या फुलांची निर्यात करणार नाही किंवा त्यांची आयात करणार नाही.

(2)

No person or head of household on his behalf or on behalf of the members of his household shall in the aggregate collect or transport or sell or buy or have in his possession mhowra flowers exceeding the prescribed limit in weight, except under the authority and subject to the conditions of a licence, permit or pass granted by the Collector or an officer authorized in this behalf :

Provided that no licence, permit or pass shall be necessary for the collection, transport, sale, purchase or possession within such area and during such period (hereinafter called vacation period) as the State Government may, by notification in the Official Gazette notify, of any quantity of Mhowara flowers which shall be the produce of that year and of that area:

Provided further that unless the State Government by anotification in the Official Gazette, otherwise directs, no licence, permit or pass shall be necessary for the transport by rail of any quantity of Mhowra flowers through an area which has no vacation period or the vacation period for which has expired at the time when the transport takes place, provided that—

(i) the said flowers are not unloaded in transit, and

(ii) there is a vacation period at the place from which and to which the said flowers are transported at the time when the said flowers are dispatched or arrive, as the case may be.

जिल्हाधिका-याने किंवा याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिका-याने दिलेले लायसन, परवाना किंवा पास यावाचून आणि असे लायसन, परवाना किंवा पास यातील शर्ती पाळल्यावाचून कोणत्याही व्यक्तीने किंवा कुटुंबप्रमुखाने, त्याच्या स्वत:च्या वतीने किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या वतीने एकंदर विहित करण्यात येईल इतक्या वजनापेक्षा अधिक मोहाची फुले गोळा करणार नाही किंवा त्यांचे परिवहन करणार नाही किंवा ती विकणार नाही किंवा विकत घेणार नाही किंवा ती आपल्याजवळ बाळगणार नाही :

परंतु, राज्य शासन, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे जाहीर करील अशा क्षेत्रात व अशा मुदतीत (जिल्ह्यात यापुढे माफीची मुदत असे म्हटले आहे.) त्यावर्षी व त्या क्षेत्रात आलेली मोहाची फुले कोणत्याही परिमाणात गोळा करण्यासाठी त्याचे परिवहन करण्यासाठी, ती विकण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा जवळ बाळगण्यासाठी कोणत्याही लायसनची, परवान्याची किंवा पासाची आवश्यकता असणार नाही :

परंतु, आणखी असे की, राज्य शासनाने राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे अन्यथा निदेश दिलेला नसल्यास, ज्या क्षेत्राच्या बाबतीत माफीची मुदत नाही किंवा परिवहनाचे वेळी ज्या क्षेत्राच्या बाबतीत माफीची मुदत संपली असेल त्या क्षेत्रातून, मोहाच्या फुलांचे कोणत्याही परिमाणात रेल्वेने परिवहन करण्यासाठी कोणत्याही लायसनची, परवान्याची किंवा पासाची आवश्यकता असणार नाही, परंतु-

(एक) अशी फुले त्याची ने-आण करताना खाली उतरवून घेऊ नये ; आणि

(दोन) ज्या ठिकाणाहून व ज्या ठिकाणाकडे अशा फुलांचे परिवहन करण्यात येत असेल त्या ठिकाणी अशी फुले पाठविण्यात येतील किंवा यथास्थिति, पोचतील त्यावेळी माफीची मुदत चालू असेल.

Section 61 CONTROL & REGULATION OF MOLASSES. काकवीची निर्यात, वगैरे यावर नियंत्रण.

61 Control & Regulation of Molasses. काकवीची निर्यात, वगैरे यावर नियंत्रण..[View all order & notifications]

(1)

Except as otherwise provided in sub-sections (2) and (3) no person shall export, import, transport, sell or have in his possession any quantity of molasses.

पोट-कलमे (2) व (3) अन्वये अन्यथा जी तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती कोणत्याही परिमाणात काकवी निर्यात करणार नाही, आयात करणार नाही, तिचे परिवहन करणार नाही, ती विकणार नाही किंवा आपल्याजवळ बाळगणार नाही.
 

(2)

The State Government may, by general or special order, authorise any collector or any other officer to grant licenses for the import, export, sale or possession of molasses.

राज्य शासनास सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे, काकवी आयात करण्यासाठी, निर्यात करण्यासाठी, विकण्यासाठी किंवा जवळ बाळगण्यासाठी लायसन देण्याकरिता कोणत्याही जिल्हाधिका-यास किंवा कोणत्याही इतर अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

(3)

The State Government may also authorise any Collector or any other officer to grant permits for the transport of molasses.

तसेच राज्य शासनास, काकवीचे परिवहन करण्यासाठी परवाने देण्याकरिता कोणत्याही जिल्हाधिका-यास किंवा कोणत्याही इतर अधिका-यास प्राधिकृत करता येईल.

Section 62 PROVISIONS APPLICABLE TO LICENCES UNDER SECTION 61. कलम 53 ते 59 याच्या तरतुदी कलम 61 अन्वये दिलेल्या लायसनच्या बाबतीत लागू होणे.

62 Provisions applicable to licences under section 61. कलम 53 ते 59 याच्या तरतुदी कलम 61 अन्वये दिलेल्या लायसनच्या बाबतीत लागू होणे..[View all order & notifications]

The provision of sections 53 to 59 (both inclusive) shall, so far as may be applicable, apply to licenses or permits granted under section 61.

कलमे 53 ते 59 (दोन्ही धरून) च्या तरतुदी या, शक्य तेथवर कलम 61 अन्वये दिलेली लायसने किंवा परवाने यांच्या बाबतीत लागू होतील.
 

Section 63 PROVISION OF ACT REGARDING MOLASSES TO BE IN ADDITION TO AND NOT IN DEROGATION OF BOMBAY MOLASSES (CONTROL) ACT, 1956. काकवी बाबतच्या या अधिनियमाच्या तरतुदी या सन 1956 या मुंबई अधिनियम क्रमांक 38 याच्या तरतुदीच्या जोडीने असतील व त्यामुळे उक्त अधिनियमाच्या तरतुदीचे न्यूनीकरण होणार नाही.

63 Provision of act regarding molasses to be in addition to and not in derogation of Bombay Molasses (Control) Act, 1956. काकवी बाबतच्या या अधिनियमाच्या तरतुदी या सन 1956 या मुंबई अधिनियम क्रमांक 38 याच्या तरतुदीच्या जोडीने असतील व त्यामुळे उक्त अधिनियमाच्या तरतुदीचे न्यूनीकरण होणार नाही..[View all order & notifications]

The provisions of this Act in relation to molasses shall be in addition to, and not in derogation of the provisions of the Bombay Molasses (Control) Act,1956, or of any rule or order made thereunder.

या अधिनियमाच्या काकवीसंबंधी असलेल्या तरतुदी या मुंबईचा काकवीवरील नियंत्रणाबाबत अधिनियम, 1956 याच्या किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाच्या किंवा दिलेल्या आदेशाच्या तरतुदींच्या जोडीने असतील व त्याच्यामुळे उक्त अधिनियमाच्या तरतुदींचे न्यूनीकरण होणार नाही.

Section 64 DELETED .वगळण्यात आले.

64 Deleted .वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Power of State Government to direct holder of stock of molasses to sell them at fixed price to any officer, person or class of persons.] Deleted by Bom.26 of 1952, s.30.

 (काकवीचा साठा धारण करणा-या व्यक्तीस ते कोणत्याही अधिका-यास, व्यक्तीस किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीस ठराविक किंमतीत विकण्यासाठी निदेश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार.) सन 1952 चा मुंबई अधिनियम क्रमांक 26, कलम 30 अन्वये वगळण्यात आले. 

Section 65 PENALTY FOR ILLEGAL SALE, IMPORT ETC. OF INTOXICANT

65 Penalty for illegal sale, import etc. of intoxicant.[View all order & notifications]

Whoever in contravention of the provision of this Act, or of any rule, regulation or order made or of any licence, pass, permit or authorization granted thereunder—

(a) imports or exports or transports any intoxicant (other than opium)] or hemp,

(b) manufactures any intoxicant (other than opium),

(c) constructs or works any distillery or brewery,

(d) bottles liquor,

(e) sells or buys or possesses any intoxicant (other than opium) or hemp, or

(f) uses, keeps or has in his Possession any materials, still utensils, implements or apparatus for the purpose of manufacturing any intoxicant other than opium.

(g) cultivates or collects hemp. shall, on conviction, be punished for each such offence with imprisonment for a term which shall not be less than three years but which may extend to five years or with fine which shall not be less than twenty-five thousand rupees but which may extend to fifty thousand rupees or with both.

जी कोणी व्यक्ती, या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही लायसनचे, पासाचे परवान्याचे किंवा प्राधिकारपत्राचे उल्लंघन करून,------
 
(अ) कोणतेही मादक द्रव्य (अफू व्यतिरिक्त) किंवा भांग आयात करील किंवा निर्यात करील. किंवा तिचे परिवहन करील.
(ब) कोणतेही मादक द्रव्य (अफू व्यतिरिक्त) तयार करील.
(क) कोणतेही दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधील किंवा चालविल.
(ड) दारू बाटलीत भरील.
(ई) कोणतेही मादक द्रव्य (अफू व्यतिरिक्त) किंवा भांग विकील किंवा विकत घेईल. किंवा जवळ बाळगील अथवा
(फ) (अफू व्यतिरिक्त) कोणतेही मादक द्रव्य तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य, दारू गाळण्याची भट्टी, भांडी, साधने किंवा उपकरणे वापरील, ठेवील किंवा आपल्याजवळ बाळगील.
(ग) भांगेची लागवड करील किंवा तिचा साठी करील.

 

त्यास, सिद्धापराध ठरविण्यात आल्यावर, अशा प्रत्येक अपराधाबद्दल तीन वर्षांपेक्षा कमी नसेल, परंतु, पाच वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

 

Section 66 PENALTY FOR ILLEGAL CULTIVATION OF HEMP. भांगेची बेकायदेशीररित्या लागवड करणे व ती गोळा करणे आणि इतर गोष्टींबद्दल शास्ती.

66 Penalty for illegal cultivation of Hemp. भांगेची बेकायदेशीररित्या लागवड करणे व ती गोळा करणे आणि इतर गोष्टींबद्दल शास्ती..[View all order & notifications]

(1)

whoever in contravention of the provisions of this Act, or of any rule, regulation or order made or of any licence, permit, pass or authorization issued, thereunder—

(b) consumes or uses any intoxicant other than opium or hemp,

(c)  taps or permits to be tapped any toddy producing tree,

(d)  draws or permits to be drawn toddy from any tree, shall, on conviction be punished—

(i)  for a first offence, with imprisonment for a term which may extend to sixmonths and with fine which may extend to ten thousand rupees:

Provided that, in the absence of special and adequate reasons to the contrary to be mentioned in the judgement of the Court, such imprisonment shall not be less than five thousand rupees;

(ii) for a second offence, with imprisonment for a term which may extend two years and with fine which may extend to twenty thousand rupees : Provided that, in the absence of special and adequate reasons to the contrary to be mentioned in the judgement of the Court, such imprisonment shall not be less than six months and fine shall not be less than 8[ten thousand rupees;

(iii) for a third or subsequent offences, with imprisonment for a term which may extend to two years and with fine which may extend to twenty thousand rupees:

Provided that, in absence of special and adequate reasons to the contrary to be mentioned in the judgement of the Court, such imprisonment shall not be less than nine months and fine shall not be less than ten thousand rupees.

जी कोणी व्यक्ती या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही लायसनचे, परवान्याचे, पासाचे किंवा प्राधिकारपत्राचे उल्लंघन करून-

(ब) कोणतेही मादक द्रव्य (अफू व्यतिरिक्त) किंवा भांग सेवन करील किंवा वापरील.

(क) कोणतेही ताडी देणारे झाड छेदील किंवा छेदण्यास परवानगी देईल.

(ड) कोणत्याही झाडापासून ताडी काढील किंवा ताडी काढण्यास परवानगी देईल, त्यास सिद्धापराध ठरवण्यात आले असता,-

(एक) पहिल्या अपराधाबद्दल सहा महिन्यांपर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व दहा हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ
शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल :

परंतु, न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करावयाच्या तद्विरुद्ध विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी, अशी कारावासाची शिक्षा तीन महिन्यांपेक्षा कमी
असणार नाही व असा द्रव्य दंड पाच हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही.

(दोन) दुस-या अपराधाबद्दल दोन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व वीस हजार रुपयांपर्यंत वाढविता
येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल :

परंतु, न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करावयाच्या तद्विरुद्ध विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी , अशी कारावासाची शिक्षा सहा महिन्यांपेक्षा कमी
असणार नाही व असा द्रव्य दंड दहा हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही.

(तीन) तिस-या किंवा त्या नंतरच्या अपराधाबद्दल दोन वर्षांपर्यंत विढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावसाची शिक्षा होईल व वीस हजार रुपयांपर्यंत
वाढविता येईल इतक्या दंडाची शिक्षा होईल :

परंतु, न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करावयाच्या तद्विरुद्ध विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी, अशी कारावासाची शिक्षा नऊ महिन्यांपेक्षा कमी
असणार नाही व असा द्रव्य दंड होईल व दहा हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही. 

(2)

Subject to the provisions of sub-section (3), where in any trial of an offence under clause (b) of sub-section (1) for the consumption of an intoxicant, it is alleged that the accused person consumed liquor, and it is proved that the concentration of alcohol in the blood of the accused person is 12[not less than 0.05 per cent weight in volume] then the burden of proving that the liquor consumed was a medicinal or toilet preparation, or an antiseptic preparation or solution, or a flavouring extract, essence or syrup, containing alcohol, the consumption of which is not in contravention of the Act or any rules, regulations or orders made thereunder, shall be upon the accused person, and the Court shall in the absence of such proof presume the contrary.

पोट-कलम (3) च्या तरतुदींना अधीन राहून मादक द्रव्य सेवन केल्यामुळे पोट-कलम (1) चा खंड (ब) खालील अपराधाबद्दल असलेल्या कोणत्याही न्यायचौकशीत, आरोपी व्यक्तीने दारूचे, सेवन केले आहे असा आरोप करण्यात आला असेल आणि आरोपी व्यक्तीच्या रक्तातील मद्यार्काचे प्रमाण आकारमानातील वजनाने 0.05 टक्क्यांहून कमी नाही असे सिद्ध करण्यात आले असेल तर, सेवन केलेली दारू औषधासाठी किंवा प्रसाधनासाठी तयार केलेले पदार्थ किंवा जंतुनाशक पदार्थ किंवा द्रावण किंवा मद्यार्क असलेला सुगंधी अर्क किंवा सरबत होते आणि अशा दारूचे सेवन या अधिनियमाचे किंवा त्याअन्वये केलेले कोणतेही नियम, विनियम किंवा आदेश यांचे उल्लंघन करून करण्यात आले नव्हते हे सिद्ध करण्याचा
भार आरोपी व्यक्तीवर असेल आणि न्यायालय अशा पुराव्याच्या अभावी तद्विरुद्ध अनुमान काढील.
 

(3)

The provisions of sub-section (2) shall not apply to the consumption of any liquor—

(a) by indoor patients during the period they are being treated in any hospital convalescent home, nursing home or dispensary,maintained or supported by Government or a local authority or by charity ,or

(b) by such other persons in such other institutions, or in such circumstances as may be prescribed.

पोट-कलम (2) याच्या तरतुदी----

(अ) शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने चालविलेल्या किंवा त्याच्या साहाय्याने चालविण्यात येणा-या किंवा धर्मार्थ असलेल्या कोणत्याही
रुग्णालयात, आरोग्य सुधारणा गृहात, शुश्रुषागृहात किंवा दवाखान्यात दाखल करून घेतलेल्या रोग्यांवर उपचार चालू असलेल्या मुदतीत त्यांना
देण्यात येणा-या मद्यार्काच्या बाबतीत, किंवा

(ब) विहित करण्यात येईल अशा इतर संस्थेत किंवा अशा परिस्थितीत अशा इतर व्यक्तींना, कोणतीही दारू घेण्यास लागू असणार नाही.
 

Section 66A PENALTY FOR ILLEGAL SALE, IMPORT ETC. OF OPIUM. अफूची बेकायदेशीररित्या आयात करणे, वगैरे बद्दल शास्ती.

66A Penalty for illegal sale, import etc. of Opium. अफूची बेकायदेशीररित्या आयात करणे, वगैरे बद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever, in contravention of the provisions of this Act, or of any rule, regulation or order made thereunder or of any licence, pass, permit or authorization granted by or under this Act, imports, exports, transports, consumes, uses possesses, sells or buys opium ,shall, on conviction, be punished for each such offence with imprisonment for a term which may extend to three years and also with fine : Provided that, in the absence of special and adequate reasons to the contrary to be mentioned in the judgement of the Court.

जी कोणी व्यक्ती या अधिनियमांच्या किंवा त्याअन्वये केलेल्या कोणत्याही नियमाच्या, विनियमाच्या किंवा आदेशाच्या किंवा या अधिनियमान्वये किंवा तद्न्वये मंजूर केलेल्या कोणत्याही लायसनच्या, पासाच्या, परवान्याच्या किंवा प्राधिकारपत्राच्या तरतुदींचे उल्लंघन करून, अफूची आयात, निर्यात, परिवहन करील, तिचे सेवन करील, उपयोग करील, ताब्यात ठेवील, तिची विक्री किंवा खरेदी करील त्यास सिद्धापराध ठरविण्यात आले असता अशा प्रत्येक अपराधाबद्दल तीन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा आणि तसेच द्रव्य दंडाची शिक्षासुद्धा होईल :

परंतु, न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करावयाच्या तद्विरुद्ध खास व पुरेसा कारणांच्या अभावी.-

(एक) पहिल्या अपराधाबद्दल, अशी कारावासाची शिक्षा सहा महिन्यांपेक्षा कमी असणार नाही आणि असा द्रव्य दंड पाचशे रुपयांहून कमी असणार
नाही.

(दोन) दुस-या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा नऊ महिन्यांपेक्षा कमी असणार नाही आणि द्रव्य दंड एक हजार रुपयांपेक्षा कमी असणार
नाही.

(तीन) तिस-या किंवा त्यानंतरच्या अपराधाबद्दल, अशी कारावसाची शिक्षा एक वर्षापेक्षा कमी असणार नाही आणि असा द्रव्य दंड एक हजार
रुपयांपेक्षा कमी असणार नाही.
 

(i)

for a first offence, such imprisonment shall not be less than six months and fine shall not be less than five hundred rupees;

(ii)

for a second offence, such imprisonment shall not be less than nine months and fine shall not be less than one thousand rupees.

(iii)

for a third or subsequent offences, such imprisonment shall not be less than one year and fine shall not be less than one thousand rupees.]

Section 67 PENALTY FOR ALTERATION OF DENATURED SPIRIT. विप्रकृत मद्यसारात फेरबद्दल करणे किंवा फेरबद्दल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शास्त

67 Penalty for alteration of denatured Spirit. विप्रकृत मद्यसारात फेरबद्दल करणे किंवा फेरबद्दल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शास्त.[View all order & notifications]

(1)

Whoever in contravention of section 21 alters or attempts to alter any denatured spirit or has in his possession any spirit in respect of which he knows or has reason to believe that any such alteration or attempt has been made shall, on conviction, be punished with imprisonment for a term which shall not be less than three years but which may extend to five years or with fine which shall not be less thantwenty-five thousand rupees but which may extend to fifty thousand rupees or with both.

जी कोणी व्यक्ती कलम 21 चा भंग करून कोणत्याही विप्रकृत मद्यसारात फेरबदल करील किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करील किंवा ज्या कोणत्याही मद्यसाराबद्दल असा कोणतीही फेरबदल केला आहे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न केला आहे असे त्यास माहित असेल किंवा असे वाटण्यास त्यास कारण असेल असे मद्यसार आपल्याजवळ बाळगील, तिला सिद्धापराध ठरविण्यात आले असता. तीन वर्षांपेक्षा कमी नसेल, परंतु, पाच वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावसाची किंवा पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

(2)

In prosecution under this section, it shall be presumed, until the contrary is proved, that the alteration or attempt to alter any denatured spirit was done, with the intention that such spirit may be used for human consumption as an intoxicating liquor.

या कलमान्वयेच्या खटल्यामध्ये तद्विरुद्ध सिद्ध करण्यात येत नाही तोपर्यंत. कोणत्याही विक्रकृत मद्यसारात केलेला फेरबदल किंवा फेरबदलकरण्याचा प्रयत्न, असे मद्यसार मादक दारू म्हणून मनुष्यास उपयोगात आणता यावे या हेतूने केलेले आहे असे गृहीत धरण्यात येईल.

Section 67-1A PENALTY FOR ALTERATION OF DENATURED SPIRITUOUS PREPARATIONS. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात फेरबदल करणे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शास्ती.

67-1A Penalty for alteration of denatured Spirituous Preparations. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात फेरबदल करणे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

(1)

Whoever in contravention of section 21A alters or attempts to alter any denatured spirituous preparation or has in his possession any such preparation in respect of which he knows or has reason to believe that any such alteration or attempt has been made shall, on conviction, be punished with imprisonment for a term which shall not be less than three years but which may extend to five years or with fine which shall not be less than twenty-five thousand rupees but which may extend to fifty thousand rupees or with both.

जी कोणी व्यक्ती कलम 21-अ चा भंग करून कोणत्याही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात फेरबदल करील किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करील किंवा ज्या कोणत्याही अशा सिद्धपदार्थाबद्दल असा कोणताही फेरबदल केला आहे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न केला आहे असे त्यास माहीत असेल किंवा असे वाटण्यास त्यास कारण असेल असा सिद्धपदार्थ जवळ बाळगील, तिला सिद्धापराध ठरविण्यात आले असता. तीन वर्षांपेक्षा कमी नसेल, परंतु, पाच वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा पंचवीस हजार रूपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील

(2)

In prosecutions under this section, it shall be presumed, until the contrary is proved, that the alteration or attempt to alter any denatured spirituous preparation was done with the intention that it may be used for human consumption as an intoxicating liquor.

या अधिनियमान्वयेच्या सर्व खटल्यात, तद्विरुद्ध सिद्ध करण्यात येणार नाही तोपर्यंत, कोणत्याही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात केलेला फेरबदल किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न, असा सिद्धपदार्थ मादक दारू म्हणून मनुष्यास उपयोगात आणता यावा या हेतूनेच केलेला आहे असे गृहीत धरण्यात येईल.

Section 67-1 B PENALTY FOR CONTRAVENTION OF PRESCRIPTION PROVISION. औषधोपचाराच्या औषधपत्रासंबंधी असलेल्या तर, तुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती.

67-1 B Penalty for Contravention of Prescription provision. औषधोपचाराच्या औषधपत्रासंबंधी असलेल्या तर, तुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever—

(a) not being a registered medical practitioner issues a prescription for intoxicating liquor or,

(b) being a registered medical practitioner—

(i) prescribes intoxicating liquor in contravention of the provisions of sub-section (2) of section 22A,or

(ii) fails, without reasonable excuse to state in the prescription for intoxicating liquor the particulars required by that section to be stated therein, or

(iii) fails to preserve such prescription, or a copy thereof, for the period for which it is required by that section to be preserved, shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to  ten thousand rupees or with both.

जो कोणी,--

(अ) नोंदलेला वैद्यक व्यवसायी नसताना औषधोपचाराच्या औषधपत्रात मादक दारू उपचार म्हणून सुचवील, किंवा

(ब) नोंदलेला वैद्यक व्यवसायी असून----

(एक) कलम 22-अ, पोट-कलम (2) च्या तरतुदींचे उल्लंघन करून, औषधपत्रात मादक दारू उपचार म्हणून सुचवील, किंवा

(दोन) औषधोपचाराच्या औषधपत्रात मादक दारूबद्दल उक्त कलमान्वये आवश्यक असेल असा तपशील नमूद करण्यात, कोणत्याही वाजवी कारणाशिवाय, कसूर करील, किंवा

(तीन) असे औषधोपचाराचे औषधपत्र, किंवा त्याची एक प्रत, उक्त कलमान्वये ज्या मुदतीपर्यंत राखून ठेवणे आवश्यक असेल त्या मुदतीत, राखून ठेवण्यात कसूर करील, त्यास सिद्धपराध ठरविण्यात आले असता सहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा किंवा दहा हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Section 67A PENALTY FOR CONTRAVENTION OF SECTION 59A. कलम 59-अ च्या तरतुदीचे उल्लंघन करून कलम 24-अ मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करण्याबद्दल शास्ती.

67A Penalty for contravention of section 59A. कलम 59-अ च्या तरतुदीचे उल्लंघन करून कलम 24-अ मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करण्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

(1)

Whoever in contravention of the  provisions of section 59AA or, as the case may be,of section 59A -

(1a)Manufactures, imports or exports any article mentioned in section 24A, or

(a) Sells uses or disposes of any liquor otherwise than as an ingredient of any article mentioned in section 24A, or

(b) uses more alcohol in the 8[manufacture of any of the articles mentioned in section 24A than the quantity necessary for extraction of solution of the elements contained therein and for the preservation of such article, or

(c) knowingly sells any such article] for being used as an intoxicating drink, or sells any such article under circumstances from which he might reasonably reduce the intention of the purchaser to use them for such purpose,

shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to one year or with fine which may extend to ten thousand rupees or with both.

जी कोणी व्यक्ती कलम 59-अअ किंवा यथास्थिति कलम 59-अ च्या तरतुदीचेट उल्लंघन करून

1-अ) कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वस्तू तयार करील, त्यांची आयात किंवा निर्यात करील, अथवा

(अ) कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही पदार्थाचा घटकद्रव्य म्हणून असेल त्या व्यतिरिक्त इतर रीतीने कोणत्याही प्रकारची दारू विकील,
वापरील किंवा तिची विल्हेवाट लावील, अथवा

(ब) कलम 24-अ मध्ये उल्लेख केलेला कोणताही पदार्थ तयार करण्याच्या कामी त्यात असलेली मूलद्रव्ये काढण्याकरिता किंवा ती विरघळण्याकरिता
व असा पदार्थ टिकविण्याकरिता आवश्यक असेल त्या परिमाणापेक्षा अधिक परिमाणात मद्यार्क वापरील अथवा

(क) मादक पेय म्हणून वापरण्यासाठी असा कोणताही पदार्थ जाणूनबुजून विकील किंवा असा कोणताही पदार्थ अशा कारणांसाठी वापरण्याचा,
खरेदी करण्याचा इरादा आहे असे ज्या परिस्थितीवरून त्यास वाजवी रीतीने अनुमान करता येईल त्या परिस्थितीत तो विकील,

त्यास, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, एक वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा किंवा दहा हजार रूपयांपर्यंत
येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील

(2)

No person who has been convicted for any offence under this section or has paid any sum of money under section 104 by way of composition for such offenceshall be entitled to manufacture, import or to sell any article mention in section 24A for a period of one year from the date of such conviction or payment, and any person who imports, manufactures or sells any such article] in contravention of this sub- section shall be liable to the same punishment as is provided for an offence punishable under section 65.

या कलमान्वये ज्यास सिद्धापराध ठरविण्यात आले आहे किंवा कलम 104 अन्वये तडजोड म्हणून अशा अपराधाबद्दल ज्याने कोणतीही रक्कम भरली आहे अशा कोणत्याही व्यक्तीस, अशा अपराधसिद्धीच्या किंवा रकमा भरल्याच्या दिनांकापासून एक वर्ष मुदतीपर्यंत कलम 24-अ मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ तयार करण्याचा, आयात करण्याचा किंवा विकण्याचा हक्क असणार नाही ; आणि जी कोणतीही व्यक्ती या पोट-कलमाचा भंग करून असा कोणताही पदार्थ आयात करील, तयार करील किंवा विकील, ती, कलम 65 अन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाबद्दल ज्या शिक्षेची तरतूद केली आहे त्याच शिक्षेस पात्र होईल.

Section 67 B PENALTY FOR FAILURE TO COMPLY WITH SUB-SECTION 2 OF SECTION 59B. पोट-कलम (1) खाली आयुक्ताची खात्री करून देण्यात किंवा कलम 59-ब पोट-कलम (2) अन्वये दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती.

67 B Penalty for failure to comply with sub-section 2 of section 59B. पोट-कलम (1) खाली आयुक्ताची खात्री करून देण्यात किंवा कलम 59-ब पोट-कलम (2) अन्वये दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

(1)

If the manufacturer of any of the articles mentioned in section 24A fails to show to the satisfaction of the Commissioner that the article corresponds to the description and limitations provided in section 59A, his licence for the purchase, use or possession of liquor or alcohol for the manufacture of such article shall be revoked.

कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थांपैकी कोणताही पदार्थ तयार करणा-या व्यक्तीने जर असा पदार्थ कलम 59-अ मध्ये दिलेल्या वर्णनाशी जुळता आहे व त्यात दिलेल्या मर्यादाबरहुकूम तयार केला आहे अशी आयुक्ताची खात्री होईल अशी रीतीने दाखविण्यात कसूर केली तर, असा पदार्थ तयार करण्याकरिता दारू किंवा मद्यार्क खरेदी करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा जवळ बाळगण्यासाठी असलेले त्याचे लायसन रद्द करण्यात येईल. 

(2)

Any person who fails to comply with any requisition made by the Commissioner under sub-section (2) of section 59B, shall, on conviction, be punished with imprisonment for term which may extend to one year or with fine which may extend to ten thousand rupees or with both.

कलम 59-ब पोट-कलम (2) अन्वये आयुक्ताने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे पालन करण्यात जी कोणतीही व्यक्ती कसूर करील, तिला सिद्धापराध ठरविण्यात आले असता. एक वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा दहा हजार रूपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 67C PENALTY FOR POSSESSING, ETC., DENATURED SPIRITOUS PREPARATION IN CONTRAVENTION OF PROVISIONS OF SECTIONS 59C AND 59D. कलमे 59-क व 59-ड यांच्या तरतुदींचे उल्लंघन करून विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ जवळ बाळगणे, वगैरेबद्दल शास्ती.

67C Penalty for possessing, etc., denatured spiritous preparation in contravention of provisions of sections 59C and 59D. कलमे 59-क व 59-ड यांच्या तरतुदींचे उल्लंघन करून विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ जवळ बाळगणे, वगैरेबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever,—

(a) in contravention of the provisions of section 59C, possesses, without a permit, any denatured spirituous preparation in excess of the quantity prescribed under that section or.

(b) in contravention of the provisions of section 59D manufacturers, sells, bottles for sale or imports, exports or transports, any denatured spirituous preparation, or

(c) drinks any denatured spirituous preparation,

shall, on conviction ,be punished with imprisonment for a term which shall not be less than three years but which may extend to five years or with fine which shall not be less than twenty-five thousand rupees but which may extend to fifty thousand rupees or with both.

जी कोणी व्यक्ती----

(अ) कलम 59-क याच्या तरतुदींचे उल्लंघन करून, परवान्यावाचून, त्या कलमान्वये विहित केलेल्या परिमाणापेक्षा अधिक प्रमाणात कोणताही
विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ जवळ बाळगील, किंवा

(ब) कलम 59-ड याच्या तरतुदींचे उल्लंघन करून, कोणताही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ तयार करील, विकील, विक्रीसाठी बाटलीत भरील
किंवा त्याची आयात, निर्यात किंवा परिवहन करील, किंवा

(क) कोणताही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ प्राशन करील,

तर तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, तीन वर्षांपेक्षा कमी नसेल, परंतु पाच वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा
पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा
होतील.

Section 68 PENALTY FOR OPENING ETC. OF COMMON DRINKING HOUSE. दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे, वगैरे याबद्दल शास्ती.

68 Penalty for opening etc. of common drinking house. दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे, वगैरे याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever,—

(a) opens, keeps or uses any places as a common drinking house; or

(b) has the care, management or control of, or in any manner assists in conducting the business, of any place opened, kept or used as a common drinking house.

9 shall, on conviction, be punished with imprisonment for a term which shall not be less than three years but which may extend to five years or with fine which shall not be less than twenty-five thousand rupees but which may extend to fifty thousand rupees or with both.

जी कोणी व्यक्ती----

(अ) कोणतीही जागा दारूचा सार्वजनिक गुत्ता म्हणून उघडील, ठेवील किंवा वापरील;
अथवा

(ब) दारूचा सार्वजनिक गुत्ता म्हणून उघडण्यात, ठेवण्यात किंवा वापरण्यात आलेल्या कोणत्याही जागेवर देखरेख ठेवील, तिची व्यवस्था पाहील
किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवील किंवा तिच्यातील धंदा चालविण्यासाठी कोणत्याही रीतीने सहाय्य करील

तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, तीन वर्षांहून कमी नसेल परंतु, पाच वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा
पंचवीस हजार रूपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा
होतील. 

Section 69 PENALTY FOR ILLEGAL SALE ETC. OF MHOWRA FLOWERS. मोहाच्या फुलांची बेकायदेशीररीत्या आयात करणे, वगैरे याबद्दल शास्ती.

69 Penalty for illegal sale etc. of Mhowra Flowers. मोहाच्या फुलांची बेकायदेशीररीत्या आयात करणे, वगैरे याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever, in contravention of the provisions of this Act, or of any rule, regulation or order made or licence, permit or pass granted thereunder, imports, exports collects, transports, sells, buys or has in his possession mhowra flowers, shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to two years or with fine which may extend to fifty thousand rupees or with both:

Provided that no person shall be punished in respect of any mhowra flowers which are either growing on a tree or are lying uncollected on the ground as have fallen from a tree.

जी कोणी व्यक्ती, या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही लायसनचे, परवान्याचे पासाचे उल्लंघन करून मोहाच्या फुलांची आयात करील, निर्यात करील, ती गोळा करील, त्यांचे परिवहन करील ती विकील, विकत घेईल किंवा आपल्याजवळ बाळगील.तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, दोन वर्षांपर्यंत येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल
इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील;

परंतु झाडावर असणा-या किंवा झाडावरून गळून पडून जमिनीवर गोळा न करता राहिलेल्या मोहाच्या फुलांच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीस शिक्षा करण्यात येणार नाही.

Section 70 PENALTY FOR ILLEGAL IMPORT OF MOLASSES. काकवीची बेकायदेशीररीत्या आयात करणे, वगैरे याबद्दल शास्ती.

70 Penalty for illegal import of Molasses. काकवीची बेकायदेशीररीत्या आयात करणे, वगैरे याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever, in contravention of the provisions of this Act, or of any rule, regulation or order made or of any licence or permit granted thereunder, exports, imports, transport, sells or has in his possession molasses shall, on conviction, be punished with  imprisonment for a term which shall not be less than three years but which may extend to five years or with fine which shall not be less than twenty-five thousand rupees but which may extend to fifty thousand rupees or with both.

जी कोणी व्यक्ती या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही लायसन्सचे किंवा परवान्याचे उल्लंघन करून काकवीची निर्यात करील, आयात करील, तिचे परिवहन करील, ती विकील किंवा आपल्याजवळ बाळगील, तिला सिद्धापराध ठरविण्यात आले असता. तीन वर्षांपेक्षा कमी नसेल, परंतु, पाच वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावसाची किंवा पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 71 [PENALTY FOR SELLING MOLASSES AT PRICE EXCEEDING FIXED PRICE]. DELETED BY BOM. 26 OF 1952, S.33. .(ठराविक किंमतीपेक्षा अधिक किंमतीस काकवी विकण्याबद्दल शास्ती). सन 1952 चा मुंबई अधिनियम क्रमांक 26, कलम 33 अन्वये वगळण्यात होतील.

71 [Penalty for selling molasses at price exceeding fixed price]. Deleted by Bom. 26 of 1952, s.33. .(ठराविक किंमतीपेक्षा अधिक किंमतीस काकवी विकण्याबद्दल शास्ती). सन 1952 चा मुंबई अधिनियम क्रमांक 26, कलम 33 अन्वये वगळण्यात होतील..[View all order & notifications]

Section 72 PENALTY FOR REMOVAL OF INTOXICANT ETC. मादक पदार्थ वगैरे नेण्याबद्दल शास्ती. जी कोणी व्यक्ती,

72 Penalty for removal of intoxicant etc. मादक पदार्थ वगैरे नेण्याबद्दल शास्ती. जी कोणी व्यक्ती,.[View all order & notifications]

Whoever, in contravention of the provisions of this Act, or of any rule, regulation or order made, or pass granted, thereunder, removes any intoxicant, hemp, mhowra flowers or molasses from any distillery, warehouse, godowns or other place of storage established or licensed under this Act, shall, on conviction be punished with imprisonment for a term which shall not be less than three years but which may extend to five years or with fine which shall not be less than twenty-five thousand rupees but which may extend to fifty thousand rupees or with both.

या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा पासाचे उल्लंघन करून या अधिनियमान्वये स्थापन केलेली किंवा लायसन दिलेली कोणतीही दारूची भट्टी, वखार, गोदाम किंवा साठा करण्याची इतर जागा यातून, कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी काढून नेईल, तिला सिद्धापराध ठरविण्यात आले असता. तीन वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु, पाच वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावसाची किंवा पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईलट. किंवा या दोन्ही शिक्षा होतील. 

Section 73 PENALTY FOR PRINTING OR PUBLISHING ADVERTISEMENT IN CONTRAVENTION OF PROVISIONS OF ACT, ETC. या अधिनियमाच्या तरतुंदी, वगैरेचे उल्लंघन करून जाहिराती छापणे किंवा प्रसिद्ध करणे याबद्दल शास्ती.

73 Penalty for printing or publishing advertisement in contravention of provisions of Act, etc. या अधिनियमाच्या तरतुंदी, वगैरेचे उल्लंघन करून जाहिराती छापणे किंवा प्रसिद्ध करणे याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever, in contravention of the provisions of this Act, or of any rule, regulation or Order made thereunder, prints, or publishes in any newspaper, news-sheet, book, leaflet, booklet or any single or periodical publication or otherwise displays or distributes any advertisement or other matter—

(a) Which 4* * * solicits the use of or offers any intoxicant or hemp, or

(b) Which is calculated to encourage or incite any individual or class of individuals or the public generally to commit an offence under this Act, or to commit a breach of or to evade the provisions of, any rule regulation or order made thereunder or of the conditions of licence, permit, pass or authorization granted thereunder,

shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to 5 [five thousand rupees] or with both.

जी कोणी व्यक्ती या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करून-

(अ) ज्याद्वारे कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यात येत आहे किंवा असे द्रव्य किंवा भांग देऊ करण्यात येत आहे, अथवा

(ब) ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीस किंवा सर्वसामान्य लोकांस या अधिनियमाखालील अपराध करण्यास किंवा तद्न्वये केलेला कोणताही नियम किंवा विनियम किंवा तद्न्वये दिलेला कोणताही आदेश याच्या तरतुदींचा भंग करण्यास किंवा तद्न्वये केलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या कोणत्याही शर्तीचा भंग करण्यास किंवा त्या टाळण्यास हेतुपूर्वक उत्तेजन किंवा चिथावणी देण्यात येत आहे ;

अशी कोणतीही जाहिरात किंवा इतर मजकूर, कोणत्याही वर्तमानपत्रात, वृत्तपत्रात, पुस्तकात, पत्रकात, पुस्तिकेत किंवा कोणत्याही इतर स्वतंत्र किंवा नियतकालिक प्रकाशनात छापील किंवा प्रसिद्ध करील किंवा अशी जाहिरात किंवा असा मजकूर अन्यथा प्रदर्शित करील किंवा वाटील तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा पाच हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 74 PENALTY FOR CIRCULATING ETC. NEWS PAPERS ETC. CONTAINING ADVERTISEMENT REGARDING INTOXICANTS ETC. मादक द्रव्ये, वगैरे यासंबंधी जाहिराती असलेली वर्तमानपत्रे वगैरे यांचा प्रसार करणे, वगैरे याबद्दल शास्ती.

74 Penalty for circulating etc. news papers etc. containing advertisement regarding intoxicants etc. मादक द्रव्ये, वगैरे यासंबंधी जाहिराती असलेली वर्तमानपत्रे वगैरे यांचा प्रसार करणे, वगैरे याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever, in contravention of a notification issued under sub- section (3) of section 24, circulates, distributes or sells any newspaper, news-sheet, book, leaflet, booklet or other publication printed and published outside the State which contains any advertisement or matter,—

(a) which 7* * solicits the use of or offers any intoxicant or hemp, or

(b) which is calculated to encourage or incite any individual or class of individuals or the public generally to commit any offence under this Act, or to commit a breach of or to evade the provisions of any rule, regulation or order made thereunder, or the conditions of any licence, permit, pass or authorization granted thereunder—

shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to 9 ten thousand rupees or with both.

जी कोणी व्यक्ती, कलम 24, पोट-कलम (3) अन्वये काढलेल्या अधिसूचनेचे उल्लंघन करून-

(अ) ज्याद्वारे कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यात येत आहे किंवा असे द्रव्य किंवा भांग देऊ करण्यात येत आहे; अथवा

(ब) ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीस किंवा सर्वसामान्य लोकास या अधिनियमाखाली अपराध करण्यास किंवा तद्न्वये केलेला कोणताही नियम किंवा विनियम किंवा तद्न्वये दिलेला कोणताही आदेश याच्या तरतुदींचा भंग करण्यास तद्न्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यांच्या शर्तीचा भंग करण्यास किंवा त्या टाळण्यास हेतुपूर्वक उत्तेजन किंवा चिथावणी देण्यात येत आहे,

अशी कोणतीही जाहिरात किंवा इतर मजकूर असलेले राज्याबाहेर छापलेले व प्रसिद्ध केलेले कोणतेही वर्तमानपत्र, वृत्तपत्र, पुस्तक, पत्रक, पुस्तिका किंवा इतर प्रकाशन यांचा प्रसार करील, वाटील किंवा विकील, तिला सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावसाची शिक्षा होईल किंवा दहा हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 75 PENALTY FOR INCITING OR ENCOURAGING CERTAIN ACTS . काही कृत्ये करण्यास चिथावणी देणे किंवा उत्तेजन देणे याबद्दल शास्ती.

75 Penalty for inciting or encouraging certain acts . काही कृत्ये करण्यास चिथावणी देणे किंवा उत्तेजन देणे याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever, in contravention of the provisions of this Act or any rule, regulation or order made thereunder,—

(a) Solicits the use of or offers any intoxicant or hemp, or 

(c) does any act which is calculated to incite or encourage any individual or a class of individuals or the public generally to commit an offence under this Act or to commit a breach of any rule, regulation or order made or of conditions of a licence, permit, pass or authorization granted thereunder,

shall on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to ten thousand rupees or with both.

जी कोणी व्यक्ती, या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करून-

(अ) कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करील किंवा असे द्रव्य किंवा भांग देऊ करील, अथवा

(क) कोणत्याही व्यक्तीस किंवा एखाद्या वर्गातील व्यक्तीस किंवा सर्वसामान्य लोकांस या अधिनियमाखालील कोणताही अपराध करण्यास किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचा किंवा विनियमाचा किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचा भंग करण्यास किंवा तद्न्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या कोणत्याही शर्तींचा भंग करण्यास चिथावणी किंवा उत्तेजन देण्याच्या हेतूने कोणतेही कृत्य करील.

तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावसाची शिक्षा होईल किंवा दहा हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 75 A PENALTY FOR CONTRAVENTION OF PROVISIONS OF SECTION 43. कलम 43 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती.

75 A Penalty for contravention of provisions of section 43. कलम 43 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever in contravention of the provisions of section 43,—

(a) drinks in a public place 

(b) 5 [* * *]

(c) serves liquor at any ceremonial or other function or any assembly of persons where persons (not being members of his family or his employees) not holding permits under sections 40, 41, 46A or 47 are present;

shall on conviction, be punished for every such offence with imprisonment which may extend to six months, or with fine which may extend to 6 [ten thousand rupees] or with both..

जी कोणी व्यक्ती कलम 43 च्या तरतुदींचे उल्लंघन करून-

(अ) एखाद्या सार्वजनिक जागेत दारू प्राशन करील;

(क) कलमे 40, 41, 46, 46-अ किंवा 47 अन्वये परवाना धारण करीत नसतील अशा (त्याच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा नोकर नसलेल्या) व्यक्ती जेथे हजर असतील अशा कोणत्याही समारंभात किंवा इतर प्रसंगी व्यक्तींच्या कोणत्याही जमावात दारू देईल.

तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, अशा प्रत्येक अपराधाबद्दल सहा महिन्यापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या कारावसाची शिक्षा होईल किंवा दहा हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. 

Section 76 PENALTY FOR NEGLECT TO KEEP MEASURES ETC. मापे, वगैरे ठेवणे यात हयगय केल्याबद्दल शास्ती.

76 Penalty for neglect to keep measures etc. मापे, वगैरे ठेवणे यात हयगय केल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever in contravention of the provisions of this Act, rule or regulation or order or condition of any licence, permit or pass granted under this Act,—

(a) neglects to supply himself with measures and weights for measuring and weighing any intoxicant or hemp or with instruments for testing the strength of liquor or keep the same in good conditions, or

(b) refuses to measure, weigh, or test any intoxicant or hemp in his possession 7 [or to have it weighed, measured or tested],

shall, on conviction, be punished for each such offence with fine which may extend to 8 [two thousand rupees].

जी कोणी व्यक्ती, या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तद्न्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही लायसनच्या, परवान्याच्या किंवा पासाच्या शर्तीचे उल्लंघन करून-

(अ) कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग मापण्यासाठी व वजन करण्यासाठी आपल्याजवळ वजने व मापे ठेवण्यात किंवा दारुची तीव्रता तपासण्यासाठी उपकरणे ठेवण्यात किंवा ती सुस्थितीत ठेवण्यात हयगय करील, अथवा

(ब) आपल्याजवळ असलेले कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग मापण्याचे, वजन करण्याचे किंवा तपासण्याचे किंवा मापण्याची, वजन करण्याची किंवा तपासण्याची व्यवस्था करण्याच नाकारील, तिला सिद्धापराध ठरविण्यात आले असता, अशा प्रत्येक अपराधाबद्दल दोन हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.

Section 77 PENALTY FOR MISCONDUCT BY LICENCEE. लायसनदाराने, वगैरे गैरवर्तन केल्याबद्दल शास्ती.

77 Penalty for misconduct by licencee. लायसनदाराने, वगैरे गैरवर्तन केल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever, being the holder of a licence, permit, pass or authorization granted under this Act or a person in the employ of such holder or acting with his express or implied permission on his behalf—

(a) fails to produce licence, permit, pass or authorization on demand by a Prohibition Officer or any other officer duly empowered if such licence, permit, pass or authorization is in his possession or control, or

(b) wilfully does or omits to do anything in contravention of any rule, regulation or order made under this Act, or 

shall, on conviction, be punished for each offence with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to five thousand rupees or with both.

या अधिनियमान्वये दिलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणारी जी कोणतीही व्यक्ती किंवा अशा व्यक्तीच्या नोकरीत असलेली कोणतीही व्यक्ती किंवा तिच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने तिच्या वतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती-

(अ) आपल्याजवळ किंवा आपल्या नियंत्रणाखाली असलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र दारूबंदी अधिका-याने किंवा योग्यरीत्या प्राधिकृत केलेल्या कोणत्याही इतर अधिका-याने मागणी केली असता, ते हजर करण्यात कसूर करील तर, अथवा

(ब) या अधिनियमाअन्वये केलेला कोणताही नियम, विनियम किंवा तद्न्वये दिलेला कोणताही आदेश याचे उल्लंघन करून कोणतेही कृत्य जाणूनबुजून करील किंवा करण्याचे टाळील तर, अथवा

तिला, सिद्धापराध आले असता, अशा प्रत्येक अपराधाबद्दल सहाट महिन्यापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावसाची शिक्षा होईल किंवा पाच हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 78 PENALTY FOR MISCONDUCT BY LICENSED VENDOR OR MANUFACTURER. लायसन दिलेल्या विक्रेत्याने किंवा माल तयार करणा-या व्यक्तीने गैरवर्तन केल्याबद्दल शास्ती.

78 Penalty for misconduct by licensed vendor or manufacturer. लायसन दिलेल्या विक्रेत्याने किंवा माल तयार करणा-या व्यक्तीने गैरवर्तन केल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever, being the holder of licence for the sale or manufacture of any intoxicant under this Act, or a person in the employ of such holder or acting with his express or implied permission on his behalf—

(a) mixes or permits to be mixed with the said intoxicant any noxious drug or any foreign ingredient likely to add to the actual or apparent intoxicating quality or strength or any article prohibited by any rule made under this Act or water except for the purpose of reducing liquor to the strength or any prescribed in the licence, or any diluting or coloring substance or any ingredient whatsoever likely to render the intoxicant inferior in quality whether such ingredient is or is not prohibited as aforesaid when such admixture shall not amount to the offence of adulteration under section 272 of the Indian Penal Code, or

(b) Sells or keeps or exposes for sale as foreign liquor, which liquor he knows or has reason to believe to be country liquor, or

(c) marks the cork of any bottle, or any bottle, case package or other receptacle containing country liquor, or uses any bottle case package or other receptacle containing country liquor, with any mark thereon or on the cork thereof with the intention of causing it to be believed that such bottle, case, package or other receptacle contains foreign liquor, when such act shall not amount to an offence of using a false trade mark with intent to deceive or injure any person under section 482 of the Indian Penal Code, or

(d) Sells any intoxicant which is not of the nature, substance and quality or other receptacle, with any mark thereon or on the cork thereof with the intention of causing it to be believed, that such bottle case package or other receptacle contains foreign liquor, when such act shall not amount to the offence of selling goods marked with a counterfeit trade mark under section 486 of the Indian Penal Code, or

(e) sells any intoxicant which is not of the nature, substance and quality demanded by the purchaser or keeps or exposes for sale any intoxicant which is not of the nature, substance and quality authorized by the term of the licence to be kept for sale by the holder of the licence.

shall, or conviction, be punished for each such offence with imprisonment for a term which may extend to one year and with fine which may extend to ten thousand rupees.

या अधिनियमान्वये कोणतेही भादक द्रव्य विकण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी लायसन धारण करणारी जी कोणतीही व्यक्ती किंवा अशा व्यक्तीच्या नोकरीत असलेली कोणतीही व्यक्ती किंवा तिच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने तिच्या वतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती-

(अ) अशा मादक द्रव्यात, ज्यामुळे तिचा प्रत्यक्ष किंवा बाह्र मादक गुण किंवा तीव्रता यात वाढ होईल असे कोणतेही उपद्रवकारक औषधिद्रव्य किंवा कोणतेही विजातीय घटकद्रव्य मिसळील किंवा मिसळण्याची परवानगी देईल अथवा या अधिनियमान्वये केंलेल्या कोणत्याही नियमान्वये प्रतिषिद्ध असा कोणताही पदार्थ त्यात मिसळील किंवा मिसळण्याची परवानगी देईल किंवा लायसनमध्ये विहित केलेल्या तीव्रतेइतकी दारूची तीव्रता कमी करण्याच्या कारणाव्यतिरिक्त इतर कारणासाठी त्यात पाणी मिसळील किंवा मिसळण्याची परवानगी देईल अथवा पातळ करणारा किंवा रंग आणणारा कोणताही पदार्थ किंवा असे मादक द्रव्य ज्यामुळे दर्जात कमी ठरेल अस कोणतेही घटकद्रव्य-मग असे घटकद्रव्य वर सांगितल्याप्रमाणे प्रतिषिद्ध
असो किंवा नसो-मिसळील किंवा मिसळण्याची परवानगी देईस व जेव्हा असे अपमिश्रण भारतीय दंड संहिता, कलम 272 अन्वये अपमिश्रणाबाबत अपराध होत नसेल तेव्हा, अथवा

(ब) जी दारू देशी असल्याचे त्यास माहीत आहे किंवा ती तशी आहे असे वाटण्यास त्यास कारण आहे अशी दारू परदेशी दारू म्हणून विकील किंवा विक्रीसाठी ठेवील किंवा मांडील, अथवा

(क) कोणत्याही बाटलीचे बूच किंवा देशी दारू असलेली कोणतीही बाटली, पेटी, संवेष्टन किंवा इतर पात्र यावर त्या बाटलीत, पेटीत, संवेष्टनात किंवा इतर पात्रात परदेशी दारू आहे असे वाटावे या इराद्याने निशाणी करील अथवा देशी दारू असलेली कोणतीही बाटली, पेटी, संवेष्टन किंवा इतर पात्र, त्यावर किंवा त्याच्या बुचावर असलेल्या कोणत्याही निशाणीसह, अशा इराद्याने वापरील व जेव्हा असे कृत्य भारतीय दंड संहिता, कलम 482 अन्वये कोणत्याही व्यक्तीस फसविण्याच्या इराद्याने किंवा तिचे नुकसान करण्याच्या इराद्यांने खोटे व्यापारचिन्ह म्हणून वापरण्याचा अपराध होत नसेल तेव्हा, अथवा

(ड) ठराविक जातीचे, द्रव्याचे व दर्जाचे नसलेले किंवा इतर पात्रात असलेले असे कोणतेही मादक द्रव्य, त्यावर किंवा त्याच्या बुचावर असलेल्या कोणत्याही निशाणीसह, अशा बाटलीत, पेटीत, संवेष्टनात किंवा इतर पात्रात परदेशी दारू आहे असे वाटावे या इराद्याने विकील आणि जेव्हा असे कृत्य भारतीय दंड संहिता, कलम 486 अन्वये नकली व्यापारचिन्ह ज्यावर आहे असा माल विकण्याचा अपराध होत नसेल तेव्हा, अथवा

(ई) खरेदीदाराने मागितलेल्या जातीचे, द्रव्याचे व दर्जाचे नसेल असे कोणतेही मादक द्रव्य विकील किंवा लायसन धारण करणा-या व्यक्तीला तिच्या लायसनच्या अटीप्रमाणे ज्या जातीचे, द्रव्याचे किंवा दर्जाचे मादक द्रव्य विकण्याचा अधिकार नाही असे कोणतेही मादक द्रव्य विक्रीसाठी ठेवील किंवा मांडील,

तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, अशा प्रत्येक अपराधाबद्दल एक वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि दहा हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 

Section 79 LIABILITY FOR ACT OF SERVANTS. नोकरांच्या अपराधाबद्दल लायसनदाराची जबाबदारी.

79 Liability for act of servants. नोकरांच्या अपराधाबद्दल लायसनदाराची जबाबदारी..[View all order & notifications]

The holder of a licence, permit, pass or authorization granted under this act shall be responsible, as well as the actual offender, for any offence committed by any person in his employ or acting with his express or implied permission on his behalf under the provisions of this Act as if he himself had committed the same, unless he shall establish that all due and reasonable precautions were exercised by him to prevent the commission of such offence:

या अधिनियमान्वये दिलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणा-या व्यक्तीने, तिच्या नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये तिच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने तिच्या वतीने काम करणा-या कोणत्याही व्यक्तीने केलेल्या अपराधाच्याबाबतीत, असा अपराध होऊ नये म्हणून आपण सर्व योग्य व वाजवी उपाययोजना केल्या होत्या असे सिद्ध न केल्यास, असा अपराध जणू तिनेच केला होता असे समजून, त्याबद्दल तिला जबाबदार धरण्यात येईल. तसेच प्रत्यक्ष अपराध करणा-या व्यक्तीलाही त्याबद्दल जबाबदार धरण्यात येईल :

Section 80 IMPORT EXPORT, ETC., OF INTOXICANT BY ANY PERSON ON ACCOUNT OF ANOTHER. कोणत्याही व्यक्तीने दुस-याच्या वतीने मादक द्रव्याची आयात, निर्यात करणे.

80 Import export, etc., of intoxicant by any person on account of another. कोणत्याही व्यक्तीने दुस-याच्या वतीने मादक द्रव्याची आयात, निर्यात करणे..[View all order & notifications]

(1)

Whenever any intoxicant, hemp, mhowra flowers or molasses are manufactured, imported, exported, transported, sold, or are possessed by any person on account of any other person and such other person knows or has reason to believe that such manufacture, import, export, transport, sale or possession is, on his account the intoxicant, hemp, mhowra flowers or molasses, as the case may be, shall, for the purposes of this Act, be deemed to have been manufactured, imported, exported, transported or sold by or to be in possession of, such other person.

जेव्हा कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही इतर व्यक्तीच्या वतीने मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी तयार केली असेल, आयात केली असेल, निर्यात केली असेल किंवा तिचे परिवहन केले असेल, ती विकली असेल अथवा जवळ बाळगली असेल आणि जेव्हा अशा दुस-या व्यक्तीस, असे तयार करणे, आयात करणे, निर्यात करणे, परिवहन करणे, विकणे अगर जवळ बाळगणे आपल्या वतीने झाले आहे हे माहित असेल अगर तसे त्यास सकारण वाटत असेल तेव्हा, यथास्थिति, असे मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी या अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता अशा दुस-या व्यक्तीने तयार केली आहे, आयात केली आहे, निर्यात केली आहे किंवा तिने तिचे परिवहन केले आहे. विक्री केली आहे किंवा आपल्याजवळ बाळगली आहे असे समजले पाहिजे.
 

(2)

Nothing in sub-section (1) shall absolve any person from liability to any punishment under this Act for the unlawful manufacture, import, export, transport, sale or possession of such articles

पोट-कलम (1) मधील कोणत्याही तरतुदींमुळे असे पदार्थ बेकायदेशीररित्या तयार करणे, आयात करणे, निर्यात करणे, त्याचे परिवहन करणे, विक्री करणे किंवा जवळ बाळगणे याबद्दल, या अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीस जी कोणतीही शिक्षा होऊ शकेल, त्यातून ती मुक्त होणार नाही.

Section 81 PENALTY FOR ATTEMPTS OR ABETMENT. प्रयत्न करणे किंवा अपप्रेरणा देणे याबद्दल शिक्षा.

81 Penalty for attempts or abetment. प्रयत्न करणे किंवा अपप्रेरणा देणे याबद्दल शिक्षा..[View all order & notifications]

Whoever attempts to commit or abets the commission of an offence under this Act shall, on conviction, be punished for such attempt or abetment with the same punishment as is provided for the principle offence.

जी कोणती व्यक्ती, या अधिनियमाखालील अपराध करण्याचा प्रयत्न करील किंवा तो करण्यास अपप्रेरणा देईल, तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, असा प्रयत्न केल्याबद्दल किंवा प्रोत्साहन दिल्याबद्दल मुख्य अपराधाबद्दल जी शिक्षा सांगितली असेल तितकी शिक्षा होईल.

Section 82 BREACH OF LICENSE, PERMIT, ETC. TO BE AN OFFENCE. लायसन, परवाना, वगैरे यांचा भंग करणे हा अपराध असणे.

82 Breach of license, permit, etc. to be an offence. लायसन, परवाना, वगैरे यांचा भंग करणे हा अपराध असणे..[View all order & notifications]

(1)

In the event of any breach by the holder of any licence, permit, pass or authorization granted under this Act or by his servants or by any person acting with his express or implied permission on his behalf of any of the terms or conditions of such licence, permit, pass or authorization such holder shall, in addition to the cancellation or suspension of the licence, permit, pass or authorization granted to him be punished, on conviction, with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to five thousand or with both, unless it is proved that all due and reasonable precautions were exercised by him to prevent any such breach.

या अधिनियमान्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणा-या कोणत्याही व्यक्तीने किंवा तिच्या नोकराने किंवा तिच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने तिच्या वतीने काम करणा-या कोणत्याही व्यक्तीने अशा लायसनाच्या, परवान्याच्या, पासाच्या किंवा प्राधिकारपत्राच्या कोणत्याही अटीचा किंवा शर्तीचा भंग केल्यास, तिला दिलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र रद्द होऊन किंवा तहकूब होऊन शिवाय असा कोणताही भंग होऊ न देण्यासाठी आपण सर्व योग्य व वाजवी उपाययोजना केल्या होत्या असे तिने सिद्ध न केले तर, तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावसाची शिक्षा होईल किंवा पाच हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
 

(2)

Any person who commits any such breach shall, whether he acts with or without the permission of the holder of the licence, permit, pass or authorization be liable to the same punishment.

जी कोणती व्यक्ती, अशा रीतीने कोणताही भंग करील, ती त्याच शिक्षेस पात्र होईल-मग ती असे कृत्य लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणा-या व्यक्तीच्या परवानगीने केलेला असो किंवा परवानगीवाचून केलेला असो.

Section 83 PENALTY FOR CONSPIRACY. कट करण्याबद्दल शास्ती.

83 Penalty for conspiracy. कट करण्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

When two or more persons agree—

(a) to commit or cause to be committed any offence under this Act, or

(b) to commit a breach of a condition of a licence, permit pass or authorization.

each of such persons shall on conviction, be punished with imprisonment for a term which shall not be less than three years but which may extend to five years or with fine which shall not be less than twenty-five thousand rupees but which may extend to fifty thousand rupees or with both.

जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती-

(अ) या अधिनियमाखालील कोणताही अपराध स्वत: करण्याचे किंवा तो दुस-या व्यक्तीकडून करविण्याचे, अथवा

(ब) लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या शर्तीचा भंग करण्याचे आपसात ठरवतील तेव्हा,

त्यापैकी प्रत्येक व्यक्तीस, सिद्धापराध ठरविण्यात आले असता तीन वर्षांपेक्षा कमी नसेल, परंतु, पाच वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा पंचवीस हजार
रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 84 PENALTY FOR BEING FOUND DRUNK IN ANY DRINKING HOUSE. कोणत्याही सार्वजनिक गुत्त्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून आल्याबद्दल शास्ती.

84 Penalty for being found drunk in any drinking house. कोणत्याही सार्वजनिक गुत्त्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून आल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever is found drunk or drinking in a common drinking house or is found there present for the purpose of drinking shall, on conviction, be punished with fine which may extend to  five thousand rupees. Any person found in a common drinking house during any drinking therein shall be presumed, until the contrary is proved, to have been there for the purpose of drinking.

जी कोणतेही व्यक्ती, कोणत्याही दारूच्या सार्वजनिक गुत्त्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून येईल किंवा दारू पीत असताना आढळून येईल किंवा दारू पिण्यासाठी तेथे हजर असल्याचे आढळून येईल तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता पाच हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल. कोणतीही व्यक्ती गुत्त्यात दारू पिण्याचे काम चालू असता तेथे आढळून येईल तर ती तद्विरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत, तेथे दारू पिण्यासाठी हजर होती असे गृहीत धरण्यात येईल.

Section 85 PENALTY FOR BEING DRUNK AND DISORDERLY BEHAVIOUR. दारू पिऊन धुंद झाल्याबद्दल व गैरशिस्त वागणुकीबद्दल शास्ती.

85 Penalty for being drunk and disorderly behaviour. दारू पिऊन धुंद झाल्याबद्दल व गैरशिस्त वागणुकीबद्दल शास्ती..[View all order & notifications]

(1)

Whoever in any street or thoroughfare or public place or in any place to which the public have or are permitted to have access, behaves in disorderly manner under the influence of drink, shall, on conviction, be punished—

(a) for a first offence, with rigorous imprisonment for a term which may extend to six months and with fine which may extend to ten thousand rupees:

Provided that, in absence of special and adequate reasons to the contrary to be mentioned in the judgement of the Court, such imprisonment shall not be less than three months and the fine shall not be less than five thousand rupees; and

(b) for a subsequent offence, with rigorous imprisonment for a term which may extend to one year and also with a fine of ten thousand rupees:

Provided that, in the absence of special and adequate reasons to the contrary to be mentioned in the judgement of the court, such imprisonment shall not be less than six months and fine shall not be less than seven thousand five hundred rupees.

जी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही सडकेवर अथवा सार्वजनिक जागी किंवा ज्या कोणत्याही जागी लोकांना प्रवेश मिळू शकतो अथवा परवानगी मिळू शकते अशा जागी दारूच्या नशेत गैरशिस्तीने वागेल तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता,-----

(अ) पहिल्या अपराधाबद्दल, सहा महिन्यापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची व 5दहा हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल :

परंतु, न्यायालयाच्या निकालपत्रात तद्विरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणाच्या अभावी अशा कारावासाची शिक्षा तीन महिन्यांपेक्षा कमी असणार नाही व असा द्रव्यदंड पाच हजारट पेक्षा कमी असणार नाही; आणि

(ब) नंतरच्या अपराधाबद्दल, एक वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची व तसेच 7दहा हजार रुपयेट इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल :

परंतु न्यायालयाच्या निकालपत्रात तद्विरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी, अशी कारावासाची शिक्षा सहा महिन्यांपेक्षा कमी असणार नाही व असा द्रव्यदंड सात हजार पाचशे रुपयांपेक्षाट कमी असणार नाही.

(2)

In prosecution for an offence under sub-section (1), it shall be presumed until the contrary is proved that the person accused of the said offence has drunk liquor or consumed any other intoxicant for the purpose of being intoxicated and not for a medicinal purpose.

पोट-कलम (1) खालील अपराध केल्याबद्दल चालविलेल्या खटल्यात, तद्विरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत, असा अपराध केल्याबद्दल जिच्यावर आरोप ठेवला आहे अशी व्यक्ती औषधी कारणांसाठी नव्हे तर नशा येणासाठी दारू प्यायली आहे किंवा कोणत्याही इतर मादक द्रव्याचे तिने सेवन केले आहे असे गृहीत धरण्यात येईल.

Section 86 PENALTY FOR ALLOWING ANY PREMISES FOR PURPOSE OF COMMITTING AN OFFENCE UNDER ACT. या अधिनियमाखालील अपराध करण्यासाठी कोणतीही जागा वापरण्याची परवानगी देण्याबद्दल शास्ती.

86 Penalty for allowing any premises for purpose of committing an offence under Act. या अधिनियमाखालील अपराध करण्यासाठी कोणतीही जागा वापरण्याची परवानगी देण्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

(1)

Whoever, being the owner or occupier, or having the use or care or management or control of any place, knowingly permits it to be used for the purpose of the commission by any other person of any offence punishable under this Act, shall on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to 5[ten thousand rupees] or with both:

Provided that, in the absence of special and adequate reasons to the contrary to be mentioned in the judgement of the Court, the imprisonment shall not be less than three months and fine shall not be less than 6[five thousand rupees];

जी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही जागेची मालक किंवा तिचा भोगवटा करणारी अगर वापर करणारी किंवा तिच्यावर देखरेख ठेवणारी अगर तिची व्यवस्था पाहणारी किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवणारी असून, या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध इतर कोणत्याही व्यक्तीकडून करण्यासाठी अशा जागेचा वापर करण्याची जाणूनबुजून परवानगी देईल, तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा दहा हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील :

परंतु न्यायालयाच्या निकालपत्रात तद्विरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी, अशी कैदेची शिक्षा तीन महिन्यांपेक्षा कमी असणार नाही व असा द्रव्यदंड पाच हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही.

(2)

Any owner who has leased out his premises to be used by other person under any agreement shall not be held responsible for an offence under sub-section (1) committed by the tenant in the premises in his possession, unless it is proved that the owner is actively involved in the commission of such offence.

ज्याने आपली जागा कोणत्याही कराराअन्वये भाडेपट्ट¬ाने दिली आहे अशा कोणत्याही मालकाला, भाडेकरूने त्याच्या ताब्यात असलेल्या जागेत केलेल्या पोट-कलम (1) खालील अपराधासाठी, जोपर्यंत तो मालक अशा अपराधामध्ये सक्रियपणे गुंतला आहे असे शाबीत होत नाही तोपर्यंत, जबाबदार धरले जाणार नाही.

Section 87 PENALTY FOR CHEMIST, DRUGGIST OR APOTHECARY FOR ALLOWING HIS PREMISES TO BE USED FOR PURPOSE OF CONSUMPTION OF LIQUOR. रसायनी औषधे विकणारी व्यक्ती, औषधे विकणारी व्यक्ती किंवा औषध विक्रेता यास आपली जागा त्यात दारूचे सेवन करण्यासाठी वापरण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल शास्ती.

87 Penalty for chemist, druggist or apothecary for allowing his premises to be used for purpose of consumption of liquor. रसायनी औषधे विकणारी व्यक्ती, औषधे विकणारी व्यक्ती किंवा औषध विक्रेता यास आपली जागा त्यात दारूचे सेवन करण्यासाठी वापरण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

A chemist, druggist, apothecary or keeper of a dispensary who allows any liquor, which has not been bonafide medicated for medicinal purposes according to the prescription of a registered medical practitioner or any intoxicating drug to be consumed on his business premises by any person, shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months, or with fine which may extend to ten thousand rupees or with both.

रसायनी औषधे विकणारा, औषधे विकणारा, औषधाविक्रेता किंवा दवाखान्याचा व्यवस्थापक अशी जी कोणी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीस नोंदलेल्या वैद्यक व्यवसायींच्याट चिकित्सापत्रानुसार औषधीय कारणासाठी जी खरोखर औषधीयुक्त केलेली नाही अशा कोणत्याही प्रकारची दारू किंवा कोणतीही मादक औषधी सेवन करण्यास आपल्या धंद्याच्या जागेत परवानगी देईल तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा 6दहा हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 88 PENALTY FOR ISSUING FALSE PRESCRIPTION. खोटी चिकित्सापत्रे दिल्याबद्दल शास्ती.

88 Penalty for issuing false prescription. खोटी चिकित्सापत्रे दिल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

If a registered medical practitioner issue a prescription with the intention that such prescription shall be used by the person to whom it is issued for the purpose of consuming liquor, intoxicating drug or opium in contravention of the provisions of this Act, or rule, regulation or order made thereunder any licence, permit, pass or authorization granted under this Act, he shall on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to ten thousand rupees or with both.

एखादा नोंदलेला वैद्यक व्यवसायीट एखाद्या व्यक्तीस चिकित्सापत्र देईल व अशा व्यक्तीने या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तदन्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तदन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा या अधिनियमाअन्वये दिलेल्या कोणत्याही लायसनचे, परवान्याचे, पासाचे किंवा प्राधिकारपत्राचे उल्लंघन करून, दारू, मादक द्रव्य किंवा अफू यांचे सेवन करण्यासाठी असे चिकित्सापत्र वापरावे असा त्या व्यवसायीचा इरादा असेल तर, त्यास सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा दहा हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 89 PENALTY FOR MALICIOUSLY GIVING FALSE INFORMATION. दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरविल्याबद्दल शास्ती.

89 Penalty for maliciously giving false information. दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरविल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Any person who maliciously and falsely gives information to any person exercising powers under this Act leading to a search, scizure, detention or arrest shall, on conviction be punished with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to ten thousand rupees or with both.

जी कोणतीही व्यक्ती या अधिनियमाअन्वये अधिकारांचा वापर करणा-या कोणत्याही व्यक्तीस दुर्भावपूर्वक व खोटेपणाने माहिती देईल व त्यामुळे कोणत्याही जागेत झडती घेण्यात येईल, कोणताही माल जप्त करण्यात येईल, कोणत्याही व्यक्तीस अटकावून ठेवण्यात येईल किंवा अटक करण्यात येईल तर, त्या व्यक्तीस, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा दहा हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 90 PENALTY FOR OFFENCES NOT OTHERWISE PROVIDED FOR.  ज्यासाठी अन्यथा तरतूद केलेली नाही अशा अपराधाबद्दल शास्ती.

90 Penalty for offences not otherwise Provided for.  ज्यासाठी अन्यथा तरतूद केलेली नाही अशा अपराधाबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Whoever is guilty of any willful act or intentional omission in contravention of the provisions of this Act, or any rule, regulation or order thereunder or of any licence, permit, pass or authorization granted under this Act, and if such act or omission is not otherwise made an offence under this Act, shall on conviction, be punished with the imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to five thousand rupees or with both.

जी कोणतीही व्यक्ती, या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तदन्वये केलेल्या नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तदन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा या अधिनियमाअन्वये दिलेल्या कोणत्याही लायसनचे, परवान्याचे, पासाचे किंवा प्राधिकारपत्राचे उल्लंघन करून कोणतेही कृत्य बुद्ध¬ा केल्याबद्दल किंवा कोणतेही कृत्य हेतुपूर्वक टाळाल्याबद्दल दोषी असेल व असे कृत्य करणे किंवा टाळणे हे या अधिनियमाअन्वये अन्यथा अपराध होत नसेल तर, तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा पाच हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 91 DEMAND FOR SECURITY FOR ABSTAINING FROM COMMISSION OF OFFENCES. काही अपराध करण्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रतिभूती मागणे.

91 Demand for security for abstaining from commission of offences. काही अपराध करण्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रतिभूती मागणे..[View all order & notifications]

(1)

Whenever any person is convicted of an offence punishable under this Act, the court convicting such person, may at the time of passing the sentence on such person, order him to execute a bond for a sum proportionate to his means with or without sureties to abstain from the commission of offences punishable under the provisions of this Act during such period not exceeding three years as it may direct.

या अधिनियमाअन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीस सिद्धापराध ठरविण्यात येईल तेव्हा, अशा व्यक्तीला सिद्धापराध ठरविणा-या न्यायालयास तिला शिक्षा देताना, या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये शिक्षापात्र असलेला अपराध न्यायालय निदेश देईल अशा जास्तीत जास्त तीन वर्षांच्या मुदतीत त्याने करू नये म्हणून त्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणात असलेल्या रकमेचे बंधपत्र जामिनानिशी किंवा जामिनावाचून, करून देण्याविषयी त्याला आदेश देता येईल.

(2)

The bond shall be in such form as may be provided under the provisions of the code of Criminal Procedure,*1898, and the provision of the said code shall in so far as they are applicable apply to all matter connected with such bond if it were a bond to keep the peace ordered to be executed under section 106 of the said Code.

असे बंधपत्र, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 यांच्या तरतुदींअन्वये तरतूद करण्यात येईल अशा नमुन्याप्रमाणे असेल ; आणि उक्त संहितेच्या तरतुदी, जेथवर लागू होतील तेथवर, अशा बंधनपत्रासंबंधी असलेल्या सर्व गोष्टींना जणू असे बंधपत्र शांतता राखण्यासाठी उक्त संहितेच्या कलम 106 अन्वये करून देण्यास फर्मविले आहे असे समजून लागू होईल.

(3)

If the conviction is set aside in appeal the bond so executed shall become void.

अपिलात अपराधसिद्धी रद्द झाली तर, अशा रीतीने करून दिलेले बंधपत्र निरर्थक होईल.

Section 92 DELETED. वगळण्यात आले.

92 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

Release of offenders on bond.] Delected by Bom. 67 of 1953, s. 2.

(अपराध्यांची जामिनावर सुटका.) सन 1953 चा मुंबई अधिनियम क्रमांक 67 कलम 2 अन्वये वगळण्यात आले.

Section 93 DEMAND OF SECURITY FOR GOOD BEHAVIOUR. चांगली वर्तणूक ठेवण्याबद्दल प्रतिभूती मागणे.

93 Demand of security for good behaviour. चांगली वर्तणूक ठेवण्याबद्दल प्रतिभूती मागणे..[View all order & notifications]

(1)

Whenever a Presidency Magistrate specially empowered by the State Government in this behalf in Greater Bombay and elsewhere, a District Magistrate or Sub-Divisional Magistrate] receives information that any person within the local limit of his jurisdiction habitually commits or attempts to commit or abets the commissioner of an offence punishable under this Act such Magistrate may require such person to show cause why he should not be ordered to execute a bond, with sureties, for his good behaviour for such period not exceeding three years as the Magistrate may direct.

 जेव्हा जेव्हा बृहन्मुंबईत राज्य शासनाने याबाबत खास अधिकार दिलेला इलाखा-शहर दंडाधिकारी व इतरत्र, जिल्हादंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांस. त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक हद्दीत, कोणतीही व्यक्ती या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला अपराध वारंवार करते किंवा करण्याचा प्रयत्न करते किंवा करण्यास अपप्रेरणा देते अशी माहिती मिळेल तेव्हा तेव्हा, अशा व्यक्तीस दंडाधिकारी निदेश देईल अशा जास्तीत जास्त तीन वर्षांच्या मुदतीसाठी चांगली वर्तणूक ठेवण्याबद्दल जामिनानिशी, बंधपत्र लिहून देण्यास त्यास आदेश का देण्यात येऊ नये याविषयी कारणे दाखविण्यास अशा दंडाधिका-यास सांगता येईल.

(2)

The provisions of the Code of Criminal Procedure,1898, *shall in so far as they are applicable apply to any proceedings under sub-section (1) as if the bond referred to therein where a bond required to be executed under section 110 of the said Code.

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 यांच्या तरतुदी, त्या जेथवर लागू असतील तेथवर, पोट-कलम (1) अन्वये केलेल्या कोणत्याही कामकाजाच्या बाबतीत, त्यात उल्लेख केलेले बंधपत्र हे जणू उक्त संहितेचे कलम 110 अन्वये करून देणे आवश्यक असलेले बंधपत्र आहे असे समजून, लागू होतील.

Section 94 EXECUTION OF BONDS IN RESPECT OF MINORS. बंधपत्र फर्माविले असेल अशी कोणतीही व्यक्ती अज्ञान असल्यास.

94 Execution of bonds in respect of minors. बंधपत्र फर्माविले असेल अशी कोणतीही व्यक्ती अज्ञान असल्यास..[View all order & notifications]

If any person in respect of whom a bond is ordered to be executed under 1[sections 91 and 93] is a minor, the bond shall be executed by his guardian.

(कलमे 91 व 93 अन्वये) बंधपत्र करून देण्यास जिच्या बाबतीत फर्माविले असेल अशी कोणतीही व्यक्ती अज्ञान असल्यास, असे बंधपत्र तिच्या पालकाकडून करण्यात येईल.

Section 95 PUNISHMENT FOR VEXATIOUS SEARCH, SEIZURE OR ARREST. त्रासदायक रीतीने झडती घेणे किंवा अटक करणे याबद्दल शास्ती.

95 Punishment for vexatious search, seizure or arrest. त्रासदायक रीतीने झडती घेणे किंवा अटक करणे याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Any officer or person exercising powers under this Act who—

(a) Maliciously enters or searches or causes to be entered or searched, any building or house or similar dwelling place; or

(b) Vexatiously and unnecessarily seizes the property of any person of the presentence of seizing or searching for anything liable to confiscation under this Act; or

(c) Vexatiously and unnecessarily detains, searches or arrests any person; or

d) in any other way maliciously exceeds or abuses his lawful powers,

shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to one year or with fine which may extend to ten thousand rupees] or with both.

या अधिनियमान्वये अधिकारांचा वापर करणारा कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती---

(अ) कोणत्याही इमारतीत किंवा घरात किंवा तत्सम राहण्याच्या जागेत दुर्भावपूर्वक प्रवेश करील किंवा करवील किंवा तिची झडती घेईल किंवा घेववील ; अथवा

(ब) या अधिनियमान्वये जप्त करण्यास पात्र असलेली कोणतीही वस्तू जप्त करण्याच्या सबबीवर किंवा अशा वस्तूंसाठी झडती घेण्याच्या सबबीवर कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता त्रासदायक रीतीने व निष्कारण जप्त करील ; अथवा

(क) कोणत्याही व्यक्तीस त्रासदायक रीतीने व निष्कारण अटकावून ठेवील, तिधी झडती घेईल किंवा तिला अटक करील ; अथवा

(ड) इतर कोणत्याही रीतीने आपल्या कायदेशीर अधिकारांचे दुर्भावपूर्वक अतिक्रमण करून वर्तन करील किंवा आपल्या कायदेशीर अधिकारांचा दुरुपयोग करील ;

तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, एक वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा दहा हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 96 PUNISHMENT FOR VEXATIOUS DELAY. त्रासदायक रीतीने विलंब लावल्याबद्दल शास्ती.

96 Punishment for vexatious delay. त्रासदायक रीतीने विलंब लावल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Any officer or person exercising powers under this Act who vaxatiously and unnecessarily delays forwarding to a Magistrate or to the officer-in-charge of the nearest police station as required by the provisions of this Act any person arrested or article seized under this Act shall, on conviction be punished with imprisonment for a term which may extend to one year or with fine which may extend to ten thousand rupees or with both.

या अधिनियमाअन्वये अधिकारांचा वापर करणारा जो कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती या अधिनियमान्वये अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीस या अधिनियमाच्या तरतुदीअन्वये आवश्यक असल्याप्रमाणे दंडाधिका-याकडे किंवा अगदी नजिकचे पोलीस ठाणे स्वाधीन असलेल्या अधिका-याकडे पाठविण्यास किंवा या अधिनियमाअन्वये जप्त केलेली कोणतीही वस्तू या अधिनियमाच्या तरतुदीअन्वये आवश्यक असल्याप्रमाणे अशा अधिका-याकडे पाठविण्यास, त्रास देण्याच्या हेतूने आणि आवश्यकता नसताना विलंब लावील, तिला सिद्धापराध ठरविण्यात आले असता, एक वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा दहा हजार रुपयांपर्यंतवाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
 

Section 97 PUNISHMENT FOR ABETMENT FOR ESCAPE OF PERSONS ARRESTED . अटक केलेल्या व्यक्तींनी पळून जावे यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल शास्ती.

97 Punishment for abetment for escape of persons arrested . अटक केलेल्या व्यक्तींनी पळून जावे यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल शास्ती..[View all order & notifications]

Any officer or person exercising power under this Act, who—

(a) unlawfully releases any person arrested under this Act, or

(b) abets the escape of any person arrested under this Act, or

(c) abets the commission of any offence against this Act, and any other officer of the Government] or of a local authority who absets the commission of any offence against this Act. shall, on conviction, be punished,—

(i) if such act is done intentionally, with imprisonment for a term which may extend to thirty months or with fine which may extend to twenty-five thousand rupees or with both; or

(ii) if such act is done negligently, with imprisonment for a term which may extend to two years or with fine which may extend to ten thousand rupees or with both

या अधिनियमान्वये अधिकाराचा वापर करणारा जो कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती-

(अ) या अधिनियमान्वये अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीस बेकायदेशीररीत्या सोडून देईल, अथवा

(ब) या अधिनियमान्वये अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीस पळून जाण्यास प्रोत्साहन देईल, अथवा

(क) या अधिनियमाविरुद्ध कोणताही अपराध करण्यास अपप्रेरणा देईल, त्यास आणि शासनाचा किंवा स्थानिक प्राधिकरणाचा जो कोणताही इतर अधिकारी या अधिनियमाविरुद्ध कोणताही अपराध करण्यास अपप्रेरणा देईल, त्यास, सिद्धापराध ठरविण्यात आले असता.-

(एक) जर अशी कृती हेतुपुरस्सर केली असेल तर, तीस महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील ; किंवा

(दोन) जर अशी कृती हयगयीने केली असेल तर, दोन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा दहा हजार रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 98 THINGS LIABLE TO CONFISCATION. सरकारजमा होण्यास पात्र असलेली, वस्तू .

98 Things liable to confiscation. सरकारजमा होण्यास पात्र असलेली, वस्तू ..[View all order & notifications]

(1)

Whenever any offence punishable under this Act has been committed,

(a) any intoxicant, hemp, mhowra flowers, molasses, materials, still, utensil, implement or apparatus in respect of which the offence has been committed,

(b) where in the case of an offence involving illegal possession, the offender has in his lawful possession any intoxicant, hemp, mhowra flowers or molasses other than those in respect of which an offence under this Act has been committed , the entire stock of such intoxicant, hemp, mhowra flowers or molasses,

(c) where in the case of an offence of illegal import, export or transport, the offender has attempted to import, export or transport any intoxicant, hemp, mhowra flowers or molasses, in contravention of the provisions of this Act, rule, regulation or order or in breach of a condition of a licence, permit pass or authorization, the whole quantity of such intoxicant hemp, mhowara flowers or molasses which he has attempted to import, export or transport,

(d) where in the case of an offence of illegal sale, the offender has in his lawful possession any intoxicant, hemp, mhowra flowers or molasses other than that in respect of which an offence has been committed the whole of such other intoxicant, hemp mhowra flowers or molasses,

shall be confiscated by the order of the Court.

या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध करण्यात येईल तेव्हा----

(अ) ज्याच्या बाबतीत अपराध करण्यात आला असेल असे कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले, काकवी, साहित्य, दारु गाळण्याची भट्टी, भांडी, साधने किंवा उपकरणे,

(ब) बेकायदेशीररीत्या जवळ बाळगण्यामुळे होत असलेल्या अपराधाच्या बाबतीत, या अधिनियमाखालील अपराधांशी संबंधित अशा पदार्थाव्यतिरिक्त इतर कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी कायदेशीररीत्या अपराधी व्यक्तीच्या कब्जात असेल तेव्हा, मादक द्रव्याचा, भांगेचा, मोहाचा फुलांचा किंवा काकवीचा संबंध साठा,

(क) बेकायदेशीररीत्या आयात, निर्यात किंवा परिवहन करण्यामुळे होत असलेल्या अपराधाच्या बाबतीत जेव्हा अपराधी व्यक्तीने या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तदन्वये केलेल्या नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तदन्वये दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून किंवा लायसनच्या, परवान्याच्या, पासाच्या किंवा प्राधिकारपत्राच्या शर्तीचा भंग करून कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी यांची आयात, निर्यात किंवा परिवहन करण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा, ज्यांच्या बाबतीत अशा व्यक्तीने आयात, निर्यात किंवा पहिवहन करण्याचा प्रयत्न केला असेल ती सर्व मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले, किंवा काकवी,

(ड) बेकायदेशीर विक्री करण्यामुळे होत असलेल्या अपराधांच्या बाबतीत, ज्यांच्या बाबतीत अपराध करण्यात आला असेल अशा पदार्थाव्यतिरिक्त इतर कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी कायदेशीररीत्या अपराधी व्यक्तीच्या कब्जात असेल तेव्हा, अशी इतर सर्व मादक द्रव्ये, भांग मोहाची फुले किंवा काकवी. ही, न्यायालयाच्या आदेशावरून सरकारजमा केली जातील.

(2)

Any receptacle, package or covering in which any of the articles liable to confiscation under sub- section (1) is found and the other contents of such receptacle, package or covering and the animals, carts, vessels or other conveyances used in carrying any such article shall like-wise be liable to confiscation by the order of the Court.

पोट-कलम (1) अन्वये सरकारजमा होण्यास पात्र असलेली, कोणतीही वस्तू ज्यात आढळून आली आहे असे कोणतेही पात्र, संवेष्टन किंवा वेष्टन व अशा पात्रातील संवेष्टनातील किंवा वेष्टनातील इतर वस्तू आणि अशी कोणतीही वस्तू वाहून नेण्याकरिता वापरण्यात आलेली जनावरे, गाड¬ा, जलयाने किंवा इतर वाहने ही, न्यायालयाच्या आदेशावरून तशाच प्रकारे सरकारजमा होण्यास पात्र असतील.
 

Section 99 RETURN OF THINGS LIABLE TO CONFISCATION TO BONA FIDE OWNERS. सरकारजमा होण्यास पात्र असलेल्या वस्तू खरोखरीच्या मालकांस परत करणे.

99 Return of things liable to confiscation to bona fide owners. सरकारजमा होण्यास पात्र असलेल्या वस्तू खरोखरीच्या मालकांस परत करणे..[View all order & notifications]

When during the trial of a case for an offence under this Act the Court decides that anything is liable to confiscation under the foregoing section. The court may, after hearing the person, if any, claiming any right thereto and the evidence, if any which he produces in support of his claim, order confiscation, or in the case of any article other than an intoxicant, hemp, mhowra flowers or molasses give the owner an option to pay fine as the Court deems fit in lieu of confiscation :

Provided that no animals, cart vessel, vehicle or other conveyance shall be confiscated if the owner thereof satisfies the Court that he had exercised due care in preventing the commission of the offence.

या अधिनियमाखालील अपराधाचा खटला चालू असताना, कोणतीही वस्तू मागील कलमाअन्वये सरकारजमा होण्यास पात्र आहे असा न्यायालयाने निर्णय दिल्यास, त्यास, अशा वस्तूवर हक्क सांगण्या-या कोणत्याही व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि आपल्या हक्कांच्या समर्थनार्थ तो जो कोणताही साक्षीपुरावा हजर करील तो एकून घेतल्यानंतर, अशी वस्तू जप्त करण्याविषयी आदेश देता येईल. तसेच एखादे मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी यां व्यतिरिक्त असलेल्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत सरकारजमा करण्याऐवजी न्यायालयास, त्यास योग्य वाटेल इतका द्रव्य दंड भरण्याविषयी अशा मालकास मुभा देता येईल :

परंतु, कोणत्याही जनावराच्या, गाडीच्या, जलयानाच्या, वाहनाच्या किंवा इतर वाहतुकीच्या साधनाच्या मालकाने, गुन्हा घडू नये यासाठी आपण
वाजवी काळजी घेतली होती अशी न्यायालयाची खात्री करून दिली तर, असे जनावर, गाडी, जलयान किंवा इतर वाहन सरकारजमा करता येणार
नाही.

Section 100. PROCEDURE IN CONFISCATION. सरकारजमा करण्याच्या वेळी अनुसरावयाची कार्यपद्धती.

100. Procedure in confiscation. सरकारजमा करण्याच्या वेळी अनुसरावयाची कार्यपद्धती..[View all order & notifications]

When an offence under this Act has been committed and the offender is not known or cannot be found or when anything liable to confiscation under this Act is found or seized, the Commissioner Collector or any other officer authorized by the State Government in this behalf may make an inquiry and if after such inquiry is satisfied that an offence has been committed, may order the thing found to be confiscated ;

Provided that no such order shall be made before the expiry of one month from the date of seizure, or without hearing the person, if any claiming any right thereto and the evidence, if any, which he produces in support of this claim.


या अधिनियमाखाली एखादा अपराध करण्यात आला असेल आणि अपराधी माहीत नसेल किंवा सापडणे शक्य नसेल किंवा या अधिनियमाअन्वये सरकारजमा करण्यास पात्र असलेली कोणतीही वस्तू सापडली असेल किंवा जप्त करण्यात आली असेल तेव्हा आयुक्तास, जिल्हाधिका-यास किंवा
राज्य शासन याबाबत प्राधिकृत करील अशा कोणत्याही इतर अधिका-यास, चौकशी करता येईल आणि अशी चौकशी केल्यानंतर अपराध करण्यात आला आहे अशी त्याची खात्री झाल्यास, त्यास, सापडलेली वस्तू सरकारजमा करण्याविषयी आदेश देता येईल :

परंतु, अशी वस्तू जप्त केल्याच्या दिनांकापासून एक महिन्याची मुदत संपण्यापूर्वी किंवा अशा वस्तूवर कोणताही हक्क सांगणारी व्यक्ती असल्यास तिचे म्हणणेट ऐकून घेतल्यावाचून आणि आपल्या हक्काच्या समर्थनार्थ ती जो कोणताही साक्षीपुरावा हजर करील तो ऐकून घेतल्यावाचून, असा कोणताही आदेश देणार नाही.

Section 101. POWER OF COLLECTOR, ETC. TO ORDER SALE OF DESTRUCTION OF ARTICLES LIABLE TO CONFISCATION. सरकारजमा केली जाण्यास पात्र असलेली वस्तू विकण्याविषयी किंवा नष्ट करण्याविषयी आदेश देण्याच्या जिल्हाधिकारी, वगैरे यांचा अधिकार.

101. Power of Collector, etc. to order sale of destruction of articles liable to confiscation. सरकारजमा केली जाण्यास पात्र असलेली वस्तू विकण्याविषयी किंवा नष्ट करण्याविषयी आदेश देण्याच्या जिल्हाधिकारी, वगैरे यांचा अधिकार..[View all order & notifications]

If the thing in question is liable to speedy and natural decay, or if the Commissioner, Collector, Court or the officer authorized by the State Government in this behalf is of opinion that the sale would be for the benefit of the owner, the Commissioner, Collector, Court or the officer may at any time direct it to be sold and the provisions of section 99 or 100 shall apply so far as may be to the net proceeds of the sale:

Provided that, where anything is liable to speedy and natural decay, or is of trifling value, the Court, or the officer concerned may order such thing to be destroyed, if in its or his opinion such order is expedient in the circumstances of the case.

जेव्हा अशी वस्तू त्वरित व स्वाभाविकरित्या नाश पावण्याजोगी असेल किंवा तिची विक्री करणे मालकाच्या हिताचे आहे असे आयुक्ताचेट जिल्हाधिका-याचे न्यायालयाचेट किंवा राज्य शासनाने याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिका-याचे मत झाल्यास त्यास, अशी वस्तू विकण्याविषयी कोणत्याही वेळी निदेश देता येईल; आणि कलम 99 किंवा कलम 100 च्या तरतुदी, जेथवर शक्य असेल तेथवर, विक्री करून आलेल्या निव्वळ रकमेच्या बाबतीत लागू होतील.

परंतु, कोणतीही वस्तू, त्वरित व स्वाभाविकरीत्या नाश पावण्याजोगी असेल किंवा ती क्षुल्लक किंमतीची असेल त्याबाबतीत, न्यायालयास किंवा संबंधित अधिका-यासं प्रकरणांच्या परिस्थितींचा विचार करता अशी वस्तू नष्ट करण्याचा आदेश देणे इष्ट आहे असे त्यांचे मत झाल्यास, ती नष्ट करण्याविषयी आदेश देता येईल.
 

Section 102 FORFEITURE OF ANY PUBLICATION CONTAINING ADVERTISEMENT MATTER SOLICITING USE OF INTOXICANTS. मादक द्रव्य वापरण्याची विनंती करणारी जाहिरात किंवा मजकूर असलेले कोणतेही प्रकाशन सरकारजमा करणे.

102 Forfeiture of any publication containing advertisement matter soliciting use of intoxicants. मादक द्रव्य वापरण्याची विनंती करणारी जाहिरात किंवा मजकूर असलेले कोणतेही प्रकाशन सरकारजमा करणे..[View all order & notifications]

(1)

Where any newspaper, news – sheet, book, leaflet, booklet or other publication wherever printed or published appears to the State Government to contain any advertisement or matter  soliciting the use of, or offering intoxicant or hemp, the State Government may, by notification in the Official Gazette, declare every copy of such newspaper, news-sheet, books, leaflet, booklet or other publication whether printed or published in the State or outside to be forfeited to 8[the State Government] and hereupon any Police Officer may seize the same wherever found in the State. Any Magistrate may by warrant authorize any Police Officer not below the rank of Sub-inspector to enter upon and search for the Same in any premises where any copy of such issue or any such newspaper, news-sheet, book, leaflet, booklet or other publication may be or may be reasonably suspected to be. Every warrant issued under this section shall be executed in the manner provided for the execution of search warrants under the Code of Criminal Procedure,1898.

जेव्हा कोणत्याही ठिकाणी छापलेल्या किंवा प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही वर्तमानपत्रात वृत्तपत्रात, पुस्तकात, पत्रकात, पुस्तिकेत किंवा इतर प्रकाशनात ज्याद्वारे कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यात येत आहे किंवा असे द्रव्य किंवा भांग देऊ करण्यात येत आहे अशी कोणतीही जाहिरात किंवा मजकूर असल्याचे राज्य शासनास दिसून येईल तेव्हा, राज्य शासनास, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, अशा वर्तमानपत्राची, वृत्तपत्रांची, पुस्तकांची, पुस्तकेचीकिंवा इतर प्रकाशनाची प्रत्येक प्रत-मग ते राज्यात किंवा राज्याबाहेर छापलेले किंवा प्रसिद्ध केलेले असो - सरकारजमा करण्यात आली आहे असे जाहीर करता येईल, आणि त्यानंतर, कोणत्याही पोलीस अधिका-यास अशा प्रती राज्यात
सापडतील तेथे जप्त करता येतील. कोणत्याही दंडाधिका-यास फौजदाराच्या दर्जाहून कमी दर्जाच्या नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिका-याला जेथे अशा अंकाची किंवा अशा कोणत्याही वर्तमानपत्राची, वृत्तपत्राची, पुस्तकाची/पत्रकाची, पुस्तिकेची किंवा इतर प्रकाशनाची कोणतीही प्रत असेल किंवा असल्याचा वाजवी रीतीने संशय येत असेल त्या कोणत्याही जागेत प्रवेश करण्यासाठी व झडती घेण्यासाठी अधिपत्र देऊन, प्राधिकृत करता येईल. या कलमाअन्वये देण्यात आलेले प्रत्येक अधिपत्र फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 अन्वये झडतीचे अधिपत्र बजाविण्यासाठी ज्या रीतीने तरतूद करण्यात आली आहे त्याच रीतीने बजविण्यात येईल.

(2)

The declaration of the State Government under this section shall be final and shall not be questioned in any Civil or Criminal Court.

या कलमाअन्वये राज्य शासनाने दिलेला निर्णय अखेरचा असेल व त्यावर कोणत्याही दिवाणी किंवा फौदारी न्यायालयात अक्षेप घेता येणार नाही.

Section 103 PRESUMPTION AS TO COMMISSION OF OFFENCES IN CERTAIN CASES. काही बाबतीत अपराध करण्यात आला आहे असे गृहीत धरणे.

103 Presumption as to commission of offences in certain cases. काही बाबतीत अपराध करण्यात आला आहे असे गृहीत धरणे..[View all order & notifications]

(1)

In prosecutions under any of the provisions of this Act, it shall be presumed without further evidence, until the contrary is proved, that the accused person had committed an offence under this Act in respect of any intoxicant, hemp, mhowra flowers or molasses or any, still, utensil, implement or apparatus, whatsoever for the manufacture of an intoxicant or any materials which have undergone any process towards the manufacture of any intoxicant or form which an intoxicant has been manufactured, for the possession of which he is unable to account satisfactorily.

या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीअन्वये चालविलेल्या खटल्यात, तद्विरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत, आरोपी व्यक्तीने, जे जवळ बाळगण्याबद्दल त्यास समाधानकारक रीतीने कारण दाखविता येत नाही असे कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी याबाबत अथवा अशी कोणतीही दारू गाळण्याची भट्टी, भांडी, साधने किंवा उपकरणे या बाबत अथवा कोणतेही मादक द्रव्य तयार करण्यासाठी ज्याच्यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात आली आहे किंवा ज्यापासून एखादे मादक द्रव्य तयार करण्यात आले आहे असे कोणतेही साहित्य याबाबत या अधिनियमाखालील अपराध केला आहे असे अधिक पुराव्यावाचून गृहीत धरण्यात येईल. 

Section 103A DELETED. वगळण्यात आले.

103A Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Report of certain registered medical officers as evidence.] Delected by Bom.12 of 1959, s.12.

(काही नोंदलेल्या वैद्यकीय अधिका-यांचे प्रतिवृत्त पुराव्यादाखल असणे) सन 1959 मुंबई अधिनियम क्रमांक 12, कलम 12 अन्वये वगळण्यात आले.

Section 104. COMPOUNDING OF OFFENCE. अपराध आपसात मिटवणे.

104. Compounding of offence. अपराध आपसात मिटवणे..[View all order & notifications]

(1)

The State Government may sanction the acceptance from any person whose licence, permit, pass or authorization is liable to be cancelled or suspended under the provisions of sections 54 and 56 or who is reasonably suspected of having committed an offence under sections 67A, 67B, 69, 73, 74, 76, 77, 82 or 108, of a sum of money in lieu of such cancellation or suspension or by way of composition for the offence which may have been committed, as the case may be; and in all cases in which any property other than the intoxicant, hemp, mhowra flowers or molasses has been seized as liable to confiscation under this Act may release the same on payment of the value thereof as estimated by the[State Government or such officer as the State Government may authorize in this behalf :

Provided that where a person who is reasonably suspected of having committed an offence under section 69, 70 or 108 is not the holder of a licence, permit, pass orauthorization granted under this Act or a person in the employ of such holder or a person acting with his express or implied permission on his behalf, the sum of money which may be accepted from such person by way of composition shall not exceed five hundred rupees :

Provided further that, in the case of a person who is reasonably suspected of having committed an offence under section 108, for not more than three occasions, the sum of money which may be accepted from him by way of composition for the offence, shall,—

(a) for the first offence, be an amount equal to three times the duty or fee evaded by him;

(b) for the second offence, be an amount equal to four times the duty or fee evaded by him; and

(c) for the third offence, be an amount equal to five times the duty or fee evaded by him; Provided also that, sum money which may be accepted by way of composition for the offence under the second proviso shall be in addition to the duty or fee to be paid by him under this Act.

कलमे 54 आणि 56 यांच्या तरतुदींअन्वये ज्या कोणत्याही व्यक्तीचे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्रे रद्द केले जाण्यास किंवा तहकूब केले जाण्यास पात्र असेल किंवा ज्याच्यावर कलमे 67-अ, 67-ब, 69, 73, 74, 76, 77, 82 किंवाट 108 या खालील अपराध केल्याचा वाजवी संशय असेल किंवा अशा कोणत्याही व्यक्तीकडून यथास्थिति, अशा रीतीने लायसन वगैरे रद्द करण्याऐवजी किंवा तहकूब करण्याऐवजी किंवा जो अपराध करण्यात आला असेल तो अपराध आपसात मिटविण्यासाठी म्हणून पैशाची रक्कम स्वीकारण्यास राज्य शासनास मंजुरी देता येईल; आणि ज्या कोणत्याही बाबतीत मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी याव्यतिरिक्त जी कोणतीही इतर मालमत्ता या अधिनियमान्वये सरकारजमा
होण्यास पात्र असेल त्याबाबतीत, ती मालमत्ता राज्य शासनाने किंवा राज्य शासन याबाबत प्राधिकृत करील अशा अधिका-याने अंदाजलेली तिची
किंमत देण्यात आल्यावर सोडून देईल.

परंतु कलम 69, 70 किंवा 108 या खालील अपराध केल्याचा ज्या व्यक्तीवर वाजवी संशय असेल अशी व्यक्ती या अधिनियमान्वये दिलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करीत नसेल किंवा असे लायसन वगैरे धारण करणा-या व्यक्तीच्या नोकरीत नसेल किंवा तिच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने तिच्या वतीने काम करीत नसेल तेव्हा, अशा व्यक्तीकडून अपराध आपसात मिटविण्यासाठी म्हणून द्यावयाची रक्कम पाचशे रुपयांहून अधिक असणार नाही :

परंतु असेही, जिच्यावर तीनपेक्षा अधिक नसतील इतक्या वेळा, कलम 108 खालील एखादा अपराध केल्याचा वाजवी संशय असेल अशा व्यक्तीच्या बाबतीत, अपराध अपसात मिटविण्यासाठी म्हणून तिच्याकडून जी रक्कम स्वीकारण्यात यईल ती रक्कम,-

(अ) पहिल्या अपराधाबद्दल, तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या तीनपट रकमेएवढी असेल ;

(ब) दुस-या अपराधाबद्दल, तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या चारपट रकमेएवढी असेल ;

(क) तिस-या अपराधाबद्दल, तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या पाचपट रकमेएवढी असेल :

परंतु तसेच, अपराध आपसात मिटविण्यासाठी म्हणून दुस-या परंतुकान्वये तिच्याकडून जी रक्कम स्वीकारण्यात येईल ती रक्कम, तिने या अधिनियमान्वये भरावयाच्या शुल्काच्या किंवा फीच्या रकमेव्यतिरिक्त असेल.
 

(2)

On the payment by such person of such sum of money, or such value or both, as the case may be such person, if in custody, shall be set at liberty and the property seized may be released and if any proceedings shall have been instituted against such person in any Criminal Court, the composition shall be held to amount to an acquittal and in no case shall any further proceedings be taken against such person or property with reference to the same facts.

 अशा व्यक्तीने, यथास्थिति, अशी पैशाची रक्कम किंवा अशी किंमत किंवा दोन्ही दिल्यानंतर, तिला ती अभिरक्षेत असेल तर, सोडून देण्यात यावी व जप्त केलेली मालमत्ता सुद्धा मुक्त करण्यात यावी; आणि अशा व्यक्तीविरुद्ध फौजदारी न्यायालयात कोणतेही काम चालविण्यात आले असेल तर, अशा तडजोडीमुळे व त्यांची दोषमुक्ती झाली आहे असे समाजण्यात येईल व अशा व्यक्तीविरुद्ध किंवा मालमत्तेविरुद्ध त्याच गोष्टीसंबंधाने पुढे कोणतेही काम चालविता कामा येणार नाही. 

Section 104 A BOMBAY PROBATION OF OFFENDERS ACT, 1938, AND SECTION 562, OF CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1898, NOT TO APPLY TO PERSONS CONVICTED OF OFFENCE UNDER THIS ACT. मुंबई अपराधी परिवीक्षा अधिनियम, 1938 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 याच्या कलम 562 च्या तरतुदी या अधिनियमाखालील अपराध केल्याबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आलेल्या व्यक्तीस लागू नसणे.

104 A Bombay Probation of Offenders Act, 1938, and section 562, of Code of Criminal Procedure, 1898, not to apply to persons convicted of offence under this Act. मुंबई अपराधी परिवीक्षा अधिनियम, 1938 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 याच्या कलम 562 च्या तरतुदी या अधिनियमाखालील अपराध केल्याबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आलेल्या व्यक्तीस लागू नसणे..[View all order & notifications]

Nothing in the Bombay Probation of Offenders Act, 1938, or in any law corresponding to that Act in force in any part of the State or in the Probation of Offenders Act, 1958, where that Act is brought into force in any part of the State or in] section 562 of the Code of Criminal Procedure,1898, shall apply to any person convicted of any offence under this Act.

मुंबई अपराधी परिवीक्षा अधिनियम, 1938 किंवा राज्याच्या कोणत्याही भागात अंमलात असलेल्या उक्त अधिनियमासारख्या कोणत्याही कायद्यात किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियम, 1958 हा राज्याच्या कोणत्याही भागात अंमलात आणला असल्यास त्या अधिनियमात किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 याच्या कलम 562 यातील कोणत्याही तरतुदी, या अधिनियमाखालील कोणताही अपराध केल्याबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीस लागू होणार नाहीत.

 

Section 105 EXCISE DUTIES. उत्पादन शुल्क

105 Excise Duties. उत्पादन शुल्क.[View all order & notifications]

(1)

An excise duty or countervailing duty, as the case may be, at such rate or rates as the State Government shall direct may be imposed either generally or for any specified local area on—

(a) any alcoholic liquor for human consumption,

(b) any intoxicating drug or hemp,

(c) Opium,

(d) any other excisable article,

When imported, exported, transported, possessed, manufactured or sold in or from the State.as the case may be;

Provided that duty shall not be so imposed on any article which has been imported into the territory of India and was liable on such importation to duty under the Indian Tariff Act, 1934, or the Sea Customs Act, 1878 or on any medicinal or toilet preparation containing alcohol, opium, hemp or other narcotic drugs or narcotics. 

Explanation.–Duty may be imposed under this section at different rates,—

(i) according to the places to which an excisable article is to be removed for consumption; or

(ii) according to the varying strengths or quality of such article; or

(iii) according to the manufacturing cost of the excisable article, declared in writing, by the manufacturer or the exporter to the State, to the prescribed authority and authenticated by that authority.

(अ) मनुष्याने सेवन करण्याजोगी कोणत्याही प्रकारची मद्यार्कयुक्त दारू,

(ब) कोणतेही मादक औषधिद्रव्य किंवा भांग,

(क) अफू ,

(ड) कोणताही इतर उत्पादनशुल्कयोग पदार्थ,

यांवर जेव्हा ते यथास्थिति राज्यात आयात करण्यात येतील. किंवा राज्यांतून निर्यात करण्यात येतील, किंवा यथास्थिति, राज्यात किंवा राज्यातूनट त्याचे परिवहन करण्यात येईल, ते जवळ बाळगण्यात येतील, तयार करण्यात येतील अथवा विकण्यात येतील तेव्हा, सामान्यत: किंवा कोणत्याहीविशिष्ट स्थानिक क्षेत्राकरिता, राज्य शासन विनिर्दिष्ट करील त्या दराने किंवा दरांनी, यथास्थिति, उत्पादनशुल्क किंवा प्रतिशुल्क बसविता येईल:

परंतु, जो कोणताही पदार्थ भारतात आयात करण्यात आला असेल व अशा आयात करण्याच्या वेळी भारतीय आयात-निर्यात कर अधिनियम, 1934 किंवा समुद्र सीमाशुल्क अधिनियम, 1878 या अन्वये शुल्क देण्यास पात्र असेल अशा कोणत्याही पदार्थावर किंवा मद्यार्क, अफू, भांग किंवा इतर अंमली औषधी किंवा अंमली द्रव्ये असलेला कोणताही औषधीयुक्त किंवा प्रसाधनीय सिद्धपदार्थ यांवर अशा रीतीने शुल्क बसविण्यात येणार नाही.

स्पष्टीकरण.---- या कलमान्वये,----

(एक) ज्या जागी सेवनासाठी कोणताही उत्पादनशुल्क योग्य पदार्थ न्यावयाचा असेल त्या जागेप्रमाणे; किंवा

(दोन) अशा पदार्थांच्या निरनिराळ्या तीव्रतेप्रमाणे किंवा गुणाप्रमाणे; किंवा

(तीन) उत्पादकाने किंवा राज्याला निर्यात करणा-या व्यक्तीने विहित प्राधिकरणाकडे लेखी घोषित केलेल्या व त्या प्राधिकरणाने अधिप्रमाणित केलेल्या उत्पादनशुल्कयोग्य पदार्थाच्या उत्पादन मूल्याप्रमाणे ; निरनिराळ्या दराने शुल्क बसविता येईल.
 

Section 106 MANNER OF LEVYING EXCISE DUTIES. उत्पादन शुल्क वसूल करण्याची रीत.

106 Manner of levying excise duties. उत्पादन शुल्क वसूल करण्याची रीत..[View all order & notifications]

Subject to any regulations to regulate the time, place and manner of payment Manners of made by the Commissioner in this behalf, the duties referred to in section 105 may be levied in one or more of the following ways :—

(a) in the case of an excisable article imported excise imported—

(i) by payment either in the State at the time of its import or in the State or territory of export at the time of its export, or

(ii) by payment upon issue for sale from a warehouse established or licensed under the provisions of this Act;

(b) in the case of an excisable article exported payment in the State at the time of its export, or in the State or territory of import;

(c) in the case of excisable articles transported—

(i) by payment in the district from which they are transported, or

(ii) by payment upon issue for sale from a warehouse established or licensed under the provisions of this Act;

(d) in the case of spirit or beer manufactured in any distillery established or any distillery or brewery licensed under this Act—

(i) by a rate charged upon the quantity produced in or issued from the distillery or brewery, as the case may be, or issued from a warehouse established or licensed under this Act, or

(ii) by rate charged in accordance with such scale of equivalents calculated on the quantity of materials used or by the degree or attenuation of the wash or wort, as the case may be, as the State Government may prescribe;

(e) in the case of intoxicating drugs manufactured in the State by payment upon the quantity produced or manufactured or issued from a warehouse established or licensed under this Act:

Provided that where payments is made upon issue for sale from a warehouse established or licensed under this Act, such payment shall be at the rate of the duty in force at the date of issue from the warehouse:

Provided further that where one and the same person is permitted—

(i) to manufacture or import and to sell, or

(ii) to manufacture and export, country liquor or any intoxicant, such duty may be levied in consideration of the joint privileges granted, as the Collector deems fit.

कलम 105 मध्ये उल्लेख केलेली शुल्के ही, याबाबत आयुक्ताने शुल्क देण्याची जागा व रीत यांचे नियमन करण्यासाठी केलेल्या कोणत्याही विनियमास अधीन राहून, खालील मार्गापैकी कोणत्याही एका किंवा अधिक मार्गांनी वसूल करता येतील :-

(अ) आयात केलेल्या उत्पादन शुल्कयोग्य पदार्थांच्या बाबतीत-

(एक) ज्या राज्यात तो आयात करण्यात आला असेल त्या राज्यात आयात करण्याच्या वेळी किंवा ज्या राज्यातूनट किंवा प्रदेशातून तो निर्यात करण्यात आला असेल त्या राज्यात किंवा प्रदेशात निर्यात करण्याच्या वेळी शुल्क देऊन, अथवा

(दोन) या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये स्थापन केलेल्या किंवा लायसन दिलेल्या वखारीतून विक्रीकरिता बाहेर काढल्यावर, शुल्क देऊन ;

(ब) निर्यात केलेल्या उत्पादन शुल्क योग्य पदार्थाच्या बाबतीत निर्यात करण्याच्या वेळी ज्या राज्यातून तो निर्यात करण्यात आला असेल त्या राज्यातट अथवा ज्या राज्यात किंवा प्रदेशात तो आयात करण्यात आला असेल त्या राज्यात किंवा प्रदेशात शुल्क देऊन ;

(क) परिवहन केलेल्या उत्पादन शुल्कयोग्य पदार्थाच्या बाबतीत-

(एक) ज्या जिल्ह्रातून त्याचे परिवहन करण्यात आले असेल त्या जिल्ह्रात शुल्क देऊन, अथवा

(दोन) या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये स्थापन केलेल्या किंवा लायसन दिलेल्या वखारीतून विक्रीकरिता बाहेर काढल्यावर शुल्क देऊन ;

(ड) या अधिनियमान्वये स्थापन केलेल्या कोणत्याही दारुच्या भट्टीत अथवा लायसन्स दिलेल्या कोणत्याही दारुच्या भट्टीत किंवा दारू गाळण्याच्या कारखान्यात तयार झालेल्या मद्यसाराच्या किंवा बीअरच्या बाबतीत-

(एक) यथास्थिति, अशा दारुच्या भट्टीत किंवा दारू गाळण्याच्या कारखान्यात तयार झालेल्या किंवा त्यातून बाहेर काढलेल्या किंवा या अधिनियमान्वये स्थापन केलेल्या किंवा लायसन दिलेल्या वखारीतून बाहेर काढलेल्या परिमाणावर बसविलेल्या दराने, अथवा

(दोन) राज्य शासन विहित करील अशा सममूल्य प्रमाणानुसार घ्यावयाच्या दराने, हे प्रमाण वापरलेल्या मालमसाल्याच्या परिमाणाप्रमाणे अथवा, यथास्थिति, वॉश किंवा वर्ट ज्या प्रमाणात मिसळून पातळ केलेला असेल त्याप्रमाणे मोजावे ;

(ई) राज्यात तयार केलेल्या मादक औषधींच्या बाबतीत, या अधिनियमान्वये स्थापन केलेल्या किंवा लायसन दिलेल्या वखारीत तयार केलेल्या किंवा तेथून बाहेर काढलेल्या परिमाणावर शुल्क देऊन :

परंतु या अधिनियमान्वये स्थापन केलेल्या किंवा लायसन दिलेल्या वखारीतून विक्रीकरिता बाहेर काढलेल्या पदार्थावर शुल्क देण्यात येईल तेव्हा, ते पदार्थ वखारीतून बाहेर काढण्याच्या दिनांकास अंमलात असणा-या शुल्काच्या दराप्रमाणे देईल :

परंतु आणखी असे की, एकाच व्यक्तीला देशी दारू किंवा कोणतेही मादक द्रव्य----

(एक) तयार करण्याची किंवा आयात करण्याची व विकण्याची, अथवा

(दोन) तयार करण्याची व निर्यात करण्याची, परवानगी देण्यात आली असेल तेव्हा, अशी रीतीने देण्यात आलेला संयुक्त विशेष अधिकार लक्षात घेऊन, जिल्हाधिका-यास योग्य वाटेल असे शुल्क वसूल करता येईल.

Section 107 DELETED. वगळण्यात आले.

107 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Power to exempt, remit or refund excise duty.] Delected by Bom.22 of 1960, s. 69.

(उत्पादनशुल्क माफ करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा ते परत करण्याचा अधिकार.) सन 1960 चा मुंबई अधिनियम क्रमांक 22, कलम 69 अन्वये वगळण्यात आले. 

Section 107A DECLARATION OF STOCK OF ARTICLES MENTIONED IN SECTION 24A; MAINTENANCE OF ACCOUNTS AND SUBMISSION OF RETURNS. कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थांचा साठा जाहीर करणे; हिशेब ठेवणे व विवरणे सादर करणे.

107A Declaration of stock of articles mentioned in section 24A; maintenance of accounts and submission of returns. कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थांचा साठा जाहीर करणे; हिशेब ठेवणे व विवरणे सादर करणे..[View all order & notifications]

Every person who imports or manufactures any of the articles mentioned in section 24A shall;

(a) submit to the Collector within such period and in such form, as may be prescribed, a declaration of the quantity of such article in his possession on the importation or manufacture of the said article, as the case, may be;

(b) maintain accounts of the articles in such form and submit such returns as may be prescribed.

कलम 24-अ मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ आयात करणारी किंवा तयार करणारी प्रत्येक व्यक्ती-

(अ) विहित करण्यात येईल अशा मुदतीत व अशा नमुन्याप्रमाणे त्याच्या कब्जात असलेल्या अशा पदार्थाचे परिमाण दर्शविणारे विवरण यथास्थिति, असा पदार्थ आयात करण्यात येईल किंवा तयार करण्यात येईल त्यावेळी जिल्हाधिका-याकडे सादर करील ;

(ब) अशा पदार्थाचे विहित करण्यात येईल अशा नमुन्याप्रमाणे हिशेब ठेवील व विहित करण्यात येतील अशी विवरणे सादर करील.

Section 107 B POWER TO OBTAIN INFORMATION AND TO SEARCH AND SEIZE EXCISABLE ARTICLES.. माहिती मिळविण्याचा व उत्पादन- शुल्कयोग्य पदार्थांची झडती घेण्याचा व ते जप्त करण्याचा अधिकार.

107 B Power to obtain information and to search and seize excisable articles.. माहिती मिळविण्याचा व उत्पादन- शुल्कयोग्य पदार्थांची झडती घेण्याचा व ते जप्त करण्याचा अधिकार..[View all order & notifications]

(1)

The Collector or any officer empowered by the State Government in this behalf may, subject to such conditions as may be prescribed,—

(a) by order require any person liable to pay any excise duty or fee under this Chapter to furnish him with any information or to produce before him any accounts or other documents concerning any excisable article as may be necessary, for the purposes of this Chapter,

(b) inspect at all reasonable hours the accounts or other documents relating to the stocks of any excisable article imported or manufactured or stored in respect of which such duty or fee has been paid or is payable and any place where such article is manufactured or stored;

(c) for reasons to be recorded in writing, enter any such place where he knows or has reason to believe that any excisable article in respect of which such duty or fee has not been paid is being imported or manufactured or stored and search for the same and seize any stocks of such article found therein and detain the same until such time as proof of payment of such duty or fee is produced or such further time as may be necessary for taking action under sections 98, 99 or 100 or for prosecuting for an offence under section 108.

जिल्हाधिकारी किंवा राज्य शासन याबाबत अधिकार देईल अशा कोणत्याही अधिका-यास विहित करण्यात येतील अशा शर्तींना अधीन राहून-

(अ) आदेशाद्वारे, या विभागांन्वये कोणतेही उत्पादनशुल्क किंवा फी देण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीस, या विभागाच्या प्रयोजनांकरिता आवश्यक असेल अशा कोणत्याही उत्पादन शुल्कयोग्य पदार्थांसंबंधी कोणतीही माहिती त्यास पुरविण्यास किंवा कोणतेही हिशेब किंवा इतर कागदपत्र त्याच्यापुढे हजर करण्यास फर्मावता येईल.

(ब) ज्याच्या बाबतीत असे शुल्क किंवा फी भरण्यात आली आहे किंवा भरण्याजोगी असेल अशा आयात केलेल्या, तयार केलेल्या किंवा साठविलेल्या कोणत्याही उत्पादन शुल्कयोग्य पदार्थाच्या साठ¬ासंबंधीचे हिशेब व इतर कागदपत्र, तसेच असा पदार्थ जेथे तयार केला जातो किंवा साठविण्यात येतो अशी कोणतीही जागा सर्व वाजवी वेळी तपासता येईल.

(क) लेखी नमूद करावयाच्या कारणासाठी, असे शुल्क किंवा फी ज्याच्या बाबतीत भरण्यात आली नसेल असा कोणताही उत्पादन शुल्कयोग्य पदार्थ जेथे आयात करण्यात, तयार करण्यात किंवा साठविण्यात येत आहे असे त्यास माहीत असेल किंवा सकारण वाटत असेल अशा कोणत्याही जागेत प्रवेश करण्याचा व अशा पदार्थाची झडती घेण्याचा आणि तीत सापडलेल्या अशा पदार्थांचा कोणताही साठा जप्त करण्याचा व असे शुल्क किंवा फी भरल्याचा पुरावा हजर करण्यात येईपर्यंत किंवा कलम 98, 99 किंवा 100 अन्वये कारवाई करण्याकरिता किंवा कलम 108 अन्वये अपराध केल्याबद्दल खटला दाखल करण्याकरिता आवश्यक असेल तितक्या अधिक मुदतीपर्यंत असा पदार्थ अटकावून ठेवता येईल.

(2)

Whoever—

(a) fails to furnish any information or produce any accounts or other documents in compliance with an order made under clause (a) of sub-section (2) or furnishes false information or produces false accounts or documents or;

(b) obstructs any officer making an inspection, entry, a search or a seizure under clause (b) or clause (c) of sub-section (i),

shall, on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to one thousand rupees or with both.

जी कोणतीही व्यक्ती-

(अ) पोट-कलम (1) खंड (अ) अन्वये दिलेल्या आदेशास अनुसरून कोणतीही माहिती पुरविण्यात किंवा कोणतेही हिशेब किंवा इतर कागदपत्र हजर करण्यात कसूर करील किंवा खोटी माहिती पुरवील किंवा खोटा हिशेब किंवा कागदपत्र हजर करील ; अथवा

(ब) पोट-कलम (1) खंड (ब) किंवा (क) अन्वये जो कोणताही अधिकारी तपासणी करीत असेल, प्रवेश करीत असेल, झडती घेत असेल किंवा पदार्थ जप्त करीत असेल त्यास अडथळा करील, त्यास सिद्धापराध ठरविण्यात आले असता, संहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावसाची शिक्षा होईल किंवा एक रूपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 108 PENALTY FOR IMPORT OF INTOXICANT, ETC. WITHOUT PAYMENT OF DUTY. शुल्क दिल्यावाचून मादक द्रव्य इत्यादी आयात करणे, निर्यात करणे, इत्यादी साठी शास्ती.

108 Penalty for import of intoxicant, etc. without payment of duty. शुल्क दिल्यावाचून मादक द्रव्य इत्यादी आयात करणे, निर्यात करणे, इत्यादी साठी शास्ती..[View all order & notifications]

Whoever, holding a licence, permit, pass or authorization under this Act, imports, exports, transports, possesses, sells or manufactures any intoxicant without payment of duty or fee provided for unde this Act shall, on conviction, in addition to the duty or fee required to be paid by him under this Act, be punished,—

(a) for the first offence, with imprisonment for a term which may extend to one year and with fine which shall not be less than three times of the amount of the duty or fee evaded by him;

(b) for the second offence, with imprisonment for a term which may extend to eighteen months and with fine which shall not be less than four times of the amount of the duty or fee evaded by him;

(c) for the third or subsequent offence, with imprisonment for a term which may extend to two years and with fine which shall not be less than five times of the amount of the duty or fee evaded by him;

या अधिनियमानुसार लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणारी जी कोणतीही व्यक्ती, या अधिनियमान्वये तरतूद केल्याप्रमाणे, शुल्क किंवा फी दिल्यावाचून, कोणतेही मादक द्रव्य आयात करील, निर्यात करील, त्याचे परिवहन करील, ते जवळ बाळगील, त्याची विक्री करील किंवा ते तयार करील, तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता तिने या अधिनियमान्वये भरणे भाग असलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या रकमेव्यतिरिक्त,-

(अ) पहिल्या अपराधाबद्दल, एक वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि तिने चुकविलेल्या शुल्काच्या रकमेच्या किंवा फीच्या तिपटीहून कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल ;

(ब) दुस-या अपराधाबद्दल, अठरा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या रकमेच्या चारपटीहून कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल;

(क) तिस-या किंवा त्यानंतरच्या अपराधाबद्दल, दोन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या रकमेच्या पाचपटीहून कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.

Section 109 DUTY ON TAPPING OF TODDY TREES. ताडीची झाडे छेदण्याबद्दल शुल्क.

109 Duty on tapping of toddy trees. ताडीची झाडे छेदण्याबद्दल शुल्क..[View all order & notifications]

(1)

For every toddy producing tree which is tapped or licensed to be tapped or in respect of which a licence for drawing toddy therefrom is granted. There, shall, if the State Government so directs, be levied for any period during which such tree is tapped or licensed to be tapped, such duty as the State Government may from time to time direct.

(1) राज्य शासन तसा निदेश देईल तर, ताडी देणारे जे झाड छेदण्यात आले असेल किंवा छेदण्याचे लायसन दिले असेल किंवा ज्यांच्या संबंधात त्यापासून ताडी काढण्यासाठी लायसन दिले असेल त्या प्रत्येक झाडाबद्दल, ते झाड ज्या मुदतीत छेदण्यासाठी लायसन्स देण्यात येईल अशा कोणत्याही मुदतीसाठी राज्य शासन वेळोवेळी निदेश देईल असे शुल्क वसूल करण्यात येईल.
 

(2)

Every licence for the tapping of, and drawing toddy from, toddy producing trees granted under this Act shall specify in addition to any other particulars prescribed under the provisions of this Act or rules and regulations—

(a) the number, description and situation of the trees to be tapped,

(b) the amount of duty to be levied in respect of each tree,

(c) the installments, if any, in which and the period at which the said duty shall be leviable.

या अधिनियमान्वये ताडी देणारी झाडे छेदण्यासाठी व त्यापासून ताडी काढण्यासाठी दिलेल्या प्रत्येक लायसनमध्ये या अधिनियमाच्या तरतुदी किंवा विनियम याअन्वये जो कोणताही इतर तपशील विहित करण्यात आला असेल त्याशिवाय आणखी पुढील तपशील विनिर्दिष्ट करण्यात येईल:

(क) छेदावयाच्या झाडांची संख्या, वर्णन व ठिकाण,

(ख) प्रत्येक झाडाच्या बाबतीत वसूल करावयाची शुल्काची रक्कम,

(ग) शुल्क हप्त्याहप्त्याने भरावयाचे असल्यास ज्या हप्त्यांनी व ज्या मुदतीने ते वसूल करावयाचे ते हप्ते व ती मुदत.
 

Section 110 DUTY ON BY WHOM PAYABLE. शुल्क कोणी द्यावे.

110 Duty on by whom payable. शुल्क कोणी द्यावे..[View all order & notifications]

The duty on toddy producing trees shall be leviable primarily from the person holding the licence 5[to tap them and to draw toddy therefrom] and in default by him or if the trees are tapped without licence, from the owner of the trees.

ताडी देणा-या झाडाबद्दल द्यावायाचे शुल्क हे, प्रथमत: ती छेदण्याचे व त्यापासून ताडी काढण्याचे लायसन धारण करणा-या व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल आणि असे शुल्क देण्यास त्याने कसूर केली तर किंवा अशी झाडे लायसन वाचून छेदण्यात आली तर, ते अशा झाडांच्या मालकाकडून वसूल करण्यात येईल.

Section 111 OWNER OF THE TREES ENTITLED TO ASSISTANCE FOR DUTY PAID. झाडांच्या मालकास त्याने दिलेले शुल्क वसूल करण्यासाठी सहाय्य मिळण्याचा हक्क.

111 Owner of the trees entitled to assistance for duty paid. झाडांच्या मालकास त्याने दिलेले शुल्क वसूल करण्यासाठी सहाय्य मिळण्याचा हक्क..[View all order & notifications]

When the duty on toddy producing trees, is levied from the owner of, the trees, he shall be entitled to assistance in recovering the same, from the holder of the licence under the provisions of the law for the time being in force relating to the recovery by superior holders of their dues from their tenants.

ताडी देणा-या झाडाबद्दल झाडांच्या मालकाकडून शुल्क वसूल करण्यात येईल तेव्हा, त्यास, असे शुल्क लायसन धारण करणा-या व्यक्तीकडून वसूल करण्यांसाठी, वरिष्ठ धारकास आपल्या कुळांकडून आपली येणी वसूल करण्याच्या बाबतीत त्या त्या वेळी अमलात असलेल्या ज्या कायद्याच्या तरतुदींअन्वये सहाय्य मिळण्याचा हक्क आहे त्याच कायद्यांच्या तरतुदीअन्वये हक्क असेल.
 

Section 112 PRIVILEGE OF DRAWING TODDY FROM TREES BELONGING TO GOVERNMENT. शासनाच्या मालकीच्या झाडांपासून ताडी काढण्याचा विशेषाधिकार.

112 Privilege of drawing toddy from trees belonging to Government. शासनाच्या मालकीच्या झाडांपासून ताडी काढण्याचा विशेषाधिकार..[View all order & notifications]

The privilege of drawing toddy from trees the right to which vests in the 3[State] Government may be disposed of 6* by auction or otherwise on such terms as the Collector deems fit.

जी झाडे राज्य शासनाच्या मालकीची आहेत त्या झाडांपासून ताडी काढण्याचा विशेषाधिकार जिल्हाधिका-यास योग्य वाटेल अशा शर्तीवर, लिलाव करून किंवा अन्य प्रकारे विकता येईल.

Section 113 DELETED. वगळण्यात आले.

113 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Rules for levy of duty on opium etc.] Deleted by Bom. 22 of 1960, s. 74.

(अफू वगैरे यांवर शुल्क बसविण्यासाठी नियम) सन 1960 चा मुंबई अधिनियम क्रमांक 22, कलम 74 अन्वये वगळण्यात आले.

Section 114 RECOVERY OF DUTIES, ETC. शुल्क वगैरे वसूल करणे.

114 Recovery of duties, etc. शुल्क वगैरे वसूल करणे..[View all order & notifications]

(2)

When any person, in compliance with any rules regulation or order made under this Act, gives a bond (other than a bond under section 91 or 93) for the performance of an act, or for his abstention, from any act, such performance or abstention shall be deemed to be a public duty within the meaning of section 74 of the Indian Contract Act, 1872; and upon breach of the conditions of such bond by him, the whole sum named therein as the amount to be paid in case of such breach may be recovered from him or from his surety, (if any) as if it were an arrear of land revenue.

जेव्हा कोणत्याही व्यक्तीने या अधिनियमान्वये केलेला कोणताही नियम, विनियम किंवा दिलेला आदेश यांचे पालन करुन कोणतेही कृत्य करण्यासाठी किंवा त्याने कोणतेही कृत्य न करण्याबद्दल (कलम 91 किंवा 93 अन्वयेच्या बंधपत्राव्यतिरिक्त) बंधपत्र दिले असेल तेव्हा, असे कृत्य करणे किंवा न करणे हे भारतीय संविदा अधिनियम, 1872 याच्या कलम 74 च्या अर्थाप्रमाणे, सार्वजनिक कर्तव्य आहे असे समजण्यात येईल व त्याने अशा बंधपत्राच्या शर्तीचा भंग केल्यानंतर, असे उल्लंघन केल्याच्या बाबतीत, त्याच्याकडून वसूल करावयाची रक्कम म्हणून त्यात सांगितलेली रक्कम त्याच्याकडून किंवा त्याचा जामीनदार असल्यास त्या जामीनदाराकडून जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करता येईल.

(1)

All duties, taxes, fines (except fines imposed by a Court) and fees leviable under any of the provisions of this Act or in respect of any licence, permit, pass or authorisation granted under it and the cost of the supervising staff appointed under section 58A if not paid within the due date or the prescribed period, shall be recovered from any person liable to pay the same or from his surety, if any, with simple interest at the rate of 2 per cent per month, from the date it has become due, as if they were arrears of land revenue.

 या अधिनियमाच्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींअन्वये देण्याजोगे किंवा या अधिनियमान्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यांच्याबाबतीत वसूल करावयाची सर्व शुल्के, कर, दंड (न्यायालयाने बसविलेल्या दंडाव्यतिरिक्त इतर) व फी आणि कलम 58-अ अन्वये नेमलेल्या पर्यवेक्षकीय कर्मचारी वर्गाचा खर्च हा, जर देय झाल्याच्या दिनांकास किंवा विहित कालवधीत दिला नाही तर, तो देण्याचे दायित्व असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याचा कोणताही जामीनदार असल्यास त्याच्याकडून, देय झाल्याच्या दिनांकापासून दरमहा 2 टक्के दराने सरळ व्याजासह जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करण्यात येईल.

 

Section 115 MAGISTRATE’S POWER TO IMPOSE ENHANCED PENALTIES. वाढीव दंड बसविण्याचा दंडाधिका-याचा अधिकार.

115 Magistrate’s power to impose enhanced penalties. वाढीव दंड बसविण्याचा दंडाधिका-याचा अधिकार..[View all order & notifications]

Notwithstanding anything contained in section 32 of the Code of Criminal Procedure 1898, it shall be lawful for any Presidency Magistrate or any Magistrate of the First Class to pass any sentence authorized by this Act in exercise of his powers under section 32 of the said Code, provided that the fine shall not exceed three thousand rupees;

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 च्या कलम 32 मध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, इलाखा शहर दंडाधिका-यास किंवा पहिल्या वर्गाच्या कोणत्याही दंडाधिका-यास, उक्त संहितेच्या कलम 32 अन्वये त्यांना असलेल्या कोणत्याही अधिकाराव्यतिरिक्त आणखी या अधिनियमान्वये प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देता येईल व त्यांनी तसे करावे हे कायदेशीर असेल; परंतु दंडाची रक्कम तीन हजार रुपयांहून अधिक असणार नाही.

Section 116 PROCEDURE TO BE FOLLOWED BY MAGISTRATE. दंडाधिका-यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती.

116 Procedure to be followed by Magistrate. दंडाधिका-यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती..[View all order & notifications]

In all trials for offences under this Act, the Magistrate shall follow the procedure prescribed in the Code of Criminal Procedure,1898 for the trial of summary cases in which an appeal lies.

या अधिनियमाखालील अपराधांच्या न्यायचौकशीच्या सर्व कामांत, दंडाधिका-याने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 मध्ये, ज्यात अपील करता येते अशा संक्षिप्तरीत्या काम चालवावयाच्या खटल्यात न्यायचौकशीकरिता जी कार्यपद्धती विहित केलेली आहे, तीच कार्यपद्धती अनुसरण्यात येईल.
 

Section 116 A TENDER OF PARDON TO ACCOMPLICE. सहअपराध्यास माफी देणे

116 A Tender of pardon to accomplice. सहअपराध्यास माफी देणे.[View all order & notifications]

(1)

Whenever two or more persons are prosecuted for an offence under this Act, a Presidency Magistrate or any Magistrate of the First Class may, at any stage of the investigation or inquiry into or the trial of offence, with a view to obtaining the evidence of any person supposed to have been directly or indirectly concerned in, or privy to the offence, tender a pardon to such person on condition of his making a full and true disclosure of all facts within his knowledge relating to the offence.

या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोन किंवा अधिक व्यक्तींवर खटला भरण्यात आल्यास, इलाखा शहर दंडाधिका-यास किंवा पहिल्या वर्गाच्या कोणत्याही दंडाधिका-यास त्या अपराधाच्या तपासाच्या किंवा चौकशीच्या किंवा न्यायचौकशीच्या कोणत्याही अवस्थेत अपराधात ज्यांचा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबध आहे किंवा जो अपराधात भागीदार आहे असे समजण्यात येत असेल अशा कोणत्याही व्यक्तीकडून पुरावा मिळविण्याच्या दृष्टीने अशा व्यक्तीस, त्याने अपराधाच्या संबंधात त्यास माहीत असलेल्या सर्व वस्तुस्थिती पूर्णपणे व खरेपणाने उघड करण्याच्या अटीवर माफी देता येईल.

(2)

Every Magistrate, who tender a pardon under sub-section (1), shall record his reasons for so doing.

पोट-कलम (1) अन्वये माफी देणारा प्रत्येक दंडाधिकारी तसे करण्याची कारणे नमूद करील.

(3)

Every person, accepting a tender under this section, shall be examined as a witness in the Court of the Magistrate taking cognizance of the offence, and, in the subsequent trial, if any.

या कलमाखालील माफी स्वीकारणा-या प्रत्येक व्यक्तीची, अपराधाची दखल घेणा-या दंडाधिका-याच्या न्यायालयात, आणि नंतरची न्यायचौकशी असल्यास, त्या न्यायचौकशीत तपासणी करण्यात येईल.

(4)

The Provisions of sections 339 and 339 A of the Code of Criminal Procedure, 1898*, shall apply to the trial of a person to whom pardon has been tendered under this section as they apply to a person to whom pardon has been tendered under section 337 or section 338 of that Code.

Explanation.—For the purposes of sub-section (4), the reference to the Public Prosecutor, in Section 339 of the said Code shall include a reference to any officer conducting a prosecution under this Act.

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 ची कलमे 339 व 339-अ यांच्या तरतुदी या संहितेच्या कलम 337 किंवा कलम 338 अन्वये ज्याला माफी देण्यात आली आहे अशा व्यक्तीस ज्याप्रमाणे लागू होतात त्याचप्रमाणे या कलमान्वये माफी दिलेल्या व्यक्तीच्या न्यायचौकशीस लागू होतील.

स्पष्टीकरण.---- पोट-कलम (4) च्या प्रयोजनाकरिता उक्त संहितेच्या कलम 339 मधील सरकारी वकिलाच्या उल्लेखात, या अधिनियमान्वये खटला चालविणा-या कोणत्याही अधिका-याच्या उल्लेखाचा अंतर्भाव होतो.

 

Section 117 INVESTIGATION, ARREST, SEARCHES ETC. HOW TO BE MADE तपास, अटक, झडत्या, वगैरे कशा कराव्या.

117 Investigation, arrest, Searches etc. how to be made तपास, अटक, झडत्या, वगैरे कशा कराव्या..[View all order & notifications]

Saw as otherwise expressly provided in this Act, all investigations, arrests, detentions in custody and searches shall be made in accordance with provisions of the Code of Criminal Procedure,1898 :

Provided that  no search shall be deemed to be illegal by reason only of the fact that witnesses for the search were not inhabitants of the locality in which the place searched is situated.

या अधिनियमात स्पष्टपणे अन्यथा जी तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त, तपास करणे, अटक करणे, अभिरक्षेत अटकावून ठेवणे व झडती घेणे या सर्व गोष्टी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 च्या तरतुदींनुसार करण्यात येतील :

परंतु, झडती घेतवेळी असलेले साक्षीदार हे, झडती घेतलेली जागा ज्या भागात आहे त्या भागातील रहिवासी नव्हते एवढ¬ाच केवळ कारणामुळे अशी झडती बेकायदेशीर आहे असे समजण्यात येणार नाही. 

Section 118 PROCEDURE OF CODE OF CRIMINAL PROCEDURE RELATING TO COGNIZABLE OFFENCE TO APPLY फौजदारी प्रक्रिया संहितेची दखलपात्र अपराधांच्या संबंधांतील कार्यपद्धती लागू असणे.

118 Procedure of Code of Criminal Procedure relating to cognizable offence to apply फौजदारी प्रक्रिया संहितेची दखलपात्र अपराधांच्या संबंधांतील कार्यपद्धती लागू असणे..[View all order & notifications]

In the absence of any provision to the contrary in this Act, the provisions of the Code of Criminal Procedure, 1898* with respect to cognizable offences shall apply to offences under this Act.

या अधिनियमात त्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही तरतुदीच्या अभावी दखलपात्र अपराधासंबंधी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 च्या तरतुदी या अधिनियमाखालील अपराधांच्या बाबतीत लागू असतील.
 

Section 119 CERTAIN OFFENCES TO BE NON-BAILABLE विवक्षित अपराध जामीन घेण्यास अयोग्य असणे.

119 Certain offences to be non-bailable विवक्षित अपराध जामीन घेण्यास अयोग्य असणे..[View all order & notifications]

Offences under  sections 65, 67, 67-A, 67-C, 68, 70, 72 and 83 shall be non-bailable.

कलमे 65, 67, 67-1 अ, 67क, 68, 70, 72 आणि 83 याखालील अपराध जामीन घेण्यास अयोग्य असतील.
 

Section 120 POWER OF ENTRY AND INSPECTION प्रवेश करण्याचा व तपासणी करण्याचा अधिकार.

120 Power of entry and inspection प्रवेश करण्याचा व तपासणी करण्याचा अधिकार..[View all order & notifications]

The Commissioner, Collector or any Prohibition officer duly empowered in this behalf by the State Government, or any Police Officer may—

(a) enter at any time by day or by night, any warehouse, godowns, shop, premises, house, building, vessel, vehicle or enclosed place in which he has reason to believe that any intoxicant, hemp, mhowra flowers, molasses, material or article liable to confiscation under this Act is manufactured, kept or concealed or that any still, utensil, implement or intoxicant contrary to the provisions of this Act;

(b) in case of resistance break open any door and remove any other obstacle to the entry into any such warehouse, godown, shop, premises, house, building, vessel, vehicle or enclosed place;

(c) seize any intoxicant, hemp, mhowra flowers, or molasses and any material used in the manufacture of any intoxicant and any still, utensil, implement, or apparatus and any other thing which he has reason to believe to be liable to confiscation under this Act and any document or other article which he has reason to believe may furnish evidence of the commission of any offence under this Act; and

(d) detain and search and if he thinks proper arrest any person who he has reason to believe to be guilty of any offence under this Act.

आयुक्त जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाने याबाबत रीतसर अधिकार दिलेला कोणताही दारूबंदी अधिकारी किंवा कोणताही पोलीस अधिकारी यांस----

(अ) ज्या वखारीत, गोदामात, दुकानात, जागेत, घरात, इमारतीत, जलयानात, वाहनात किंवा परिवेष्टित जागेत या अधिनियमान्वये जप्त होण्यास पात्र असलेले कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले, काकवी, मालमसाला किंवा पदार्थ तयार करण्यात येतो, ठेवण्यात येतो किंवा लपविण्यात येतो किंवा या अधिनियमाच्या तरतुदींच्याविरुद्ध कोणतेही मादक द्रव्य तयार करण्याच्या प्रयोजनासाठी कोणतीही दारु गाळण्याची भट्टी, भांडी, साधने किंवा उपकरणे वापरतो, ठेवतो किंवा लपवितो असे त्यास सकारण वाटत असेल अशा कोणत्याही वखारीत, गोदामात, दुकानात, जागेत, घरात, इमारतीत, जलयानात, वाहनात किंवा परिवेष्टित जागेत दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी प्रवेश करता येईल ;

(ब) प्रतिकार केला गेल्यास, दरवाजा फोडून उघडण्याचा आणि कोणत्याही अशा वखारीत, गोदामात, दुकानात, जागेत, घरात, इमारतीत, जलयानात, वाहनात किंवा परिवेष्टित जागेत प्रवेश मिळविण्याच्या कामी जो कोणताही इतर अडथळा होईल तो दूर करता येईल ;

(क) या अधिनियमान्वये जप्त होण्यास पात्र आहे असे त्यास सकारण वाटत असेल असे कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी व कोणतेही मादक द्रव्य तयार करण्याच्या कामी वापरात येणारा असा कोणताही मालमसाला व अशी कोणतीही दारू गाळण्याची भट्टी, भांडी, साधने किंवा उपकरणे व असा कोणताही इतर पदार्थ आणि या अधिनियमाखालील कोणताही अपराध केल्याचा पुरावा ज्यावरून मिळेल असे त्यास सकारण वाटत असेल असा कोणताही लेख किंवा इतर वस्तू जप्त करता येईल; आणि

(ड) जी कोणतीही व्यक्ती या अधिनियमाखालील कोणताही अपराध केल्याबद्दल दोषी आहे असे त्यास सकारण वाटत असेल त्या व्यक्तीस अटकावून ठेवता येईल व तिची झडती घेता येईल आणि त्यास योग्य वाटेल तर अशा व्यक्तीस अटक करता येईल.
 

Section 121 POWER TO OPEN PACKAGE ETC. सवेष्टने, वगैरे उघडण्याचा अधिकार.

121 Power to open package etc. सवेष्टने, वगैरे उघडण्याचा अधिकार..[View all order & notifications]

(1)

Any Prohibition officer duly empowered in this behalf by the State Government or any Police Officer may open any package and examine any goods and may stop and search for any intoxicant, hemp, mhowra flowers, or molasses any vessel, vehicle or other means of conveyance and may seize any intoxicant,hemp mhowra flowers, molassess or any other thing liable to confiscation or forfeiture under this Act or any other law for the time being in force relating to excise revenue found which making such search.

 राज्य शासनाने याबाबत रीतसर अधिकार दिलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिका-यास किंवा कोणत्याही पोलीस अधिका-यास कोणतेही सवेष्टन उघडता येईल व कोणताही माल तपासता येईल. आणि त्याला कोणतेही जलयान, वाहन किंवा वाहतुकीचे इतर साधन थांबविता येईल वट कोणत्याही मादक द्रव्यासाठी, भांगेसाठी, मोहाच्या फुलांसाठी किंवा काकवीसाठी त्याची झडती घेता येईलट; आणि अशी झडती घेताना आढळून आलेला व या अधिनियमान्वये किंवा उत्पादनशुल्क महसुलासंबंधीच्या त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही इतर कायद्यान्वये जप्त केले जाण्यास किंवा सरकारजमा केले जाण्यास पात्र असलेले कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले, काकवी किंवा कोणतीही इतर वस्तू जप्त करता येईल.

(2)

The unloading and carrying of goods, the bringing of them to the place appointed under sub section (3) for examination, the opening and repacking of them, where such operations are necessary for searches made] under this section and the removing of goods to and placing of them in the place appoint under sub-section (3) for examination or deposit, shall be performed by or at the expenses of the owner of such goods.

या कलमान्वये घेतलेल्या झडत्यांसाठी तसे करणे आवश्यक असेल तेव्हा, माल उतरवणे व वाहून नेणे, तपासणीसाठी पोट-कलम (3) अन्वये नेमलेल्या जागी तो आणणे, तो उघडणे व पुन्हा भरून ठेवणे या गोष्टी व पोट-कलम (3) अन्वये मालाची तपासणी करण्यासाठी व तो ठेवण्यासाठी नेमलेल्या जागी माल नेणे व ठेवणे या गोष्टी अशा मालाच्या मालकाकडून किंवा त्याच्या खर्चाने करण्यात येईल.
 

(3)

The owner of goods or the persons-in-charge of the goods shall if so required by any officer conducting the search, take the goods 4[to a place appointed in Greater Bombay by the Commissioner of Police Bombay and elsewhere, by the District Magistrate for the purpose of examination or deposit.

मालाचा मालक किंवा माल ताब्यात असलेली व्यक्ती, झडती घेणा-या कोणत्याही अधिका-याने तसे करण्यास फर्माविले असता, मालाची तपासणी करण्यासाठी किंवा तो ठेवण्यासाठी बृहन्मुंबईत पोलीस आयुक्त, मुंबई यांनी व इतरत्र जिल्हा दंडाधिका-यांने नेमलेल्या जागी. असा माल नेईल. 

(4)

The expenses incurred by the State Government for any of the purposes mentioned in sub-section (2) may be recovered from the owner, or as the case may be, the person in-charge, of the goods as arrears of land revenue.

राज्य शासनाला, पोट-कलम (2) मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही कारणासाठी आलेला खर्च, मालाच्या मालकाकडून किंवा यथास्थिति, तो ताब्यात असणा-या व्यक्तीकडून तो जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करता येईल.

Section 122 POWER TO REQUIRE PRODUCTION OF THE LICENSE लायसन हजर करण्यास भाग पाडण्याचा अधिकार.

122 Power to require production of the license लायसन हजर करण्यास भाग पाडण्याचा अधिकार..[View all order & notifications]

(1)

The Commissioner or Collector or any Prohibition officer duly empowered in his behalf by the State Government or any Police Office may—

(a) require a licensed manufacturer or vendor or tapper or drawer of toddy or a person in the employ of such manufacturer or vendor or tapper or drawer of toddy or acting with his express or implied permission on his behalf to produce the licence, permit pass or authorization issued under this Act under which he carries on the manufacture, storage or sale of any intoxicant, hemp mhowra flowers or molasses or taps toddy-producing trees or draws toddy therefrom;

(b) enter and inspect, at any time by day or by night, any land on which toddyproducing trees are growing, whether such trees are licensed for tapping or not and any warehouse, godown, shop or premises in which any licensed manufacturer or vendor manufacturers , stores, or sells any intoxicant, hemp, mhowra flowers or molasses and examine ,test, measure or weigh any stock of any such articles or cause any such stock to be examined ,tested measured or weighed.

आयुक्त किंवा जिल्हाधिकारी किंवा याबाबत राज्य शासनाने योग्य रीतीने अधिकार दिलेला कोणताही दारूबंधी अधिकारी किंवा कोणताही पोलीस अधिकारी यांस----

(अ) लायसन दिलेल्या कोणत्याही कारखानदाराला किंवा विक्रेत्याला किंवा ताडीचे झाड छेदणा-याच्या किंवा ताडी काढणा-याला किंवा अशा कारखानदाराच्या किंवा विक्रेत्याच्या किंवा ताडीचे झाड छेदणा-याला किंवा ताडी काढणा-याच्या नोकरीत असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने त्याच्या वतीने काम करणा-या व्यक्तीला तो या अधिनियमान्वयदिलेल्या ज्या लायसनच्या, परवानाच्या, पासाच्या किंवा प्राधिकारपत्राच्या आधारे कोणतीही मादक द्रव्ये, भांग, मोहाची फुले किंवा काकवी तयार करण्याचे, साठविण्याचे किंवा विकण्याचे काम चालवीत असेल किंवा ज्या आधारे ताडी देणारी झाडे छेदीत असेल किंवा त्यापासून ताडी काढीत असेल ते लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र हजर
करण्यास भाग पाडता येईल ;

(ब) ज्या कोणत्याही जमिनीत छेदण्यासाठी लायसन दिलेली अथवा न दिलेली, ताडी देणारी झाडे, असतील अथवा ज्या कोणत्याही वखारीत, गोदामात, दुकानात किंवा जागेत कोणताही लायसन दिलेला कारखानदार किंवा विक्रेता कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी तयार करीत असेल, साठवीत असेल किंवा विकीत असेल त्या जमिनीवर, वखारीत, गोदामात, दुकानात किंवा जागेत दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी प्रवेश करता येईल व त्याची तपासणी करता येईल. तसेच त्यास, अशा कोणत्याही पदार्थच्या कोणत्याही साठ¬ाची तपासणी करता येईल, पारख करता येईल, मापता येईल व त्याचे वजन करता येईल किंवा अशा कोणत्याही साठ¬ाची तपासणी करविता येईल, पारख करविता येईल, माप किंवा वजन करविता येईल.

(2)

If any officer mentioned is sub-section (1) finds that the holder of a licence, permit, pass or authorization issued under this Act, or a person in the employ of such holder or acting with his express or implied permission on his behalf willfully does or omits to do anything, which is an offence under this Act, such officer may seize any intoxicant hemp, mhowra flowers or molasses or any material or article in respect of which the offence is committed and any document or other article which he has reason to believe may furnish evidence of the commission of an offence under this Act and send a report to his official superior for such action as he deems fit

या अधिनियमान्वये दिलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणारी व्यक्ती किंवा असे लायसन वगैरे धारण करणा-या व्यक्तीच्या नोकरीत असलेली व्यक्ती किंवा तिच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने तिच्या वतीने काम करणारी व्यक्ती, या अधिनियमान्वये अपराध असलेले कोणतेही कृत्य मुद्दाम करीत आहे किंवा जे करण्याचे वगळल्यामुळे या अधिनियमान्वये अपराध होतो असे कोणतेही कृत्य करण्याचे. वगळीत आहे असे पोट-कलम (1) मध्ये दिलेल्या कोणत्याही अधिका-यास आढळून येईल तर, त्यास ज्याच्या संबंधात असा अपराध करण्यात आला असेल असे कोणतेही मादक द्रव्य भांग, मोहाची फुले किंवा काकवी किंवा कोणतीही वस्तू किंवा पदार्थ तसेच, जो कोणताही दस्तऐवज किंवा इतर वस्तू
या अधिनियमान्वये केलेल्या अपराधाचा पुरावा म्हणून सादर करता येईल असे त्यास सकारण वाटत असेल असा दस्ताऐवज किंवा अशी वस्तू जप्त करता येईल. तसेच त्यास अशा गोष्टीसंबंधीचे प्रतिवृत्त, त्याला योग्य वाटेल ती उपाययोजना करण्यासाछी आपल्या वरिष्ठ अधिका-याकडे पाठविता येईल.

Section 123 ARREST OF OFFENDER AND SEIZURES OF CONTRABAND ARTICLES. अपराध्यास अटक करणे व निषिद्ध पदार्थ जप्त करणे.

123 Arrest of offender and seizures of contraband articles. अपराध्यास अटक करणे व निषिद्ध पदार्थ जप्त करणे..[View all order & notifications]

(1)

Any prohibition authorized by the State Government in his behalf of any Police Officer may—

(a) arrest without warrant any person whom he has reason to believe to be guilty of an offence under this Act;

(b) seize and detain any intoxicant hemp, mhowra flowers or molasses or other articles which he has reason to believe to be liable to confiscation or forfeiture under this Act and seize any document or other article which he has reason to believe may furnish evidence of the commission of an offence under this Act.

राज्य शासनाने याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिका-यास किंवा कोणत्याही पोलीस अधिका-यास----

(अ) जी कोणतीही व्यक्ती या अधिनियमान्वये अपराध केल्याबद्दल दोषी आहे असे त्यास सकारण वाटत असेल त्याला अधिपत्रावाचून अटक करता येईल;

(ब) या अधिनियमान्वये जप्त केले जाण्यास किंवा सरकारजमा केले जाण्यास पात्र आहे असे त्यास सकारण वाटत असेल असे कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी किंवा इतर वस्तू जप्त करता येईल व अटकावता येईल. आणि जो कोणताही दस्तऐवज किंवा इतर वस्तू या अधिनियमान्वये केलेल्या अपराधाचा पुरावा म्हणून सादर करता येईल असे त्यास सकारण वाटत असेल असा कोणताही दस्तऐवज किंवा अशी वस्तू जप्त करता येईल.
 

(2)

Any Prohibition Officer authorized by the State Government under this section who arrests any person under clause (a), or seizes and detains any article under clause (b), of sub-section (7) shall forward such person or article, as the case may be, without unnecessary delay to the officer-in-charge of the nearest Police Station.

या कलमान्वये राज्य शासनाने प्रधिकृत केलेला जो कोणताही दारूबंदी अधिकारी पोट-कलम (1), खंड (अ) अन्वये कोणत्याही व्यक्तीस अटक करील किंवा खंड (ब) अन्वये कोणतीही वस्तू जप्त करील व अटकावील त्याने अशा व्यक्तीला निष्कारण विलंब न लावता, अगदी नजीकचे पोलीस ठाणे स्वाधीन असणा-या अधिका-याकडे पाठविल व त्याचप्रमाणे असा पदार्थही अशा अधिका-याकडे पाठविल.

Section 124 POWER TO OBTAIN INFORMATION. माहिती मिळविण्याचा अधिकार.

124 Power to obtain information. माहिती मिळविण्याचा अधिकार..[View all order & notifications]

(1)

The Commissioner or Collector or any Prohibition Officer specially empowered in this behalf by the State Government or a Police Officer may, by order, require any person to furnish to any specified authority or person any such information in his possession concerning any intoxicant, hemp mhowra flowers or molasses as may be specified in the order.

आयुक्त किंवा जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाने याबाबत खास अधिकार दिलेला कोणताही दारूबंदी अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यास, आदेशाद्वारे, कोणत्याही व्यक्तीला अशा आदेशात, विनिर्दिष्ट करण्यात येईल अशी, कोणत्याही मादक द्रव्यासंबंधी, भांगेसंबंधी, मोहाच्या फुलासंबंधी किंवा काकवीसंबंधी त्याच्या जवळ असलेली कोणतीही माहिती कोणत्याही विनिर्दिष्ट प्राधिका-यास किंवा व्यक्तीस पुरविण्याविषयी फर्मविता येईल.
 

(2)

If any person fails to furnish any information in compliance with the order made under sub-section (1) or furnishes false information, he shall on conviction, be punished with imprisonment for a term which may extend to six months or with fine which may extend to five hundred rupees or with both.

कोणत्याही व्यक्तीने, पोट-कलम (1) अन्वये दिलेल्या आदेशानुसार कोणतीही माहिती पुरविण्यात कसूर केली किंवा खोटी माहिती पुरविली तर, त्यास सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीची कारावसाची शिक्षा होईल किंवा पाचशे रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

Section 125 POWER TO SEIZE INTOXICANTS, ETC. मादक द्रव्ये, वगैरे जप्त करण्याचा अधिकार.

125 Power to seize intoxicants, etc. मादक द्रव्ये, वगैरे जप्त करण्याचा अधिकार..[View all order & notifications]

The Commissioner, Collector or any Prohibition Officer duly empowered in this behalf or any Police Officer may—

(a) seize in any open place, or in transit any intoxicant, hemp mhowra flowers or molasses or any other thing which he has reason to believe to be liable to confiscation or forfeiture under this Act or any other law for the time being in force relating to excise revenue and any document or other article which he has reason to believe may furnish evidence of the commission of any offence under this Act;

(b) detain any search any person whom he has reason to believe to be guilty of any offence under this Act or any other law for the time being in force relating to excise revenue, and if such person has any intoxicant hemp, Mhowra flowers, molasses or 6 [other thing] in his possession, arrest him.

आयुक्त जिल्हाधिकारी किंवा याबाबत योग्य रीतीने अधिकार दिलेले कोणताही दारूबंदी अधिकारी किंवा कोणताही पोलीस अधिकारी यांस,-

(अ) या अधिनियमान्वये किंवा उत्पादन शुल्क महसुलासंबंधीच्या त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही इतर कायद्यान्वये जे जप्त केले जाण्यास व सरकार जमा होण्यासट पात्र आहे असे त्यास सकारण वाटत असेल असे कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी किंवा कोणतीही इतर वस्तू कोणत्याही खुल्या जागेत किंवा त्यांची ने आण करताना जप्त करता येईल आणि जो कोणताही दस्तऐवज किंवा इतर वस्तू या अधिनियमान्वये केलेल्या अपराधाचा पुरावा म्हणून सादर करता येईल असे त्यास सकारण वाटत असेल असा दस्ताऐवज किंवा अशी वस्तू जप्त करण्याचा अधिकार असेल,

(ब) हा अधिनियम किंवा उत्पादन शुल्क महसुलांसंबंधीचा त्या त्या वेळी अमलात असलेला कोणताही इतर कायदा यांविरुद्ध अपराध केल्याबद्दल जी कोणतीही व्यक्ती दोषी आहे असे त्यास सकारण वाटत असेल तिला अटकावून ठेवता येईल व तिची झडती घेता येईल आणि अशा व्यक्तीच्या जवळ कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले, काकवी किंवा कोणतीही वस्तू  असल्यास, तिला अटक करता येईल.

Section 126 ARREST WITHOUT WARRANT. अधिपत्रावाचून अटक करणे.

126 Arrest without warrant. अधिपत्रावाचून अटक करणे..[View all order & notifications]

The Commissioner, Collector or any Prohibition Officer duly empowered in his behalf by the State Government or any Police Officer may arrest without an order from a Magistrate and without warrant any person who obstructs him in the execution of his duties under this Act or who has escaped or attempts to escape from custody in which he has been or is lawfully detained under this Act.

आयुक्त जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाने याबाबत योग्य रीतीने अधिकार दिलेल्या कोणत्याही दारूबंधी अधिका-यास किंवा कोणत्याही पोलीस अधिका-यास, या अधिनियमान्वये असलेली त्याची कर्तव्ये पार पाडण्याच्या कामी अडथळा करणा-या कोणत्याही व्यक्तीला किंवा या अधिनियमान्वये कायदेशीररीत्या अभिरक्षेत अटकावून ठेवलेल्या व्यक्तीला, तो अशा अभिरक्षेतून पळून गेला असेल किंवा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा, दंडाधिका-याच्या आदेशावाचून व अधिपत्रावाचून अटक करता येईल.

Section 127 ARREST OF OFFENDER FAILING TO GIVE NAME. नाव सांगण्यात कसूर करणा-या अपराध्यास अटक.

127 Arrest of offender failing to give name. नाव सांगण्यात कसूर करणा-या अपराध्यास अटक..[View all order & notifications]

(1)

When any person who in the presence of the Commissioner, Collector or any Prohibition Officer not below such rank as the State Government may determine has committed or has been accused of committing an offence under this Act, refuses on demand of such officer to give his name and residence or gives a names and residence which such officer has reason to believe to be false, he may be arrested by such officer, in order that his name or residence may be ascertained.

जेव्हा कोणत्याही व्यक्तीने आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा राज्य शासन ठरवील अशा दर्जाहून कमी नसलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिका-यासमक्ष या अधिनियमाखालील अपराध केला किंवा त्याच्यावर असा अपराध केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याने अशा अधिका-याने विचारले असता आपले नाव व राहण्याचे ठिकाण सांगण्याचे नाकारले किंवा जे नाव व राहण्याचे ठिकाण खोटे आहे असे मानण्यास त्या अधिका-यास कारण असेल असे नाव, राहण्याचे ठिकाण सांगितले तर, त्याचे नाव व राहण्याचे ठिकाण शोधून काढण्यासाठी अशा अधिका-यास त्याला अटक करता येईल.
 

(2)

When the true name and residence of such person have been ascertained, he shall be released on his executing a bond with or without sureties, to appear before a Magistrate having jurisdiction when so required :

Provided that if such person is not resident in  India, the bond shall be secured, by a surety or sureties residing in India.

अशा व्यक्तीचे खरे नाव व राहण्याचे ठिकाण शोधून काढल्यानंतर, तिने ज्या ज्या वेळी फर्मविण्यात येईल त्या त्या वेळी क्षेत्राधिकार असलेल्या दंडाधिका-यापुढेट हजर राहण्याबद्दल जामिनानिशी किंवा जामिनावाचून बंधपत्र लिहून दिले तर तिला सोडून देण्यात येईल:

परंतु, अशी व्यक्ती भारताचा रहिवासी नसेल तर, त्या बंधपत्रास भारतात राहणा-या एक किंवा एकाहून अधिक व्यक्ती जामीन राहतील.
 

(3)

If the true name and residence of such person is not ascertained within twentyfour hours from the time of the arrest, or if he fails to execute the bond, or if so required, to furnish sufficient sureties, he shall forthwith be forwarded to the nearest Magistrate having jurisdiction.

अशा व्यक्तीस अटक केलेल्या चोवीस तासांच्या आत तिचे खरे नाव व राहण्याचे ठिकाण शोधन काढण्यात आले नाही किंवा तिने बंधपत्र लिहून देण्यात कसूर केली किंवा तसे फर्मावण्यात आले असता पुरेसे जामीन देण्यात कसूर केली तर, तिला क्षेत्राधिकार असलेल्या अगदी नजीकच्या दंडाधिका-याकडे पाठविल.

Section 128 ISSUE OF WARRANTS. अधिपत्रे काढणे

128 Issue of warrants. अधिपत्रे काढणे.[View all order & notifications]

(1)

The Commissioner, Collector or any Prohibition Officer duly empowered in this behalf or in Greater Bombay, a Deputy Commissioner of Police or an Assistant Commissioner of Police in-charge of a Division, or a Magistrate or a Superintendent of Police or an Assistant or Deputy Superintendent of Police specially empowered by the State Government in this behalf may issue a warrant—

(a) for the arrest of any person whom he has reason to believe to have committed an offence under this Act or any other law relating to the excise revenue for the time being in force;

(b) for the search whether by day or by night of any building, vehicle or place in which he has reason to believe that any intoxicant, hemp,  mhowra flowers or molasses are manufactured or sold or stored or that any toddy is drawn contrary to the provisions of this Act or that any intoxicant, hemp, mhowra flowers, molasses] or other thing liable to confiscation or forfeiture, under this Act or any other law for the time being in force relating to the excise revenue is kept or concealed and for the seizure of such intoxicant, hemp  mhowra flowers, molasses or such other thing found in such building, vehicle or place.

आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा याबाबत योग्य रीतीने अधिकार दिलेला कोणताही दारूबंदी अधिकारी किंवा बृहन्मुंबईत पोलीस उप-आयुक्त किंवा विभाग स्वाधीन असलेला सहायक पोलीस आयुक्त किंवा दंडाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकट किंवा राज्य शासनाने याबाबत खास अधिकार दिलेला सहायक किंवा उप-पोलीस अधीक्षक यास पुढील कारणांसाठी अधिपत्र काढता येईल.

ती कारणे अशी----

(अ) हा अधिनियम किंवा उत्पादनशुल्क महसुलासंबंधीचा त्या त्या वेळी अमलात असलेला कोणताही इतर कायदा याखालाली अपराध ज्या कोणत्याही व्यक्तीने केला आहे असे त्यास सकारण वाटत असेल तिला अटक करणे ;

(ब) ज्या कोणत्याही इमारतीत वाहनात किंवा जागेत या अधिनियमाच्या तरतुदींविरुद्ध कोणतेही मादक द्रव्य, भांग मोहाची फुले किंवा काकवी तयार करण्यात, विकण्यात किंवा साठविण्यात येते किंवा ताडी काढण्यात येते अथवा या अधिनियमान्वये किंवा उत्पादनशुल्क महसुलासंबंधीच्या त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही इतर कायद्यान्वये जप्त केले जाण्यास किंवा सरकारजमा केले जाण्यास पात्र असलेले कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले, काकवीटकिंवा इतर वस्तू ठेविली आहे किंवा लपविली आहे असे त्यास सकारण वाटत असेल त्या इमारतीची, वाहनाची किंवा जागेची दिवसा किंवा रात्री झडती घेणे आणि अशा इमारतीत. वाहनात किंवा जागेत सापडलेले असे मादक द्रव्य, भांग मोहाची फुले, काकवी किंवा इतर वस्तू जप्त करणे.
 

(2)

All warrants issued under sub-section (1) shall be executed in accordance with the provisions of the Code of Criminal Procedure, 1898,  by a Police Officer or a Prohibition Officer duly empowered in this behalf or if the Officer issuing warrant deems fit, by any other person.

पोट-कलम (1) अन्वये काढलेली सर्व अधिपत्रे, पोलीस अधिका-याकडून किंवा याबाबत योग्य रीतीने अधिकार दिलेल्या दारूबंदी अधिका-यांकडून किंवा अधिपत्र काढणा-या अधिका-यास योग्य वाटेल तर कोणत्याही इतर व्यक्तीकडून फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 च्या तरतुदीनुसार बजावण्यात येतील. 

Section 128 A CERTAIN PROVISIONS TO APPLY TO DENATURED SPIRITOUS PREPARATION.विवक्षित तरतुदी विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थास लागू असणे.

128 A Certain provisions to apply to denatured spiritous preparation.विवक्षित तरतुदी विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थास लागू असणे..[View all order & notifications]

The provisions of sections 80, 98, 99, 103(1), 104, 120, 121, 122, 123, 124, 125, 128, 135 and 139 shall apply to denatured spirituous preparations as they apply to any intoxicant under this Act.

कलमे 80, 98, 99, 103 (1), 104, 120, 121, 122, 123, 124, 125, 128, 135 व 139 यांच्या तरतुदी या इतर कोणत्याही मादक पदार्थांस या अधिनियमान्वये ज्याप्रमाणे लागू होतात त्याचप्रमाणे विप्रकृत मद्यासारयुक्त सिद्धपदार्थांस लागू होतील.
 

Section 129 PROHIBITION OFFICER MAY BE EMPOWERED TO INVESTIGATE OFFENCE. दारूबंदी अधिका-यास अपराधांचा तपास करण्यासाठी अधिकार देता येईल.

129 Prohibition officer may be empowered to investigate offence. दारूबंदी अधिका-यास अपराधांचा तपास करण्यासाठी अधिकार देता येईल..[View all order & notifications]

(1)

The State Government may empower any Prohibition Officer to investigate offences under this Act.

राज्य शासनास या अधिनियमाखालील अपराधांचा तपास करण्यासाठी कोणत्याही दारूबंदी अधिका-यास अधिकार देता येईल.
 

(2)

An officer empowered under sub-section (1) shall in the conduct of such investigation exercise the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1898,upon an officer-in-charge of a Police Station for the investigation of congnizable offences.

पोट-कलम (1) अन्वये अधिकार दिलेल्या अधिका-यास, असा तपास करताना, दखली अपरांधाचा तपास करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1998 अन्वये पोलीस ठाणे स्वाधीन असलेल्या अधिका-यास जे अधिकार देण्यात आले आहेत ते अधिकार चालविता येईल.
 

(3)

Any Prohibition Officer, to whom such officer is subordinate may, during the course of the investigation, take over the investigation himself or direct any other Prohibition Officer duly empowered to conduct the same. The Officer in conducting the investigation shall have the same powers under sub-section (1) and (2) as if he were the Prohibition Officer appointed for the area or for the purpose of investigating the said offence.

असा अधिकारी ज्याच्या हाताखाली असेल त्या कोणत्याही दारूबंदी अधिका-यास, तपास चालू असताना, तपासाचे काम स्वत:कडे घेण्याचा किंवा योग्य रीतीने अधिकार दिलेल्या कोणत्याही इतर दारूबंदी अधिका-यास ते काम चालविण्याविषयी निदेश देता येईल. तपासाचे काम चालविताना अधिका-यास जणू तो त्या क्षेत्रासाठी किंवा उक्त अपराधाचा तपास करण्यासाठी नेमलेला दारूबंदी अधिकारी आहे असे समजून, पोट-कलमे (1) आणि (2) अन्वये असलेले अधिकार असतील.
 

(4)

If the Prohibition Officer conducting the investigation is of opinion that there is not sufficient evidence or reasonable ground of suspicion to justify the forwarding of the accused to a Magistrate, or that the person arrested may be discharged with a warning, such officer shall release him on his executing a bond with or without sureties, to appear, if and when so required, before a Magistrate empowered to take congnizance of the offence and shall make a full report of the case to his official superior and be guided by the order which he shall receive on such report.

आरोपी व्यक्तीला दंडाधिका-याकडे पाठवणे न्याय्य होईल, इतका पुरेसा पुरावा नाही किंवा संशय घेण्यास वाजवी कारण नाही असे किंवा अटक केलेल्या व्यक्तीस ताकीद देऊन सोडण्यात यावे असे तपासाचे काम चालविण्या-या दारूबंदी अधिका-याचे मत झाले तर असा अधिकारी, अपराधाची दखल घेण्यास अधिकार दिलेल्या दंडाधिका-यापुढे अशा व्यक्तीने जर व जेव्हा तसे करण्यास फर्माविण्यात येईल तर व तेव्हा, हजर राहण्यासाठी, जामिनानिशी किंवा जामिनावाचून बंधपत्र लिहून दिल्यावर त्यास सोडून देईल ; आणि असा अधिकारी प्रकरणाचे संपूर्ण प्रतिवृत्त आपल्या वरिष्ठ अधिका-याकडे पाठवील व अशा प्रतिवृत्तावर त्यास जो आदेश दिला जाईल त्याप्रमाणे वागेल.
 

(5)

The powers of any officer empowered under this section shall be subject to such other modifications or restrictions as the State Government may deem fit.

या कलमान्वये अधिकार दिलेल्या अधिका-याचे अधिकार राज्य शासनास योग्य वाटतील त्या इतर फेरफारांस व निर्बंधास अधीन असतील. 

Section 129 A POWER TO REQUIRE PERSON TO SUBMIT TO MEDICAL EXAMINATION, ETC. व्यक्तींची वैद्यकीय तपासणी, वगैरे करविण्यासाठी त्यांना भाग पाडण्याचा अधिकार.

129 A Power to require person to submit to medical examination, etc. व्यक्तींची वैद्यकीय तपासणी, वगैरे करविण्यासाठी त्यांना भाग पाडण्याचा अधिकार..[View all order & notifications]

(1)

Where in the investigation of any offence under this Act, any Prohibition Officer duly empowered in this behalf by the State Government or any Police Officer, has reasonable ground for believing that a person has consumed an intoxicant and that for the purpose of establishing that he has consumed an intoxicant or for the procuring of evidence thereof it is necessary that his body be medically examined, or that his blood be collected for being tested for determining the percentage of alcohol therein, such Prohibition Officer or Police Officer may produce such person before a registered medical practitioner (authorised by general or special order by the State Government in this behalf) for the purpose of such medical examination or collection of blood, and request such registered medical practitioner to furnish a certificate on his finding whether such person has consumed any intoxicant and to forward the blood collected by him for test to the Chemical Examiner or Assistant Chemical Examiner to Government, or to such other Officer as the State Government may appoint in this behalf.

या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाचा तपास करताना, याबाबत राज्य शासनाने योग्य रीतीने अधिकार दिलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिका-यास किंवा कोणत्याही पोलीस अधिका-यास, एखाद्या व्यक्तीने मादक द्रव्य घेतले आहे आणि तिने मादक द्रव्य घेतले आहे हे सिद्ध करण्याच्या कारणांकरिता किंवा त्याबाबतचा पुरावा मिळविण्याकरिता त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे किंवा त्याच्या रक्तातील मद्यार्काचे प्रमाण ठरविण्यासाठी त्याचे रक्त घेणे आवश्यक आहे असे समजण्यास वाजवी कारण असेल त्याबाबतीत अशा दारूबंदी अधिका-यास किंवा पोलीस अधिका-यास, अशा व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी किंवा तिचे रक्त घेण्यासाठी त्यास (राज्य शासनाने याबाबत सर्वसाधारण किंवा विशेष
आदेशान्वये अधिकार दिलेल्या) नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीपुढे हजर करता येईल आणि अशा नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीस, अशा व्यक्तीने कोणतेही मादक द्रव्य घेतले आहे किंवा कसे याबाबत त्याने तपासणी केल्यावर त्यासंबंधीचे प्रमाणपत्र सादर करण्याची विनंती करता येईल आणि त्याने काढलेले रक्त शासनाचा रसायन परीक्षक किंवा सहायक रसायन परिक्षक यांच्याकडे किंवा त्याबाबत राज्य शासन नेमील अशा इतर अधिका-याकडे पाठविण्याची विनंती करता येईल.
 

(2)

The registered medical practitioner before whom such person has been produced shall examine such person and collect and the forward in the manner prescribed the blood of such person, and furnish to the Officer by whom such person has been produced, a certificate in the prescribed form containing the result of his examination . The Chemical Examiner or Assistant Chemical Examiner to Government, or other officer appointed under sub-section (1) shall certify the result of the test of the blood, forwarded to him, stating therein in the prescribed form, the percentage of alcohol, and such other particulars as may be necessary or relevant.

ज्याच्यापुढे अशा व्यक्तीस हजर करण्यात आले असेल असा नोंदलेला वैद्यक व्यवसायी अशा व्यक्तीची तपासणी करील व विहित केलेल्या रीतीने अशा व्यक्तीचे रक्त घेऊन ते पाठवील व ज्या अधिका-याने अशा व्यक्तीस हजर केले असेल त्यास, त्याने केलेल्या तपासणीचा निष्कर्ष असलेले प्रमाणपत्र विहित केलेल्या नमुन्यात देईल. शासनाचा रसायन परीक्षक किंवा सहायक रसायन परीक्षक किंवा पोट-कलम (1) अन्वये नेमलेला इतर अधिकारी, त्यांच्याकडे पाठविलेल्या रक्ताच्या तपासणीच्या निष्कर्षांबद्दल एक प्रमाणपत्र देईल; आणि त्यात विहित केलेल्या नमुन्यात मद्यर्काचे प्रमाण व आवश्यक किंवा तत्संबद्ध असा इतर तपशील नमूद करील.
 

(3)

If any person offers resistance to his production before a registered medical practitioner under sub-section (1) or on his production before such practitioner to the examination of his body or to the collection of his blood, it shall be lawful to use all means reasonably necessary to secure the production of such person or the examination of his body or the collection of blood necessary for the test.

नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीपुढे पोट-कलम (1) अन्वये हजर होण्यास कोणत्याही व्यक्तीने प्रतिकार केल्यास किंवा अशा अधिका-यापुढे हजर केल्यावर, त्याची शारीरिक तपासणी करण्यास किंवा त्याचे रक्त काढून घेण्यास प्रतिकार केल्यास त्यास हजर करण्यासाठी किंवा त्याची शारीरिक तपासणी करण्यासाठी किंवा रक्ताची परीक्षा करण्याकरिता त्याचे रक्त काढून घेण्यासाठी वाजवी रीतीने आवश्यक वाटतील असे सर्व उपाय योजणे हे कायदेशीर असेल.
 

(4)

If the person produced is a female, such examination shall be carried out by, and the blood shall be collected by or under the supervision of, a female registered medical practitioner authorised by general or special order by the State Government in this behalf, and any examination of the body or collection of blood, of such female shall be carried out or made with strict regard to decency.

जर हजर केलेली व्यक्ती ही स्त्री असेल तर, अशी तपासणी आणि रक्त काढून घेणे या गोष्टी, राज्य शासनाने याबाबत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे प्राधिकृत केलेल्या अशा नोंदलेल्या स्त्री वैद्यक व्यवसायीच्या देखरेखीखाली करण्यात येतील व अशा स्त्रीची शारीरिक तपासणी करणे किंवा रक्त काढणे हे शिष्टाचारास धरून करण्यात येतील.
 

(5)

Resistance to production before a registered medical practitioner as aforesaid, or to the examination of the body under this section or to the collection of blood as aforesaid, shall be deemed to be an offence under Section 186 of the Indian penal Code.

पूर्वोक्तप्रमाणे नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीपुढे हजर करण्यास किंवा या कलमाखालील शारीरिक तपासणीस किंवा पूर्वोक्तप्रमाणे रक्त काढून घेण्यास प्रतिकार करणे हा, भारतीय दंड संहितेच्या कलम 186 अन्वयेचा अपराध आहे असे समजण्यात येईल.
 

(6)

Any expenditure incurred for the purpose of enforcing the provisions or this section including any fees payable to a registered medical practitioner or the officer appointed under sub-section (1) shall be defrayed out of moneys provided by the State Legislature.

या कलमाच्या तरतुदी अंमलात आणण्याच्या कामी नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीस किंवा पोट-कलम (1) अन्वये नेमलेल्या अधिका-यास द्यावयाच्या फीचा समावेश करून आलेला खर्च, राज्य विधानमंडळाने तरतूद केलेल्या पैशातून भागविण्यात येईल.
 

(7)

If any Prohibition Officer or Police Officer vexatiously and unreasonably proceeds under sub-section (1) he shall, on conviction, be punished with fine which may extend to five hundred rupees.

कोणत्याही दारूबंदी अधिका-याने किंवा पोलीस अधिका-याने, त्रास देण्यासाठी व गैरवाजवी रीतीने पोट-कलम (1) अन्वये कारवाई केली तर, त्यास, सिद्धापराध ठरविण्यात आले असता पाचशे रुपयांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल.
 

(8)

Nothing in this section shall preclude that fact that the person accused of an offence has consumed an intoxicant from being proved otherwise than in accordance with the provisions of this section.

या कलमातील कोणत्याही मजकुरामुळे, अपराध केल्याचा आरोप ज्या व्यक्तीवर ठेवला असेल तिने मादक द्रव्य घेतले आहे ही वस्तुस्थिती, या कलमाच्या तरतुदीनुसार असेल त्याव्यतिरिक्त इतर रीतीने सिद्ध करण्यास प्रतिबंध होतो असे समजले जाणार नाही.

Section 129 B DOCUMENTS OF REPORTS OF REGISTERED MEDICAL PRACTITIONER, ETC. AS EVIDENCE. नोंदविलेला वैद्यक व्यवसायी, इत्यादी यांनी दिलेले दस्तऐवज किंवा प्रतिवृत्ते, वगैरे पुरावा असणे.

129 B Documents of reports of registered medical practitioner, etc. as evidence. नोंदविलेला वैद्यक व्यवसायी, इत्यादी यांनी दिलेले दस्तऐवज किंवा प्रतिवृत्ते, वगैरे पुरावा असणे..[View all order & notifications]

Any document purporting to be—

(a) a certificate under the hand of a registered medical practitioner, or the Chemical Examiner or Assistant Chemical Examiner to Government, under section 129 A or of an officer appointed under sub-section (1) of that section or

(b) a report under the hand of any registered medical practitioner, in any hospital or dispensary maintained by the State Government or a local authority or any other registered medical practitioner authorised by the State Government in this behalf, in respect of any person examined by him or upon any matter or thing duly submitted to him for examination or analysis and report, may be used as evidence of the facts stated in such certificate, or as the case may be, report in any proceedings under this act; but the Court may if it thinks fit, and shall, on the application of the prosecution or the accused person, summon and examine any such person as to the subject matter of his certificate or as the case may be report.

जो कोणताही दस्तऐवज हा,-

(अ) कलम 129-अ अन्वये नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीने किंवा शासनाच्या रसायन परीक्षकाने किंवा सहायक रसायन परीक्षकाने किंवा त्या कलमाच्या पोट-कलम (1) अन्वये नेमलेल्या अधिका-याने त्याच्या सहीशिक्क्यानिशी दिलेले प्रमाणपत्र असेल ; किंवा

(ब) राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिका-याने चालविलेल्या कोणत्याही रुग्णालयातील किंवा दवाखान्यातील कोणत्याही नोंदलेल्या वैद्यकीय व्यवसायीने किंवा याबाबत राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही इतर नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीने त्याने कोणत्याही व्यक्तीच्या तपासणीसंबंधीचे किंवा त्याच्याकडे तपासणीसाठी किंवा पृथ:करणासाठी किंवा प्रतिवृत्तासाठी योग्य रीतीने सादर केलेल्या गोष्टीसंबंधीचे त्याच्या सहीशिक्क्यानिशी दिलेले प्रतिवृत्त असेल; तर तो दस्तऐवज या अधिनियमान्वयेच्या कोणत्याही कारवाईत, त्या प्रमाणपत्रात किंवा, यथास्थिति, प्रतिवृत्तात नमूद केलेल्या वस्तुस्थितीचा पुरावा म्हणून वापरता येईल; परंतु फिर्यादीने किंवा आरोपी व्यक्तीने अर्ज केला तर, न्यायालयास, अशा व्यक्तीस आज्ञापत्र (समन्स) काढून बोलविण्याचा आणि प्रमाणपत्रातील किंवा यथास्थिति, प्रतिवृत्तातील वादविषयाबद्दल अशा व्यक्तीची तपासणी करता येईल आणि न्यायालय त्यास योग्य वाटेल तर
अशा व्यक्तीस आज्ञापत्र (समन्स) काढून बोलावील आणि प्रमाणपत्रातील किंवा, यथास्थिति प्रतिवृत्तातील वादविषयाबद्दल अशा व्यक्तीची तपासणी करील.
 

Section 130 ARRESTED PERSONS AND THINGS SEIZED TO BE SENT TO OFFICER-INCHARGE OF POLICE STATION. अटक केलेली व्यक्ती व जप्त केलेल्या वस्तू पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-याकडे पाठविणे.

130 Arrested persons and things seized to be sent to officer-incharge of Police Station. अटक केलेली व्यक्ती व जप्त केलेल्या वस्तू पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-याकडे पाठविणे..[View all order & notifications]

Every person arrested and thing seized by a Prohibition Officer under this Act, shall be sent to the officer-in-charge of the nearest Police Station or to any other officer duly empowered under section 129 if the Commissioner in any particular case has directed such officer to conduct the investigation of the offence].

या अधिनिमान्वये दारुबंदी अधिका-याने अटक केलेली प्रत्येक व्यक्ती व जप्त केलेली प्रत्येक वस्तू ही अगदी नजीकच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-याकडे पाठवील किंवा या अपराधाची चौकशी करण्यास एखाद्या विशिष्ट बाबतीत आयुक्ताने अशा अधिका-यास निदेश दिल्यास, कलम 129 अन्वये योग्यरीत्या अधिकार दिलेल्या इतर कोणत्याही अधिका-याकडे, पाठविण्यात येईल. 

Section 131 BAIL BY PROHIBITION OFFICER. दारूबंदी अधिका-याने जामिनावर सोडणे.

131 Bail by Prohibition Officer. दारूबंदी अधिका-याने जामिनावर सोडणे..[View all order & notifications]

(1)

Any Prohibition officer empowered to investigate an offence under this Act shall have power to grant bail in accordance with the provisions of the Code of Criminal Procedure, 1898, to any person arrested without a warrant for an offence of under this Act.

या अधिनियमाखालील अपराधाचा तपास करण्यासाठी अधिकार दिलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिका-यास, या अधिनियमाखालील अपराध केल्याबद्दल अधिपत्रावाचून अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 च्या तरतुदींनुसार जामिनावर सोडून देता येईल.
 

(2)

When any person has been arrested under section 126, a Prohibition officer empowered to investigate offence under this Act shall have power to grant bail in accordance with the provisions of the Code of Criminal Procedure, 1898.

कलम 126 अन्वये कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात येईल तेव्हा, या अधिनियमाखालील अपराधांचा तपास करण्यासाठी अधिकार दिलेल्या दारूबंदी अधिका-यास, तिला फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 च्या तरतुदींनुसार जामीनावर सोडून देता येईल.

Section 132 ARTICLES SEIZED. जप्त केलेल्या वस्तू.

132 Articles seized. जप्त केलेल्या वस्तू..[View all order & notifications]

When anything has been seized under the provisions of this Act by a Prohibition Officer exercising powers under section 129 or by on Officer-in-charge of a Police Station], or has been sent to him in accordance with provisions of this Act, such officer, after such inquiry as may be deemed necessary,—

(a) if it appears that such thing is required as evidence in the case of any person arrested, shall forward it to the Magistrate to whom such person is forwarded or for his appearance before whom bail has been taken.

(b) if it appears that such thing is liable to confiscation but is not required as evidence as aforesaid, shall sent it with a full report of the particulars of seizure to the Collector.

(c) if no offence appears to have been committed shall return it to the person from whose possession it was taken.

कलम 129 अन्वये अधिकार चालवून एखाद्या दारूबंदी अधिका-याने किंवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-याने या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये कोणत्याही वस्तू जप्त केल्या असतील, किंवा या अधिनियमाच्या तरतुदींनुसार कोणत्याही वस्तू त्यांच्याकडे पाठविण्यात आल्या असतील तेव्हा, असा अधिकारी, आवश्यक वाटेल ती चौकशी केल्यानंतर,-

(अ) अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या खटल्यात पुरव्यादाखल अशा वस्तूची आवश्यकता आहे असे दिसून आले तर, अशा व्यक्तीस ज्या दंडाधिका-याकडे पाठविले असेल किंवा ज्याच्यापुढे हजर राहण्याबद्दल जामीन घेतला असेल त्या दंडाधिका-याकडे ती वस्तू पाठवील ;

(ब) जर अशी वस्तू जप्त केली जाण्यास पात्र आहे परं तु वर सांगितल्याप्रमाणे पुरावा म्हणून त्याची आवश्यकता नाही असे दिसून आले तर, ती जप्त केल्याच्या तपशिलाच्या संपूर्ण प्रतिवृत्तासह जिल्हाधिका-याकडे पाठविल ;

(क) जर कोणताही अपराध केल्याचे दिसून आले नाही तर, ज्या व्यक्तींच्या कब्जातून ती वस्तू घेतली असेल तिला ती परत करील.

Section 133 DUTY OF 4 [OFFICERS OF GOVERNMENT] AND LOCAL AUTHORITIES TO ASSIST. शासनाच्या अधिका-यांचे व स्थानिक प्राधिकरणाच्या अधिका-यांचे सहाय्य करण्याचे कर्तव्य.

133 Duty of 4 [officers of Government] and local authorities to assist. शासनाच्या अधिका-यांचे व स्थानिक प्राधिकरणाच्या अधिका-यांचे सहाय्य करण्याचे कर्तव्य..[View all order & notifications]

Every officer of the Government] and every officer or servant of local authority, shall be legally bound to assist any Prohibition Officer or Police Officer or person authorised in this behalf in carrying out the provisions of this Act.

शासनाचा प्रत्येक अधिकारी व स्थानिक प्राधिकरणाचा प्रत्येक अधिकारी व सेवक हा, या अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यासाठी, कोणत्याही दारुबंदी अधिका-यास किंवा पोलीस अधिका-यास किंवा याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीस सहाय्य करण्यास कायदेशीररीत्या बांधलेला असेल.
 

Section 134 OFFICES TO BE REPORTED. अपराध झाल्याचे कळविणे.

134 Offices to be reported. अपराध झाल्याचे कळविणे..[View all order & notifications]

Every village officer or servant useful to Government, every officer of the State Government, and (with the consent of the Central Government) every officer of the Customs and Central Excise Departments and every officer or servant of a local authority, and the Sarpanch of a village Panchayat constituted under the Bombay Village Panchayats Act, 1958, shall be bound—

(a) to give immediate information at the nearest Police Station or to any officer or person authorised in this behalf of the commission of any offence and of the intention or preparation to commit any offence under this Act which may come to their knowledge;

(b) To take all reasonable measures in their power to prevent the commission of any such offence which they may know or have reasons to believe is about or likely to be committed.

शासनाला उपयुक्त असलेला प्रत्येक ग्राम-अधिकारी किंवा ग्रामसेवक, राज्य शासनाचा प्रत्येक अधिकारी, आणि (केंद्र सरकारची संमती घेऊन) सीमा शुल्क विभागाचा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचा प्रत्येक अधिकारी व स्थानिक प्राधिकरणाचा प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी, आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 अन्वये घटित केलेल्या ग्रामपंचायतीचा सरपंच हे,-

(अ) त्यांना कळेल असा या अधिनियमान्वये घडलेला कोणताही अपराध आणि या अधिनियमांन्वये अपराध करण्याचा हेतू किंवा करण्याची तयारी याबद्दलची या अधिनियमाखाली कोणताही अपराध घडल्याची गोष्ट किंवा कोणत्याही अपराधाच्या इराद्याची किंवा तयारीची माहिती त्यांना समजली तर त्याबद्दलची खबर अगदी नजीकच्या पोलीस ठाण्याकडे किंवा याबाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिका-याकडे किंवा व्यक्तीकडे देण्यास ;

(ब) जो अपराध घडल्याचे त्यांना माहीत होईल किंवा जो घडण्याच्या बेतात आहे किंवा घडण्याचा संभव आहे असे त्यास सकारण वाटत असेल तर तो अपराध घडण्यास प्रतिबंध करण्याच्या कामी आपल्या अधिकारात असलेल्या सर्व वाजवी उपाययोजना अंमलात आणण्यास; बांधलेले असतील. 

Section 135 LANDLORDS AND OTHERS TO GIVE INFORMATION. जमीन मालकांनी व इतर व्यक्तींनी माहिती कळविणे.

135 Landlords and others to give information. जमीन मालकांनी व इतर व्यक्तींनी माहिती कळविणे..[View all order & notifications]

Every person who owns or occupies any land or building, or who is landlord of an estate residing in the village, and the agent of such owner, occupier or landlord of the land, building or estate, as the case may be, on or in which there has been any unlawful tapping of toddy-producing trees or unlawful manufacture of any liquor or intoxicating drug or unlawful cultivation or collection of hemp, and every owner of a vessel or vehicle in which liquor or intoxicating drug is manufactured contrary to the provisions of this Act, shall, in the absence of reasonable excuse, be bound to give notice of the same to a Magistrate or to a Prohibition Officer or to a Police Officer immediately the same shall have come to his knowledge.

ज्यामध्ये ताडी देणारी झाडे बेकायदेशीररीत्या छेदण्यात येत असतील, किंवा ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची दारू किंवा मादक औषधी तयार करण्यात येत असेल आणि जीत भांगेची बेकायदेशीररीत्या लागवड करण्यात येऊन गोळा करण्यात येते अशी कोणतीही जमीन किंवा इमारत यांचा मालक असलेली किंवा भोगवटा करणारी प्रत्येक व्यक्ती किंवा अशा मालमत्तेच्या गावात. राहणारा मालक आणि यथास्थिति; अशा जमिनीच्या, इमारतीच्या किंवा मालमत्तेच्या मालकाचा, भोगवटा करणा-याचा किंवा जमीनदाराचा अभिकर्ता हा आणि ज्यात या अधिनियमाच्या तरतुदींविरूद्ध दारु किंवा मादक औषधी तयार करण्यात येते अशा जलयानाच्या किंवा वाहनाच्या प्रत्येक मालक हा वाजवी सबबीच्या अभावी अशा प्रकारे झाडे छेदण्यात आल्याची किंवा दारू किंवा मादक औषधी तयार करण्यात आल्याची माहिती त्यास मिळाल्याबरोबर त्याबाबतची नोटीस दंडाधिका-यास किंवा दारूबंदी अधिका-यास किंवा पोलीस अधिका-यास देण्यास बांधलेला असेल.

Section 136 DELETED. वगळण्यात आले.

136 Deleted. वगळण्यात आले..[View all order & notifications]

[Power to arrest and make orders detaining or restricting movements or actions of persons.] Deleted by Bom. 26 of 1952. s. 50.

(अटक करण्याचा व व्यक्तीस अटकावून ठेवण्याचा किंवा तिच्या हालचालींवर किंवा कृत्यांवर निर्बंध घालण्याचा अधिकार). हे कलम सन 1952 चा मुंबई अधिनियम क्रमांक 26, कलम 50 अन्वये वगळण्यात आले.

Section 137 APPEALS. अपिले

137 Appeals. अपिले.[View all order & notifications]

(1)

All order passed by my Prohibition Officer other than the Collector or Commissioner under this Act shall be appealable to the Collector at any time within sixty days from the date of the order complained of.

जिल्हाधिकारी किंवा आयुक्त याव्यतिरिक्त इतर कोणत्याही दारूबंदी अधिका-याने या अधिनियमान्वये दिलेल्या सर्व आदेशांवर, तक्रारीचा विषय असलेला आदेश दिल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत कोणत्याही वेळी जिल्हाधिका-याकडे अपील करता येईल.
 

(2)

All orders passed by the Collector and Commissioner shall be appealable to the Commissioner and the State Government respectively at any time within ninety days from the date of the order complained of :

Provided that no appeal shall lie against an order passed by the Commissioner on appeal.

जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी दिलेल्या सर्व आदेशांवर अनुक्रमे आयुक्ताकडे व राज्य शासनाकडे, तक्रारीचा विषय असलेला आदेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसांच्या आत कोणत्याही वेळी अपील करता येईल :

परंतु आयुक्ताने अपिलात दिलेल्या आदेशावर कोणतेही अपील करता येणार नाही.
 

(3)

Subject to the foregoing provisions the rules which the State Government may make in this behalf shall apply to appeals under this section.

राज्य शासन याबाबत जे नियम करील ते मागील तरतुदींना अधीन राहून, या कलमान्वये दिलेल्या अपिलास लागू होतील. 

Section 138 REVISION. पुनरीक्षण

138 Revision. पुनरीक्षण.[View all order & notifications]

The State Government may call for and examine the record of any proceeding before any Prohibition Officer including that relating to the grant or refusal of a licence, permit, or authorization under this Act for the purpose of satisfying itself as to the correctness, legality or propriety of any order passed in, and as to the regularity of, any such proceeding and may when calling for such record, direct that the order be not given effect to pending the examination of the record. On examining the record, it may either annual, reverse, modify or confirm such order, or pass such other order as it may deem fit.

या अधिनियमाखालील लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र देण्यासंबंधीचे किंवा नाकारण्यासंबंधीचे कामकाज धरून कोणत्याही दारूबंदी अधिका-यापुढे चालू असलेल्या कोणत्याही कामकाजाचे कागदपत्र हे, अशा कामकाजात दिलेल्या कोणत्याही आदेशाचा बिनचूकपणा, कायदेशीरपणा किंवा औचित्य याविषयी तसेच असे कामकाज व्यवस्थितपणे चालविण्यात येते किंवा कसे याविषयी स्वत:ची खात्री करून घेण्यासाठी राज्य शासनास मागविता येतील व त्याची तपासणी करता येईल आणि असे कागदपत्रे मागविल्यानंतर, त्यांची तपासणी पूर्ण होई तोपर्यंत आदेश अंमलात आणण्यात येऊ नये असा निदेश देता येईल. तसेच, त्यास कागदपत्र तपासल्यानंतर असा आदेश रद्द करता येईल, फिरविता येईल, त्यात फेरफार करता येईल किंवा तो कायम करता येईल किंवा त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे इतर कोणताही आदेश देता येईल.

Section 139 GENERAL POWERS OF 2 [STATE] GOVERNMENT IN RESPECT OF LICENCES, ETC. लायसन, वगैरे यांच्या बाबतीत राज्य शासनाचे सर्वसाधारण अधिकार.

139 General powers of 2 [State] Government in respect of licences, etc. लायसन, वगैरे यांच्या बाबतीत राज्य शासनाचे सर्वसाधारण अधिकार..[View all order & notifications]

(2)

An order made under sub-section (1), shall, if it is of a general nature of affecting a class of persons, be notified in the Official Gazette.

पोट-कलम (1) अन्वयेचा आदेश सामान्य स्वरुपाचा असेल किंवा त्यामुळे व्यक्तींच्या वर्गास बाध येत असेल तर तो राजपत्रात अधिसूचित करण्यात येईल.

(1)

Notwithstanding anything contained in this Act or the rules made thereunder, the State Government may, by general or special order,—

 

(a) Prohibit the grant of any kind of licences, permits, passes or authorizations throughout the State or in any area ;

(b) regulate the import, export, transport, possession sale, purchase, consumption or use of any intoxicant, hemp, mhowra flowers, molasses or any article which is likely to be used for the manufacture of an intoxicant with or without licence, permit, pass or authorization throughout the State or within the limits of any local are subject to such conditions as it may impose .

(c) exempt any person or institution or any class of persons or institutions from all or any of the provisions of this Act or from all or any of the rules, regulations or orders made thereunder or from all or any of the conditions of any licence, permit, pass or authorization granted thereunder, subject to such conditions as it may impose;

(d) exempt any intoxicant or class of intoxicants, denatured spirituous prepara- tion, hemp, mhowra flowers or molasses from all or any of the provisions of this Act or from all or any of the rules, regulations or orders made thereunder subject to such conditions as it may impose;

(d1) remit or refund wholly or partially any fee in respect of any privilege, licence, permits, pass or authorization granted under this Act or any duty on toddy producing trees or any excise or countervailing duty or fee leviable under this Act on any intoxicant, hemp, mhowra flowers or molasses from any person or institution or from a class of persons or institution or exempt any person or institution or class of persons or institutions from the payment of such duty or fee subject to such conditions as it may impose;

(e) prescribe the maximum number of licences, permits, passes or authoriza- tions of any kind which may be granted in any area or to any class of persons;

(f) prescribe the number of places at which any intoxicant specified in such order denatured spirituous preparation, hemp, mhowra flowers or molasses may be sold in any area, the location of such places in any area, the days and hours during which such places may or may not be kept open, the number of such places in respect of which licences for sale may be granted and the number or such places which may be managed by the State Government departmentally;

(g) direct that no licence, permit, pass or authorisation of the kind specified in such order shall be granted without the previous approval of the State Government or also direct any additions or alterations to be made to or in the conditions subject to which under any other provisions of this Act, such licence, permit pass or authorization can be granted;

(h) prescribe the maximum quantity of any intoxicant denatured spirituous preparation, hemp, mhowra flowers or molasses which may be sold in any area or at any place;

(i) prescribe in respect of any place or area, the maximum number of toddy producing trees for tapping which or for drawing toddy from which licence or licences may be granted;

(j) prescribe the procedure for the disposal of any shop or shops authorised to sell any intoxicant, denatured spirituous preparation, hemp, mhowra flowers or molasses under this Act and the procedure to be followed before granting any licence or licences;

(k)  direct that before granting licences, auctions may be held, tenders called for or offers received and that licences shall be granted subject to such conditions as may be prescribed to persons whose bids, tenders or offers are accepted by the Collector;

 (l)   specify the persons or class of persons to whom licences may or may not be granted and in cases in which auctions are held, the person or classes of persons who may or may not be permitted to offer bids at such auctions;

(m) ​​​​​​direct that licences of the kind specified in such order shall be granted to persons specified in such order; and

(n)  issue such other instructions in any matter pertaining to the grant or otherwise of licences, permits, passes or authorizations under this Act, as the State Government may deem proper.

हा अधिनियम किंवा तद्न्वये, केलेले नियम यात काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, राज्य शासनास, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे पुढील गोष्टी करता येतील,--
 

(अ) सबंध राज्यात किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारची लायसने, परवाने, पास, किंवा प्राधिकारपत्रे देण्यास मनाई करणे;
 

(ब) सबंध राज्यातट किंवा कोणत्याही स्थानिक क्षेत्राच्या हद्दीत, ते घालून देईल त्या शर्तीस अधीन राहूनट लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र या अन्वये किंवा त्यावाचून, कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले, काकवी किंवा मादक द्रव्ये तयार करण्यासाठी जी वापरता येण्याचा संभव आहे असा कोणताही पदार्थ यांच्या आयातीचे, निर्यातीचे, परिवहनाचे, ते जवळ बाळगण्याचे, विकण्याचे, खरेदी करण्याचे, सेवन करण्याचे किंवा वापरण्याचे विनियमन करणे.
 

(क) ते घालून देईल त्या शर्तीस अधीन राहून कोणत्याही व्यक्तीस किंवा संस्थेस किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीस किंवा संस्थांना या अधिनियमाच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदी अथवा तद्न्वये केलेले सर्व किंवा कोणतेही नियम, विनियम किंवा दिलेले सर्व किंवा कोणतेही आदेश किंवा तद्न्वये देण्यात आलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यातील सर्व किंवा कोणत्याही शर्ती पाळण्यापासून सूट देणे ;
 

(ड) ते घालून देईल त्या शर्तीस अधीन राहून, या अधिनियमाच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदीपासून किंवा तद्न्वये केलेले सर्व किंवा कोणतेही नियम, विनियम किंवा दिलेले सर्व किंवा कोणतेही आदेश यातून, कोणतेही मादक द्रव्य, किंवा मादकद्रव्याच्या वर्ग, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग, मोहाची फुले किंवा काकवी यांना सूट देणे ;
 

(ड-1) ते घालून देईल त्या शर्तीस अधीन राहून, या अधिनियमान्वये देण्यात आलेला कोणताही विशेषधिकार, लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यांच्या बाबतीतील फी किंवा ताडी देणारी झाडे यांवरील कोणतेही शुल्क किंवा कोणत्याही व्यक्तीने, संस्थेने किंवा व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या वर्गाने कोणताही मादक पदार्थ, भांग, मोहाची फुले किंवा काकवी यावरील या अधिनियमान्वये द्यावयाचे कोणतेही उत्पादन शुल्क किंवा प्रतिशुल्क किंवा फी माफ करणे किंवा परत करणे किंवा असे शुल्क किंवा द्यावयाची फी, यांतून कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही संस्था किंवा कोणत्याही व्यक्तींचा किंवा संस्थांचा वर्ग यांस अंशत: किंवा पूर्णपणे सूट देणे ;
 

(ई) कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीस द्यावयाच्या कोणत्याही प्रकारच्या लायसनची, परवान्याची, पासाची किंवा प्राधिकारपत्रांची कमाल संख्या विहित करणे ;
 

(फ) कोणत्याही क्षेत्रात, अशा आदेशांत विनिर्दिष्ट करण्यात आलेले कोणतेही मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ,ट भांग, मोहाची फुले, अगर काकवी ज्या जागी विकता येईल त्या जागांची संख्या, कोणत्याही क्षेत्रात अशा जागांचे ठिकाण, ज्या दिवशी व ज्या वेळांच्या दरम्यान अशा जागा उघड¬ा ठेवता येतील किंवा उघड¬ा ठेवता येणार नाहीत ते दिवस व त्या वेळा, ज्या जागांच्या संबंधात विक्रीसाठी लायसन देता येईल त्या जागांची संख्या आणि राज्य शासनाच्या विभागाकडूनट ज्या जागांची व्यवस्था ठेवली जाईल त्या जागांची संख्या, ही विहित करणे ;
 

(ग) अशा आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या प्रकारचे कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीवाचून देण्यात येऊ नये असा निदेश देणे अथवा असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र या अधिनियमाच्या ज्या कोणत्याही इतर तरतुदींअन्वये देता येईल त्या तरतुदींत किंवा ज्या शर्र्तीस अधीन राहून असे लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र देता येईल त्या शर्तीमध्ये कोणताही जादा मजकूर दाखल करण्याविषयी किंवा कोणताही फेरफार करण्याविषयी निदेश देणे;
 

(ह) कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणत्याही जागी कोणतेही मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग, मोहाची फुले, किंवा काकवी जास्तीत जास्त किती विकता येईल ते कमाल परिमाण विहित करणे;
 

(आय) जी छेदण्यासाठी किंवा ज्यापासून ताडी काढण्यासाठी लायसन किंवा लायसने देता येतील अशा ताडी देणा-या झाडांची कमाल संख्या, कोणत्याही जागेच्या किंवा क्षेत्राच्या संबंधात विहित करणे;
 

(ज) या अधिनियमान्वये कोणतेही मादकद्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग, मोहाची फुले किंवा काकवी विकण्यासाठी प्राधिकृत केलेले कोणतेही दुकान किंवा कोणतीही दुकाने यांचा विनियोग करण्यासाठी अनुसरावयाची व लायसन किंवा लायसने देण्यापूर्वी अनुसरावयाची कार्यपद्धती विहित करणे;
 

(के) लायसन देण्यापूर्वी लिलाव करण्यात यावेत, निविदा मागविण्यात याव्यात किंवा देऊ केलेल्या किंमतीचा विचार करण्यात यावा आणि ज्या व्यक्तींच्या लिलावातील किंमती, मूल्य, निवेदने ; किंवा देऊ केलेल्या रकमा विहित करण्यात येतील त्या शर्तीस अधीन राहून जिल्हाधिका-याकडून स्वीकारण्यात येतील त्यास लायसन देण्यात यावीत असा निदेश देणे ;
 

(ल) ज्या व्यक्तीस किंवा ज्या वर्गातील व्यक्तीस लायसन देण्यात यावी किंवा देण्यात येऊ नयेतट त्या व्यक्ती किंवा तो वर्ग विनिर्दिष्ट करणे आणि ज्याबाबतीत लिलाव करण्यात येईल त्याबाबतीत लिलावाचे वेळी ज्या व्यक्तीस किंवा वर्गातील व्यक्तीस लिलावात किंमत बोलण्याची परवानगी देण्यात यावी किंवा देण्यात येऊ नये त्या व्यक्ती किंवा वर्ग विनिर्दिष्ट करणे;
 

(म) अशा आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या प्रकारची लायसने त्या आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तीस देण्यात यावीत असा निदेश देणे; आणि
 

(न) राज्य शासनास योग्य वाटेल त्याप्रमाणे या अधिनियमान्वये लायसन, परवाने, पास किंवा प्राधिकारपत्रे देण्यासंबंधीच्या कोणत्याही गोष्टीबाबत किंवा त्याच्याशी अन्य प्रकारे संबंध असलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत असे इतर अनुदेश देणे.
 

Section 140 POWER OF STATE GOVERNMENT TO PROHIBIT, REGULATE OR CONTROL CONSUMPTION OR USE OF INTOXICANTS ETC., IN PUBLIC PLACE. .सार्वजनिक जागी मादक द्रव्ये वगैरे यांचे सेवन करणे किंवा ती वापरणे यांस मनाई करण्याचा, त्यांचे विनियमन करण्याचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्य शासनाचा अधिकार.

140 Power of State Government to prohibit, regulate or control Consumption or use of intoxicants etc., in public place. .सार्वजनिक जागी मादक द्रव्ये वगैरे यांचे सेवन करणे किंवा ती वापरणे यांस मनाई करण्याचा, त्यांचे विनियमन करण्याचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्य शासनाचा अधिकार..[View all order & notifications]

The State Government may, by general or special order, prohibit, regulate or control, subject to such conditions as may be specified in the order, the consumption or use of any intoxicant or hemp, in any public place.

राज्य शासनास, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशद्वारे कोणत्याही सार्वजनिक जागेत कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग सेवन करणे किंवा वापरणे यास अशा आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीस अधीन राहून मनाई करता येईल, त्याचे विनियमन करता येईल किंवा त्यावर नियंत्रण ठेवता येईल.

Section 141 EMPLOYMENT OF ADDITIONAL POLICE. जादा पोलिसांची नेमणूक करणे.

141 Employment of additional Police. जादा पोलिसांची नेमणूक करणे..[View all order & notifications]

(1)

If the State Government is satisfied that the inhabitants of any area are concerned in the commission or abetment of any of the offences punishable under sections 65, 66, 66 A, 67, 67-A, 67-C, 68, 69 and 70] the State Government may, by notification in the Official Gazette, direct the employment of additional police in that area for such period as it thinks fit.

कलमे 65, 66, 66-अ, 67, 67-1 अ, 67-क, 68, 69 व 70ट या खालील कोणताही अपराध करण्याशी किंवा तो करण्यास प्रोत्साहन देण्याशी कोणत्याही क्षेत्रातील रहिवाशांचा संबंध आहे अशी राज्य शासनाची खात्री झाल्यास, त्यास राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारा योग्य वाटेल अशा मुदतीपर्यंत त्या क्षेत्रातट जादा पोलीस नेमण्यात यावेत असा निदेश देता येईल.
 

(2)

The cost of such additional police shall, if the State Government so directs, be either in whole or in part defrayed by a tax imposed on the persons hereinbelow mentioned, or by a rate assessed on the property of such persons, or both by a tax and by a rate so imposed and assessed, and charged—

(a) either generally on all persons who are in habitants of the local area to which such notification applies; or

(b) specially on any particular section or sections or class orclasses of such persons, and the State Government may direct the proportions in which such tax or rate shall be charged.

Explanation.—For the purposes of this section “inhabitants” shall include persons who themselves or by their agents or servants occupy or hold land or other immovable property within such area and landlords who themselves or by their agents or servants collect rents or revenue direct from rayats or occupiers in such area, notwithstanding that they do not actually reside therein.

अशा जादा पोलिसांचा खर्च राज्य शासनाने तसा निदेश दिल्यास, संपूर्ण किंवा अंशत: खाली नमूद केलेल्या व्यक्तीवर कर बसवून किंवा अशा व्यक्तीच्या मालमत्तेवर पट्टी आकारून किंवा असा कर किंवा पट्टी ही दोन्ही बसवून व आकारून बसविण्यात येईल; असा कर किंवा पट्टी,-

(अ) अशी अधिसूचना ज्या स्थानिक क्षेत्रांस लागू आहे त्या क्षेत्रांतील रहिवासी असलेल्या सामान्यत: सर्व व्यक्तींवर, अथवा

(ब) विशेषत: अशा व्यक्तींच्या विशिष्ट गटावर किंवा गटांवर अथवा वर्गावर किंवा वर्गांवर; आकारण्यात येईल; आणि राज्य शासनास असा कर किंवा अशी पट्टी ज्या प्रमाणात आकारली जाईल ते प्रमाण ठरविण्याविषयी निदेश देता येईल.

स्पष्टीकरण.---- या कलमाच्या प्रयोजनाकरिता ""रहिवासी'' या मध्ये, अशा क्षेत्रात ज्या व्यक्ती स्वत: किंवा आपल्या अभिकत्र्यामार्फत किंवा नोकरांमार्फत जमिनीचा किंवा इतर स्थावर मालमत्तेचा भोगवटा करतात किंवा ती धारण करतात त्या व्यक्तींचा समावेश होते. तसेच तीत, जे जमीन मालक अशा क्षेत्रात प्रत्यक्ष रयतेकडून किंवा जमिनीचा भोगवटा करणा-या व्यक्तीकडून स्वत: किंवा आपल्या अभिकत्र्यामार्फत किंवा नोकरांमार्फत खंड किंवा महसूल वसूल करतात त्यांचा समावेश होतो-मग असे जमीन मालक अशा क्षेत्रात प्रत्यक्ष राहत नसेल तरी हरकत नाही.
 

(3)

It shall be lawful for the State Government to extend for a term not exceeding in any case five years the period for the payment of such tax or rate beyond the period for which such additional police are actually employed.

राज्य शासनास असा कर किंवा पट्टी देण्याची मुदत, अशा जादा पोलिसांची ज्या मुदतीकरिता प्रत्यक्ष नेमणूक झाली असेल त्या मुदतीपलिकडे कोणत्याही बाबतीत पाच वर्षांपेक्षा अधिक नसेल अशा मुदतीपर्यंत वाढविता येईल व राज्य शासनाने तसे करणे हे कायदेशीर असेल.
 

(4)

The provisions of sub-sections (4) to (7) of section 50 of the Bombay Police Act, 1951, shall apply mutadis mutandis to the recovery of such tax or rate.

मुंबई पोलीस अधिनियम, 1951, कलम 50, पोट-कलम (4) ते (7) याच्या तरतुदी योग्य त्या फेरफारासह असा कर किंवा पट्टी वसूल करण्याच्या बाबतीत लागू होतील. 

Section 142 POWER OF COLLECTOR TO CLOSE PLACES WHERE INTOXICANT OR HEMP IS SOLD IN CERTAIN CASES. जेथे मादक द्रव्य किंवा भांग विकली जाते ती ठिकाणे काही बाबतीत बंद करण्याचे जिल्हाधिका-याचे अधिकार.

142 Power of Collector to close places where intoxicant or hemp is sold in certain cases. जेथे मादक द्रव्य किंवा भांग विकली जाते ती ठिकाणे काही बाबतीत बंद करण्याचे जिल्हाधिका-याचे अधिकार..[View all order & notifications]

(1)

If the Collector is of opinion that it is in the interest of public peace to close any place in which any intoxicant or hemp is sold it shall be lawful for the Collector by an order in writing to the person holding a licence for the sale of such intoxicant or hemp to require him to close such place at such time or for such period as may be specified in the order.

ज्या कोणत्याही जागेत कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग विकली जाते ती जागा सार्वजनिक शांततेसाठी बंद करण्यात यावी, असे जिल्हाधिका-याचे मत असल्यास, आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वेळी किंवा अशा मुदतीपर्यंत असा मादक द्रव्य किंवा भांग विकणा-या लायसनदारांना लेखी आदेश देऊन जिल्हाधिका-याने अशा जागा बंद करण्यास, त्यास भाग पाडणे हे कायदेशीर असेल.
 

(2)

If a riot or unlawful assembly is imminent or takes palce it shall be lawful for any Executive Magistrate or Police Officer who is present to direct that such place shall be closed and kept closed for such period as he thinks fit and in the absence of any Executive Magistrate or Police Officer the person referred to in sub-section (1) shall himself close such place.

जर दंगा किंवा बेकायदेशीर जमाव जमण्याची तात्कालिक भीती असेल किंवा असा दं गा किंवा असा बेकायदेशीर जमाव जमला असेल तर उपस्थित असलेल्या कार्यकांरी दंडाधिका-यास किंवा पोलीस अधिका-यास, अशी जागा बंद करण्यात यावी आणि त्यास योग्य वाटेल त्या मुदतीपर्यंत ती बंद ठेवण्यात यावी असा निदेश देता येईल व त्याने तसे करणे हे कायदेशीर असेल आणि कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या अनुपस्थितीत, पोट-कलम (1) मध्ये निर्दिष्ट केलेली व्यक्ती स्वत: ती जागा बंद करील.
 

(3)

Any order given under this section shall be final.

या कलमान्वये देण्यात आलेला आदेश अंतिम असेल.

Section 143 POWER OF STATE GOVERNMENT TO MAKE RULES. राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार.

143 Power of State Government to make rules. राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार..[View all order & notifications]

(1)

The State Government may make rules for the purpose of carrying outthe provisions of this Act or any other law for the time being in force relating to excise revenues.

राज्य शासनास, या अधिनियमाच्या तरतुदी किंवा उत्पादनशुल्क महसुलासंबंधीचा त्या त्या वेळी अंमलात असलेला कोणताही इतर कायदा अंमलात आणण्याकरिता नियम करता येतील.

(2)

In particulars and without prejudice to the generality of the foregoing provisions, the State Government may make rules,—

(a) regulating the delegation of any powers by the Commissioner, by Collector or by any other Prohibition Officer ;

(b) regulating the import, export, transport, collection, sale purchase bottling, consumption, use or possession of any intoxicant, denatured spirituous preparation] or hemp, mhowra flowers or molasses;

(c) regulating the manufacture of any intoxicant 8[or denatured spirituous preparation];

(d) regulating the cultivation and collection of hemp;

(e) regulating the tapping of toddy- producing trees and drawing of toddy therefrom;

(f) regulating the grant, suspension or cancellation of licences, permits, passes or authorizations for the import, export, transport Collection, sale, purchase, possession, manufacture bottling, consumption, use or cultivation of any of the above articles mentioned in clause (b) and for the matters specified in clause(e);

(g) regulating the periods and localities for which the licences may be granted for the wholesale or retail vend of any of the above articles mentioned in clause (b);

(h) providing for the consulting of public opinion and prescribing theprocedure to be followed and the matters to be ascertained before any licence, permit,pass or authorization for the vend, consumption or use of any of the above articles mentioned in clause (b) is granted to any person or in any locality;

(h1) prescribing the restrictions under which and the conditions on which any licence, permit pass or authorization may be granted including—

(i) the prohibition of the admixture with any intoxicant of any substance deemed to be noxious or objectionable;

(ii) the fixing of the strength, price or quantity in excess of or below which any intoxicant or mhowra flowers shall not be sold or supplied, and the quantity in excess of which denatured spirit, denatured spirituous preparation or molasses shall not be possessed or sold and the prescription of a standard or quality for any intoxicant denatured spirituous preparation, mhowra flowers or molasses;

(iii) the prohibition of sale of any intoxicant, denatured spirituous preparation or hemp except for cash;

(iv) the prescription of the days and hours during which any licensed premises may or may not be kept open and provisions for the closure of such premises on special occasions;

(v) the prescription of the nature of the premises on which any intoxicant may be sold and the notices to be exposed at such premises;

(vi) the prescription of the accounts to be maintained and the returns to be submitted by licence-holders or permit-holders;

(vii) the regulation or prohibition of the transfer of licenses;

(viii) the writing of the names and addresses and the taking of signatures of purchasers in the register of sale of any intoxicant, hemp, mhowra flowers or molasses or any article the sale or purchases of which is regulated by clause (b)of sub-section (1) of section 139;

(h2) (i) declaring the processes by which spirits shall be denatured in particulars areas, or for particulars purposes;

(ii) for causing such spirits to be denatured through the agency or under the supervision of the Government Officers and for the payments of charges for such supervision;

(iii) for ascertaining whether such spirits have been denatured.

(i) Prohibiting and regulation the employment by the licence- holder of any person or classes of persons to assist him in his business in any capacity whatsoever ;

(j) prescribing the manner in which the juice from a coconut, brab, date or any kind of palm trees is to be treated for the purpose of preventing fermentation;

(k) prescribing the persons or classes of persons to whom any intoxicant, denatured spirituous preparation, hemp, mhowra flowers or molasses may or may not be sold or who may or may not be allowed to sell, purchase or use any of these articles;

(l) for the prevention of drunkenness, gambling or disorderly conduct in or near any licensed premises and the meeting and remaining of persons of bad character on such premises;

(l1) Prescribing the occasions on which special orders may be granted for the sale by retail of larger quantities or liquor or intoxicating drugs, or opium than those which are prescribed in any notification issued under this Act and the conditions on which such sales may be made;

(l2) prescribing the amount of security to be deposited by the holder of any licence, permit, pass or authorization for the performance of the conditions for the same ;

(l3) provibing for the maintenance by the holders of licences, permits, passes or authorizations of the registers of sales, purchases, possession, consumption or use and the particulars to be entered in the register;

(m) regulating the grant of rewards or expenses to officers, informants, or persons giving information or assistance in the detection or investigation of offences under this Act, and of compensation to persons charged with offences punishable under this Act and aquited;

(n) regulating the printing, publishing or otherwise displaying or distributing any advertisement or other matter  soliciting the use of, or offering any intoxicant or hemp or calculated to encourage or incite any individual or class of individuals or the public generally to commit an offence under this Act or to commit a breach or evade the provisions of any rule or order made thereunder or the conditions of any licence, permit, pass or authorization issued thereunder ;

(o) regulating within the State the circulation, distribution or sale of newspaper news-sheet, book, leaflet, booklet, or other publication printed and published] outside the State containing any advertisement or matter which 3 *  *  * solicits the use of, or offers any intoxicant, or hemp 

(p) imposing restrictions and conditions on buyers of intoxicant, denatured spirituous preparation, hemp, mhowra flowers or molasses or any article the purchase of which is regulated by clause (b) of sub-section (1) of section 139 including provision forcompelling them to sign entries pertaining to the purchase by them of any of these article;

(r) regulating the taking of samples of molasses;

(r1) prescribing the Constitution of Committees, Boards and Medical Boards or panels thereof and the procedure regarding their work ;

(s) Prescribing the powers, function and duties of Prohibition Officers, boards, Committee and Medical Boards or panels thereof and the fees and allowances payable to the members of the boards, Committee and Medical Boards or panels thereof;

(t) prescribing the procedure regarding the work of the Board of Experts ;

(t1) prescribing conditions of through transport under section 29;

(u) prescribing the fees (including rent or consideration) payable in respect of any privilege, licence, permit, pass or authorization granted or issued under this Act;

(uu) prescribing the other persons, other institutions or the circumstances under clause (b) of sub-section (3) of section 66;

(v) prescribing the period within which and the form in which a declaration under section 107A shall be submitted and the account shall be maintained;

(w) prescribing the manner of collecting and forwarding blood and prescribing the form of certificates, and the other particulars required to be stated therein under sub-section (2) of section 129A

(x) prescribing the form of application, the mode of submitting the application and manner of verification of authenticity of the applicants under clause (b) of sub-section (2) of section 134A;

(y) prescribing the eligibility for the appointment as a member of the Gram Rakshak Dal under sub-section (4) of section 134A;

(z) prescribing the duties and responsibilities of the members of Gram Rakshak Dal under sub-section (7) of section 134A.

 विशेषकरून व वरील तरतुदीच्या सर्वसाधारणतेस बाध येऊ न देता राज्य शासनास पुढील गोष्टींसाठी नियम करता येतील,----

(अ) आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा कोणताही इतर दारूबंदी अधिकारी यांना कोणताही अधिकार सोपवून देणे यांचे विनियम करणे ;

(ब) कोणतेही मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ किंवा भांग, मोहाची फुले किंवा काकवी यांची आयात करणे, निर्यात करणे, परिवहन करणे, ती गोळा करणेट, तिची विक्री करणे, खरेदी करणे, बाटलीत भरणेट तिचे सेवन करणे ती वापरणे किंवा जवळ बाळगणे यांचे विनियमन करणे ;

(क) कोणतेही मादक द्रव्य किंवा विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ तयार करण्याचे यांचे विनियमन करणे ;

(ड) भांगेची लागवड करणे व ती गोळा करणे यांचे विनियम करणे ;

(ई) ताडी देणारी झाडे छेदणे व त्यापासून ताडी काढणे यांचे विनियमन करणे ;

(फ) खंड (ब) मध्ये नमूद केलेल्या वरील पदार्थांपैकी कोणत्याही पदार्थाची आयात करणे, निर्यात करणे, परिवहन करणे, ते गोळा करणे, त्यांची विक्री करणे, ते खरेदी करणे, जवळ बाळगणे, तयार करणे, बाटलीत भरणेट त्याचे सेवन करणे, ते वापरणे किंवा त्यांची लागवड करणे यासाठी आणि खंड (ई) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या गोष्टीसाठी, लायसने, परवाने, पास किंवा प्राधिकारपत्रे देणे, तहकूब करणे, किंवा रद्द करणे यांचे विनियम करणे ;

(ग) खंड (ब) मध्ये नमूद केलेल्या वरील पदार्थांपैकी कोणत्याही पदार्थाची घाऊक किंवा किरकोळ विक्री करण्याकरिता ज्या मुदतीसाठी व ज्या विभागासाठी लायसने देता येतील त्या मुदती व ते विभाग याबाबत नियमन करणे ;

(ह) कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही विभागात खंड (ब) मध्ये नमूद केलेल्या वरील पदार्थांपैकी कोणत्याही पदार्थाची विक्री करण्यासाठी, सेवन करण्यासाठी किंवा वापर करण्यासाठी, कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र देण्यापूर्वी लोकमत विचारात घेण्यासाठी तरतूद करणे आणि अनुसरावयाची कार्यपद्धती व ज्या गोष्टीसंबंधी खात्री करून घ्यावयाची त्या गोष्टी विहित करणे ;

(ह-1) जे निर्बंध घालून व ज्या शर्तीवर कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र देता येईल ते निर्बंध व त्या त्या शर्तीं विहित करणे; यात पुढील गोष्टींचा समावेश होतो :----

(एक) उपद्रवकारक किंवा आक्षेपार्ह म्हणून समजण्यात येणा-या कोणत्याही पदार्थाचे कोणत्याही मादक द्रव्याबरोबर अवमिश्रण करण्यास प्रतिबंध करणे ;

(दोन) ज्या तीव्रतेपेक्षा, किंमतीपेक्षा किंवा परिमाणापेक्षा अधिक किंवा कमी तीव्रता, किंमत किंवा परिमाण असलेले कोणतेही मादक द्रव्य किंवा मोहाची फुले विकणार नाही किंवा त्यांचा पुरावठा करणार नाही. ती तीव्रता, किंमत किंवा परिमाण ठरविणे आणि ज्या परिमाणापेक्षा अधिक विप्रकृत मद्यसार विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ किंवा काकवी जवळ बाळगणार नाही, ते परिमाण ठरविणे आणि कोणतेही मादक, द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, मोहाची फुले किंवा काकवी ज्या दर्जाची असली पाहिजे ते प्रमाण विहित करणे ;

(तीन) रोख पैसे घेतल्यावाचून कोणत्याही मादक द्रव्याची विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थाची किंवा भांगेची विक्री करण्यास मनाई करणे ;

(चार) कोणतेही लायसन दिलेली जागा ज्या दिवशी व ज्या वेळांच्या दरम्यान उघडी ठेवता येईल किंवा उघडी ठेवता येणार नाही ते दिवस व त्या वेळा विहित करणे आणि विशेष प्रसंगी अशा जागा बंद करण्यासाठी तरतूद करणे ;

(पाच) ज्या जागेत कोणतेही मादक द्रव्य विकता येईल त्या जागेचे स्वरूप व अशा जागी लावावयाच्या नोटिसा विहित करणे ;

(सहा) लायसन किंवा परवाना धारण करणा-या व्यक्तीनी ठेवावयाचे हिशेब व सादर करावयाची पत्रके विहित करणे ;

(सात) लायसनच्या हस्तांतरणाचे विनियमन करणे किंवा अशा हस्तांरणास मनाई करणे ;

(आठ) कोणत्याही मादक द्रव्याच्या, भांगेच्या, मोहाच्या फुलांच्या किंवा काकवीच्या किंवा ज्या कोणत्याही पदार्थाची विक्री किंवा खरेदी ही, कलम 139, पोट-कलम (1), खंड (ब) द्वारे विनियमित करण्यात आली आहे त्या कोणत्याही पदार्थांच्या विक्रीबाबत असलेल्या नोंदवहीत खरेदीदरांची नावे व पत्ते लिहिणे व त्यांच्या सह्रा घेणे ;

(ह-2) (एक) विशिष्ट क्षेत्रात किंवा विशिष्ट कारणांकरिता ज्या प्रक्रिया करून मद्यसार विप्रकृत करता येईल त्या प्रक्रिया जाहीर करणे ;

(दोन) अभिकत्र्यामार्फत किंवा राज्य शासनाच्या अधिका-यांच्या पर्यवेक्षणाखाली असे मद्यसार विप्रकृत करविणे, आणि अशा पर्यवेक्षणासाठीचा खर्च ठरविणे ;

(तीन) असे मद्यसार विप्रकृत केले आहे किंवा कसे हे निश्चित करणे ;

(आय) लायसन धारण करणा-या व्यक्तीने आपल्या धंद्यात सहाय्य करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींच्या वर्गास कोणत्याही नात्याने कामावर लावण्यास मनाई करणे व त्याचे विनियमन करणे ;

(जे) नारळीच्या, शिंदीच्या, खजुरीच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या ताडाच्या झाडापासून काढलेल्या रसावर तो आंबू नये म्हणून ज्या रीतीने क्रिया करावयाची ती रीत विहित करणे ;

(के) ज्यांना कोणतेही मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग, मोहाची फुले किंवा काकवी विकण्यात येईल किंवा विकण्यात येणार नाही किंवा ज्यांना यांपैकी एखादा पदार्थ विकण्याची, खरेदी करण्याची किंवा उपयोग करण्याची परवानगी देण्यात येईल किंवा देण्यात येणार नाही अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे वर्ग विहित करणे ;

(ल) कोणत्याही लायसन दिलेल्या जागेत किंवा जागेजवळ दारू पिऊन धुंद होण्यास, जुगार खेळण्यास किंवा गैरशिस्त वर्तन करण्यास किंवा अशा जागी वाईट चालीचे लोक जमण्यास व ते तेथे राहू देण्यास प्रतिबंध करणे ;

(ल-1) या अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या कोणत्याही अधिसूचनेत विहित केलेल्या व्यतिरिक्त इतर प्रकारच्या दारूची किंवा इतर प्रकारच्या मादक औषधीद्रव्यांची किंवा अफूची ज्याप्रसंगी किरकोळीने मोठ¬ा प्रमाणात विक्री करण्यासाठी विशेष आदेश देता येतील ते प्रसंग आणि ज्या शर्तीवर अशी विक्री करता येईल त्या शर्ती विहित करणे ;

(ल-2) कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणा-या व्यक्तीने अशा लायसनातील, परवान्यातील, पासातील किंवा प्राधिकारपत्रातील शर्ती पार पाडण्याकरिता ठेवावयाच्या तारणांची रक्कम विहित करणे ;

(ल-3) लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्रे धारण करणा-यांनी विक्री करणे, खरेदी करणे, जवळ बाळगणे, सेवन करणे किंवा वापरणे यासंबंधी नोंदवह्रा ठेवणे आणि अशा नोंदवह्रात तपशील दाखल करणे याबाबत तरतूद करणे ;

(म) या अधिनियमाखालील अपराधासंबंधी चौकशी व तपास करणारे अधिकारी व माहिती देणा-या व सहाय्य करणा-या व्यक्ती यांना बक्षिसे व खर्च देणे आणि या अधिनियमांन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधांचा ज्या व्यक्तींवर आरोप ठेवण्यात आला असेल व ज्यास दोषमुक्त करण्यात आले असेल, त्यास नुकसानभरपाई देणे याबाबींचे विनियमन करणे ;

(न) ज्याद्वारे कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यात येते किंवा असे द्रव्य किंवा भांग देऊ करण्यात येते अथवा ज्याद्वारे, कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीस किंवा सर्वसामान्य लोकांस या अधिनियमाखालील अपराध करण्यास किंवा तद्न्वये केलेल्या कोणत्याही नियमांची तरतूद किंवा तद्न्वये दिलेला कोणताही आदेश किंवा तद्न्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यांच्या शर्ती यांचा भंग करण्यास किंवा त्या टाळण्यास हेतूपूर्वक उत्तेजन किंवा चिथावणी देण्यात येत आहे अशी कोणतीही जाहिरात किंवा इतर मजकूर छापणे, प्रसिद्ध करणे अथवा अशी जाहिरात अन्यथा प्रदर्शित करणे किंवा वाटणे अथवा असा मजकूर प्रदर्शित करणे किंवा प्रस्तुत करणे यांचे विनियमन करणे ;

(ओ) ज्याद्वारे कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यात येत आहे किंवा असे द्रव्य किंवा भांग देऊ करण्यात येत आहे अशी कोणतीही जाहिरात किंवा मजकूर असलेले राज्याबाहेर छापलेले व प्रसिद्ध केलेलेट वर्तमानपत्र, वृत्तपत्र, पुस्तक, पत्रक, पुस्तिका किंवा इतर प्रकाशन यांचा प्रसार वाटप किंवा विक्री यांचे राज्यातट विनियमन करणे.

(प) मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग, मोहाची फुले किंवा काकवी किंवा कलम 139 चे पोट-कलम (1) खंड (ब) अन्वये ज्यांची खरेदी विनियमित करण्यात आली आहे अशी कोणतीही वस्तू खरेदी करणा-या व्यक्तींवर निर्बंध व शर्ती घालणे; यात त्याने खरेदी केलेल्या या कोणत्याही वस्तुसंबंधीच्या नोंदीत त्यांना सही करण्यास भाग पाडण्याबाबत तरतुदीचा समावेश होतो ;

(र) काकवीचे नमुने घेण्याचे विनियमन करणे ;

(र-1) समित्या, मंडळे व वैद्यकीय मंडळे यांची रचना किंवा त्यांची नामिका व त्यांची कार्यपद्धती विहित करणे;

(स) दारूबंदी अधिकारी, मंडळे, समित्याट व वैद्यक मंडळे व त्यांच्या नामिका यांचे अधिकार, कामे व कर्तव्ये विहित करणे तसेच मंडळाच्या, समित्यांच्याट व वैद्यक मंडळाच्या व त्याच्या नामिकांच्याट सदस्यास द्यावयाची फी व भत्ते विहित करणे ;

(ट) तज्ञ मंडळाच्या कामासंबंधी कार्यपद्धती विहित करणे ;

(ट-1) कलम 29 अन्वये थेट वाहतुकीच्या शर्ती विहित करणे ;

(यु) या अधिनियमान्वये दिलेला कोणताही विशेष अधिकार, लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यासंबंधी द्यावयाची फी (भाडे किंवा मोबदला यांसह)ट विहित करणे ; (युयु) कलम 66, पोट-कलम (3), खंड (ब) अन्वये इतर व्यक्ती, इतर परिसंस्था किंवा परिस्थिती विहित करणे ;

(व्ही) कलम 107-अ अन्वये ज्या मुदतीच्या आत व ज्या नमुन्याप्रमाणे पत्रक सादर केले पाहिजे ती मुदत व तो नमुना आणि ज्या नमुन्याप्रमाणे हिशेब ठेवले पाहिजेत तो नमुना विहित करणे ;
(डब्ल्यू) रक्त काढून घेण्याची या पाठविण्याची पद्धती विहित करणे आणि प्रमाणपत्रांचा नमुना व त्यात कलम 129-अ, पोट-कलम (2) अन्वये नमूद
करणे आवश्यक असलेला इतर तपशील विहित करणे.

(क्ष) कलम 134अ च्या पोट-कलम (2) च्या खंड (ब) अन्वये अर्जाचा नमुना, अर्ज सादर करण्याची पद्धत आणि अर्जदारांच्या खरेपणाच्या पडताळणीची रीत विहित करणे ;

(य) कलम 134अ च्या पोट-कलम (4) अन्वये ग्राम रक्षक दलाचा सदस्य म्हणून नियुक्तीसाठीची पात्रता विहित करणे ;

(ज्ञ) कलम 134अ च्या पोट-कलम (7) अन्वये ग्राम रक्षक दलाच्या सदस्यांची कर्तव्ये व जबाबदा-या विहित करणे.
 

(3)

The power to make rules under this section shall be subject to the condition of previous publication :

Provided that any such rules may be made without previous publication if the State Government considers that they should be brought into force at once.

त्या कलमान्वये नियम करण्याचा अधिकार पूर्वप्रसिद्धीच्या अधीन असले :

परंतु, असे कोणतेही नियम ताबडतोब अंलमात आणले पाहिजेत असे राज्य शासनास वाटल्यास ते पूर्वप्रसिद्धी न देता करता येतील.
 

(4)

All rules made under this Act shall be laid for not less than thirty days before each House of the State Legislature as soon as may be after they are made, and shall be subject to such modifications as the State Legislature may make during the session in which they are so laid or the session immediately following.

या अधिनियमान्वये केलेले सर्व नियम, ते केल्यानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधान मंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे, तीस दिवसांहून कमी नसेल इतक्या मुदतीपर्यंत, ठेवण्यात येतील आणि ते, ज्या अधिवेशनात अशा रीतीने ठेवण्यात आले असतील त्या अधिवेशनात किंवा त्याच्या लगतनंतरच्या अधिवेशनात राज्य विधानमंडळ जे फेरफार करील त्यास अधीन असतील. 

Section 144 COMMISSIONER'S POWER TO MAKE REGULATIONS

144 Commissioner's Power to make Regulations.[View all order & notifications]

(1)

The Commissioner] may make regulations, not inconsistent with the provision of this Act, or rules,—

(a) regulating, as the case may be, the  supply or storage of any intoxicant denatured spirituous preparation or hemp, mhowra flowers or molasses including—

(i) the erection, inspection, supervision, management and control of any place for the manufacture, supply or storage of such article, and the fittings implements and apparatus to be maintained therein;

(b) regulating the depositing of any intoxicant, hemp,  mhowra flowers or molasses in a warehouse and the removal of such articles from any such warehouse or from any distillery or brewery;

(d) prescribing the scale of fees including rent or consideration or the manner of fixing the fees payable in respect of any storage of any intoxicant,hemp, mhowra flowers or molasses;

(e) regulating the time, place and manner of payment of any duty or fees;

(h) providing for the destruction or other disposal of any intoxicant declared to be unfit for use;

(i) regulating the disposal of confiscated or forfeited articles;

(m) regarding any other matter which the State Government may by notification in the Official Gazette, direct him to prescribe for the purposes of carrying out the provisions of this Act.

आयुक्तास पुढील गोष्टीसाठी, या अधिनियमाच्या तरतुदी किंवा नियम यांच्याशी विसंगत नसतील असे विनियम करता येतील,----

(अ) कोणतेही मादक द्रव्य विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ किंवा भांग, मोहाची फुले किंवा काकवी यांचा यथास्थिति, पुरवठा करणे किंवा ती साठविणे यांचे विनियमन करणे ; यात पुढील गोष्टींचा समावेश होतो :----

(एक) असे पदार्थ तयार करण्यासाठी, त्यांचा पुरवठा करण्यासाठी किंवा साठविण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही जागा आणि त्यातील जोडकामे, साधने व उपकरणे ही बांधणे, त्यांची तपासणी करणे, त्यावर देखरेख ठेवणे, त्यांची व्यवस्था पाहणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ;

(ब) कोणतेही मादक द्रव्य, भांग मोहाची फुले किंवा काकवी वखारीत ठेवणे आणि असे पदार्थ अशा कोणत्याही वखारीतून अथवा कोणत्याही दारूच्या भट्टीतून किंवा दारू गाळण्याच्या कारखान्यातून काढून नेणे याचे विनियमन करणे ;

(ड) कोणतेही मादक द्रव्य, भांग मोहाची फुले किंवा काकवी यांच्या कोणत्याही साठ¬ासंबंधी द्यावयाच्या फीचे प्रमाण (भाडे किंवा मोबदला यांसह) किंवा ज्या रीतीने अशी फी ठरविली पाहिजे ती रीत विहित करणे ;

(ई) कोणतेही शुल्क किंवा फी देण्याची वेळ, जागा व रीत यांचे विनियम करणे ;

(ह) वापरण्यासाठी अयोग्य म्हणून जाहीर केलेले कोणतेही मादक द्रव्य नष्ट करणे किंवा त्याचा इतर प्रकारे विल्हेवाट लावणे यांसाठी तरतूद करणे ;

(आय) जप्त केलेल्या किंवा सरकारजमा केलेल्या वस्तुंची विल्हेवाट लावण्याचे विनियम करणे ;

(म) राज्य शासन, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्याकरिता जी कोणतीही इतर गोष्ट विहित करण्याविषयी त्यास निदेश देईल ती गोष्ट ;
 

(2)

The regulations made under this section shall be published in the Official Gazette.

या कलमान्वये केलेले विनियम राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील.

Section 145 OFFICERS AND PERSONS ACTING UNDER THIS ACT TO BE PUBLIC SERVANTS. या अधिनियमान्वये काम करणारे अधिकारी व व्यक्ती लोकसेवक असणे.

145 Officers and persons acting under this Act to be public servants. या अधिनियमान्वये काम करणारे अधिकारी व व्यक्ती लोकसेवक असणे..[View all order & notifications]

All officers and persons empowered to exercise any powers or to perform any function under this Act  shall be deemed to be public servants within the meaning of section 21 of the Indian Penal Code.

या अधिनियमान्वये कोणतेही अधिकार चालविण्यासाठी किंवा कोणतीही कामे पार पाढण्यासाठी अधिकार दिलेले सर्व अधिकारी व व्यक्ती या, भारतीय दंड संहिता, कलम 21 च्या अर्थांनुसार लोकसेवक आहेत असे मानण्यात येतील.
 

Section 146 BAR OF PROCEEDINGS. कारवाई करण्यास मनाई.

146 Bar of Proceedings. कारवाई करण्यास मनाई..[View all order & notifications]

No suit or proceeding shall lie against the Government or against any Prohibition, Police, or other officers or against any person empowered to exercise powers or to perform functions under this Act, for anything in good faith done or purporting to be done under this Act.

शासनाविरूध्द किंवा कोणत्याही दारूबंदी अधिका-याविरुद्ध, पोलीस अधिका-याविरुद्ध किंवा इतर अधिका-याविरुद्ध किंवा या अधिनियमान्वये अधिकार वापरण्यासाठी किंवा कामे पार पाडण्यासाठी अधिकार दिलेल्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध, या अधिनियमान्वये सद्भावनापूर्वक केलेल्या किंवा करण्याचा आशय असलेल्या कोणत्याही कृत्याबद्दल कोणताही दावा किंवा कार्यवाही चालविता येणार नाही. 

Section 146 A LIMITATION OF PROSECUTIONS SUITS AGAINST OFFICERS. अधिका-यांविरुद्ध करावयाच्या खटल्यांची किंवा दाव्यांची मुदत.

146 A Limitation of prosecutions suits against officers. अधिका-यांविरुद्ध करावयाच्या खटल्यांची किंवा दाव्यांची मुदत..[View all order & notifications]

(1)

All Prosecutions of any Prohibition, Police or other officers, or of any persons empowered to exercise powers or to perform functions under this Act, and all actions which may be lawfully brought against the Government or any of the aforesaid officers or persons, in respect of anything done or alleged to have been done in pursurance of this Act, shall be instituted within four months from the date of the act complained of and not afterwards; and any such action shall be dismissed—

(a) if the plaintiff does not prove that, previously to bringing such action he has presented all such appeals allowed by this Act, or any other law for the time being in force as within the aforesaid period of four months it was possible to present; or

(b) in the case of an action for damages, if tender of sufficient amends shall have been made before the action was brought, or if after the institution of the action a sufficient sum of money is paid into Court with costs, by or on behalf of the defendant.

या अधिनियमास अनुसरून केलेल्या किंवा करण्यात आल्याचे समजण्यात येणा-या अधिका-याविरुद्ध करावयाच्या खटल्यांची किंवा दाव्याची मुदत कोणत्याही कृत्याच्यासंबंधात कोणताही दारूबंदी अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा इतर अधिकारी यांच्याविरुद्ध किंवा या अधिनियमान्वये अधिकार वापरण्यासाठी किंवा कामे पार पाडण्यासाठी अधिकार दिलेल्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध चालवावयाचे सर्व खटले आणि शासनविरुद्ध किंवा उपरोक्त कोणत्याही अधिका-याविरुद्ध कायदेशीररीत्या चालविण्यात येऊ शकतील अशा सर्व कारवाया या, ज्यासंबंधी तक्रार करण्यात आली ते कृत्य ज्या दिनांकास घडले त्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत दाखल करण्यात येतील आणि त्यानंतर त्या दाखल करता येणार नाहीत; तसेच अशी कोणतीही कारवाई पुढील कारणांवरून काढून ठेवण्यात येईल-

(अ) अशी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी उपरोक्त चार महिन्यांच्या अवधीत वादीस, या अधिनियमान्वये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये जी कोणतीही अपिले सादर करता आली असती ती अपिले त्याने सादर केली होती असे त्याने सिद्ध करून दाखविले नाही तर, किंवा

(ब) नुकसानभरपाईसाठी केलेल्या कारवाईच्या बाबतीत, कारवाई दाखल करण्यापूर्वीच भरपाईची पुरेशी रक्कम दिलेली असेल तर किंवा कारवाई
दाखल केल्यानंतर प्रतिवादीने किंवा त्याच्या वतीने न्यायालयात खर्चासह पुरेशी रक्कम भरली असेल तर.
 

(2)

Subject to the Provisions of section 197 of the Code of Criminal Procedure no Court shall take cognizance of an offence committed or alleged to have been committed by any Prohibition, Police or other officer or any person empowered to exercise powers or to perform functions under this Act, in regard to anything done under this Act, until the sanction of the Collector having jurisdiction has been obtained.

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 कलम 197 च्या तरतुदींना अधीन राहून, कोणताही दारूबंदी अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा इतर अधिकारी किंवा या अधिनियमान्वये अधिकार वापरण्यास किंवा कामे पार पाडण्यास प्राधिकृत करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती यांनी, या अधिनियमाखालील कोणत्याही गोष्टींच्या संबंधात, या अधिनियमान्वये केलेल्या किंवा केल्याचे मानण्यात आलेल्या कोणत्याही अपराधाची, क्षेत्राधिकार असलेल्या जिल्हाधिका-याची मान्यता मिळेपर्यंत, कोणतेही न्यायालय दखल घेणार नाही.
 

Section 146 B PROVISIONS OF ACT NOT TO APPLY TO GOVERNMENT. अधिनियमाच्या तरतुदी शासनाला लागू नसणे.

146 B Provisions of Act not to apply to Government. अधिनियमाच्या तरतुदी शासनाला लागू नसणे..[View all order & notifications]

Save in so far as may be expressly provided in any rule, regulation or order made under this Act, nothing in this Act shall apply in respect of any intoxicant, denatured spirituous preparation hemp, mhowra flowers or molasses which are the property and in the possession of the Government.

या अधिनियमान्वये करण्यात आलेला कोणताही नियम, विनियम किंवा आदेश यात स्पष्टपणे जेथवर तरतूद करण्यात आली असेल ती खेरीजकरून या अधिनियमातील कोणताही मजकूर शासनाची मालमत्ता असलेल्या व शासनाच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही मादक द्रव्यास, विप्रकृत मद्यासारयुक्त सिद्धपदार्थास, भांगेस, मोहाच्या फुलांस किंवा काकवीस लागू असणार नाही. 

Section 147 PROVISIONS OF THIS ACT NOT TO APPLY TO IMPORT OR EXPORT ACROSS CUSTOMS FRONTIER. या अधिनियमाच्या तरतुदी शुल्क सीमांत ओलांडून केलेल्या आयातीस किंवा निर्यातीस लागू नसणे.

147 Provisions of this Act not to apply to import or export across customs frontier. या अधिनियमाच्या तरतुदी शुल्क सीमांत ओलांडून केलेल्या आयातीस किंवा निर्यातीस लागू नसणे..[View all order & notifications]

For removal of doubts it is hereby declared that nothing in this Act shall be deemed to apply to any intoxicant or other article in respect of its import or export across the customs frontiers. 

शंकांचे निरसन व्हावे म्हणून याअन्वये असे जाहीर करण्यात येते की, या अधिनियमातील कोणतीही तरतूद शुल्क सीमांत ओलांडून जे कोणतेही मादक द्रव्य किंवा इतर द्रव्य आयात किंवा निर्यात करण्यात येते त्याबाबतीत लागू होते असे समजण्यात येणार नाही.

 

Section 148 REPEAL AND AMENDMENTS. निरसन आणि सुधारणा.

148 Repeal and Amendments. निरसन आणि सुधारणा..[View all order & notifications]

(1)

The enactments specified in Schedule I are hereby repealed to the extent specified in the fourth column thereof and those specified in Schedule are hereby amended to the extent specified in the fourth column thereof.

अनुसूची एक मध्ये विनिर्दिष्ट केलेले अधिनियम हे उक्त अनुसूचीच्या चौथ्या स्तंभात विनिर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत या अन्वये रद्द करण्यात आले आहेत आणि अनुसूची दोन मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिनियमात त्या अनुसूचीच्या चौथ्या स्तंभात विनिर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत या अन्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

(2)

But nothing in this Act or any report or amendment made thereby shall affect or be deemed to affect—

(i) any right, title obligation or liability already acquired, accrued or incurred before the commencement of this Act;

(ii) any legal proceeding or remedy in respect of any right, title interest obligation or liability or anything done or suffered before the commencement of this Act and any such proceeding shall be continued and disposed of, as if this Act was not passed;

(iii) the levy of any duties under section 29A of the Bombay Abkari Act, 1878, and the recovery of any duties or fees leviable under any other provisions of the Acts hereby repealed, and all such duties or fees shall be levied or recovered, as the case may be, as if this Act was not passed.

परंतु या अधिनियमातील कोणतीही तरतूद किंवा या अधिनियमान्वये जो कोणताही अधिनियम किंवा तरतूद रद्द करण्यात किंवा सुधारण्यात आली असेल त्यामुळे----

(एक) हा अधिनियम अमलात येण्यापूर्वी संपादन केलेला किंवा प्राप्त झालेला कोणताही हक्क किंवा स्वामित्व अथवा प्राप्त झालेले किंवा पत्करलेले कोणतेही बंधन किंवा दायित्व यांस बाध येणार नाही किंवा बाध येतो असे समजण्यात येणार नाही.

(दोन) अशा हक्काच्या, स्वामित्वाच्या, हितसंबंधाच्या, बंधनाच्या किंवा दायित्वाच्या संबंधातील कोणत्याही कायदेशीर कारवाईस किंवा उपाययोजनेस अथवा हा अधिनियम अमलात येण्यापूर्वी केलेल्या किंवा करून दिलेल्या कोणत्याही गोष्टीस बाध येणार नाही किंवा बाध येतो असे समजण्यात येणार नाही आणि हा अधिनियम जणू संमत करण्यात आला नव्हता असे समजून कोणतीही अशी कारवाई पुढे चालविण्यात येईल व त्याप्रमाणे ती निकालात काढण्यात येईल ;

(तीन) मुंबई अबकारी अधिनियम, 1878, कलम 29-अ अन्वये कोणतीही शुल्के बसविण्यात आणि या अन्वये रद्द करण्यात असलेल्या अधिनियमाच्या कोणत्याही इतर तरतुदींअन्वये बसवावयाची कोणतीही शुल्के किंवा फी यांच्या वसुलीस बाध येणार नाही किंवा बाध येतो असे समजण्यात येणार नाही आणि हा अधिनियम जणू संमत करण्यात आला नव्हता असे समजून अशी सर्व शुल्के किंवा फी च्या रकमा, यथास्थिति, बसविण्यात किंवा वसूल करण्यात येतील.

(3)

Any appointment, notification notice, order rule or form made or issue under any of the enactments repealed by this Act shall continue to be in force and deemed to have been made, granted or issued under the provisions of the Act, in so far as such appointment notification, notice order, rule or form is not inconsistent with the provisions of this Act, unless and until it is supersede by any appointment notification notice, order rule or form made or issued under this Act, notwithstanding the fact that the authority competent to make or issue such notification, notice, order, rule or form is different from that authorized in the enactments repealed and notwithstanding also that such notification notice, order, rule or form was made or issued in a different form or name.

प्रस्तुत अधिनियमान्वये निरसित करण्यात आलेल्या अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमान्वये केलेली कोणतीही नेमणूक, काढलेली कोणतीही अधिसूचना अथवा दिलेली कोणतीही नोटीस किंवा आदेश, केलेला नियम किंवा नमुना ही, प्रस्तुत अधिनियमाच्या तरतुदीशी विसंगत नसतील तेथवर अमलात असण्याचे चालू राहील आणि ती प्रस्तुत अधिनियमाच्या तरतुदीअन्वये करण्यात, काढण्यात किंवा देण्यात आली आहे, असे समजण्यात येईल ; आणि या अधिनियमान्वये दिलेली, अशी काढलेली किंवा दिलेली कोणतीही नेमणूक, अधिसूचना, नोटीस, आदेश, नियम किंवा ही प्रस्तुत अधिनियमान्वये अधिक्रमित करण्यात आली नसतील तर व अधिक्रमित करण्यात येईपर्यंत, तशीच अमलात असण्याचे चालू राहील.मग अशी अधिसूचना, नोटीस, आदेश, नियम किंवा नमुना करण्यास, काढण्यास किंवा देण्यास सक्षम असलेला प्राधिकारी निरसित केलेल्या अधिनियमान्वये प्राधिकृत केलेल्या प्राधिका-याहून भिन्न असला तरी सुद्धा हरकत असणार नाही. तसेच अशी अधिसूचना, नोटीस, आदेश, नियम किंवा नमुना ही भिन्न नमुन्याप्रमाणे किंवा भिन्न नावाने करण्यात, काढण्यात किंवा देण्यात आली असली तरीही हरकत असणार नाही.
 

(4)

Any licence, permit, pass, authorisation or permission granted or issued under any of the enactments repealed by this Act shall continue to be in force and shall be deemed to have been granted or issued under the corresponding provisions of this Act.

या अधिनियमान्वये रद्द करण्यात आलेल्या अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमान्वये दिलेले कोणतेही लायसन, परवाना, पास, प्राधिकारपत्र किंवा परवानगी अमलात असण्याचे चालू राहील आणि ती या अधिनियमाच्या तत्सम तरतुदींअन्वये देण्यात आली आहेत असे समजण्यात येईल.

Section 149 FURTHER REPEALS AND SAVINGS CONSEQUENT ON COMMENCEMENT OF BOM. XXV OF 1949 IN OTHER AREAS OF STATE. सन 1949 चा मुंबई अधिनियम क्रमांक 25 हा राज्याच्या इतर प्रदेशात अमलात आल्याचा परिणाम म्हणून इतर अधिनियमांचे निरसन व व्यावृत्ती.

149 Further repeals and savings consequent on commencement of Bom. XXV of 1949 in other areas of State. सन 1949 चा मुंबई अधिनियम क्रमांक 25 हा राज्याच्या इतर प्रदेशात अमलात आल्याचा परिणाम म्हणून इतर अधिनियमांचे निरसन व व्यावृत्ती..[View all order & notifications]

On the commencement of this Act in any area of the State to which it is extended by the Bombay Prohibition (Extension and Amendment) Act, 1959, the Acts mentioned in Schedule III and in force in that area, shall to the extent specified in the fourth column thereof, stand repealed;

Provided that such repeal shall not affect,—

(a) the previous operation of any Act so repealed or anything duly done or suffered thereunder, or

(b) any right, privilege, obligation or liability acquired, accrued or incurred under any Acts so repealed, or

(c) any penalty, forfeiture or punishment incurred in respect of any offence committed against any Acts so repealed,

(d) any investigation, legal proceeding or remedy in respect of any such right, privilege, obligation, liability, penalty, forfeiture or punishment as aforesaid,

and any such investigation, legal proceeding or remedy may be instituted, continued or enforced and any such penalty, forfeiture or punishment may be imposed, as if those Acts had not been repealed ;

Provided further that,—

(a) any licence, permit, pass, authorisation or permission granted or issued under any of the Acts so repealed shall continue to be in force and shall be deemed to have been granted or issued under the corresponding provisions of this Act, and

(b) notwithstanding the repeal of any of the Acts aforesaid, for all purposes in connection with the liability for, and the levy, assessment and collection or refund of, any tax, duty or fee (including any penalty) leviable,—

(i) under any provisions of section 27 A of the Central Provinces and Berar Excise Act, 1915, or

(ii) under section 112A of the Bombay Prohibition Act, 1949 as in force in the Saurashtra area, or

(iii) before the commencement of this Act in any area under any provisions of any of the Acts repealed by this section, the relevant Acts repealed (including all rules, regulations, notification, and orders made or issued thereunder) shall neverthless continue in force for all such purposes; and all such taxes, duties and fees shall be levied, assessed, collected, refunded and penalty imposed and paid, as the case may be, as if those relevent Acts had not been repealed.

मुंबई दारूबंदी (व्याप्ती वाढविणे व सुधारणे) अधिनियम, 1959 अन्वये राज्याच्या ज्या कोणत्याही प्रदेशास हा अधिनियम लागू करण्यात आला आहे त्या प्रदेशात, अनुसूची तीन मध्ये नमूद केलेले आणि त्या प्रदेशात अमलात असलेले अधिनियम, अनुसूचीच्या चौथ्या स्तंभात निर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत निरसित करण्यात आल्याचे समजण्यात येईल :

परंतु, अधिनियम अशा रीतीने निरसित करण्यात आल्यामुळे,----

(अ) अशा रीतीने निरसित झालेल्या कोणत्याही अधिनियमांच्या पूर्वीचा अमल किंवा तदन्वये योग्यरीत्या केलेली किंवा करू दिलेली कोणतीही गोष्ट, किंवा

(ब) अशा रितीने निरसित झालेल्या कोणत्याही अधिनियमान्वये संपादन केलेला कोणताही हक्क व विशेषाधिकार किंवा पत्करलेली किंवा प्राप्त झालेली कोणतीही जबाबदारी किंवा बंधन, किंवा

(क) अशा रीतीने निरसित केलेल्या अधिनियमापैकी कोणत्याही अधिनियमांविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधाच्या बाबतीत झालेली कोणतीही शास्ती, जप्ती किंवा शिक्षा, किंवा

(ड) उपरोक्त कोणताही हक्क, विशेषाधिकार, बंधन, जबाबदारी, शास्ती, जप्ती किंवा शिक्षा याबाबतची कोणतीही चौकशी, कायदेशीर कारवाई किंवा इलाज;यांस बाध येतो असे समजण्यात येणार नाही; आणि ते अधिनियम निरसित करण्यात आले नव्हते असे समजून अशी कोणतीही चौकशी, कायदेशीर कारवाई किंवा इलाज करता येईल, चालू
ठेवता येईल किंवा अमलात आणता येईल, आणि अशी कोणतीही शास्ती, जप्ती किंवा शिक्षा लादता येईल :

परंतु, आणखी असे की,----

(अ) अशा रीतीने निरसित केलेल्या अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमांन्वये दिलेले किंवा काढलेले कोणतेही लायसन, परवाना, पास, प्राधिकारपत्र किंवा परवानगी अमलात असणे चालू राहील आणि ते या अधिनियमाच्या तत्सम तरतुदींअन्वये देण्यात किंवा काढण्यात आले आहेत असे समजण्यात येईल; आणि

(ब) (एक) मध्यप्रांत व व-हाड उत्पादन शुल्क अधिनियम, 1915 याचे कलम 27-अ च्या तरतुदींअन्वये, किंवा

(दोन) सौराष्ट्र प्रदेशात अमलात असलेला मुंबई दारूबंदी अधिनियम, 1949 याच्या कलम 112-अ अन्वये, किंवा

(तीन) कोणत्याही प्रदेशात हा अधिनियम अमलात येण्यापूर्वी, या कलमान्वये निरसित झालेल्या इतर कोणत्याही अधिनियमांच्या कोणत्याही तरतुदींअन्वये, बसविण्याजोगा कोणताही कर, शुल्क किंवा फी (यात कोणत्याही शास्तीचा समावेश होतो) देणे आणि बसविणे, त्यांची आकारणी करणे आणि वसूल करणे किंवा परत देणे यासंबंधीच्या सर्व कारणांकरिता उपरोक्त अधिनियमांपैकी कोणताही अधिनियम निरसित झाला तरीही. या कलमान्वये अशा रीतीने निरसित झालेले संबंधित अधिनियम (यात तदन्वये केलेले सर्व नियम, विनियम, काढलेल्या अधिसूचना आणि दिलेले आदेश यांचा समावेश होतो) अशा कारणांकरिता अमलात असण्याचे चालू राहील; आणि जणू काही ते संबंधित अधिनियम निरसित करण्यात आले नाहीत असे समजून, असे सर्व कर, शुल्क व फी बसविण्यात येईल, आकारण्यात येईल, वसूल करण्यात येईल, परत करण्यात येईल व दंड बसविण्यात येईल व यथास्थिति, तो देण्यात येईल.

Section 134 A GRAM RAKSHAK DAL. ग्राम रक्षक दल

134 A Gram Rakshak Dal. ग्राम रक्षक दल.[View all order & notifications]

Establishment of Gram Rakshak Dal

ग्राम रक्षक दल स्थापन करणे.
 

(1)

The Village Panchayat constituted under the Maharashtra Village Panchayats Act may, by resolution, or an application signed by not less than 25 per cent. of the Women voters of the Gram Sabha, may request the Sub-Divisional Magistrate of the area, for convening a special Gram Sabha, for t